प्रत्यय . शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन १

परवा आमच्या थिएटर अकॅडमीत कोपेनहेगेन चा अतिशय सुंदर असा प्रयोग झाला आणि कोल्हापूरच्या माझ्या वास्तव्यातील एक मोठा कालखंड झर्र्कन सरकला . हे नाटक व्हावे  अशी मंगेश बनसोड आणि माझी फार इच्छा होती . परिवर्तनवादाला प्रोत्साहन देणारे प्रत्येक नाटक अकॅडेमित झाले पाहिजे ही आम्हा दोघांचीही मनापासून इच्छा आहे आणि मंगेशच्या हातात अकॅडेमिचे नेतृत्व आल्याने हे आता थोडे सोपेही झाले आहे अर्थात मंगेशला हे सोपे जात नाहीये पण तरीही मार्ग काढत तो हे करतो आहे . त्यामुळे प्रथम त्याचे अभिनंदन !

हा प्रयोग झाल्यानंतर आणि मी भुताडियांना सलाम केल्याबद्दल काही प्रश्न निर्माण केले गेलेत  त्याची प्रथम उत्तरे देतो 
तू एकेकाळी प्रत्ययला कट्टर विरोध केला होतास कि नाही मग आता हे कौतूक का  ?

मी विरोध केला होता  ही वस्तुस्थिती आहे ह्या विरोधाची कारणे वैचारिक होती व आहेत ही कारणे पुढीलप्रमाणे

१ माझा मार्क्सवादाला ठाम विरोध होता आणि आहे आणि तो मी कधीही लपवलेला नाही मात्र श्रमांना प्रतिष्ठा देण्यात मार्क्सचा वाटा आहे हे मला मान्य आहे श्रमिकांना न्याय देण्याचा मार्क्सवाद हा योग्य मार्ग आहे असे मला वाटत नाही 
२ विरोधाचे दुसरे कारण प्रत्ययची आत्मग्रस्तता ! प्रत्ययला कोल्हापुरात इतर नाट्यग्रुपही  काही विचार करतात हे मान्य नाही आम्हीच फक्त शहाणे अशी ह्या ग्रुपची समजूत आहे अशी माझी समजूत आहे जी दूर झाली तर मला आवडेल 
३ प्रत्ययचा भर हा अनुकरणावर अधिक आहे त्यामुळे यूरोपमधील वास्तवे युरोपियन नाटककाराकडून उसनी आणायची आणि ती मराठी संस्कृतीला साजेशी पेश करायची अशी त्यांची पद्धत आहे यदाकदाचित मराठी नाटके केली तर ती गो पु वैग्रेंची इतरांनी इतरत्र आधीच केलेली प्रत्ययने स्वतःचे स्वतंत्र योगदान म्हणावे असे केलेले एकमेव नाटक दि धों कुलकर्णी ह्यांचे उत्तर रामायण ! १९८० ते १९८४ ह्या कालखंडात काही झाले असेल तर मला माहित नाही .

४ ज्या कोल्हापुरात प्रत्यय काम करते त्यातले एकही वास्तव कधी प्रत्ययने सादर केलेले नाही कोल्हापूरचा आत्तापत्ताही प्रत्ययच्या नाटकांतून लागत नाही एका अर्थाने कोल्हापुरी हवेच्या वर तरंगणारा हा मार्गी वास्तववाद आहे
५  मार्क्सवाद हा भारतात कायमच ब्राम्हणांच्या हातातले खेळणे बनून वावरत असतो त्यामुळे शरद पाटील कांचन इलय्या ह्या सारख्या ब्राम्हणेतर विचारवंतांशी कसलेही देणेघेणे त्याला असत नाही ब्राम्हणी पोथीनिष्ठता मार्क्सवादात काठोकाठ भरलेली आहे मला डांगे रणदिवे प्रभूंतीपेक्षा शरद पाटील जास्त जवळचे विचारवंत वाटतात प्रत्ययमध्ये शरद पाटलांना काडीचेही स्थान नाही अशा ब्राम्हण्यग्रस्त संस्थेशी कोण दोस्ती करणार ? प्रत्ययने ब्राम्हणेतरांचे काय केले ह्याचे जरा स्टॅटिस्टिक्स आम्हाला समजावून सांगितले तर बरे होईल असे वाटते


तरीही हा प्रयोग होणे मला गरजेचे का वाटले ?

१ प्रत्ययचे काहीही दोष असले तरी त्यांच्या परिवर्तनवादाशी असलेल्या कमिटमेंटविषयी मला काडीचीही शंका नाही

२ एक प्रायोगिक नाट्यसंस्था म्हणून प्रत्ययने जो स्वतःचा विकास घडवला तो केवळ लाजवाब आहे कोल्हापूरसारख्या शहरात हे घडवणे किती कठीण आहे ह्याची मला नीट कल्पना आहे

३ तिसरे कारण म्हणजे  विरोध हा फक्त वैचारिक असावा असे मला वाटते आपला स्पर्धकदोस्त   आपल्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात श्रेष्ठ असेल तर त्याला मनमोकळी दाद देणे हे मला मानसिक स्वास्थ्याचे लक्षण वाटते . आशयचा ग्रुप कवितेत प्रत्ययला सरपास करून गेला पण नाट्यक्षेत्रात प्रत्ययने अभिरुची देवल आशयसकट सगळ्यांना झोपवलं आणि केवळ सरपासच न्हवे तर फार फार पुढची मजल गाठली हे मान्य करायला आणि त्यांच्या ह्या यशाला मनमोकळी दाद द्यायला काय हरकत आहे ?

४ प्रत्ययने सादर केलेले नाट्यप्रयोग हे दर्जाच्या पातळीवर काहीवेळा जागतिक दर्जाचे आहेत असं मला वाटतं विशेषतः किंग लियर ,राशोमान आणि  घोडा ह्या  नाटकांचे  प्रयोग ह्याशिवाय कोपेनहेगेन , उत्तर रामायण ह्यांचे प्रयोगही अव्वल दर्जाचे होते 

५ अलीकडे सनातनवादी चळवळ इतकी फोफावलीये कि सर्वच परिवर्तनवाद्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे असे माझे स्पष्ट मत आहे मी विवेकानंद -बसवेश्वर -शाहू -फुले -गांधी - आंबेडकर ह्यांना मानत असलो तरी  किंवा मंगेश फक्त शाहू -फुले -आंबेडकरवादी असला तरी मार्क्सपासून आणि मार्क्सवाद्यांपासून फटकून राहण्याची गरज आहे असे आता आम्हाला वाटत नाही आणि प्रत्ययनेही वाटा पळवाटा , सत्यशोधक आणि महादेवभाई ह्या  नाटकांना स्वीकारलेले असतांना तर बिलकुलच नाही 

६ सहावे  कारण शरद भुताडिया ज्यांच्यावर  मी सविस्तर दुसऱ्या भागात लिहीन .

७ सातवे कारण प्रत्यय हल्ली वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नाटकाद्वारे जे  प्रसार करतय ते  योग्यच आहे आणि त्याला सर्वांनी साथ द्यायला हवी मला निखळ देशीवाद पटत नाही अमे -युरोपमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्या संदर्भातील साहित्य आपण मराठीत आणलेच पाहिजे असे मला वाटते . शरद नावरे ह्यांनी केलेलं हे नाट्यरूपांतर फार महत्वाचे आहे 

त्या पार्श्वभूमीवर साहजिकच कोपेनहेगेन ही काळाची गरज आहे असे वाटते मी अकॅडमीत रॅशनॅलिजम शिकवताना वैज्ञानिकाची व्यक्तिरेखा सादर करतांना अभिनेत्याला थोडाफार रॅशनॅलिजम कळला पाहिजे असे म्हणत असतो त्याचे थोडेफार प्रत्यंतर विध्यार्थ्यांना यावे अशीही  इच्छा असल्याने कोपेनहेगेन आमच्यासाठी अटळ होते . 

श्रीधर तिळवे नाईक 







Comments

Popular posts from this blog