इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जींचं नोबल श्रीधर तिळवे नाईक
अमर्त्य सेन ह्यांना नोबल मिळालं तेव्हा मी त्यांचं दिलखुलास अभिनंदन केलं होत पण अभिजित बॅनर्जी व इस्थर डिफ्लो (मायकेल क्रॅमर सह )ह्यांना मिळालेल्या नोबलबाबत मात्र सावध राहूनच अभिनंदन करावं असा माझा फील आहे
अर्थशास्त्रातील काहीही न कळणारा पंतप्रधान व अर्थशास्त्रात जेमतेम गती असणारी अर्थमंत्रीण ह्या अजिबोगरीब पार्श्वभूमीवर थोडी अर्थतज्ज्ञांची मदत घ्या असा सल्ला देण्याचा हेतू ह्या नोबलमागे असू शकतो आंतरराष्ट्रीय आर्थिक समुदाय हा आपले अर्थकारण रेटण्यात फार वाकबगार असतो त्यामुळे भारतात भाजपमध्ये राज्यकारभार चालवायला योग्य असणारे प्रमोद महाजन , अटलबिहारी वाजपेयी , सुश्मिता स्वराज्य , अरुण जेटली असे चारही नेते निघून गेलेत आणि आता ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण कळत नाही अशा नेत्यांचा सुळसुळाट झालाय असं जर ह्या समुदायाला वाटत असेल तर त्याने खेळलेली ही खेळी असू शकते
अभिजित बॅनर्जींनी काही महिन्यापूर्वी (१८ जान २०१६ ला) भारतातील श्रीमंतावरील कर वाढवा अशी सूचना केली होती विशेषतः सुपर श्रीमंतावरील त्या पार्श्वभूमीवर हे अधिकच जाणवते त्यानंतर त्यांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारणे व त्यानंतर नोबेल मिळणे हा योगायोगही असू शकतो अभिजित बॅनर्जींच्या ह्या निमित्ताने ज्या मुलाखती होतील त्यात वाजवीपेक्षा अधिक डोस बॅनेर्जीसाहेब देऊ लागले कि आपण समजून चालावं कि आंतरराष्ट्रीय समुदायांनी आपलं काम चोख बजावलं आहे एका अर्थाने हे बरेच आहे कारण सोनाराने कान टोचणे सध्या आवश्यक झाले आहे कारण मोदीसाहेब सद्या कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि मोदींचे विरोधक तर भीषणच आहेत अश्या ह्या पार्श्वभूमीवर हे नोबल थोडं साधकबाधक करूनच पाहावं हे उत्तम ! मात्र एक गोष्ट नक्की मान्य करावी ती म्हणजे दे डिजर्व इट
अभिजित व इस्थर ह्या दोघांच्या गरिबीविषयीच्या संपर्काबद्दल पुअर इकॉनॉमिक्स ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत दोघे म्हणतात
Esther was six when she read in a comic book on Mother Teresa that the city then called Calcutta was so crowded that each person had only 10 square feet to live in. She had a vision of a vast checkerboard of a city, with 3 feet by 3 feet marked out on the ground, each with a human pawn, as it were, huddled into it. She wondered what she could do about it. When she finally visited Calcutta, she was twentyfour and a graduate student at MIT. Looking out of the taxi on her way to the city, she felt vaguely disappointed; everywhere she looked, there was empty space—trees, patches of grass, empty sidewalks. Where was all the misery so vividly depicted in the comic book? Where had all the people gone?
At six, Abhijit knew where the poor lived. They lived in little ramshackle houses behind his home in Calcutta. Their children always seemed to have lots of time to play, and they could beat him at any sport: When he went down to play marbles with them, the marbles would always end up in the pockets of their ragged shorts. He was jealous. This urge to reduce the poor to a set of clichés has been with us for as long as there has been poverty: The poor appear, in social theory as much as in literature, by turns lazy or enterprising, noble or thievish, angry or passive, helpless or self-sufficient. It is no surprise that the policy stances that correspond to these views of the poor also tend to be captured in simple formulas: “Free markets for the poor,” “Make human rights substantial,” “Deal with conflict first,” “Give more money to the poorest,” “Foreign aid kills development,” and the like. These ideas all have important elements of truth, but they rarely have much space for average poor women or men, with their hopes and doubts, limitations and aspirations, beliefs and confusion. If the poor appear at all, it is usually as the dramatis personae of some uplifting anecdote or tragic episode, to be admired or pitied, but not as a source of knowledge, not as people to be consulted about what they think or want or do.
अभिजित ज्या घरात मोठा झाला ते घर अर्थशास्त्राचे होते वडील दिलीप बॅनर्जी चक्क लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आलेले तर आई निर्मला पाटणकर बॅनर्जी मुंबईच्या एल्फिन्स्टनमधून अर्थशास्त्राची पदवी घेऊन भारतातील फेमिनिस्ट इकॉनॉमिक्स ची एक पायोनियर बनलेली ! साहजिकच अर्थशास्त्राचे
बाळकडू घरातच ! पुअर इकॉनॉमिक्स हा जवळ जवळ ६०० पानांचा ग्रंथराज दोघांनीही आपल्या आयांना अर्पण केला आहे हाही विशेष !
ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाचा सर्वात मोठा तडाखा बंगाल प्रांताला बसल्याने बंगाल कायमच डाव्या विचारसरणीचे माहेरघर ठरला आहे बंगालमध्ये ब्राम्हणांचे वर्चस्व कधीच ओसरले नाही उलट कम्युनिस्ट राजवटीने ते वर्णसंघर्षाच्या चौकटीत शाबूत ठेवून तिथल्या जातिसंघर्षाची व वर्णसंघर्षाची हवा काढून घेतली आणि तिथला इंटीलिजन्टशीया डाव्या अंगाने विकास करत राहिला
अमर्त्य सेननी हा डावेपणा शाबूत ठेवत एका विकासकेंद्री वेगळ्या अर्थशास्त्राची मांडणी केली त्यांनी केलेलं दुष्काळाचे विवेचन क्रांतिकारक होते व त्याचा सखोल परिणाम जगावर झाला दुष्काळाविषयीची अनेक राष्ट्रांची पॉलिसी त्यांच्या संशोधनाने बदलली अमर्त्य सेन हे वडील दिलीप मुखर्जींचे मित्र असल्याने व ते अभिजित बॅनर्जींचेही गुरु असल्याने त्यांचा परिणाम अभिजित बॅनर्जींच्यावर होणे अटळ होते
गेली कित्येक वर्षे अमर्त्य सेन दारिद्र्याचा विचार करतायत हाच विचार धरून इस्थेर व अभिजित बॅनर्जींनी स्वतःचे काम सुरु केले त्यांनी केलेल्या संशोधनामुळे भारतातील ५० लाख व जगभरातील १ करोड मुलांचे आयुष्य बदलले आहे आणि म्हणूनच हे नोबल त्यांना दिले गेले असावे वर्षाला ५० लाख मुलांना दारिद्र्यात ढकलणाऱ्या मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावरचा हा उतारा असावा
गरिबांना कार्टून बनवणाऱ्या अर्थशास्त्रापासून वाचवून गरिबांचे व गरिबीचे खरे अर्थशास्त्र शोधण्याचा हा प्रयत्न आहे मुळात क्लासिकल अर्थशास्त्राचा अंत झाल्यानंतर निव्वळ सिद्धांताचे युग संपले प्रतिसृष्टीत सामाजिक बांधिलकीची जागा सामाजिक जबाबदारीने घेतली आणि त्यासाठी अनेक एनजीओज स्थापन झाल्या सामाजिक सेवेतही व्यवस्थापन आले इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जींचं काम हे एनजीओंशी सहकार्य करत करत विकास करते झाले आहे प्रत्यक्ष गरिबांच्या मुलाखती गरिबांचा प्रत्यक्ष गोळा केलेला डेटा जेव्हा आधीच्या सिद्धांतांना खोटा पाडू लागला तेव्हा मग एका नव्या अर्थचौकटीची गरज भासू लागली जगातले १३ % ते १६ %लोक आजही १६ रुपये ते २४ रुपयांच्या डेली उत्पन्नावर जगतात इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जींचं अर्थशास्त्र प्रामुख्यानं त्यांच्यासाठी बोलतं हे न दिसणारे गरीब आहेत असं इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जीं म्हणतात त्यांच्या मते हे गरीब लोक जास्त चांगले इकॉनॉमिस्ट असतात कारण कमी पैश्यात त्यांना बरंच काही मॅनेज करायचं असतं ह्याला मी काटकसरीनं येणार शहाणपण म्हणेन पण हे गरिबांच्यातील प्रत्येकाकडं असतं ? दारूत उडणाऱ्या पैश्याचं मग काय करायचं कि हा समाजशास्त्रीय प्रश्न असल्यानं त्याची अर्थशास्त्रीय मीमांसा करायची नाही ?
इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जींचं अर्थशास्त्र गरिबांना पगार नसतो आणि त्यामुळं रिटायरमेंट प्लानही नसतो अनेकदा त्यांना मध्यमवर्ग व उच्च वर्ग ह्यांना सहज मिळणाऱ्या इन्फर्मेशनचा एकसेस नसतो आणि त्यामुळेच त्यांना लसी माहित नसतात आणि सरकारी योजनाही हे अधोरेखित करत गरिबांचे सेविंग्स अल्प असतं आणि त्यांना हॅन्डल करण्यासाठी येणारा खर्च सेविंग्जपेक्षा अधिक असतो मग ह्या सेविंग्जनं जावं कुठं असा प्रश्न दोघेही उपस्थित करतात
इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जीं गरिबांच्या आयुष्याची सखोल आर्थिक चौकशी सादर करतात त्या चौकशीतून एनजीओंना काय करता येईल सरकारला काय करता येईल ह्यांच्याविषयीचे पुश तपशीलवार सुचवतात म्हणूनच मी म्हणालो कि नोबल सत्कारणी पडले आहे मोदींनी जर काय हे पुश नीट अभ्यासले असते तर कदाचित त्यांच्या एक्झिक्युशनमध्ये जी भगदाडे निर्माण झाली ती निर्माण झाली नसती अजूनही वेळ गेलेली नाही अर्थव्यवस्था बदलायला नुसते धाडस असून चालत नाही तर आपण जे पुश देणार आहोत त्याचे तपशील त्यांच्या होणाऱ्या परिणामांचे तपशील नीट माहित असावे लागतात आशा आहे मोदी आमच्यासारख्यांचे ऐकणार नाहीत निदान आंतरराष्ट्रीय समुदायाने दिलेल्या ह्या नोबल पुशचं ऐकतील
गरिबीचं श्रीमंत अर्थशास्त्र देणाऱ्या इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जींचं मनापासून अभिनंदन !
आणि हो इस्थेर डिफ्लॉला सारखं सारखं अभिजित बॅनर्जींची पत्नी म्हणू नका ती स्वतंत्र प्रज्ञेची अर्थशास्त्रज्ञ आहे आणि त्याची आई मराठी आहे म्हणून डान्स करण्यापेक्षा ती मांडत असलेल्या फेमिनिस्ट अर्थशास्त्राची थोडी दखल घ्या
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment