Posts

Marathi literature | Wikipedia audio article

Image
प्रजासत्ताकदिनी थोडे चिंतन व्हावे म्हणून श्रीधर तिळवे नाईक भारतीय प्रजासत्ताक हे कधीच सर्व भारतीयांनी पाठिंबा दिलेले प्रजासत्ताक न्हवते तर बहुसंख्याक भारतीयांनी पाठिंबा दिलेले प्रजासत्ताक होते . हा बहुमताचा पाठिंबा काँग्रेसला होता आणि काँग्रेसने तिला अभिप्रेत असलेले प्रजासत्ताक निर्माण करण्यासाठी संविधानाची निर्मिती केली जिला बाबासाहेब आंबेडकरांचाही पाठिंबा होता किंबहुना ह्या संविधान निर्मितीत त्यांचा सिंहांचा वाटा होता काँग्रेस आणि आंबेडकर ह्यांच्यात सहमतीचे मुद्दे तब्बल ९० % होते आणि जिथे सहमती न्हवती अशा मुद्द्यांची चर्चा बाबासाहेबांनी नंतर केली काँग्रेसने तयार केलेलं हे संविधान हिंदुत्ववाद्यांच्या सहमतीने तयार करण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी ह्या काळात संविधानाबाबत हिंदुत्ववादी गोंधळलेले होते स्मृतींच्या परंपरेकडे सरकणे शक्य नाही आणि आधुनिकता पेलत नाही अशी त्यांची गोची होती साहजिकच जिला ते आता भीमस्मृती म्हणतात आणि परंपरेत बसवू पाहतात तिच्याशी तडजोड करण्यावाचून त्यांच्याकडे ह्या काळात तरी पर्याय न्हवता असे दिसते त्यांना अभिप्रेत असलेले हिंदू राष्ट्र हा एक भावनिक परंपराब...
१९९० नंतर जगाच्या इतिहासात इतके विविध धक्कादायक शोध लागलेत की आधीचे इतिहास कचऱ्याच्या पेटित टाकायच्या लायकीचे झालेत पण मराठी लोकांचा ह्याबाबतीतला अनभिज्ञपणा तारीफेकाबील ! महान विचारवंतांना दुखवायची भारतीय विचारवंतांची तयारी नाही त्यामुळे तडजोडीचे इतिहास पुन्हा पुन्हा सांगितले जातात अस्मितांचे इतिहास घेऊन राजकारण खेळले जाते  सत्य काय आहे त्यापेक्षा कोणतं सत्य मांडले म्हणजे लाईक्स मिळतील फॅनफॉलोइंग मिळेल मते मिळतील त्याचा विचार करून कालबाह्य झालेला इतिहास सादर केला जातोय गोड बोलणं आणि खोटं बोलणं ह्यातील अंतर सर्वांना कळो ह्याच शुभेच्छा श्रीधर तिळवे नाईक 
मराठी साहित्याची उलटी गंगा :श्रीधर तिळवे नाईक  कुठलेही युग अद्ययावयता जोपासण्यासाठी अद्ययावत माध्यमे वापरत पुढे जात असते किंबहुना जितके माध्यम अद्ययावत तितके ते युग अद्ययावत ! प्रत्येक युगात अद्ययावत माध्यमे वापरणाऱ्यांना सहजासहजी जागा मिळत नाही त्यामुळे अद्ययावत लोकांना बंड करावे लागते आणि आपल्या युगाची नवता तिच्यातील अद्ययावतता विश्लेषण करून मांडावी लागते चौथ्या नवतेला हा संघर्ष हा अटळ होता आणि तिने तो केलाही ! कुठल्याही  नवतेतील दुसरी व तिसरी पिढी ही पहिल्या पिढीपेक्षा आपली नवता अधिक चांगल्या रित्या पेलते हा इतिहास असल्यानेच मी चौथ्या नवतेची मांडणी करतांना आमच्या ऎशोत्तर पिढीपेक्षा नव्वदोत्तर पिढी आणि नव्वदोत्तर पिढीपेक्षा दोन हजारोत्तर पिढी आमच्यापेक्षा ताकदीने लिखाण करेल अशी मांडणी केली होती प्रत्यक्षातही आमच्यापेक्षा नव्वदोत्तरीत सलील वाघांच्या पासून नितीन वाघ संतोष पवारपर्यंत आणि  आत्ता ओंकार कुलकर्णी प्रणव सुखदेव पासून स्वप्नील शेळकेपर्यंत अनेकजण अतिशय अव्वल लिखाण करतांना दिसतायत पण एक गोष्ट जी बदलेल असं वाटलं होतं ती मात्र बदललेली दिसत नाही ती म्हण...
सत्य किती ? सत्ये किती?श्रीधर तिळवे नाईक  गेले कित्येक लेख आपण सत्याविषयी चौथी नवता काय म्हणते याचा शोध घेत आहोत. पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे दोघेही एकच एक सत्य मानत होते आणि तशी मांडणी करत होते. याला शह देण्यासाठी म्हणून उत्तराधुनिकतेने सत्य अनेक असतात असा सिद्धांत मांडला आणि संपूर्ण आधुनिक वाद मोडीत काढला . यामागे नेमके काय कारण होते? यामागे कारण होते उत्तराधुनिक ज्ञानाची quantam प्रक्रिया जी मुळातच ऑब्जेक्टिव्ह कडून सब्जेक्टिव्ह कडे आली. सर्वसाधारणपणे पुरोगामी युग हे ऑब्जेक्टिव्ह सत्य शक्य आहे असे मानत होते तर आधुनिक युग ऑब्जेक्टिव्ह सत्य एक आहे हे स्वीकारत होते परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी फॅक्चर झालेले आहे अशी मांडणी करत होते त्यामुळेच फ्रॅक्चरड सब्जेक्ट फ्रॅक्चरड माईंड फ्रॅक्चरड सोसायटी हे आधुनिकतेचे एक फार मोठे समीकरण उदयाला आले. उत्तर आधुनिकतेने याही पुढे जाऊन अनेक सत्ये असतात असा सिद्धांत मांडला आणि सब्जेक्ट इज डेड असे जाहीर केले . त्यातूनच मग बहुविध दृष्टिकोन आणि बहुविध multiple सत्ये यांचा सिद्धांत स्वीकारला गेला यातल...
सागर तळाशीकर दुराव्यातून जिव्हाळ्याकडे श्रीधर तिळवे नाईक सागरची आणि माझी पहिली भेट नेमकी कधी झाली हे आता आठवणं कठीण आहे इतकी ती जुनी आहे भेटल्यापासून हे नाते अंतर ठेवून जिव्हाळा राखणे ह्या कॅटेगरीतील आहे ह्याला आम्ही दोघेही जबाबदार आहोत माझी स्वतःची जीवनशैली म्हणजे जो ज्या समूहातील आहे त्याला त्या समूहाच्या अंगाने भेटणे कविंना कवी म्हणून संन्याश्यांना संन्याशी म्हणून शैवांना शैवाचार्य म्हणून इतिहासकारांना इतिहासकार म्हणून भविष्यावैज्ञानिकांना भविष्यावैज्ञानिक म्हणून ज्योतिष्यांना ज्योतिषी म्हणून समाजशास्त्रज्ञांना समाजशास्त्री म्हणून फिल्म नाटकवाल्यांना फिल्म नाटकवाला म्हणून ! सागर मला भेटला तो नाटकवाला म्हणून ! साहजिकच आमच्या भेटी नाटक , सिरीयल आणि फिल्मच्या पार्श्वभूमीवरच होत राहिल्या तो सुरवातीला एक मितभाषी , माझ्या तथाकथित सिनियॉरिटीचा आदर ठेवणारा म्हणून भेटत असला तरी लवकरच आमची भेट मित्र म्हणून व्हायला लागली त्याने त्यावेळी आंतरमहाविद्यालयीन नाट्यकात काम करायला सुरवात केली होती आणि तो लॉचे शिक्षण घेत होता त्यावेळीही  तो स्वतःचे लाईफ कधीच उघड्यावर आणायचा नाही...
प्रत्यय , शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन ३ श्रीधर तिळवे नाईक कोपेनहेगेन माझ्या आयुष्यात मी इतिहासाचा अभ्यास पाच वेळा केला प्रथम शैवाचार्य म्हणून  भारतीय दर्शनाच्या संदर्भात मग बीएला इतिहास हा माझा मुख्य विषय होता तेव्हा जागतिक इतिहासापासून महाराष्ट्राच्या इतिहासापर्यंत वैज्ञानिक पद्धतीने पुढे पीएचडीला प्रायोगिक रंगभूमीचा अभ्यास करतांना  सरंचनावाद उत्तरसंरचनावाद आणि पोस्टमॉडर्निज्मच्या संदर्भात ,  चौथ्यांदा जेव्हा जेएनयूला पेपर सादर केल्यानंतर शैव पॅरॅडाईम्स आणि युरोपियन पॅरॅडाईम्स हा इतिहासविषयीचा  ग्रंथ सिद्ध केला तेव्हा पुन्हा शैव पद्धतीने आणि पाचव्यांदा जेव्हा थिएटर अकॅडमीत सगळे इजम शिकवायची जबाबदारी मंगेशने टाकली तेव्हा थिएट्रिकल संदर्भात  ! कोपेनहेगेन ट्क्करले ते चौथ्या इतिहासाच्या अभ्यासावेळी ज्यांना कॉन्टिनेन्टल फिलॉसॉफी माहित आहे त्यांना  जर्मन आणि डेन आयडेन्टीटीचे प्रश्न माहित आहेत त्यांना कोपेनहेगेनला टक्करावेच लागते वास्तविक इंग्लिश जर्मन आणि डेन तिन्हीही जर्मनीक तरीही त्यांच्यातले पेच इतिहासकारांना आव्हान देणारे ! ऍटोमि...