महाकाव्य कालबाह्य झाले आहे का आणि असल्यास कवींना महाकाव्य का लिहावेसे वाटते ?
श्रीधर तिळवे नाईक
एक कवी म्हणून मला कायमच महाकाव्याचे आकर्षण वाटत राहिले आहे हा देशच मुळात रामायण महाभारत ह्या महाकाव्यातल्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या आधारे घडलेला आहे किंबहुना भारताची वाट लावण्यात ह्या दोन महाकाव्यांचा किंबहुना महाकाव्याचा प्रचंड वाटा आहे हा वाटा इतका प्रचंड आहे कि ह्या देशाचा इतिहास महाकाव्यपुर्व भारत आणि महाकाव्योत्तर भारत अशी विभागणी करून लिहिता येतो हा देशच असा आहे कि इथे वास्तवापेक्षा फिक्शन अधिक टिकते आणि त्याला जबाबदार पुराणे रामायण आणि महाभारत आहेत त्यामुळे साहजिकच इतिहासाचे रूपांतरही इथे फिक्शनमध्ये होते . लोक फिक्शनसाठी आणि मिथसाठी मरायला तयार होतात पडद्यावरचे हिरो जनतेसाठी काहीच न करता निवडणूक जिंकतात
अश्या पार्श्वभूमीवर एखाद्या कवीने महाकाव्य लिहावे कि नाही आणि लिहायचे असल्यास त्याचे स्वरूप काय असावे ?
माझ्या आयुष्यात १९८३ ते २००७ ह्या दरम्यान मी आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण आणि श्रीवाहिनी अशी दोन महाकाव्ये लिहिली पहिले आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण हे कोल्हापूरशी निगडित मुंबईशी थोडेसे संबंधित तर दुसरे श्रीवाहिनी पूर्णपणे मुंबईकर एक प्रकाशित झालेले तर दुसरे सध्या फेसबुकवर अर्धेअधिक प्रकाशित झालेले !दोघांनाही प्रतिसाद शून्य जो अपेक्षितच होता पहिल्यात नायक कोल्हापुरात घडतो मग मॉलमध्ये फसतो आणि एका करवीर नगरीशी संबंधित प्रोग्रॅममध्ये अडकतो तर दुसऱ्यात नायक चिन्हसृष्टीय चॅनेल्सच्या भाऊगर्दीत स्वतःचे सात दिवसापुरते व्यक्तिगत चॅनेल सादर करतो
प्रश्न असा आहे कि ज्या संस्कृतीत जिथे गद्यही धड वाचले जात नाही जी रामायण महाभारत ह्या महाकाव्यातून बाहेरही आलेली नाही तिथे नव्या युगाचे महाकाव्य सादर का करावे ?आतले उमाळे ऊर्जा काळीज भरून येणे आतून वाटणे वैग्रे रोमँटिक समीक्षेच्या गोष्टी ज्यांचा महापूर फेसबुकवर आलेला आहे त्या सोडून द्या (अगदी हगणे आणि मुतणेही आतूनच दाटून येते हो पण म्हणून कोणी त्यांचे विश्लेषण रोमँटिक पद्धतीने करत नाही आतून किक येणे हे गृहीतच असते )पण सामाजिक पातळीवर आणि मानसशास्त्रीय पातळीवर मला हे का करावेसे वाटते ?
मी जेव्हा महाकाव्ये लिहायला बसलो तेव्हा महाकाव्ये ही कालबाह्य झालेली आहेत आणि कादंबऱ्यांच्या युगात त्यांना कसलेही स्थान नाही असे मला सांगण्यात आले होते रामायण महाभारत ही आता गद्यात वाचायची नाही तर नाटकात व नंतर टीव्हीत पाहावयाची महाकाव्ये झालेली असताना हा खटाटोप करणे कितपत योग्य हा प्रश्न माझ्याही मनी आलेला होताच तुझा प्रत्येक कवितासंग्रह हाच मुळात एखादी दीर्घ कविता किंवा कादंबरी असतांना हा स्वतंत्र महाकाव्य लिहिण्याचा खटाटोप कशाला केला आहेस असेही एका कवीने मला विचारलेले आहे
मला वाटते कवितेची ताकद आणि मोठा कॅनव्हास पकडण्याची प्रबळ आंतरिक उर्मी ह्यातून ह्याची सुरवात होते सभोवताल पकडण्याची जेव्हा ही एकमेव शक्यता कवीपुढे उरते तेव्हा कवी महाकाव्य लिहितो महाकाव्यातून कवीचे आत्मचरित्र सादर होणे अटळ असते म्हणजे रामायण हे वाल्मिकीचे आणि महाभारत हे व्यासांचे आत्मचरित्रही असते पण त्याला महाकाव्यात एक फिक्शनल स्वरूप प्राप्त झालेले असते कदाचित ज्यांची आत्मचरित्रे अत्यंत गुंतागुंतीची असतात तेच हा फॉर्म निवडतात का ?आणि ह्यापुढे जाऊन संन्यासी असणाऱ्या लोकांनाच महाकाव्ये लिहावीशी वाटतात का कि त्यांच्या एकांतिक जीवनशैलीची ती फलश्रुती असते ?कि महाकाव्यात वेळ घालवायला त्यांच्याकडे मुबलक एकांत असतो म्हणून हे घडते कि समाजाशी एकाकीपणे घेतलेली ही झुंज असते ?कि मुळात व्यक्तिमत्वच प्रचंड असते ?कि त्यांच्या लोकांताचा हा आकांत आणि एकांत असतो ?किंवा एकांतात व्यक्त झालेला लोकांत व आकांत असतो ?
महाकाव्यांना सुरवातीला अनेकदा घृणाच झेलावी लागते आणि काळ पुढे सरकवल्यावर अनेकदा त्यांना मान्यता मिळते त्यामुळे प्रसिद्धीच्या पातळीवर तर हा आतबट्ट्यातला खेळ असतो त्यामुळे जिवंतपणी त्यावर वेळ खर्च करावा का असाही एक प्रश्न असतो ?थोडक्यात म्हणजे महाकाव्य लिहायला घेणे हा स्वतःहून आयुष्याची दिवाळखोरी काढण्यातला प्रकार असतो आणि तरीही तो केला जातो कदाचित स्वतःच्या प्रतिभेवरच्या खऱ्या वा खोट्या विश्वासापायी !
कुठल्याही महाकाव्याच्या केंद्रस्थानी कविता आणि पद्य असते हे तर उघडच आहे पण आत्ताच्या काळात महाकाव्यात गद्यही वापरतांना ते काव्यात्मक पद्धतीने वापरावे लागते खंडकाव्य हे एखाद्या छोट्या कादंबरीसारखे असते तिथे गद्य न वापरण्याची चैन सहज परवडू शकते पण महाकाव्यात हे फार अवघड असते त्यामुळे महाकाव्य लिहिताना गद्यही काव्यात्मक करून वापरावे लागते
महाकाव्याचा अवकाश हा एक वा दोनतीन नगरांनी युक्त असतो म्हणजे रामायणात अयोध्या व लंका किंवा महाभारतात हस्तिनापूर व कुरुक्षेत्र त्यामुळे त्यांची संपूर्ण संस्कृती सादर करण्याचा खटाटोप महाकवींना करावा लागतो नगरातून येणे व नगरातून जाणे ह्या क्रियांना विशेष महत्व द्यावे लागते त्यामुळे निरोपाचे एपिसोड महाकाव्यात अटळ असतात
महाकाव्ये ही नगरप्रधान असल्याने एका अर्थाने मार्गी असतात पण अनेक देशी संस्कृत्यांची जाण त्यांच्यात विलसत असते पोटी आणि जमाती ह्यांचे भानही त्यांच्यात असते.
माझ्या पहिल्या महाकाव्यासमोर रामायण व महाभारत होते पण त्यात मला माझा वर्तमान मांडण्यात रस होता इतकेच कशाला आपण लिहितोय ते महाकाव्य आहे कि नाही ह्याचीच शंका होती कोल्हापूर आणि करवीर नगरी हा ह्याचा प्रमुख अवकाश होता ह्या महाकाव्याचा नायक मला ना देशी ठेवायचा होता ना मार्गी त्यामुळेच मी दलितसदृश्य नायकाची निवड केली मात्र उठसुठ जात मिरवणारा दलित आत्मकथनातला नायक मला नको होता तर ज्याला अस्पृश्यतेच्या सामाजिक समस्येने कमी आणि चिन्हसृष्टीय समस्येने ज्यादा भेडसावलंय आणि ज्याला निर्वाण प्राप्त करायचंय असा नायक मला अपेक्षित होता
तर दुसऱ्या महाकाव्यावेळी समोर होते डेरेक वॉलकॉट ह्याचे ओमेरॉस हे १९९० सालचे तिसऱ्या नवतेचे महाकाव्य ! नेमाडे वैग्रे देशीवादाच्या गप्पा मारत असतांना वॉलकॉट एका महाकाव्याचे रूपांतर देशी कॅरिबियन जाणिवेत कसे करायचे ह्याचा प्रश्न सोडवत होते त्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळालेले होते माझ्यापुढे प्रश्न नव्या युगाचा होता वॉलकॉट ह्यांच्याप्रमाणे मला परंपरेत घुसायचे न्हवते तर आताच्या युगाचे महाकाव्य शोधायचे होते त्यातून श्रीवाहिनी जन्मली वॉलकॉटना नोबेल मिळाले मला नोबेल जाऊ द्या पण एका नोबेल वाचकाचीही अपेक्षा न्हवती एका अर्थाने स्वतःच्या साधनेला सामाजिक आरश्यात स्वान्तसुखाय पाहण्याचा हा खटाटोप होता . मुंबई ही ह्या महाकाव्याचा केंद्रस्थानी असली तरी मुख्य नगरी ही खुद्द पर्सनल टीव्ही बॉक्स आहे . असो
हे दोन्ही खटाटोप वाया गेले असे आता म्हणता येईल पण ह्यामुळे नवीन पिढीतील एकाला जरी महाकाव्य हा फॉर्म हाताळवासा वाटला तरी खूप !
मराठीला टाटा बायबाय गुडनाईट करण्याची वेळ आलीये बहुदा ! पण जे आजवर मराठीत लिहून ठेवलंय त्याचं काय करायचं हा प्रश्न उरतोच ! आणि त्याचा मराठी वाचकाला त्रास होऊ नये म्हणून काय करायचं हाही !वडिलांना दिलेले वचन फिरवता येणे शक्य नाही त्यामुळे जे लिहिलंय ते प्रकशित तर करावंच लागेल पण ते मराठीत कुणाला वाचायला लागू नये म्हणून काय करायचं हेही पाहावं लागेल !बघू काय मार्ग निघतो ते !

Comments
Post a Comment