प्रत्यय ,शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन २ शरद भुताडिया आणि आत्मनिष्ठ अभिनयघराणे
श्रीधर तिळवे नाईक
संगीताची जशी स्पष्ट घराणी असतात तशी अभिनयाचीही घराणी असतात एक शैवाचार्य म्हणून अभिनय शिकणे गरजेचे असल्याने ते शिकताना आणि गेली कित्येक वर्षे अभिनय शिकवताना मी हे सत्य शिकलो आहे शैव परंपरेने अभिनयाचे दोन प्रकार केलेले आहेत
१ नाट्यधर्मी वा कलाधर्मी अभिनय
२ लोकधर्मी म्हणजे लोकांचे अनुकरण करून करावयाचा अभिनय
इंग्लिशमध्ये ज्याला BECOMING म्हणतात त्याला शैव शब्द आहे भव आणि ह्या भवण्याची शक्ती ती भवानी ! हे भवणे मानवी पार्थिव पातळीवर भवन भुवन आणि भव्यता निर्माण करते त्याचा अंतःकरणात्मक व्यवहार व चलनवलन म्हणजे भाव होय अभिनेत्याने त्या त्या सीनप्रमाणे स्वतःला भावांनी संचरित करावयाचे आणि त्या त्या सीननुसार नाट्यधर्मी वा कलाधर्मी किंवा लोकधर्मी अभिनय करावयाचा अशी शैव कल्पना आहे ह्या अभिनयानुसार मग रसिकांच्यात रस निर्माण होतात आणि रसनिष्पती हे कलेचे प्रधान कार्य आहे असे शैव मानतात
शैव परंपरेनुसार अभिनयाची दोन घराणी आहेत
१ अभिजात घराणे
२ लोक घराणे
शैव दोन्ही घराणी महत्वाची मानतात आणि अनेकदा शूद्रकासारखे शैव नाटककार लोकघराण्याला प्राधान्य देणारे मृच्छकटीकं सारखी नाटके लिहितात
भरत त्याच्या नाट्यशास्त्राची सुरवातच पितामह म्हणजे पितर आणि शिव ह्यांच्या नमनाने करतो आणि मग हळूच एक वैदिक भाकडकथा सांगून शैवांचे श्रेय हिसकावून घेतो चौथ्या अध्यायात नाट्यशास्त्रात त्याला हे तांडव ( हे फक्त नृत्याचे न्हवे तर नृत्यनाट्याचे नाव आहे ) तंडू कडून आणि तंडू ला ते शिवाकडून मिळाल्याचा स्पष्ट उल्लेख करतो आणि इथेच आंगिक अभिनयाची चर्चा करतो मात्र ह्या नाट्यशास्त्राचे त्याने प्रचंड वैदिकीकरण घडवलेले आहे किंबहुना मूळ शैव नाट्यशास्त्राचे हे भ्रष्ट वैदिक रूपांतरण आहे त्यामुळे एक दुष्परिणाम होतो आणि झाला तो म्हणजे ही दोन्ही अभिनय घराणी धार्मिकतेत अडकून पडली आणि संकेतनिष्ठ झाली ही संकेतनिष्ठता इतकी कट्टर झाली कि संकेतनिष्ठ अभिनय हाच ह्या दोन्ही घराण्यांचा विशेष बनून गेला आणि अभिनय शिकणे म्हणजे अभिनयाचे संकेतशास्त्र शिकणे असा गैरसमज पसरला आणि दहाव्या शतकानंतरची नाट्यकला ही निर्जीव संकेतांची मृतप्राय आणि तेच तेच सिन सादर करणारी मृतोपजीवी कला बनून गेली
पाश्चात देश ह्याला अपवाद न्हवते भारतात भरताने जशी सांकेतिकता निर्माण केली तशीच सांकेतिकता ख्रिश्चन धर्मामुळे ग्रीकोरोमनमध्ये ऍरिस्टोटलद्वारा निर्माण केली गेली ह्या सांकेतिकतेला छेद दिला तो ख्रिस्तोफर मार्लो ह्या नाटककाराने त्याने कधी संकेत पाळून तर कधी संकेत धुडकावून स्वतःची नवी नाट्यकला निर्माण केली आणि त्याच्या ह्या नाट्यकलेला कळसास पोहचवले ते शेक्सपिअरने ह्या दोघांच्या नाट्यकलेतून अभिनयाचे तिसरे घराणे जन्मले हे घराणे होते भावप्रधान आत्मनिष्ठ घराणे त्या काळात माईक नसल्याने ह्याही घराण्याचा भर वाचिक अभिनयावर होता पण ह्या घराण्याने आवाजी लाऊड अभिनयाचे पारंपरिक संकेतशास्त्र पूर्ण धुडकावून लावले आणि ज्याला नैसर्गिक अभिनय म्हणतात त्याच्या शेजारी अभिनयाला आणून ठेवले हा प्रबोधनात्मक प्रोजेक्टचाच भाग होता आणि ह्याचे प्रेरणास्थान रॉजर बेकनच होता त्याचे धर्म आणि निसर्ग विज्ञान ह्यांचे समतोल साधण्याचे तत्वज्ञान ह्याकाळात इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाले होते आणि ह्या दोघांच्या नाटकात ख्रिश्चनिटी आणि निसर्ग विज्ञान ह्यांचा समतोल साधण्याचा पहिला प्रयत्न होता पुढे गटेच्या फाउस्टने रोमँटिसिझम पूर्णच प्रस्थापित केला आणि हे आत्मनिष्ठ अभिनय घराणे यूरोपमध्ये पूर्णच स्थिर झाले
ह्या घराण्यात नेमके काय होते ?
१ क्लासिकल आणि लोक नाटकांतील अतिवादी वा संकेतवादी अभिनय पूर्ण फेटाळून लावला जातो
२ संहितेतील व्यक्तिरेखेकडे पूर्णपणे आत्मनिष्ठ दृष्टिकोनातून पाहून तिच्या देहशैलीचे आणि भावभावनांचे तर्कप्रधान विश्लेषण केले जाते
३ ती व्यक्तिरेखा स्वतःच्या शरीरशैलीत पूर्णपणे मुरवली जाते
४ ती मुरवतानाच स्वतःतील ऊर्जेने तिला जिवन्त करण्याचे प्रयत्न केले जातात
५ प्रत्यक्ष प्रयोगात किंवा दृश्यात मग ती अधिकाधिक रसरशीतपणे सादर करण्याचा प्रयत्न केला जातो
मराठीत ह्या घराण्याची ही अभिनयशैली शैली कित्येकदा अजागळ पद्धतीने वापरली जाते पण ती योग्य पद्धतीने
वापरली तर काय होते ह्याचे जितेजागते अतिशय खणखणीत उदाहरण म्हणजे शरद भुताडिया होय . हे घराणे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण ह्या घराण्याने दिलेले राजेश खन्ना आणि शाहरुख खान हे दोन सुपरस्टार ! मराठी रंगभूमीवर ह्या घराण्याने घातलेल्या सुंदर धुमाकूळाचे सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व म्हणजे काशिनाथ घाणेकर आणि नाना पाटेकर !
ह्या घराण्यात नटाची वा नटीची देहबोली पूर्णपणे बदलत नाही मात्र तिचा कोन त्या त्या व्यक्तिरेखेनुसार निसर्गतः बदलतो हा कोन जर बदलला नाही तर व्यक्तिरेखा जिवंत होत नाही आणि उरते ते नटाच्या त्याच त्याच देहबोलीचे गचाळ आणि उर्जाहीन कलेवर ! चांगली लेखकसंहिता ह्या घराण्याला मिळाली नाही कि ह्यांची देहशैली उघड्यावर पडते आणि तिचा उजळणीचा अभ्यासक्रम कंटाळवाणा होतो त्यामुळे ह्या लोकांना कायमच चांगल्या लेखकांची आणि चांगल्या संहितांची आणि व्यक्तिरेखांची गरज भासते . वाईट स्क्रिप्ट पण चांगला अभिनय हा विरोधाभास ह्यांच्याबाबतीत घडत नाही संहिता वाईट तर आणि त्यामुळे अभिनयही वाईट हेच ह्यांचे प्राक्तन असते त्यामुळे चांगल्या संहितांची निवड हे ह्यांच्यासाठी आवश्यक असते ज्या संकेतबद्धतेला हे अभिनयपटू टाळतात तीच संकेतबद्धता ह्यांच्या ठायी निर्माण होण्याचा धोका असतो मात्र ही संकेतबद्धता घराण्याची नसते तर वैयक्तिक देहबोलीची , हावभावांची व भावशैलीची असते
मग हे मर्यादित कुवतीचे अभिनयपटू असतात का ? तर नाही ! जर हे योग्य संहिता निवडत गेले तर आयुष्यभर उत्कृष्ट अभिनय पुरवू शकतात ह्याचे उत्तम उदाहरण खुद्द शरद भुताडिया आहेत ( अलीकडे नाना पाटेकरांनी ते काला चित्रपटात पुन्हा सिद्ध केले आहे )
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद भुताडियांच्या अभिनयाचा विचार करायला हरकत नाही
१ भुताडियांच्या अभिनयाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ते आपल्या व्यक्तिरेखेचं डायग्नोसिस कसे करतात ? ते नेहमीच ह्या प्रश्नाचे उत्तर शिताफीनं टाळतात मी कोपेनहेगेनच्या प्रयोगानंतर हा प्रश्न विचारला होता तेव्हा पुन्हा एकदा सागरच्या हातात माईक देऊन त्यांनी हा प्रश्न शिताफीनं चुकवलाच पण त्यांच्या अभिनयाचा चाहता म्हणून हा प्रश्न मला कायमच पडला आहे एक गोष्ट नक्की ती म्हणजे ते डायग्नोसिस नक्कीच करतात जे ह्या घराण्यासाठी आवश्यक आहे आणि कधीतरी शांतपणे त्यांना ह्यावर प्रश्न विचारून हे रहस्य उलगडणे आवश्यक आहे
२ सर्वसंचारी शारीरिक गती ही ह्या घराण्यात मुख्य व्यक्तिरेखा रंगवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते शरद भुताडियांची सर्वसंचारी शारीरिक गती ही अत्यंत अव्वल दर्जाची आहे तिला वेग आणि पॉज दोन्ही गोष्टी नीट अवगत आहेत गतीच्या त्वरणावरacceleration वर त्यांचा अभूतपूर्व कंट्रोल आहे मी ती गती आणि तो कंट्रोल पाहिला घोडा ह्या नाटकात तोपर्यंत कोल्हापुरात तो मी कधीच पाहिला न्हवता (अपवाद काशिनाथ घाणेकरांचा अश्रूंची झाली फुले मधला अभिनय ) सुरेश भटांच्या मखमली तारुण्य माझे सादर करतांना त्यातले विडंबन आणि सत्तेचा माज त्यांनी जबरदस्त पेलले होते आधीची सर्वसंचारी शारीरिक गती आणि ह्या गाण्यात ती गती बदलून टिकवायचा कंट्रोल केवळ थरारक होता
३ सर्वसाधारणपणे प्रायोगिक नाटकात हे घराणे चालत नाही असा एक गैरसमज पसरला आहे हा गैरसमज खोडून काढणारे शरद भुताडिया हे प्रायोगिक रंगमंचावरचे कदाचित पहिले अभिनेते आहेत (अलीकडे इरफान खानने ज्याला मी समांतर चित्रपटांचा शाहरुख खान म्हणतो हा गैरसमज पुन्हा दूर केला आहे )
४ ह्या घराण्यात वाचिक अभिनय फार महत्वाचा असतो आणि शरद भुताडिया ह्याबाबत अव्वल आहेत चित्रपटात काम करतांना त्यांचा हा वाचिक अभिनय कुठे जातो हा प्रश्न मला कायमच पडलेला असतो पण नाटकात मात्र ते वाचिक अभिनयाचे प्यादे अचूक सरकवत जातात आणि त्या प्याद्याचा शेवटी राजा बनलेला असतो आपला आवाज प्रचंड घनदाट नाही ह्याची त्यांना जाणीव आहे मात्र तो प्रभावी कसा बनवावा हे त्यांना अचूक माहिती आहे तो आवाज सुरवातीपासूनच पकड घेणाऱ्यातला नाही पण हळू हळू तुम्ही कन्व्हिन्स होत जाता कि ह्या व्यक्तिरेखेचा आवाज जो भुताडियांनी दिलाय तोच असू शकतो
५ आंगिक वा कायिक अभिनयाचे दोन भाग असतात
अ ) उपजत आंगिक अभिनय हा तुमच्याकडे उपजतच असतो
ब ) अवगत आंगिक अभिनय हा तुम्हाला प्रशिक्षणाद्वारे अवगत करावा लागतो
शरद भुताडियांच्याकडे उपजत आंगिक अभिनय प्रचंड आहे ह्याबाबतीत ते गर्भश्रीमंत आहेत असं म्हणायला हरकत नाही कुठल्याही व्यक्तिरेखेला सादर करतांना ते त्याचा पुरेपूर वापर करतात काहींच्याजवळ काहीवेळा उपजत आंगिकता प्रचंड असते पण अभिनय मर्यादित असतो उदाहरणार्थ धर्मेंद्र आणि जितेंद्र भुताडियांच्याकडे अभिनयही अमर्यादित आहे ते स्वतःच्या देहबोलीच्या नव्या नव्या शक्यता शोधू शकतात
६ भुताडियांचे फुटवर्क हा अभ्यासाचा विषय ठरावा वेगवान , मध्यगती , मंद्रगती आणि अतिमन्द्र गती अश्या चारही गतीत त्यांचे फुटवर्क लीलया फिरत असते त्यांचे वळणेही अचूक असते मुख्य म्हणजे ते कधीही दृश्यात्मकतेला छेद देणारे असत नाही अपवाद उत्तररामायण असेल जिथे हा समतोल मी पाहिलेल्या प्रयोगात १ % सुटला होता ग्रामीण भागातील अनुभवाचा अभाव ह्याला जबाबदार होता कि काय माहित नाही बाकीच्यांनी हा अभाव १० % वर न्हेला आणि नाटक सर्वोत्कृष्ट होता होता उत्कृष्टच राहिले त्याउलट किंग लियरमध्ये त्यांनी अक्षरशः बाप म्हणावे असे फुटवर्क केले होते आणि राशोमान मध्ये त्याचा पाया घातला गेला होता
७ ह्या घराण्यात सर्वात महत्वाची असते ती भावनाशीलता आणि ऊर्जा ! भुताडियांची भावनाशीलता संयत आहे पण गंमत म्हणजे त्यांची ऊर्जा अक्षरशः प्रचंड उन्मुक्त आहे जिच्या सहाय्याने ते रंगमंचावर अक्षरशः थैमान , धिंगाणा आणि थरथराट घालू शकतात ही ऊर्जा दुर्लभ आहे आणि तिला मूळच्या स्वभावातील संयतशीलतेची जोड जेव्हा मिळते तेव्हा ते केवळ एक अजोड कॉम्बिनेशन ठरते ह्या घराण्याचे अनेक सर्वोच्च मानबिंदू त्यामुळे तयार होतात आणि भुताडियांच्या अभिनयाने ते तयार केलेले आहेत त्यांचा किंग लियर हा जगातल्या सर्वोत्कृष्ट किंग लियरपैकी एक आहे
७ कुठल्याही व्यक्तिरेखेचा आहार्य अभिनय लेखक ठरवत असला तरी ज्याला आम्ही फिल्म इंडस्ट्रीत बिझनेस म्हणतो तो अनेकदा दिग्दर्शक आणि अभिनयपटू ह्यांच्यावर अवलंबून असतो स्वतःच्या सर्वसंचारीपणाला वाव मिळेल असा आहार्य भुताडिया निवडतात आणि त्यामुळे मर्यादित नेपथ्यशीलतेची अट पाळतच ते नाटकांची दृश्यरचना सादर करत असतात त्यांना भडकपणाचा तिटकारा आहे हे त्यांच्या आहार्यतेतही स्पष्टपणे जाणवते
मला एकदा त्यांना नेपथ्याने पूर्ण भरून आणि भारून गेलेल्या रंगमंचावर ते कसे अभिनय करतात ते पहावयाचे आहे पायात बेड्या पडलेला राजकैदी काय करतो ते पहावयाचे आहे बेड्या नसलेल्या रंगमंचावर ते बाप आहेतच स्वतःची वस्त्रे रंगमंचावर कशी हाताळावीत तेही त्यांच्याकडून शिकावे असे आहे विशेषतः वस्त्रांचा पायघोळपणा ते लीलया हाताळतात . शस्त्रवापराबाबत ते ठीकठाक आहेत . इतर वस्तूंचा वापर मात्र ते डौलाने करतात .
८ आणि शेवटी नटाच्या सभ्यतेचा प्रश्न ! तिची उंची नट कुठली नाटके आणि व्यक्तिरेखा निवडतो त्यावर ठरते ह्याबाबत भुताडियांची नाटकातील सभ्यता कधीच सुटली नाही व्यावसायिक ठिकाणी ती पाळता येत नाही पण तिथेही ती फार सुटलीये असे वाटत नाही
एकंदर काय शरद भुताडिया आत्मनिष्ठ घराण्याचे नटसम्राट आहेत किंग आहेत परवा ह्या राजाला मी रंगमंचावरून सॅल्यूट ठोकलेलाच आहे आता लिखाणात पुन्हा एकदा सॅल्यूट ठोकतो मी सर्वोत्कृष्टतेचा पुजारी आहे आणि ती ह्या देशात फार अपवादात्मक आहे . डॉक्टर शरद भुताडिया , रंगमंचाचा एक चाहता म्हणून गेली कित्येक वर्षे मी तुम्हाला पाहतोय तुमच्या अभिनयाने माझ्यासारख्या रसिकाला खूप श्रीमंत असे अनेक सुवर्णक्षण दिले त्या सुवर्णक्षणांबद्दल तुमचे मनापासून आभार

Your Website Is Nice And Informative. Please Keep Continue Such Kind Of Good Effort. If you want to watch sanju full movie visit our site http://allviralstorys.blogspot.com. Sanju is a Bollywood film directed by Rajkumar Hirani which features Ranbir Kapoor in the major role. The film is based on the life of famous film actor Sanjay Dutt. Ranbir Kapoor acts in the shoes of Sanjay Dutt and did a great job. The film received a positive response from the cinema fans.
ReplyDelete