Posts

मेघना भुस्कुटे ह्यांचा प्रयत्न आणि त्याचे यशापयश कुठल्याही साहित्याच्या  काळकेंद्री अभ्यासाच्या दोन महत्वाच्या पद्धती असतात १ नवताकेंद्री १ पिढ्याकेंद्री ह्यातील पिढयंकेंद्री अभ्यासपद्धतीत पिढ्या कुठल्या तारखेपासून सुरु करायच्या आणि कुठे त्यांचा अस्त धरायचा हा एक कळीचा प्रश्न आहे साठोत्तरी पिढीत प्रथम हा प्रश्न केंद्रीय स्थानी आला आणि मराठी आधुनिक साहित्याचे १ स्वातंत्र्यपूर्व २ स्वातंत्र्योत्तर आणि ३ साठोत्तरी अशा तीन कालखंडात वर्गीकरण झाले आणि पुढे नव्वदोत्तर पिढीने स्वतःची नव्वदोत्तरी पिढी असे बारसे केले . प्रत्यक्षात दिलीप चित्रे सारख्यांना त्यांची पिढी १९५५ नंतर सुरु झाली असे वाटे मात्र त्यांनी पंचावन्नोत्तरी पिढी अशी काही संकल्पना मांडली नाही मला स्वतःला मात्र अलीकडे १ पंचेचाळीसोत्तरी २ पंचावन्नोत्तरी पिढी ३ पासष्टोत्तरी पिढी ४ पंचाहत्तरी पिढी ५ पंच्याऐंशोत्तरी पिढी ६ पंचान्नवोत्तरी पिढी ७ दोनहजार पाचोत्तरी (दोपाचोत्तरी )पिढी ८ दोनहजार पंधरोत्तरी (दोपंधरोत्तरी )पिढी अशी पिढ्यांची मांडणी  अधिक योग्य वाटते मेघना भुस्कुटे ह्यांनी गेल्या काही वर्षात दमदार काम केल...
फेसबुकवरील पुरोगामी विचारवंत आणि राजकीय परिस्थिती ह्यांचा अनेकदा एकमेकांशी काडीचाही संबंध राहिलेला नाही हे अनेकदा सिद्ध झालेले आहे त्रिपुरा निवडणूक हे आणखी एक उदाहरण !स्वतःच्या आशांना स्वतःचे विचार आणि लोकांचेही विचार म्हणून प्रस्तुत करणाऱ्या महाभागांची संख्या इथे प्रचंड आहे . भारतीय मतदार हा स्वभावतः आयडियॉलॉजीत अडकून पडलेला मतदारच न्हवे तो स्वतःच्या तात्कालिक स्वार्थाला महत्व देणारा आणि त्याला झालेल्या तात्कालिक तापानुसार कलणारा मतदार आहे त्याला धर्माचे प्रचंड आकर्षण आहे भले मग कुणीही कितीही टीर्ऱ्या वाजवोत किंबहुना भारतीय आणि उत्तरपश्चिम आशियाचे ते वैशिष्ट्य आहे त्यामुळे खोमेनीने सुरु केलेली प्रतिक्रांती आज ना उद्या भारतात पोहचणे अटळ होते ह्याबाबतीत मी १९८३ पासून इशारे दिलेले आहेत नेमाडे हे अंतिमतः मोदींना जाऊन मिळतात हे तर मी कधीपासून सांगतो आहे साहित्य अकॅडमीच्या निवडणुकीत ते थोडेसेच दिसले जी माझ्या मते फक्त झाँकी आहे मार्क्सवाद कोसळणार हे तर माझे फार पूर्वीपासूनचे भविष्य ! फक्त एकच भविष्य बाकी आहे ते म्हणजे आंबेडकरवादी हिंदू समाजापासून तुटून मुस्लिमांबरोबरीने एकटे पडत जाणार ...
कलेचे सैनिकीकरण  वैगरे श्रीधर तिळवे नाईक च प्र  देशपांडे ह्यांनी आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये कलेचे  सैनिकीकरण ह्या नावाने लेख लिहून  कलावादी भूमिका पुन्हा एकदा पुढे आणली  आहे ह्या लेखात त्यांनी एकूणच सर्व भूमिका घेणाऱ्या लोकांच्याविरुद्ध सणसणीत तोफ डागलीये . आमच्या थिएटर अकॅडमी ऑफ मुंबई  युनिव्हर्सिटी ने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल २२ -२३ सप्टेंबर २०१६ मध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ थिएटर पर्सन ह्या चर्चासत्रात भूमिकांची सविस्तर आणि सांगोपांग चर्चा झाली होती आणि त्या सर्व भाषणांचा समारोप मंगेश बनसोडने भूमिका आवश्यक आहे म्हणूनच केला होता ज्याची अधिक तपशीलवार मांडणी लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी केली . त्यावेळच्या माझ्या भाषणात(ते मी फेसबुकवर दिले आहे ) अश्या प्रकारची तोफ डागणारा आणि कलावादी भूमिका मांडणारा च प्र सारखा कुणीतरी हवा होता असे मी म्हंटले होते ह्या शिळ्या आणि मागासलेल्या कढीला पुन्हा एकदा ऊत आलेला आहे जीवनासाठी कला कि कलेसाठी कला हा मराठीतील एक फार प्राचीन  वाद आहे आणि त्याचे मूळ बुद्धिप्रामाण्यव...
महाकाव्य कालबाह्य झाले आहे का आणि असल्यास कवींना महाकाव्य का लिहावेसे वाटते ? श्रीधर तिळवे नाईक एक कवी म्हणून मला कायमच महाकाव्याचे आकर्षण वाटत राहिले आहे हा देशच मुळात रामायण महाभारत ह्या महाकाव्यातल्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या आधारे घडलेला आहे किंबहुना भारताची वाट लावण्यात ह्या दोन महाकाव्यांचा किंबहुना महाकाव्याचा प्रचंड वाटा आहे हा वाटा इतका प्रचंड आहे कि ह्या देशाचा इतिहास महाकाव्यपुर्व भारत आणि महाकाव्योत्तर भारत अशी विभागणी करून लिहिता येतो हा देशच असा आहे कि इथे वास्तवापेक्षा फिक्शन अधिक टिकते आणि त्याला जबाबदार पुराणे रामायण आणि महाभारत आहेत त्यामुळे साहजिकच इतिहासाचे रूपांतरही इथे फिक्शनमध्ये होते . लोक फिक्शनसाठी आणि मिथसाठी मरायला तयार होतात पडद्यावरचे हिरो जनतेसाठी काहीच न करता निवडणूक जिंकतात अश्या पार्श्वभूमीवर एखाद्या कवीने महाकाव्य लिहावे कि नाही आणि लिहायचे असल्यास त्याचे स्वरूप काय असावे ? माझ्या आयुष्यात १९८३ ते २००७ ह्या दरम्यान मी आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण आणि श्रीवाहिनी अशी दोन महाकाव्ये लिहिली पहिले आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण हे...
कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता   ( SOCIAL RESPONSIBILITY OF THEATRE PERSON )२२ ते २३ सप्टेंबर २०१६ INTERNATIONAL THEATRE  फेस्टिवल ) श्रीधर तिळवे नाईक प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो , कलावंताच्या उत्तरदायित्वावर हे चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मंगेश बनसोड ह्याचे प्रथम आभार तुम्ही गेले काही तास ह्या विषयावर अनेकांचे मौलिक विचार ऐकत आहातच आणि आता  आम्ही फॅकल्टीचे लोक समारोपाचे सेशन  सादर करतो आहोत मी नेहमीच एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो आहे ती म्हणजे प्रश्न विचारा कोणी कितीही मोठा माणूस असो श्रद्धा ठेऊ नका  प्रश्न विचारा प्रश्नक व्हा त्यामुळे पहिला प्रश्न हे चर्चासत्र  कशासाठी ?तुम्ही आता सर्वच अभ्यासक्रमानंतर समाजात उतरणार आहात आणि समाज आणि कला ह्यासंदर्भात तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागणार आहे ही भूमिका घेण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार करणे हा ह्या चर्चासत्राचा उद्देश  आहे. भूमिका कोणतीही असो ती प्रामाणिक असणे हे फार गरजेचे आहे बनावट भूमिका  बनावट कला निर्माण करतात त्यामुळे बनावट भूमिका घेऊ नक...
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग १ श्रीधर तिळवे नाईक  इंडियात चार भारत आहेत ही चौथ्या नवतेची सुरवातीपासून भूमिका आहे . हे चार भारत पुढीलप्रमाणे १ मार्गी भारत २ देशी भारत ३ पोटी भारत ४ जमाती भारत मार्गी भारत हा भारत शैव संस्कृतीत आकार घ्यायला लागला आणि नगरे निर्माण व्हायला लागली आणि मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून त्यांचे स्वरूपही स्पष्ट झाले ह्या नगरांची मार्गी संस्कृती नेमकी काय होती हे पुरेसे स्पष्ट झालेले नाही पुढे वैदिकांनी विजय मिळवला खरा पण त्यांच्या नगरांचे खरे स्वरूप काय होते ते आजतागायत कळलेले नाही पुढे आगमवादाने उचल खाल्ली आणि भारतातील पहिले साम्राज्य नंदानी उभे केले ज्याचे रूपांतर चंद्रगुप्त मौर्याने मौर्यसम्राज्यात केले पण चंद्रगुप्त येण्यापूर्वीच पाटलीपुत्र सारखी नगरे तयार झाली होती नंतर वैदिकांनी वैष्णव नावाचा धर्म पुढे करत शैवांना गिळायला केली आणि नंतर शंकराचार्यांना पुढे टाकत बौद्ध आणि जैनांची वाट लावली नेमाडेंनी बौद्ध धम्म हा नागरकेंद्री असल्याने नष्ट झाला असे प्रमेय मांडले ज्याचे निवार...
Image
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने काही टिपणे श्रीधर तिळवे नाईक टिपण १ सौष्ठवच्या पहिल्या अंकाला निघून  पंचवीस वर्षे पूर्ण होतायत . सर्व संबंधितांचे जाहीर आभार . विशेषतः भालचंद्र कुबल , जयराज साळगावकर , आशुतोष आपटे , मंगेश बनसोड , आल्हाद भावसार , राहुल सरवटे , अविनाश धर्माधिकारी , मंदार फणसे , कीर्तिकुमार शिंदे ,सतीश पाध्ये ,  सलील वाघ , मनोज जोशी , अभिजीत देशपांडे , नितीन रिंढे ,निवि कुलकर्णी , सचिन केतकर , ज्ञानदा ,हेमंत दिवटे , मंगेश काळे , भुजंग मेश्राम , संतोष क्षीरसागर , ऋत्विक काळसेकर , महेश म्हात्रे , दिलीप लाठी , शंकर सारडा , केशव मेश्राम  ह्या साऱ्यांच्याशिवाय हे अशक्य होते . ह्या साऱ्यांचे मनापासून आभार !सौष्ठवचे साहित्यात योगदान आहे कि नाही आणि असलेच तर त्याचे स्वरूप काय ह्याची चर्चा मराठी साहित्य करेल न करेल कदाचित सौष्ठव काळाच्या उदरात कसलीही चर्चा न होता नाहीसे होईल पण एक नक्की आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि खिशातले पैसे टाकून अंक काढले गेले . मंगेश बनसोड व राहुल सरवटे ह्यांनी प्रत्येकी एका अंकाचे उत्कृष्ट संपादन केले त्यां...