बा सी मर्ढेकर मर्ढेकर हे व्यक्तिमत्व एक विलक्षण रसायन होते . एकीकडे जुन्या छंदात विशेषतः पादाकुलक अभंग ओवीत ते नवी कविता लिहीत होते आणि दुसरीकडे नवे सोंदर्यशास्त्र रचत होते मराठीची एक परंपरा अशी कि दोन पातळीवर कोणी काम करत असेल तर त्या कवीची कविता साईडलाईन करायची आणि आणि त्याला समीक्षक म्हणून जास्तीत जास्त गाजवायचे मर्ढेकरांच्या बाबत हेच घडले आणि मराठीत त्यांच्या कवितांची चर्चा कमी आणि सौन्दर्यशास्त्राची चर्चा जास्त झाली ह्याला छेद साठोत्तरी पिढीने दिला आणि मर्ढेकरांच्या कविता चर्चेत आणायला सुरवात केली त्यांनी मर्ढेकरांचे सौन्दर्यशास्त्र साईडलाईन केले आणि कवितेतला आधुनिकतावादी आशय केंद्रस्थानी आणला . मात्र एका मुद्दयांवर चर्चा झालीच नाही तो मुद्दा म्हणजे कवितेत पक्के आशयवादी असणारे मर्ढेकर समीक्षेत आकृतिवादी का झाले ? ह्या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन कवितेच्या स्थितीत आहे . रोमँटिसिझमने भारावलेल्या त्या कालखंडात रोमँटिक भावना असली म्हणजे काम भागते अशी गैरसमजूत पसरली आणि रविकिरण मंडळाच्या त्याच त्याच प्रतिमा जुन्या कढीला नवा ऊत आणावा तश्या नवा ऊत आणून साद...
Popular posts from this blog
चौथी नवता चौथीच का श्रीधर तिळवे नाईक मराठीत पहिली दुसरी तिसरी चौथी अशा तऱ्हेची इतिहास मांडणी करण्याची परंपराच नाही साहजिकच पहिली नवता दुसरी नवता असं म्हंटल कि लोक दचकतात पाश्चात्य देशात मात्र १९६० नन्तर अशी मांडणी कॉमन होत गेली विशेषतः अल्विन टॉफ्लरच्या थर्ड वेव नंतर अशी मांडणी लोकप्रिय झाली आपल्याकडे द भि कुलकर्णी ह्यांनी पहिली परंपरा दुसरी परंपरा अशी मांडणी केली व ह्या नावाचे ग्रन्थही लिहिले विशेषण वापरण्याऐवजी संख्यात्मक मांडणी का केली गेली ह्याचे कारण एकाच काळात एकच मांडणी निर्माण होण्याचा काळ ओसरला होता मी अगदी सुरवातीला जालता हा शब्द वापरायचो पण तो डोक्यावरून जायला लागल्यावर परिचित काही शोधायला हवे म्हणून मी द भि कुलकर्णी ह्यांचा वारसा पुढे न्हेत १९९२ च्या नव्यांच्या अक्षर चळवळीत (संपादक अरुण म्हात्रे ) प्रथम चौथी परंपरा हा शब्द वापरला होता पण परंपरा हा शब्द कोणीच द भि च्या अर्थाने घेत नाही म्हंटल्यावर नवता हा शब्द वापरायला सुरवात केली त्याआधी विशेषण वापरतांना चौथी हा शब्द वापरला कारण करंट ट्रेंड तसाच होता उदाहरणार्थ ह्या काळात मानसशास्त्रात वर्तनवादी शाखेत वर्तनवादी थ...
FACESHIP ITS THE RELATIONSHIP ON FACEBOOK WITHOUT FLESHAL CONTACT. IT COMMUNICATES DIGITAL THINGS BUT NEVER TOUCH EACH OTHER. ALL PLEASURES AND SORROWS ARE SHARED WITHOUT REAL SENSES. SHRIDHAR TILVE NAIK सतीश तांबे ह्यांच्या पोस्टवर लिहिलेली कॉमेंट अर्थसंदिग्धता व दुर्बोधता श्रीधर तिळवे नाईक अर्थसंदिग्धता हा मुळीच काव्यगुण न्हवे तो एक सापेक्ष इफेक्ट आहे आकलन आणि अनाकलन ह्यांच्यामुळे निर्माण झालेला ! दुर्बोधता हे त्याचे टोक ! अर्थसंदिग्धता व दुर्बोधता दोन प्रकारची असते १ सहज २ हेतुग्रस्त जी सहज असते ती अर्थसंदिग्धता व दुर्बोधता उत्तम पण जी अर्थसंदिग्धता व दुर्बोधता मुद्दाम हेतुपूर्वक निर्माण केली जाते ती घटिया ! तिची सुरवात ग्रेस आणि खानोलकर ह्यांनी केली . लेखकाचे कामच मुळी शब्द ह्या साधनांद्वारे अर्थ ह्या माध्यमातून अनुभव निर्माण करणे हे असते हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधता अनुभवाचा गळा घोटते तर सहज निर्माण झालेली अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही अनुभवाच्या कक्षा रुंदावते अनुभवविश्व विस्तारते मर्ढेकर हे सहज अर्थसंदिग्धता व दुर्बोधतेचे उत्तम उदाहरण आहे अर्थस...
Comments
Post a Comment