रोमँटिसिझमचे वाकपुरुष ते वावदूकपुरुष श्रीधर तिळवे नाईक
सुभाष अवचट , खानोलकर , जी ए , पु ल हे सगळेच मिडलक्लास रोमँटिसिझममध्ये वावरत असतात वा होते भावनाविलास आणि किस्सेगिरी ह्यातुन हिरोगिरी प्रकट करण्याची दांडगी हौस हीही ह्या रोमँटिसिझमची वैशिष्ट्ये ! मेलोड्रामा हा कणा आणि कधीकधी तो क्रिएट करण्याच्या नादात वास्तवाला काल्पनिक डगला चढवणे हेही अटळ ! ह्याहून काही वेगळी अपेक्षा मला तरी न्हवती लेखकाचं प्रत्यक्ष दारिद्र्य आणि त्याच्या लिखाणातील कल्पनाश्रीमंती ह्यांच्यातले ताणेबाणे आपण सादर करतोय अशा कैफात झालेला हा लेख आहे प्रयत्न हिरो बनवायचा होता तो फसला आणि वाद निर्माण झाला
रोमँटिसिझमने अर्वाचीन फॅमिली केंद्रस्थानी आणून शेक्सपियरच्या राजेशाही फॅमिलीला छेद दिला खरा पण मध्ययुगीन स्वप्नविभोर माहोलमधून त्याची सुटका झाली नाही इमोशनल लटके आणि झटके ह्यावर तो तगला खरा पण हळूहळू त्यातले नावीन्य संपले मराठीत ही इंतेहा ८० लाच झाली अशावेळी २०२१ साली ही मेन्टॅलिटी सदर म्हणून सादर करायची म्हणजे एकता कपूरला फिलॉसॉफर म्हणून नेमणे आहे असो कुबेरांची कुबेरगिरी ही अशी एटीच्या एटीकेटमध्ये कधीकधी अडकत असते आपण त्यांना एटीकेटी देऊन पास म्हणूया झालं .
श्रीधर तिळवे नाईक
आता खानोलकरांनी गरिबी हा तसा जुना विषय प्रॉब्लेम इतकाच कि चप्र देशपांडे खरे मानले तर अशी आणि इतकी गरिबी न्हवती खानोलकरकन्या हेच म्हणतायत मग खरं काय ? तर अवचटांचे किस्से कधीचे त्यावर हे अवलंबून आणि अवचटांनी ते काही सांगितलेले नाही त्यामुळे समजा हा खेळ १९७० नंतरचा असेल तर गणित बदलते कारण अमेय प्रकाशनाची तारीख तसं सांगते
Comments
Post a Comment