अब्सर्ड कविता
प्रबोधनात्मक युगाचा औद्योगिक क्रांतीने अंत करायला सुरवात केली आणि मानवी इतिहासातला आधुनिक टप्पा सुरु झाला ह्या आधुनिकतेचे व्यक्तिगत आविष्कृत रूप म्हणजे अस्तित्ववाद ! अस्तित्ववादाचे सात टप्पे आहेत
१ आदि अस्तित्ववाद हा प्रामुख्याने सोरेन किर्केगार्द व फ्रेडरिक नित्शे ह्यांनी मांडला अस्तित्ववादाच्या सर्व मूळ थीम्स ह्या दोघांनी शोधल्या मराठी साहित्यावर ह्या दोघांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना आधुनिक युगाचे पाच तत्वज्ञ निवडले तर त्यात ह्या दोघांचा समावेश करावाच लागतो इतके ह्या दोघांचे कार्य महत्वाचे आहे ह्यातील किर्केगार्दच्या प्रभावामुळेच इब्सेन इब्सेन बनला
२ मानसघटित अस्तित्ववाद हा एडमंड हुसेर्ल ने मांडला ह्याने हेतुगर्भतेचे इंटेन्शनलिटीचे तत्वज्ञान मांडले प्रत्येक मानवी कृती ही हेतू ठेऊन जन्मते आपले ज्ञानही हेतुग्रस्त असते अशी त्याची मांडणी पुढे अनसर्टन्टीच्या तत्वज्ञानाला जन्म देणारी ठरली हुसेर्लने भूमितीच्या तत्वज्ञानाची जी मांडणी केली तिचा थेट प्रभाव जॅकस देरिदावर आहे
३ मनोविश्लेषणात्मक अस्तित्ववाद हा जास्पर्स व सिगमंड फ्रॉइड ह्यांनी मांडला
४ नवअस्तित्ववाद हा प्रथम हायडेगरने मांडला
५ मार्क्सवादी अस्तित्ववाद सार्त्रने अस्तित्ववादाला सामाजिक आधार देत व मार्क्सवादी टच देत हा विस्तारला अस्तित्वाच्या सामाजिक कृतीचे विश्लेषण हे त्याचे वैशिष्ट्य !
६ स्त्रीवादी अस्तित्ववाद हा अस्तित्ववाद सीमॉन द बुवाने सेकण्ड सेक्स ह्या पुस्तकात मांडला ह्याला सेकण्ड वेव फेमिनीजमची सुरवात मानले जाते
७ ऍब्सर्ड अस्तित्ववाद हा सार्त्रच्या नो एक्झिट ह्या नाटकापासून सुरु होतो हा प्रामुख्याने कलेत विशेषतः साहित्यात अवतरला मराठीवर ह्या टप्प्याचा प्रचंड प्रभाव आहे विशेषतः विलास सारंग दिलीप चित्रे व कोसलातले नेमाडे
Comments
Post a Comment