प्रत्यय , शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन ३ श्रीधर तिळवे नाईक
कोपेनहेगेन
माझ्या आयुष्यात मी इतिहासाचा अभ्यास पाच वेळा केला प्रथम शैवाचार्य म्हणून भारतीय दर्शनाच्या संदर्भात मग बीएला इतिहास हा माझा मुख्य विषय होता तेव्हा जागतिक इतिहासापासून महाराष्ट्राच्या इतिहासापर्यंत वैज्ञानिक पद्धतीने पुढे पीएचडीला प्रायोगिक रंगभूमीचा अभ्यास करतांना सरंचनावाद उत्तरसंरचनावाद आणि पोस्टमॉडर्निज्मच्या संदर्भात , चौथ्यांदा जेव्हा जेएनयूला पेपर सादर केल्यानंतर शैव पॅरॅडाईम्स आणि युरोपियन पॅरॅडाईम्स हा इतिहासविषयीचा ग्रंथ सिद्ध केला तेव्हा पुन्हा शैव पद्धतीने आणि पाचव्यांदा जेव्हा थिएटर अकॅडमीत सगळे इजम शिकवायची जबाबदारी मंगेशने टाकली तेव्हा थिएट्रिकल संदर्भात ! कोपेनहेगेन ट्क्करले ते चौथ्या इतिहासाच्या अभ्यासावेळी ज्यांना कॉन्टिनेन्टल फिलॉसॉफी माहित आहे त्यांना जर्मन आणि डेन आयडेन्टीटीचे प्रश्न माहित आहेत त्यांना कोपेनहेगेनला टक्करावेच लागते वास्तविक इंग्लिश जर्मन आणि डेन तिन्हीही जर्मनीक तरीही त्यांच्यातले पेच इतिहासकारांना आव्हान देणारे ! ऍटोमिक संरचनेचे रुदरफोर्ड मॉडेल , बोहर मॉडेल आणि नंतरचे आईझेनबर्ग मॉडेल ह्या तिन्हींचे प्रणेते कधी ना कधी कोपेनहेगेनला वावरलेले असल्याने कोपेनहेगेनबद्दल एक सार्वत्रिक आदर आहे
मायकेल फ्रायनला मी वाचक म्हणून ओळखत होतो ते त्याच्या हेडलॉन्ग ह्या कादंबरीमुळे पण जेव्हा कोपेनहेगेनबद्दल कळले तेव्हा ते नाटक मिळवणे अगत्याचेंच होते कारण वर उल्लेख केलेली पार्श्वभूमी ! अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासकीवर अणुबॉम्ब टाकले तेव्हा त्याचा जो भीषण परिणाम झाला त्यातून विज्ञानाचे समाजशास्त्र जे तोपर्यंत कासवाच्या वेगाने धावत होते ते अचानक सश्याच्या वेगाने धावायला लागले वैज्ञानिकांची सामाजिक भूमिका आणि जबाबदारी ह्यावर जोरदार चर्चा सुरु झाली ह्यातूनच त्याचे पडसाद साहित्यात उमटायला लागले ह्याचा अर्थ ह्यापूर्वी वैज्ञानिकांच्यावर नाटके लिहिली गेली न्हवती असे नाही
ह्यापूर्वी बेर्टोल्ट ब्रेश्टने लाईफ ऑफ गॅलिलिओ नावाचे नाटक लिहिले होते पण ते प्रबोधनाच्या पार्श्वभूमीवरचे होते
आधुनिक विज्ञानाची सुरवात जॉन डाल्टनच्या ऍटोमिक सिद्धांताने १८०० साली झाली आणि थॉम्सनने इलेकट्रॉनचा शोध लावून आधुनिक विज्ञान प्रस्थापित केले पण ह्या आधुनिक वैज्ञानिकांच्यावर फार लिखाण झाले नाही अपवाद एडिसनचा होता कारण त्याच्या शोधांनी तंत्रज्ञान प्रस्थापित केले आधुनिकता एडिसनच्या काळापर्यंत निश्चिततेच्या झुल्यावर झुलत होती जरी तिला क्लासिकल सायन्सबद्दल शंका यायला सुरवात झाली होती त्यानंतर आलेल्या उत्तराधुनिक वैज्ञानिकांच्यावरही फार कुणी काम केलेलं न्हवतं विशेषतः विज्ञानाच्या समाजशास्त्राच्या पार्श्वभूमीवर (अटोबायोग्राफीकल व बायोग्राफीकल काम अर्थात खूपच ! )मायकेल फ्रायनचे २००० साली रंगमंचावर आलेले कोपेनहेगेन हे नाटक ह्याबाबतीत माईलस्टोन म्हणावे असे आहे
१९४१ साली नील्स बोहर आणि वेरनेर हायझेनबर्ग ह्यांची जी ऐतिहासिक भेट झाली त्या भेटीत काय झाले ह्याविषयीची वेगवेगळी व्हर्जन्स आणि त्या व्हर्जन्सचा खुद्द ह्या दोन वैज्ञानिकांनी मरणोत्तर घेतलेला शोध ही ह्या नाटकाची थिम . ह्या दोघांना सातत्याने अनिश्चिततेच्या प्रिन्सिपलमधल्या अणुकणांसारखे ठेवत सादर केलेली !
नाटकाची सुरवातच
Margrethe
But why?
Bohr
You're still thinking about it?
Margrethe
Why did he come to Copenhagen?
Bohr
Does it matter, my love, now we're all three of us dead and gone?
Margrethe
Some questions remain long after their owners have died. Lingering like ghosts. Looking for the answers they never found in life.
Bohr
Some questions have no answers to find.
Margrethe
Why did he come? What was he trying to tell you?
Bohr
He did explain later.
Margrethe
He explained over and over again. Each time he explained it became more obscure.
अशी होते इथेच नाटक कुठे जाणार ते स्पष्ट होते मार्गरेथ हायझेनबर्गच्या स्पष्टीकरणाने समाधानी नाहीये कारण प्रत्येक व्हर्जन संदिग्धता वाढवणारा आहे इथेच हे सर्व मरणोत्तर आहे हेही स्पष्ट केले आहे
पुढे मार्गरेथ
Margrethe
Heisenberg was German. We were Danes. We were under German occupation.
असे म्हणून जर्मन आणि डेन ह्या दोन भिन्न ओळखी आहेत हे राष्ट्रवादाद्वारे स्पष्ट करते ( प्रत्यक्षात वेळेच्या वक्तशीरपणापासून ते जर्मनीक भाषा संरचनेपर्यंत ह्या दोन ओळखीत अनेक साम्य आहेत ) आणि इथेच ही भेट युद्धाच्या छायेत झाली होती आणि हायझेनबर्ग जेत्या राष्ट्राचा म्हणून मार्गरेथ पाहात होती हे दिसते
इथून पुढे सुरु होतात ती ह्या भेटींची व्हर्जन्स ! ह्या भेटीत नेमके काय झाले ह्याबरोबरच ह्या वैज्ञानिकांनी ज्या उत्तराधुनिक भौतिकीचा शोध लावला तिचाही शोध इथे घेतला जातो आधुनिक विज्ञानाचे जे काही पायोनियर आहेत त्यातील एक डार्विन त्याने क्रिएशन थेरीला खरा सुरुंग लावला खरा पण वंशवादाला नवे बळही पुरवले डार्विनच्या सिद्धांताचा चुकीचा अर्थ म्हणजे शुद्ध आर्यवंशाची संकल्पना जी हिटलरला जन्म देती झाली आणि तिने निर्माण केलेल्या अनर्थकारी महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ह्या भेटी नाटकात होतायत ! ह्या भेटीतील दोघेही ज्यू ! बोहर अर्धा ज्यू (त्यामुळेच त्याला नाझींनी सोडला कि काय असाही विचार येतो ) !पण राष्ट्रे वेगळी ! एक पराजीत एक जेता !पहिल्या महायुद्धानंतर राख झालेल्या जर्मनीला ज्या काही मोजक्या वैज्ञानिकांनी मदत केली त्यात नील्स बोहर होते साहजिकच हायझेनबर्गला त्यांच्याविषयी त्याही अंगाने कृतज्ञता आहे तर बोहरनां कौतुक आहे ते त्याच्या प्रतिभेचे आणि असाधारण बुद्धिमत्तेचे !भारतात सृजनशीलतेची पारदर्शकताच नाही त्यामुळे दुसऱ्याच्या क्रिएटिव्ह कल्पना उचलण्याची त्यांची चोरी करण्याची लाज नाही त्यामुळे ज्या प्रकारचे पारदर्शक संबंध यूरोपमध्ये आहेत त्याचा मागमूसही भारतात नाही आणि ही सृजनशीलतेबाबतची पारदर्शकता ही ह्या नाटकाचा कणा आहे तिच्यामुळेच हे नाटक शक्य आहे त्यामुळेच मॅट्रिक्स मॅपिंग बद्दलचे श्रेय तळटिपेत दिल्याबद्दल बोहर हायझेनबर्गला खडसावतात तेव्हा हे भारतीय दर्शकाला काय आहे ते समझणे पचणे थोडे अवघडच जाईल हायझेनबर्ग त्याबद्दल माफीही मागतो
Bohr
You never cared what got destroyed on the way, thought. As long as the mathematics worked out you were satisfied.
Heisenberg
If something works it works.
Bohr
But the question is always, What does the mathematics mean, in plain language? What are the philosophical implications?
Heisenberg
I always knew you'd be picking your way step by step down the slope behind me, digging all the capsized meanings and implications out of the snow.
Margrethe
The faster you ski the sooner you're across the cracks and crevasses.
Heisenberg
The faster you ski the better you think.
हा दोघांच्या अटीट्युडमधला फरक आहे
अणुबॉम्ब तयार करणारी संशोधनात्मक तर्क पद्धती नाट्यरूपाने पुढीलप्रमाणे येते
Margrethe
What did he say?
Bohr
Nothing. I don't know. I was too angry to take it in.
Margrethe
Something about fission?
Bohr
What happens in fission? You fire a neutron at a uranium nucleus, it splits, and it releases energy.
Margrethe
A huge amount of energy. Yes?
Bohr
About enough to move a speck of dust. But it also releases two or three more neutrons. Each of which has the chance of splitting another nucleus.
Margrethe
So then those two or three split nuclei each release energy in their turn?
Bohr
And two or three more neutrons.
Heisenberg
You start a trickle of snow sliding as you ski. The trickle becomes a snowball...
Bohr
An ever-widening chain of split nuclei forks through the uranium, doubling and quadrupling in millionths of a second from one generation to the next. First two splits, let's
say for simplicity. Then two squared, two cubed, two to the fourth, two to the fifth, two to the sixth...
Heisenberg
The thunder of the gathering avalanche echoes from all the surrounding mountains.. .
Bohr
Until eventually, after, let's say, eighty generations, 280 specks of dust have been moved. 280 is a number with 24 noughts. Enough specks of dust to constitute a city, and all who live in it.
आणि मग येतात ती अणुबॉम्ब तयार होतांना ह्या वैज्ञानिकांना सतावणारी दडपणे , आपल्यामुळे माणसे मेली तीही एका क्षणात ह्याचा पश्चाताप , युद्धे , प्रसंग आणि त्यातील अनिश्चितता , देशभक्ती आणि मानवता ह्यांच्यातील आंतरिक तणाव , ज्यू म्हणून झालेल्या हत्या आणि आपणही ज्यू असल्याने असलेली दडपणे , सतत मृत्यूची छाया आणि बॉम्बफेकीचे आवाज
हे सर्व अनुभवण्यासाठी हे नाटक प्रत्यक्षच पाहायला हवे .
नाटकाचे दिग्दर्शन वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला मात्र सीन्सच्या भिंत्या तोडणारी उत्तराधुनिकता उत्तम वाटते ती अभिनयामुळे ! एका सिनमधून दुसऱ्या सीनमध्ये सहज सातत्याने होणारा प्रवेश भुताडिया (नील्स बोहर )आणि सागर तळाशीकर ( हायझेनबर्ग ) हे दोघेही केवळ पॉज आणि पॉइज ह्यांच्या समतोलाने लीलया करून दाखवतात नेपथ्य आणि वस्त्रभूषा ह्या करड्या रंगाने अवतरल्याने युद्धजन्य वातावरण एस्टॅब्लिश होते खरे पण ज्या अणुबॉम्बच्याभवती ही चर्चा फिरते त्याचा मागमूसही नेपथ्यात प्रकट होत नाही त्यामुळे फिजन त्याचे अणुबॉम्बमध्ये होणारे रूपांतर लेखकाच्या शब्दांद्वारे आले तरी ते इतर अंगाने येतच नाही एक संयमी ट्रीटमेंट नाटकभर वासासारखी दरवळत राहते खरी पण अणुबॉम्बिक भयाणतेचा धूर नाकातोंडात घुसत नाही घुसते ती वैज्ञानिकांची मानवी ओळख आणि मानवता ! हायझेनबर्गने हिटलरला शेवटपर्यंत अणुबॉम्ब तयार करू दिला नाही आणि त्यामुळे जग वाचले पण जर्मनी मेली आपल्या राष्ट्राच्या पराभवाचा शोक हायझेनबर्गच्या बाजूने व्यक्त होतो खरा पण त्यावर रडावे कि हसावे हे कळणे कठीण होऊन बसते आपण आपल्या देशाशी द्रोह केला ही त्याची बोचरी जाणीव सागरने अतिशय उत्तम रीतीने सादर केली शरद भुताडियांच्या अप्रतिम अभिनयाचा आणखी एक नमुना आपणाला पाहावयास मिळतो आपला सर्वसंचारी अभिनय इथे त्यांना संयत पद्धतीने दाखवणे भाग होते आणि त्यांची धबधब्यासारखी असणारी ऊर्जा इथे धरणातून पाणी सोडल्यासारखी सोडणे आवश्यक होती ते त्यांनी सहजरित्या करून दाखवले तिघांचेही ( तिसरी मेघना भागवत ) फुटवर्क उत्तम काही संवाद बाणाच्या अग्रासारखे आहेत ते तसेच यायला हवे होते पण तेही संयत आले शरद भुताडियांच्या बरोबर काम करणारे सर्वचजण शरद भुताडिया होऊन जातात हा माझा आजवरचा अनुभव हे अपवादात्मकवेळा घडले तरी ह्यावेळी सागर तळाशीकरने भुताडियांना तोडीस तोड टक्कर दिली हे मान्य करावयास हवे रंगमंचावर भुताडिया असले कि बाकीचे दिसत नाहीत ह्यावेळी हे घडलेले नाही सागर तळाशीकरने स्वतःचे काम स्वतः घडवले असावे असे वाटण्याइतपत त्याचा रंगमंचावरचा वावर स्वतंत्र वाटला आणि हे त्याच्या अभिनयाचे फार मोठे यश मानावयाला हवे एकंदरच भुताडियांनी आपला शिष्य योग्य तऱ्हेने तयार केलाय असे वाटले किंग लियरमध्ये भुताडिया सरळ सरळ वन अप होते इथे दोघांच्यातील सामना वनवन झालेला आहे आणि प्रत्ययच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी हे आवश्यक आहे .
एक उत्तम नाट्यप्रयोग दिल्याबद्दल प्रत्यय व शरद भुताडिया ह्यांचे मनापासून आभार !
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment