कलेचे सैनिकीकरण वैगरे श्रीधर तिळवे नाईक
च प्र देशपांडे ह्यांनी आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये कलेचे सैनिकीकरण ह्या नावाने लेख लिहून कलावादी भूमिका पुन्हा एकदा पुढे आणली आहे ह्या लेखात त्यांनी एकूणच सर्व भूमिका घेणाऱ्या लोकांच्याविरुद्ध सणसणीत तोफ डागलीये . आमच्या थिएटर अकॅडमी ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी ने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल २२ -२३ सप्टेंबर २०१६ मध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ थिएटर पर्सन ह्या चर्चासत्रात भूमिकांची सविस्तर आणि सांगोपांग चर्चा झाली होती आणि त्या सर्व भाषणांचा समारोप मंगेश बनसोडने भूमिका आवश्यक आहे म्हणूनच केला होता ज्याची अधिक तपशीलवार मांडणी लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी केली . त्यावेळच्या माझ्या भाषणात(ते मी फेसबुकवर दिले आहे ) अश्या प्रकारची तोफ डागणारा आणि कलावादी भूमिका मांडणारा च प्र सारखा कुणीतरी हवा होता असे मी म्हंटले होते ह्या शिळ्या आणि मागासलेल्या कढीला पुन्हा एकदा ऊत आलेला आहे
जीवनासाठी कला कि कलेसाठी कला हा मराठीतील एक फार प्राचीन वाद आहे आणि त्याचे मूळ बुद्धिप्रामाण्यवाद निसर्गवाद विरुद्ध स्वछंदवाद ह्यांच्यात झालेल्या वादात आहे . आपल्याकडे फडके आणि खांडेकर खांडे फाडून फाडून ह्यावर भांडले आहेत प्रबोधनानंतर मार्क्सवादाने कलावंत हा कॉम्रेड असावा अशी अपेक्षा करून कलेच्या कॉम्रेडगिरीला सुरवात केली तर हिटलरने नाझीझमच्या नावाखाली कलावंतांचे आणि कलेचे सैनिकीकरण सुरु केले मेड टू ऑर्डर साहित्य लिहण्याची ही सक्ती कशी प्राचीन आहे आणि ती कशी धर्माने सुरु केली त्याचा इतिहास मी माझ्या भाषणात मांडला होताच धार्मिक सक्ती सामाजिक बांधिलकी आणि मग कलेचे कॉम्रेडीकरण व सैनिकीकरण असा हा विकास आहे च प्र नी त्याला विरोध केलाय पण प्रश्न असा आहे कि कलेचे सैनिकीकरण मराठीत मुळात झाले आहे का ? माझ्या मते अधूनमधून तसा प्रयत्न होतो आणि आपण पुन्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याकडे परततो
वास्तविक असा प्रयत्न चाललाय तो हिंदुत्ववादी शक्तीकडून आणि चं प्र तोफ डागतायत ते ह्या हिंदुत्ववादाविरुध्द
आवाज उठवणाऱ्या लक्ष्मीकांत देशमुखांच्या विरुद्ध हे म्हणजे द ग्रेट डिक्टेटर मध्ये चार्ली चॅप्लिन लढत लढत स्वतःच्या पार्टीविरुद्ध ठाकतो . चं प्र चे असे काही झालेले नाही ना अशीही शंका मला हा लेख वाचताना येत होती
दुसरी गोष्ट भूमिका घेतली नाही म्हणजे ग्रेट साहित्य निर्माण होते का ?
फुल्यांच्या मृत्यूनंतर सामाजिक बांधिलकी न मानणारे अत्यंत फडतूस साहित्य जन्माला आले तेव्हा भूमिका घेतली नाही म्हणजे चांगले साहित्य निर्माण होतेच असे नाही त्यानंतर बालकवी आणि गडकऱ्यांची नाटके वगळता जवळ जवळ १९३० पर्यंत सामाजिक बांधिलकी नाकारणऱ्यांनी फार काही दर्जेदार निर्माण केलंय असं दिसत नाही ह्या काळात सामाजिक बांधिलकी मानणाऱ्यांनीही फार काही दिवे लावलेत असं दिसत नाही उलट अनुभवाशी प्रामाणिक राहणारी माझा प्रवास स्मृतिचित्रे सारखी आत्मकथने ज्यादा ताकदीची वाटतात
त्यानंतर मात्र स्पष्टपणे स्वच्छन्दवादी भूमिका स्वीकारणाऱ्या बा भ बोरकर पु शि रेगे पु ल देशपांडे (विशेषतः तुझे आहे तुझ्यापाशी )ह्यांनी चांगले साहित्य निर्माण केले ह्याचकाळात सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या प्र के अत्रे ह्यांनी बरे लिहिले
प्रश्न असा आहे कि स्वच्छन्दवाद ही भूमिका आहे कि नाही ?तर माझ्या मते तीही भूमिकाच आहे ह्यावर च प्र चे म्हणणे काय आहे ?
१९४५ नंतर उघड उघड भूमिका नाकारण्याऱ्या साहित्यप्रवाहाची मांडणी मर्ढेकरांनी केली त्यातूनच कलावादाचे रूपांतर प्रतिमावादात होऊन भरपूर भोंगळ साहित्य निर्माण झाले पण ह्याच मर्ढेकरांनी आधुनिकवाद स्वीकारून उत्तम कविता लिहिली प्रश्न असा आहे कि आधुनिकवाद ही भूमिका आहे कि नाही ? तर आहे ! चं प्र ज्या दादावादाचा दाखला देतात तो एक आधुनिकतावादातील एक भूमिकाच घेऊन जन्मला होता आणि अभिव्यक्तीवादापुढचे ते पाऊल होते ज्यातून पुढे अतिवास्तववादी चळवळ जन्मली ह्यामागे फ्रॉईडचे संशोधन आणि त्यातून जन्मलेला मनोविश्लेषणवाद होता आणि हीही एक भूमिका होती प्रत्येक कलावंत आणि कलाकृती ही अपरिहार्यपणे राजकीय असते हीही भूमिका मार्क्सवादातून जन्माला आलेली आहे . ज्याच्या प्रभावाबद्दल देशपांडे बोलतात ते ऍब्सर्ड थिएटर सरळ सरळ अस्तित्ववादी भूमिकेतून जन्मलेले आहे ज्याचे कारण त्याकाळी घडत असलेले वा घडलेले दुसरे महायुद्ध होते . मराठीत देशीवादी भूमिका घेऊनही हिंदूसारखी चांगली कादंबरी जन्मलेली दिसते कोसला तर सरळ सरळ अस्तित्ववादी आहे
थोडक्यात काय तर भूमिका असतेच कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष कलावंतांना आपल्यावर कुठल्या भूमिकेचा वा ज्ञानव्यूहाचा परिणाम नाही हे सांगायला आवडते पण प्रत्यक्षात मात्र तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिका घेऊनच लिहीत असतो भूमिकारहितता ही फक्त मोक्ष वा निर्वाणप्राप्तीनंतर प्राप्त होते तोवर तुमच्या आसपासचे सामाजिक तुमच्या आत वेगवेगळ्या भूमिका रचत असते आणि तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारे वा तुमच्या हितसंबंधाच्या आधारे त्यातील एक वा अनेक वा मिश्र भूमिका घेत राहता फक्त लेखकाच्या अध्यात्मिकतेलाच ह्यातील पर्वत आणि दऱ्या दिसतात बाकीचे थेट कोसळतात किंवा घसरतात
राहता राहिला प्रश्न गुणवत्तेचा तर तिथे भूमिकेइतकेच महत्व प्रतिभेला आणि मेहनतीला आणि कौशल्याला असते . ह्याची जाणीव भूमिका मानणाऱ्या कलावंतांना नसते असे चं प्र नां कुणी सांगितले ? काही मूर्ख सर्वच ठिकाणी असतात आणि काही धूर्तही ! सामाजिक बांधिलकीच्या नावाने खराब माल विकणारे जसे असतात तसे प्रतिमावादाच्या वा तत्सम नावाने फालतू माल विकणारेही असतात . सत्यकथेतही असे लोक होते आणि देशीवादातही आणि चौथ्या नवतेतही आहेत !आवश्यकता एकमेकांच्या भूमिकांना सन्मान देण्याची असते वाव देण्याची असते तुम्ही कुठल्या वर्गविषयी लिहिता हा प्रश्न नाही काय सघनतेने व गहनतेने लिहिता हा प्रश्न आहे आणि त्याचा संबंध थेट प्रतिभा , माध्यमप्रभुत्व , अनुभवाची जाण व व्याप्ती आणि कुशलता ह्यांच्याशी आहे. माझा स्वतःचा फार पूर्वीपासून एक आरोप आहे तो म्हणजे ब्राह्मण वर्ग १८५० ते १९५० ह्या दरम्यान एका अभूतपूर्व संघर्षातून गेला पण त्याकाळातील मराठी साहित्यात ह्याचे कसलेही अस्सल चित्रण झालेले नाही आणि ह्याला कारण अतिरेकी कलेसाठी कला ही भूमिका होती ह्या काळाचे नीट प्रतिबिंब हे नंतरच्या काळातील ऐत्याहासिक साहित्यात पडले कारण सामाजिक बांधिलकीचा पडलेला दबाव !बॅरिस्टर , समाजसुधारक ही नाटके त्यादृष्टीने पहावीत .
थोडक्यात काय भूमिकांविरहित भूमिकेलाही इतिहास आहे आणि वाईट व चांगले साहित्य दोन्ही पार्ट्यातील साहित्यात जन्मते आणि गोतावळा सर्वच जण जमवतात खरेतर मराठीत फक्त एकच वाद आहे तो म्हणजे गोतावळावाद बाकी सारे वाद त्याच्या आसपास फिरत असतात
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment