मेघना भुस्कुटे ह्यांचा प्रयत्न आणि त्याचे यशापयश
कुठल्याही साहित्याच्या काळकेंद्री अभ्यासाच्या दोन महत्वाच्या पद्धती असतात १ नवताकेंद्री १ पिढ्याकेंद्री ह्यातील पिढयंकेंद्री अभ्यासपद्धतीत पिढ्या कुठल्या तारखेपासून सुरु करायच्या आणि कुठे त्यांचा अस्त धरायचा हा एक कळीचा प्रश्न आहे साठोत्तरी पिढीत प्रथम हा प्रश्न केंद्रीय स्थानी आला आणि मराठी आधुनिक साहित्याचे १ स्वातंत्र्यपूर्व २ स्वातंत्र्योत्तर आणि ३ साठोत्तरी अशा तीन कालखंडात वर्गीकरण झाले आणि पुढे नव्वदोत्तर पिढीने स्वतःची नव्वदोत्तरी पिढी असे बारसे केले . प्रत्यक्षात दिलीप चित्रे सारख्यांना त्यांची पिढी १९५५ नंतर सुरु झाली असे वाटे मात्र त्यांनी पंचावन्नोत्तरी पिढी अशी काही संकल्पना मांडली नाही मला स्वतःला मात्र अलीकडे
१ पंचेचाळीसोत्तरी
२ पंचावन्नोत्तरी पिढी
३ पासष्टोत्तरी पिढी
४ पंचाहत्तरी पिढी
५ पंच्याऐंशोत्तरी पिढी
६ पंचान्नवोत्तरी पिढी
७ दोनहजार पाचोत्तरी (दोपाचोत्तरी )पिढी
८ दोनहजार पंधरोत्तरी (दोपंधरोत्तरी )पिढी
अशी पिढ्यांची मांडणी अधिक योग्य वाटते मेघना भुस्कुटे ह्यांनी गेल्या काही वर्षात दमदार काम केल्याने मी त्यांच्या ह्या चर्चासत्राकडे लक्ष्य ठेऊन होतो मात्र त्यांना अपेक्षित असलेल्या पिढ्या त्यांनी स्पष्टपणे डिफाइन केलेल्या नाहीत असेही वाटत होते त्यामुळे वैचारिक गलबला निर्माण होणार असा माझा अंदाज होताच आत्ताची दोनहजार पंधरोत्तरी (दोपंधरोत्तरी )पिढी लगोलग पिढी ही स्मार्टफोन टॅबलेट व्हाटसअप पिढी आहे ती त्यांना अपेक्षित नसावी असे वाटले . त्यांचा भर हा प्रामुख्याने दोनहजार पाचोत्तरी (दोपाचोत्तरी )पिढीवर होता आणि समीक्षेच्या पातळीवर तो योग्यही होता मी ह्या पिढीला सोशल साईट वा फेसबुकी पिढी म्हणतो आणि ह्या पिढीत काही अत्यंत दर्जेदार कवी कथाकार आणि कादंबरीकार निर्माण झालेत हे मला मान्य असल्याने ह्या लोकांच्यावर काय चर्चा होते हा माझा औत्स्युक्याचा विषय होता प्रत्येक पिढीला स्वतःचे परखड बोलणारे जसे समीक्षक लागतात तसे समजून घेऊन त्या साहित्याची ताकद उलगडून दाखवणारे समीक्षकही लागतात लाळघोटे समीक्षक आणि सामूहिक गटसंबंध आणि स्वहितसंबंध सांभाळणारे हितलोलुपी समीक्षक मात्र शोधावे लागत नाहीत ते आपोआपच निर्माण होतात ही पिढीही ह्याला अपवाद नाही ह्याही पिढीत हितलोलुप आणि लाळघोटे समीक्षकांची कमी नसावी असे ही चर्चा वाचताना वाटले . स्वप्नील व प्रणवसारखे उलगडा करणारे कवी -समीक्षक ह्या पिढीला लाभले हे ह्या पिढीचे भाग्य पण पंचान्नवोत्तरी पिढीत सलील वाघासारखा जसा परखड समीक्षा करू पाहणारा समीक्षक होता तसा ह्या पिढीत नितीन वाघाखेरीज कुणी नाहीये हे मात्र ह्याही पिढीचे दुर्देव . नितीन वाघसारखा आंबेडकरी देशीवादाची मांडणी करू पाहणारा लेखकसमीक्षक ह्या चर्चेत सामील असायला हवा होता असे वाटते मेघना आणि अभिजित रणदिवे हे परखडपणा आणि शिस्त ह्यांचा समतोल सांभाळणारे आहेत मेघनाच्या अंतिम टिपणात ते पुन्हा स्पष्ट झाले ह्या पिढीने पंच्याऐंशोत्तरी पिढी
व पंचान्नवोत्तरी पिढी ह्यांच्यावर काट मारली ते बरेच केले पण ही काट पुरेशी होती काय ? ह्या पिढ्यांचा पडलेला प्रभाव तपासून पाहणे ह्या निमित्ताने शक्य होते ते झाले नाही . रेणुका खोतचे कौतुक योग्यच आहे पण तिची व तिच्या भावनाजन्यतेची चिकित्सा किती झाली ? अजित अभंग , स्वप्नील शेळके , प्रणव सुखदेव , सत्यपालसिंग राजपूत , हे ह्या पिढीतील जायंट कवी त्यांची चर्चा व्हायलाच हवी पण ओंकार कुलकर्णीकडे थोडे दुर्लक्ष्य झालंय असं वाटलं . नामदेव कोळी , वैभवछाया ही आणखी काही नावे खुद्द मेघनाचे गद्य लिखाण फार महत्वाचे आहे नव्या मध्यमवर्गाच्या नव्या संवेदना त्यात आहेत आणि त्या रेणुकापेक्षा अधिक अस्तित्वजन्य आहेत ह्रषिकेश गुप्ते (दंशकाल )वैगरेंच्या कादंबऱ्यांवर चर्चा रंगेल असे वाटले होते ते झाले नाही
एका गोष्टीबद्दल मेघनांचे अभिनंदन करायलाच हवे ते म्हणजे तिने एका पिढीला ह्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आणले अधूनमधून अशी संपूर्ण पिढी चर्चेत येणे हे साहित्याच्या अभ्यासासाठी अतिशय गरजेचे असते .
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment