काही प्रश्नांना शॉर्टकट मध्ये दिलेली उत्तरे आता अधिक दीर्घ लॉंगकटमध्ये श्रीधर तिळवे नाईक
प्रथम नाव सांगतो श्रीधर शांताराम नलिनी तिळवे नाईक
कवितेचे किंबहुना कुठल्याही कलेचे मुख्य काम अनुभव देणे वा सादर करणे हे आहे आणि अनुभव हा आपल्या आसपास होत असतो घडत असतो घडवला जात असतो आणि सादरही केला जात असतो कला अनुभव सादर करत असते मीडियाही अलीकडे अनुभव सादर करत असतो किंबहुना मीडियाची अनुभव सादर करण्याची लाईव्ह टेलिकास्ट पद्धत हे एक चौथ्या नवतेचे वैशिष्ट्य आहे अशावेळी कलेचे नेमके काम काय हा प्रश्न पडतो आपण आपल्या जीवनाचे मीडियाही असतो कारण आपले अनुभव इतरांच्यापुढे सादर करण्याची खाज आपल्यालाही असते आणि इतरांच्या अनुभवात डोकावून बघण्याची खुजलीही आपण अंतिमतः मोक्षिक किंवा सामाजिक असतो हे सामाजिक अलीकडे आपण लँग्वेज ऍनिमल आहोत असे सांगत असते नो डाउट आपण प्रोग्रामेबल एंटीटी आहोत नो डाउट आपल्यातच कल्चर नामक एक अलिएन आपले डीएनए घेऊन वावरत असतो आणि रहातही असतो पण आपल्यात हे महत्वाचे आपण न्हवे त्यामुळे हया प्रोगॅमेबल बरोबर आपण मांसल आहोत हे लक्ष्यात घ्यायला हवे मांसल ह्या शब्दाचा माझ्यासाठी असलेला अर्थ जे प्रोग्रॅम्ड नाही ते ! अडा हॉ का त मांसल विरुद्ध डिजिटल हा संघर्ष मी काम ह्या जीवनार्थाच्या संदर्भात मांडला होता कारण माणसाचे मांसल सिद्ध करणे हे कलावंताचे काम आहे असे मी मानतो चिन्हे बेसिकमध्ये सेन्शुअस नसतात माणसातील मांसल त्यांना सेन्शुअस बनवतं प्रोग्रामिंग आपल्याला हे कळू देत नाही कारण प्रोग्रॅमिंगच्या मर्यादा आपणाला माहित नाही सध्यातरी ते परमेश्वरासारखे अनलिमिटेड आहे ह्यातला विरोधाभास असा आहे कि माणसातून भाषा
वजा केली कि माणूस निव्वळ पशु उरेल असं सांगणारे खुपजण आहेत पण माणसातून पशु वजा केला तर नुसती चिन्हलता उरेल भाषा उरेल तिचं काय ? मोबाईल एकमेकाला फोन करणार आहेत काय ? मांसल बेसिक आहे चिन्हल नंतर आहे हे मांसल आधीच असते म्हणजे काय हा प्रश्न इतका सोपा नाही पूर्वी मटेरिअलिझम ह्या प्रश्नांची उत्तरे देईल असं वाटायचं पण आता ते इतकं सोपं नाही आपल्याला अद्यापही आपले ब्रम्हांडीक आणि विश्वीय प्रॉग्रॅमिंग कळत नाही इतकेच कशाला आपले अर्थनिक म्हणजेच पृथ्वीय (EARTHENIC ) प्रोग्रामिंगही आपल्या अजून देहाच्या म्हणजे मेंदूच्या कह्यात आलेले नाही अलीकडे थोड्याश्या प्रमाणात आपल्याला मानवी देहाचे प्रोग्रामिंग जनेटीक प्रोग्रामिंगच्या रूपाने आपल्या कह्यात आले आहे मात्र अनुभवातील ह्यांच्या रोलचे मॅपिंग अजूनही आपल्या कुवतीबाहेर आहे ह्या संदर्भातील काम पुढच्या पिढ्या करतीलच पण सध्या जे काही आपल्या देहकक्षेत आहे त्याच्या हिशेबाने आपल्याला मांडणी करावी लागणे अटळ आहे
कलेसाठी आणि कलावंतासाठी अनुभव ही सर्वात महत्वाची गोष्ट !
१ प्रत्यक्ष अनुभव
२ अनुमानात्मक अनुभव
३ आप्तात्मक अनुभव (नातेवाईक ,मित्र व गोतावळा ह्यांचे व ह्यांनी सांगितलेले अनुभव )
४ कल्पनात्मक अनुभव
५ स्वप्नात्मक अनुभव
६ भासात्मक अनुभव
७ चिन्हात्मक अनुभव
आणि जो भाषेत व्यक्त होतच नाही असा मोक्षानुभव
असे अनेक अनुभव त्याला येत असतात तो अनेकदा पॉसिबल वेज ऑफ बिकमिंग एक्सपीरियन्स शोधत असतो आणि अंतिमतः त्यालाही चिन्हात्मक अनुभव निर्माण करत बिकमिंग मधून बीइंग कडे परतायचं असतं हे साधायचं असेल तर साधना व प्रॅक्टिस दोन्हींची सांभाळणी करावी लागते कुणाची साधना मोक्षिक कुणाची सामाजिक कुणाची अध्यात्मिक कुणाची जडीक ह्याशिवाय त्याला अनुभव सादर करण्याचे विशेष कौशल्य आत्मसात करावे लागते प्रतिभा , श्रम आणि हे कौशल्य ह्यांच्या आधारे त्याने प्रभावीपणे अनुभव सादर करावा ही अपेक्षा योग्यच म्हंटली पाहिजे प्रभावी म्हणजे फक्त रसाळ न्हवे हल्ली रसाळ हा शब्द कुणी वापरत नाही त्याऐवजी इंटरेस्टिंग हा इंग्लिश शब्द वापरण्याची फॅशन आहे तर प्रभावी म्हणजे रसाळ न्हवे इंटरेस्टिंग न्हवे तर अनुभवाची जी रीत आवश्यक आहे ती रीत परिणामकारक पद्धतीने वापरणे मराठीत कोसलाने एक मोनोटोनस रसाळता केंद्रस्थानी आणल्याने हे विशेष नमूद करावे लागते काहीवेळा डिसइंट्रेस्टिंग पद्धतीनेही अनुभव सांगितला जाऊ शकतो कधीकधी क्रौर्य पद्धतीने म्हणजे जर का तुम्ही सर्बियन फिल्म ही फिल्म पाहिली तर क्रौर्याचा आणि बीभत्सचा कितीं भीषण परिणामकारक वापर करता येतो हे दिसून येते युरायपिडीजचे मीडिया आणि आर्तोचे थिएटर ऑफ क्रुएल्टी बोअर झाले म्हणे तोवर सर्बियन फिल्म मध्ये क्रौर्य हे एक नॅरेशन पद्धत बनून पुन्हा येतंय ग्रामीण गझालीचं चटकदार आधुनिकीकरण हे कोसलाचं वैशिष्ट्य असेल तर ते काही एकमेव न्हवे मला अनेक नॅरेटिव्ह पद्धती वापरायला आवडतात शेवटी एकलम नॅरेशन चपळाई म्हणून ठीक आहे पण आत्ताच्या जगाला ती कवेत घ्यायला सक्षम नाही WRITING IS नाऊ MULTITASKING अर्थात मराठी लेखकांना हे कितपत पटेल कुणास ठाऊक ? सध्या आपण सगळेच शॉर्टकटवादी झालोय मराठी लेखकांनी तरी मागं का रहावं जीथल्या मांजरांनाही आपण राजकारणाद्वारा वाघाची शिकार करू असा कॉन्फिडन्स असतो तिथे हे अटळच !वह्या काय फक्त तुकारामाच्या काळातच बुडवल्या जात होत्या असं नाही त्यापूर्वीही बुडायच्या आणि त्यानंतरही बुडत आहेत
------------------------------------------------------------------------------------------------------------
कवींना आपण गायीइतकेही उपयुक्त पशु नसल्याचा गिल्ट ग्रासून टाकत असतो आपण उपयुक्त असलो पाहिजे ह्या अपेक्षेतून हे घडत असते सौंदर्यवादी कवी आपण जीवनाला सौंदर्य पुरवतो अशी गैरसमजूत समाजाला पुरवून ह्या गिल्टमधून मोकळे होत होते हल्लीच्या कवींना हेही शक्य नाही मग कवितेचा प्रॅक्टिकल डौल टिकवायचा कसा ? कविता ही भाषेच्या अनुभववर्तुळाचे केंद्र असते जे सूक्ष्म असल्याने अनेकांच्या दिठीतून व मिठीतुन सहज निसटून जात असते मात्र तिला मात्र भाषेचा परीघ स्पष्ट दिसत असतो तिचे प्रयोग स्वतःवरच चाललेले असतात तिच्याद्वारे भाषा केवळ अनुभव सादर करत नाही तर सादर करत असताना सादर करत असलेल्या अनुभवालाही घडवते आपण भाषा जन्मजात घेऊन आलेलो नसतो आपण ती प्राप्त करत असतो आणि ही प्राप्त झालेली भाषाच आपल्या मी लाही घडवत असते भाषेला भावना आणि विचार ह्यांच्यातील फरक निदान कविता लिहिली जात असतांना तरी कळत नसावा
आपण जन्मतः भाषिक पशु असतो मग हळूहळू आपण भाषिक प्राणी बनतो फक्त कवीच असतात जे भाषिक मानव बनतात आणि वाचकांना भाषिक मानव बनवतात कवींचे काम होमो सेपियन्सना होमो लांग्वेजीयन भाषिक मानव बनवणे हे असते किंबहुना सगळेच लेखक हे काम करत असतात कवी थोडे अधिक तीव्रतेने आणि अधिक कल्पतेने हे काम करतात
अलीकडे पोस्टफ्रॉइडियन प्रभावामुळे आपला अनुभव हा आपण घेत नसतोच असाही दावा केला जातो म्हणजे आपला अनुभव हा आपला कॉन्शसनेस सबकॉन्शसनेस आणि अनकॉन्शसनेस ह्यांनी फिल्टर होऊनच आपल्यापर्यंत पोहचतो असे मानले जाते समजा हे वास्तव आहे तर ह्या फिल्टरिंगवर आपण मात कशी करणार ?
कविता ही अनकॉन्शस सबकॉन्शस कॉन्शस ह्यांचे संघटन आहे असे मानून ?गोष्टींना एकात्म करत जाणे ही संघटनांची आवश्यकता असते कविता हे काम करते काय ? प्राचीन भाषेत विचारायचे तर कविंना भाषेत आत्मा ओतता येतो काय कि कवी संपूर्ण वैयक्तिक भाषेला आत्मा बनवून तिला सामाजिक भाषेत ओतत सामाजिक शरीर देत असतात काय ?
कलावंत आणि वैज्ञानिक तंत्रवैज्ञानिक ह्यांच्या सृजनशीलता ह्या एकाच आईच्या कि दोघांच्या माता सावत्र हे अजूनही स्पष्ट नाही रामनांना दृष्टांत देणारी देवी आणि कवितादेवी एकच कि भिन्न ? किंवा अलीकडचे उदाहरण घ्यायचे तर न्यूरोसायन्समध्ये नोबल मिळवलेल्या व आयुष्यभर आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या रॉजर स्पेरीचे घेता येईल
कला वैज्ञानिक विधानं करत नाही ही कलेची कमजोरी नसून कलेची ताकद आहे तरीही गेली कित्येक शतकं विज्ञान कलेचा शिक्षक बनून कलावंतांना विध्यर्थी म्हणून ट्रीटमेंट देतंय पण ह्या शतकात त्यांनी कलेचे विध्यार्थी बनायला काय हरकत आहे ? शेवटी विज्ञान तंत्रज्ञानाला सेंसिबल आणि पब्लिकल बनवण्याचं काम कलाच करते ना ? प्रत्येकवेळी कलावंत विज्ञान तंत्रज्ञानाचा विध्यार्थी असं कशाला ? अपवाद काही प्रमाणात न्यूरोसायन्स ते अपवादात्मक वेळा विध्यार्थी बनतं. तिथं काय दिसतं ?सध्या न्यूरोसायन्स मानवी मेंदूचे लाक्षागृह जाळून जाळून पहात आहे पण अंतर्मनाची जाळी काही ह्या स्पायडरमॅनच्या कवेत येत नाहीयेत असं दिसतं असं तर नाही ना ज्या खोलात जाऊन न्यूरोसायन्स कलेचे मूळ शोधतंय त्या खोलातून मुळात कविता येतच नाही ? असं तर नाही ना कि तो सर्फेस कल्चरवरचा सुरवंट आहे जो कविता बनून अचानक उडतो ? कि हे सुरवंटीरूप केवळ एक रूप आहे आणि कालांतराने त्याची चटपटीत फुलपाखरे बोअर करायला लागतात ?कोसलासारख्या टिनएज फुलपाखराचा आपल्या जाणिववाढीत खरोखर काय वाटा आहे ? अनुभवाची घनता तपासायला गेलं कि नेव्हरएंडिंग प्रश्नावली चालू होते आणि फिल्टरिंग डोळ्यात घुटमळायला लागते
आस्वादाच्या पातळीवर करंदीकरांनी सांगितलं होत कविता कशी वाचावी तर कपडे काढून पण समजा कविताच कपडे घालून येत असेल तर किंवा ह्याही मागे खोलात जाऊन कविता हाच भाषेचा सर्वोत्तम कपडा असेल तर ! आणि ह्याही मागे खोलात जाऊन कविता जर फिल्टर केलेल्या धाग्यापासूनच कपडा बनत आपल्यापुढे वावरत असेल तर !
कविता लिहिणं म्हणजे भाषेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात अंगावर कविता नावाचा कपडा आपल्या आत्मचरित्रात्मक धाग्यांसकट फॅशनसकट घेऊन कबीरासारखं उभं राहणं लुकाटीची गरजच नाही आता कविता पुरेशी आहे कारण कवी म्हणजे ऑटोपोएट्रीकल एंटीटी ! नग्नता ही आता निषेध म्हणून वापरली जाऊ लागली आहे ह्यावरूनच आपल्या आयुष्याचे किती कपडेकरण झाले आहे ते लक्ष्यात यावे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुभवाचे कपडेकरण अनुभवाला कपडा म्हणून येऊ देते आणि कपडा म्हणूनच सादर करायला सांगते आजचा मीडिया हा असा कपडेबाज मीडिया आहे आणि फॅशन हे त्याचे स्टेटमेंट आहे कलेला ही मीडियासंमत फॅशन स्टेटमेंटस वगळून मूळ अनुभवापर्यंत जावे लागेल १९९२ सालच्या चौथ्या नवतेवरच्या पहिल्याच प्रसिद्ध झालेल्या लेखात मी लिहिले होते कि जे टीव्ही पकडू शकत नाही ते कलेने पकडायला हवे आता इंटरनेट स्मार्टफोन ऍप्स जे पकडू शकत नाही ते असे अपडेटींग करावे लागेल फिल्टरिंग वगळून अनुभवाला भिडण्याचं चॅलेंज हे काही फक्त आजचे चॅलेंज नाही
प्राचीनकाळी धर्म आपला अनुभव फिल्टर करत होता आणि अनुभवावर देवांचे व ईश्वराचे नको तेव्हढे दडपण पडायचे प्रबोधनाने हे दडपण झुगारून देण्याचा प्रयत्न केला आणि निसर्गापुढे धार्मिक कपडे काढून उभे राहा अशी घोषणा केली प्रबोधनातला पहिला इझम हा फ्रान्सिस बेकन ह्याचा एम्पीरिसिझम होता हा काही योगायोग न्हवे
ह्याचा अर्थ आपला अनुभव फिल्टर होऊन आपणाला येतो ह्याची स्पष्ट जाणीव आपणाला प्रबोधनकाळापासूनच
आली होती प्रश्न असा आहे कि परिस्थिती ,कौशल्य , ज्ञान ,सामाजिकता आणि पर्यावरण ह्यांच्या बॅकग्राऊंडवरच आपण अनुभव घेणार असू तर आपल्या अनुभवाची ऑथेन्टिसिटी काय ? आपलं अर्काइव जर आपल्याला अनुभव जसा आहे तसा घेण्यापासून वंचित ठेवत असेल तर असली अर्काईव्हजड कला खरी कला मानता येईल काय ?
माझं अर्काइव्ह जर शैव असेल तर मी बौद्ध किंवा जैन किंवा लोकायत किंवा वैदिक किंवा हिंदू किंवा वैष्णव ह्यांच्यापर्यंत ऑथेंटीकली पोहचू शकतो काय ? माझं अर्काइव्ह जर बौद्ध असेल तर मी शैव किंवा जैन किंवा वैदिक किंवा हिंदू किंवा वैष्णव किंवा लोकायत ह्यांच्यापर्यंत ऑथेंटीकली पोहचू शकतो काय ?माझं अर्काइव्ह जर वैदिक किंवा हिंदू किंवा वैष्णव असेल तर मी शैव किंवा जैन किंवा बौद्ध किंवा लोकायत ह्यांच्यापर्यंत ऑथेंटीकली पोहचू शकतो काय ? मी माझ्या अर्काइविंगवर काम करू शकतो काय ?
माझे शैव असणे आणि समोरच्याचे लोकायत किंवा बौद्ध वा जैन वा वैदिक किंवा हिंदू किंवा वैष्णव असणे हे एका सारख्याच अर्कायविंगचे भाग आहे काय आणि मग शेवटी डीअरकायविंग कसं करायचं हाच मुख्य प्रश्न उरत नाही काय ?
आपण स्वतःच सिच्युएशनल असू तर समोरच्याच्या देहक्रिया आणि अनुभवक्रिया ह्याही प्रदूषित होऊनच मला प्राप्त होणार नाहीत काय ? आपण बाहेरच्या पर्यावरणाची नासाडी तर आधीच केलेली आहे पण आपण देहाच्या आतील पर्यावरणाचाही नासाडी करत चाललो आहोत त्याचे काय ? पर्यावरणाचा प्रश्न फक्त भोगोलिक नाही तो अंतःकरणात्मकही आहे
संघटनांनी आपल्या अनुभवावर मिळवलेला कब्जा हा आजच्या काळातील कलेचा सर्वाधिक चिंता करावा असा विषय आहे आपण कलावंत म्हणून एखाद्या संघटनेसाठी काम करत आहोत काय हेही तपासण्याची वेळ आता आली आहे कारण संघटन आता फक्त कॉन्शस राहिलेले नाही ते अनकॉन्शस आणि सबकॉन्शसही झालेलं आहे दिल्लीतील गनमॅन कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेचा सभासद नसतांनाही हिंदू राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरला कारण संघटनेने त्याच्या आणि आपल्याही अनकॉन्शसवरही कब्जा मिळवलेला आहे
रस्त्यावरचा हा गनमॅन आणि कविता वा पेंटिंग वा तत्सम काही हातात घेतलेले आपण ह्यांच्यात खरोखर काय फरक आहे ? मोदीविरोधी उन्माद आणि मोदीभक्त उन्माद ह्यांच्यात फरक काय ? दोन्ही ठिकाणी संघटनात्मक सिच्युएशनल काम करत नाही काय ?
आपण जगत नाही आहोत आपण जगण्याचा अभिनय करतो आहोत आणि एकविसाव्या शतकातील ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आपण आधी ठरवतो कि आपण असे आहोत मग तसे जगतो
अशावेळी ह्यातून निर्माण होणाऱ्या किंवा ह्या अभिनयसंस्कृतीला टाळणाऱ्या सिच्युएशनल एक्सपीरियन्सवर छक्का मारायचा असेल तर अनेकदा तुम्हाला बाऊंड्रीबाहेर स्वतःच पळून जात सीमेवरचा भाषेचा बॉल टोलवावा लागतो कारण आत्ताच्या अनुभवाचे मैदान मोबाईल असते धावा मोबाइल असतात आणि सीमाही मोबाईल असतात माझ्याकडे काम करणाऱ्या मावशींच्या गावरान भाषेत मोबल असतात हे करतांना गद्य आणि म्यूजिकल स्कोर करणाऱ्या तऱ्हा सारख्याच प्रेमळतेने हाताळाव्या लागतात नाहीतर अर्थही सिच्युएशनल बनतो आणि कवितेचा युनिव्हर्सलतेचा क्लेम ढासळतो आणि कवी फिरत्या रंगमंचावर अभिनयाच्या द्वारे प्रभाकर सादर करत राहतो पोटभरू कलेसाठी प्रभाकर पणशीकर होणे कधीही चांगलेच कारण तिथे तो मी न्हवेच चा खेळ मनोरंजन म्हणून चालवता येतो पण सिरीयस कलेला मुखवटेही गांभीर्याने आणि कधीकधी चेहरे म्हणून सादर करावे लागतात किंवा गरज पडल्यास चेहरे मुखवटे म्हणून ! मी श्रीधर तिळवे असा अनेकदा सादर केलाय कवितेत आणि अडा हॉ का सारख्या महाकृतीत !
एकविसाव्या शतकातला सर्वात महत्वाचा तात्विक प्रश्न आपला प्रत्येक न्यूरॉन पर्सनल आहे का कि तो ब्रह्मांडीक ब्रेनच्या नेटवर्कचा नेटल एपिसोड आहे ? हा आहे . अर्थाच्या गोलमटोल आकाराचा मध्य ह्या प्रश्नात आहे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आयुष्याच्या अर्थाची समस्या ही तशी जुनी आहे ती प्रथम प्रतिसृष्टीय तंत्रज्ञान युगात जन्मली धर्मयुग असो मोक्षयुग असो किंवा विज्ञानयुग असो ह्या प्रत्येकाला धर्म , मोक्ष , आणि विज्ञानात आयुष्याचा अर्थ निर्विवाद सापडला पण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर ईश्वर मेला देव मेले आणि विज्ञानही काही गॅरेंटेड अंतिम देईना ह्यावर उपाय म्हणून किर्केगार्दने प्रथम आयुष्याला अर्थ देण्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आणि नित्शेने ती माणसावर असल्याची घोषणा केली त्याने आधीचे अर्थ फँटसी म्हणून निकालात काढले आता अवस्था अशी आहे कि आयुष्याला अर्थ देण्याची आपली क्षमता आपण कन्झ्युमर कल्चरकडे गहाण टाकलीये आपल्या आयुष्याला अर्थ देण्याचा ठेका कॉर्पोरेट कल्चर व पॉलिटिक्सनं स्वतःकडे घेतलाय आणि आपण त्यांनी टाकलेली अर्थांची टेंडरं फक्त पास करत बसलोय अशावेळी कवी म्हणून मला व्यवस्थेकडं गहाण पडायचं नसेल तर मला माझं शहाणपण डबल करावं लागतं . साहजिकच कविता आता मिनिंग ऑफ लाईफ सांगत नाही तर मिनिंग इन लाईफ शब्दांद्वारे दाखवते कधी कधी मिनिंग थ्रू कविता फॉर लाईफ असंही ऑपरेटिंग होतं ब्रेनची क्लिनिकल क्लॅरिटी अचिव्ह करण्याचाही प्रयत्न चालू असतो एकमेकांचे दिवस प्रज्वलित करत आपण जगतो आहोत आणि आपल्याला ऑलॉट केलेला टाइम कधीतरी सम्पणार ह्याची खिन्न करणारी जाणीवही आहे पूर्वी कुणीतरी जन्मायचा मरायचा आणि त्याची जमीन कुणासाठी तरी वाढ ठरायची आता ती वाढ ठरतेच पण विकासही ठरते आणि फिल्डिंग लावण्याची कपॅसिटी वाढवणारी ठरते यशाचा अर्थ निगोशियन्स व डीलिंगची फिल्डिंग कपॅबिलिटी वाढवणे असा आहे कवितेकडे अशी फिल्डिंग कॅपॅबिलिटी नाही तरीही काही कवी तिला फिल्डिंग कपॅबिलिटी बनवण्यात यशस्वी झालेत मराठी कवितेचे प्रदूषण त्यांच्या ऍक्टिव्हिटीत दबा धरून असते आणि चांगल्या कवीवर आणि कवितेवर योग्यवेळी हल्ला चढवते
माझ्या समकालीनांनी प्रथम माझी प्रतीक्षा केली मग त्यांच्या झुंडीत सामील व्हावं म्हणून अपेक्षा केली आणि सामील होत नाही हे कळल्यावर उपेक्षा केली मी ह्यातलं काहीही माझ्या अंगाला लावून घेतलं नाही कारण मी कुठल्या अंगाने उभा आहे आणि वाहतो आहे हे मला नीट माहित आहे माझे पाय कुणी ओढते का ह्या प्रश्नाकडे मी लक्षच देत नाही कारण कवीचे पाय ओढून कवितेचे पाय ओढता येत नाहीत विषारी प्रचार चांगल्या कवितेचे अमृत गिळू शकत नाही कॉन्फिडन्स नसलेल्यांचे माकडडान्स मी स्टॅन्ड अप डान्स म्हणून एन्जॉय करतो
अलीकडे मी एका फिल्मला म्युझिक दिले त्यावेळी आपण ऍप्सना डिझाईन करतोय कि ऍप्स आपणाला डिझाईन करतायत हाच प्रश्न पडला बहुधा हे न कळणारे अनेक आहेत स्मार्टफोन हातात आला कि आपण स्मार्ट होतो असं समजणाऱ्या वेड्यांची संख्या काही कमी नाहीये अशावेळेला स्मार्ट कलावंतांचीच चालती होणार हे उघड आहे कवितेची रोमँटिक ऍप्स सध्या भंपक कवितेचा आल्प्स पर्वत रचतायत आणि अस्सल कवितेचा हिमालय दिसेनासा झालाय आणि कैलास तर चायनीजच झालंय
डिजिटल शब्द हा डाटामधून आल्यासारखा असतो म्हणूनच तो वापरतांना अधिक मानवी करावा लागतो सिच्युएशन्स आणि भाषा ह्यांच्या सहउत्क्रांतीच्या शक्यता सतत तपासाव्या लागतात . मानवी संस्कृती ही अतिपरिचयात अवज्ञा म्हणून भाषा अत्यंत निष्काळजीपणे वापरत असते भाषा हे टूल आहे ह्याची अनेकांना जाणीवच नसते कविंना हा निष्काळजीपणा परवडणारा नसतो
कवितेत व एकंदर कलेत महत्वाची असणारी दुसऱ्याच्याजागी स्वतःला कल्पण्याची माणसाची क्षमता आता आयुष्यात आणि कवितेतही अधिक गुंतागुंतीची झालीये एक चांगली गोष्ट म्हणजे आता एम्पथी रॅशनल झालीये आणि सिम्पथी आऊटडेटेड त्यामुळे कवितेतून उमाळे काढायचे दिवस संपले अन्यथा कित्येकदा एम्पथीच्या नावाखाली स्कीमपॅथी चालायची रोमँटिक कळवळ्याच्या उलट्यात सौंदर्य शोधणारे अस्थेटिक डॉक्टर आता हास्यास्पद वाटतात
माझ्यासाठी दुकान चालवणे मेडिटेशन करणे ह्याही कवितेची प्रॅक्टिस आहेत डिझाईनवर कोसळून ठार होण्याच्या शक्यता जेवढ्या कवितेत असतात तेवढ्या इतर कलात नसतात माझी प्रॅक्टिस मला ह्या आत्महत्येपासून वाचवते कविता आपल्या भाषिक सवयींना कायमच डिस्टर्ब् करत असते एकमेकांच्या कविता किंवा कलाकृती एकमेकांच्या कवितांना कलाकृतींना कॅन्सल करत नाहीत हे कवितेचं कलेचं फार मोठं बळ ! त्यामुळे मी स्पर्धांच्या भानगडीत पडत नाही प्रत्येक चांगली कविता दुसऱ्या चांगल्या कवितेला मदतच करत असते
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या बापाला कधीही वाटलं न्हवतं कि धार्मिक स्टेट आणि लिबरल स्टेट हे एकमेकांविरोधी कॉन्टेस्टन्ट म्हणून उभे ठाकतील पण इस्लामला इस्लामचे प्रश्न सोडवूं देण्याऐवजी प्रथम अमेरिकेने अनेक इस्लामिक डेमोक्रसीत घुसून व नंतर कम्युनिस्टांनी अफगाणिस्तानात घुसून इस्लामिक स्टेटची जगभर पायाभरणी केली आर्थिक हितसंबंधांसाठी लोकशाहीशी रक्ताची होळी करू पाहणाऱ्या मूर्खांनी अंतिमतः आपले आर्थिक हितसंबंधही धोक्यात आणले आणि जगालाही धार्मिक राजवटीची चटक लावली हा धार्मिक राजवटींचा मलखांब फार काळ टिकणार नाही असाही निष्कर्ष काही जणांनी काढलाय जो पूर्ण बेसलेस आहे माणसाला आजही पुरेसं रॅशनल बनता आलेलं नाही रॅशनल टोळ्यांची पॉकेट्स म्हणजे जग न्हवे नेहरूंना पंतप्रधानपदासाठी २० टक्केही मते पडली न्हवती हे लक्ष्यात घ्यायला हवं गांधींच्या इररॅशनल पाठिंब्याने नेहरू पंतप्रधान झाले गांधींच्या नंतरही नेहरू विजयी झाले ते गांधींच्या संघटनेच्या आधारे हे संघटन संपल्यावर काय होते ते आपण आता अनुभवतो आहे गांधींची आठवण सगळ्यांना येतीये कारण गांधीसंघटन नाहीसे झाले ते तसं नाहीसे व्हावे म्हणून साम्यवादी आंबेडकरवादी आणि काही समाजवादीही फार प्रयत्नशील होते त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले पण त्यामुळे रिकामी झालेली जागा आपल्याला मिळेल हा ह्यांचा अंदाज सपशेल चुकला ती जागा मिळाली चक्क भाजपला ! नित्शेने जेव्हा दोघेही मरतात आणि त्यांचे मरणे एकंदर फायदेशीर होते अशा स्पर्धेचा उल्लेख केला होता इथे काहीसे तसे झाले आहे म्हणजे काँग्रेसही मेली आणि कम्युनिस्ट आंबेडकरवादीही मेले आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण ह्या कादंबरीत मी सावध हाका दिल्या होत्या पण ऐकते कोण ? नित्शेने ह्याला म्युच्युअल ऍनीहिलेशन म्हंटले आहे
हे सर्व कमी होते म्हणून कि काय अण्णा हजारे वाजवीपेक्षा आधिक व्यापक झाले अंगापेक्षा बोन्गा मोठा झाला
मी अण्णा हजारेंना अर्धवट गांधी म्हणतो त्यांनी गांधीवादाची अर्धवट आणि ढिली पुनर्स्थापना केली पण त्यांच्या नेहरुला म्हणजे केजरीवालांना पाठिंबा द्यायला ते विसरले राजकीय निर्णय घेण्याचे जे नैतिक धैर्य गांधींच्याकडे होते ते ह्जारेंच्याकडे न्हवते पाठीमागच्या सगळ्यांना सांभाळायला गेले आणि एकही उरला नाही त्यामुळे हजारेंनी निर्माण केलेल्या जागेपैकी पाऊण जागा भाजपला आयती मिळाली गांधींचा गुजराती प्रॅक्टिकॅलिझम ओळखण्यात मराठी माणसाने दुसऱ्यांदा चूक केली आधी विनोबा भावे आणि आता हजारे म्हणजे गांधी पुन्हा जिवंत होण्याऐवजी त्यांची धागधुग जिवन्त झाली अर्थात ह्यामुळे साम्यवादी आंबेडकरवादी आणि समाजवादी सुधारलेत असं नाही आता ते केजरीवालांच्या मागे लागलेत
केजरीवालांची कुवत नेहरूंच्याइतकी आहे कि नाही ते काळ सांगेल नेहरूंच्यासारखी पर्सनॅलिटी त्यांच्याकडे नाही पण त्यांच्याकडे असलेले मॅनेजमेंट चांगले आहे ते अजून तरी दिल्ली पातळीवर यशस्वी आहे राष्ट्रीय पातळीवर त्याचा कस लागेल कि नाही तशी संधी त्यांना मिळेल कि नाही हे पहाणे इंटरेस्टिंग
माझ्या तर्कावर उतरेल असा उदारमतवाद माझ्या आसपास नाहीये पण म्हणून मी कुठल्याही उदारमतवादावर सही करेन असं कुणी मानू नये माझ्या लढायांत मी मार खातानाही इतरांना बोलवत नाही कारण मारामारीचा नियम असा कि तुम्ही मदत करत नसाल तर मदत मागण्याचा तुम्हांलाही हक्क नाही मैं मेरी मौत मरनेकेलिये तैय्यार हूँ आणि ही काही हौतात्म्याची हौस नाही तर स्वतःच्या स्थितीचे आकलन आहे ज्यांना मोक्ष हवा असतो त्यांना क्रूसाला घाबरून चालत नाही आणि जो मोक्षाला पोहचतो त्याला क्रूस भीतीदायक वाटत नाही
उदारमतवादाची विशाल छत्री धार्मिक पाऊसापुढे केविलवाणी झालीये हे सद्याचे चित्र आहे पण एक बदल दिसतोय पूर्वी ९० च्या आसपास डावे आणि उजवे दोघेही उदारमतवादाच्या भाषेत बोलायचे म्हणजे वाजपेयी आणि नरसिंहराव दोघेही आता तसं राहिलेलं नाहीय संविधानाच्या चौकटीत वावरणारी धार्मिक राजवट हे मोदी ह्यांच्या राजवटीचे वैशिष्ट्य आहे पण हे टिकेलच ह्याची गॅरेंटी नाही त्यामुळे भय आहे उत्तराधुनिक काळातील ह्या धार्मिक राजवटी साधारणपणे आर्थिक पातळीवर नाकाम होतात मोदी ह्यांच्याबाबत सध्या तरी नाकामता दिसते आहे भारतातील किमान एक लाख उद्योगपती जी एस टी मुळे देश सोडून गेले आहेत पण मोदींच्या निबर कातडीला काहीही फरक पडलेला नाही लोकांची क्रयशक्ती थेट ५० टक्के घटलेली आहे पण ह्यानेही मोदी हलत नाहीयेत कधी कधी प्रश्न पडतो मोदी हे भारतातील सर्वात निबर कातडीचे पंतप्रधान आहेत का ? काश्मीर राम मंदिर समान नागरी कायदा ह्याबाबत मी त्यांना पाठिंबा दिला कारण हेही आवश्यक आहे पण आर्थिक बाबतीत ते जो ढोल पिटतायत तो फाटलेला आहे अंमलबजावणी पूर्ण ढेपाळलेली आहे ते स्वतःला विवेकानंदांचे शिष्य म्हणवतात पण भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही संन्याश्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय तो त्यांनी लोकांचं भलं करावं म्हणून वाटोळं करावं म्हणून न्हवे आणि आता वेळ आलीये कि सर्व संन्याश्यानी त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे कि अर्थव्यवस्था नीट करा नाहीतर पुढची इलेक्शन तुम्ही हरणार
पण समजा उद्या जर का मोदी ह्या आर्थिक पातळीवर यशस्वी झाले तर मात्र इस्राएलप्रमाणे इथेही धार्मिक राजवट टिकणे अटळ आहे आणि मग जी काही निवडणूक होईल ती दोन धार्मिक पक्षात होईल कदाचित भाजपमध्ये मोठी फूट पडेल कदाचित हिंदुत्वाचा नवा व्हर्जन ह्यातून उगवेल किंवा आप राष्ट्रीय पर्याय म्हणून उगवेल आणि फाईट आप विरुद्ध भाजप होईल
मी उदारमतवादाला आशा पुरवत नाही ह्याचा अनेकांना राग येतो पण १९८४ पासून मी दिलेली प्रेडीक्शन्स फारशी चुकलेली नाहीत काळ मागे पुढे झालाय पण निदाने अचूक आहेत
उदारमतवादाला मेटा आयडियॉलॉजी बनवता येईल का हा खरा क्रुशियल प्रश्न आहे जगातील समस्त उदारमतवाद्यांनो एक व्हा अन्यथा तुमच्याजवळ गमवायलाही काही शिल्लक राहणार नाही असा आंतरराष्ट्रीय मॅनिफेस्टो काढायला काय हरकत आहे ? उदारमतवाद हा एकेश्वरवादी नाही हे एकेकाळी त्याचे बळ होते पण कदाचित आता ती कमजोरी झालीये स्वातंत्र्य समता बंधुता नागरिक हक्क आणि स्वायत्तता ही उदारमतवादी मूल्ये टिकायलाच हवीत पण अल्पसंख्याकांचे लाड करून न्हवे तर खरीखुरी समता अप्लाय करत ! भोंगळ अंतर्राष्ट्रीयवादाऐवजी प्रॅक्टिकल आंतर्राष्ट्रीयवादाची उदारमतवादाला प्रचंड गरज आहे कयदेपालनाची सवय नसलेल्या लोकशाहीत आपण राहतोय आणि अशा लोकशाह्या ह्या कायमच एकाधिकारशाहीप्रोन असतात आणि डेमोक्रेटिक एकाधिकारशाही ही नेहमीच उदारमतवादाची पंचाईत करत असते कारण तिला लोकांचा पाठिंबा असतो
शेवटी वाद घालायला का होईना आपण जिवंत असलो पाहिजे असे वाटण्याचा काळ भारतात आलाय का ? कि हे दाखवण्यात आलेले भय आहे जेणेकरून लोकांनी घाबरून आपणाला मत द्यावे ?कम्युनिस्ट भयाचे राजकारण खेळण्यात निपुण असतात म्हणून तर आंबेडकर कम्युनिस्टांच्याबाबत सावध होते भारतातील लोकायत परंपरा टिकलीच पाहिजे आणि सद्या तरी ती कम्युनिस्टांच्या इतकी कुणीच तीव्रतेने सांभाळत नाहीये कम्युनिझम हा पुरोहितशाहीवरचा रिमोट कंट्रोल आहे आणि तो टिकलाच पाहिजे पण त्यावर आंबेडकरवादाचा अंकुशही हवा आंबेडकरांच्या मंत्रिमंडळात मी कार्ल मार्क्सला पाहू शकतो पण मार्क्सचं मंत्रिमंडळ मी इमॅजिन करू शकत नाही
उदारमतवादात सध्या घडतंय असं कि पूर्वीसारखे डॉक्टर नर्सेसशी लग्न करत नाहीयेत ते डॉक्टरांशीच लग्न करतायत उदारमतवादातली समता ही डॉक्टर डॉक्टर समता आहे तिचं डाउन ट्रिकलिंग पुरेसं झालंच नाही कारण हितसंबंधांची सांभाळकी ! जगात इतरत्र उदारमतवादी नेत्याला माणसं सांभाळण्याची कला प्राप्त असावी लागते भारतात जातींना सांभाळण्याची कला प्राप्त असावी लागते पूर्वी हे उघड न्हवते पण सोशल मीडियाने सगळ्यांना उघडं पाडलं प्रकाश आंबेडकरांनी तर उमेदवारांच्या जातीचं जाहीर केल्या आणि नवबौद्ध असेल तर मात्र त्याची जात जाहीर केली नाही म्हणजे एकतर नवबौद्ध जाती पाळत नाहीत असं म्हणायचं आहे किंवा नवबौद्ध हीच एक जात आहे असं जाहीर करायचंय आता आंबेडकरांच्या नातवाची ही अवस्था असेल तर बाकींच्याविषयी काय बोलावं बाकीचे जे गुप्तपणे करत ते आंबेडकरांनी उघडपणे केले एकंदरच आपली जातकेंद्री मानसिकता ह्यामुळं थेटपणे पोलिटिकल झाली
ह्यात भरीस भर म्हणून लोकसंख्येच्या स्फोटामुळं माणसांबद्दलची तो व्यक्तिगत इंडिविज्युअल म्हणून जिवन्त राहिला पाहिजे ही भावनाच नाही आपण कायमच गोतावळा म्हणून जगतो व्यक्ती म्हणून कसं जगायचं हे आपणाला ठाऊक नाही त्यामुळे केवळ एखाद्या वादाच्या वा महापुरुषाच्या स्टॅम्पमुळं एखादा सामान्य कुवतीचा माणूस इथं मोठा होऊ शकतो आपल्या जातीचा आपल्या वर्णाचा आपल्या धर्माचा आपल्या गोतावळ्याचा आपल्या आडनावाचा हे आपल्याकडे फार ! आपण मोक्ष मिळालेले मुक्त स्त्रीपुरुषही ते मेल्यानंतर बद्ध करून टाकतो इतके आपण नालायक आहोत अशा ठिकाणी उदारमतवाद फार काळ टिकला नाही ह्याचे आश्चर्य काय ?कारण उदारमतवाद म्हणजे व्यक्तीची प्रतिभा व्यक्तीची मेहनत व्यक्तीचे कौशल्य ह्या सर्वांची इज्जत करणे आपणाला अशी इज्जत करणे ही गोष्ट जमत नाही उलट एखाद्या व्यक्तीचे प्रातिभ काम , मेहनत किंवा कौशल्य कसे ढापता येईल ह्याकडे आपले लक्ष्य असते संकल्पनांचे अत्याचार आपण सहज सहन करतो कारण त्या आपणाला कळत नाहीत नेमाडे ही आपली प्रवृत्ती आहे श्रीधर तिळवे ही आपली अस्पृश्यता आहे मी ती झेलतो आपण संकल्पनांना पिरॅमिडमध्ये पुरत नाही आपण दरवर्षी त्यांचे श्राद्ध घालून त्यांच्या पिंडाला शिवायला जिवंत कावळे बोलवतो आणि कावळे ज्ञानेश्वरांचे पाहुणे असू शकतात किंवा पोलिटिकलही असू शकतात
आत्ताच्या राजकारण्यांपुढे अलीकडे १ पक्षाची मूळ भूमिका २ पक्षाची सत्तेसाठी बदललेली भूमिका ३ पक्षाची पक्षाला पटलेली पण बदललेली भूमिका ४ स्वतःला पटलेली भूमिका ५ करियरसाठी सोयीची भूमिका अशा पाच भूमिका असतात आणि ह्यांच्यातील संघर्ष पेलतच तो वाटचाल करत असतो चांगलं वाईट भुरट ह्यांच्यातील फरक अनेकदा सत्ताकारणात नाहीसा होतो आणि राजकारणी निखळ केऑस एजन्ट बनतात हे केऑस एजन्ट सुव्यवस्थेला पोखरतात कायद्याला जोकर बनवतात आणि हा जोकर सादर करणाऱ्या अभिनेत्याला ऑस्करही देतात ते जस्टीस देण्याऐवजी जस्टिफिकेशन देतात आणि कार्यकर्ते सब एजन्ट बनत ह्या जस्टिफिकेशनची एकमेकाला समाधानकारक वर्णने देत जगतात कधी कधी ते आपल्या नेत्याचे समर्थन देताना इतके विनोदी होतात कि एजन्ट विनोद बनतात आपण ह्या ट्रॅजेडीला कॉमेडी म्हणून हसतो स्वतःला करमणूक म्हणून पाहणारे लोक फक्त भारतात सापडतात ह्यात स्वतःचे जे पोतेरे होते त्याच्याविषयी कुणाला किती खेद किती खंत ? वर्तमान कला स्वतःच्याच पोस्टमॉडर्न शवावर ठेवलेले बुके आहेत ज्यांचा एकसंधपणा प्लॅस्टिकने वेटाळुन टाकलाय मानवतावादाची सप्लिमेंट असणारे कलावंत ती सादर करतात पण .....
कलावंताचंही कलाक्षेत्राबाबत असंच असतं का ? आणि जर असं असेल तर आपल्यात आणि राजकारणी लोकांत फरक काय राहिला ? हितसंबंध हे शेवटी स्वतःच्या क्षेत्राशी संबंधित असतात आणि आपण जर आपल्या क्षेत्रात हितसंबंध सांभाळत असू तर राजकारण्यांनी त्यांच्या राजकारणी क्षेत्रात स्वतःचे हितसंबंध सांभाळले म्हणून आपण कोणत्या नैतिक तर्काद्वारे राजकारण्यांच्यावर टीका करू शकतो ? दुसऱ्याच्या डोळ्यातील गवत दिसणारे लोक स्वतःच्या डोळ्यातील हितसंबंधांची लॉन बघत नाहीत हा माझा अनुभव आहे
एकंदरच कलावंत सभ्य असतात . जर सभ्य माणसांना अत्याचारामुळे होणाऱ्या फायद्यात वाटा मिळत असेल तर सभ्य माणसे शांत बसतात अश्या अर्थाचे एक स्ट्रॉसचे वचन आहे सभ्य माणसे ह्या वचनाचा भंग करत नाहीयेत लोकशाही म्हणजे केवळ उदारमतवाद न्हवे निडरवादही आहे आणि सुदैवाने तो शिल्लक आहे लोकशाहीत उत्तम अत्याचारी हा उत्तम ऑर्केस्ट्रात गाणाऱ्या बेसूर गायकासारखा असतो दुर्देवाने ह्या गायनाला दाद देणाऱ्या टाळ्यांची संख्या वाढली कि स्टेजवर कुत्रीही गायाला उतरतात
मी राजकारण्यांच्याकडे बघत असतो तेव्हा ते अनेकदा माझ्यासारखे आहेत का असा प्रश्न मला पडलेला असतो मी आताशा टाळ्या वाजवत नाही माझे हात नैतिक संघर्षांनी थकलेले आहेत असो
ह्या वातावरणात सदगुण स्वातंत्र्याशिवाय अशक्य असतात , हे बेसिक जरी आपणाला कळलं तरी खूप झालं
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठीत जगाच्या समकालीन असणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा आमच्या पिढीत चौथी नवतावाल्यांच्या वाट्याला आला पुढे चौथ्या नवतेतून अनेकांनी कल्टी मारून चित्रेंचे धोतर व कोलटकरांचा टाय पकडला असला तरी त्यांना स्वतःलाही स्वतःची चौथ्या नवतेतून करून घेतलेली हकालपट्टी झेपलेली दिसत नाही आंतरराष्ट्रीय मान्यतेचा अश्वमेध पूर्ण झाला कि ह्यांना देशी नवता किंवा चौथी नवता ह्यातील एकीची निवड करावी लागेल कारण देशीवादी आता ढिली भूमिका सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीत मी सुदैवाने ह्या आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या अश्वमेधातून वाचलोय ह्या फोफश्या मान्यतेला मी कधी जागा दिली नाही कारण माझी साधना ! ज्यांना ती मिळालीये त्यांना त्यातून काँक्रीट हाती काय लागलंय हा प्रश्न पडेलच .
मुळात मूल्यांचे प्रश्न आपणाला मुळापासून सतावतात काय ? कलावंतांना दाद , प्रतिष्ठा , कौतुक आणि लोकप्रियता आवडतात आणि ते नैसर्गिक आहे मी कधी त्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही सर्वांनीच मोक्षाच्या मागे लागले पाहिजे हा आग्रह मला हुकूमशाही वाटते पण मोक्षयुगाने दिलेली सत्य अहिंसा अचोर्य अपरिग्रह सुकाम मला महत्वाची वाटतात काहींना सुकामाऐवजी ब्रम्हचर्य वाटत असेल तर ब्रम्हचर्य ! किंवा सृष्टीय विज्ञानाने दिलेली स्वातंत्र्य ,समता ,बंधुता , समनागरिकता , मूल्यनिष्ठता आणि वैज्ञानिकता ही मूल्ये किंवा प्रतिसृष्टीने दिलेली सृजनकल्पकता , सर्वश्रमप्रतिष्ठा , संवादकृतीपारदर्शकता ,परस्परादर , विश्वासार्हता , जबाबदारी , फेयरनेस (ह्याला मराठी शब्द सापडत नाहीये ),अस्तित्वएकात्मता ही मूल्ये ह्यांच्याशी आपला कवी म्हणून कलावंत म्हणून नेमका काय संबंध आहे ? लोकप्रियतेसाठी आपण ह्या मूल्यांचा बळी द्यायचा का ? आयडिआलॉजी इज डेड ला मी कायमच कडाडून विरोध केलाय कारण स्वातंत्र्य ,समता ,बंधुता , समनागरिकता , मूल्यनिष्ठता आणि वैज्ञानिकता ह्यांची प्रतिष्ठा आयडियालॉजीशिवाय टिकत नाही मोक्ष सत्य शोधतो व सांगतो पण विज्ञान सत्य शोधण्याचे व त्याची अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य मागते जे मोक्षयुगात अनेकदा नाकारले गेले विज्ञान ह्या स्वातंत्र्याशिवाय शक्यच नाही म्हणूनच मोक्षाबरोबर मला आयडियालॉजी
अतिशय महत्त्वाची वाटते तंत्रवैज्ञानिकता तिथेच थांबत नाही ती सांगते विज्ञानाच्या व्यवहारात पारदर्शकता हवी प्रयोगशाळेत तुम्ही काय करताय हे आम्हांला कळलं पाहिजे तंत्रज्ञानावर कंट्रोल करणाऱ्या राजकीय शक्ती पारदर्शक हव्यात आणि त्यांची विश्वासार्हता उच्च कोटीची हवी राजकीय सरकारे आणि शासनव्यवस्था हिने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे त्यांचा कारभार पारदर्शक असला पाहिजे भांडवली स्पर्धेत ती फेअर असली पाहिजेत त्यात त्यांनी पार्शलटी व फेव्हर करता कामा नयेत लोकांची सरकारबाबतची विश्वासार्हता त्यांनी टिकवली पाहिजे समाजात परस्परादर टिकवला पाहिजे लोकशाहीत अनेकदा एखादा समाज आदर गमावतो त्याची विश्वासार्हता लयाला जाते त्याची जबाबदारी तो ओळखत नाही अशावेळी त्याची कानउघाडणी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे जबाबदारी आहे
भारतात शिव , बसवेश्वर आणि गांधी ह्या तीघांनाच सर्वश्रमप्रतिष्ठा कळली आणि त्यांनी त्याचा आग्रह धरला भारतात कामानुसार प्रतिष्ठेचाही क्रम निश्चित होतो त्यामुळे भंगीकाम करणारा कोणीही असला तरी त्याला आपण प्रतिष्ठा देत नाही अगदी विदेशात गेलो तरी भंगीकाम करणाऱ्या माणसांना आपण नीचच समजतो सर्वात आश्चर्यकारक म्हणजे भंगीकाम करणाऱ्या लोकांनाही आपले काम प्रतिष्ठेचे वाटत नाही ह्याचे कारण समाज त्यांच्या कामाला प्रतिष्ठा देत नाही हे आहे
आपण खरेतर कुठे आहोत हाच एक प्रश्न आहे आपणाला मोक्षमुल्ये पाळायची नाहीत आपल्याला विज्ञानमूल्ये पाळायची नाहीत आपणाला तंत्रज्ञानमूल्ये पाळायची नाहीत मग आपणाला पाळायचं तरी काय आहे ? कि एक मूल्यहीन समाज म्हणून आपणाला जगायचं आहे ? आपणाला कायदे तोडणाऱ्या लोकांचे कौतुक का आहे ?
भ्रष्टाचाराला व्यवस्थापन समजणारी दुर्बुद्धी आपणाला का सुचते ?
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अलीकडे यूरोप व अमेरीकन देशही आपल्यासारखे बनत चाललेत एकेकाळी इंग्रज अधिकाऱ्यांचे भ्रष्ट वर्तन हे इंग्लंडमध्ये अवगुण मानला जाई आता ही विश्वासार्हता घटत चाललीये
सगळे जगच मूल्यहीन झाले तर जगाचे काय होईल ?

सगळे जगच मूल्यहीन झाले तर जगाचे काय होईल ? हा प्रश्न विचारायची वेळ आता आलीये कारण धर्मयुग आपल्या दारात आहे आणि ते शैव बौद्ध आणि जैन ह्या धम्माना चॅलेंज देत आहे
धम्म फक्त मोक्षाची दर्शने मांडतात तर्काला केंद्रस्थानी आणतात आणि धर्मांना ठाम नाकारतात दुर्देवाने अनेकांना हा फरक कळत नाही कारण ह्या धम्मांचे रूपांतरही पुन्हा पुरोहितशाहीने धर्मात केले आहे
आणि आता जो हर हर महादेवचा गजर होतो आहे तो धम्मिक कमी आणि धार्मिक जास्त आहे कारण धर्मयुग दारात आहे आणि ते मोक्षमुल्ये विज्ञानमूल्ये आणि तंत्रज्ञानमूल्ये ह्यांना कापण्यास उत्सुक आहे शिवाजी महाराजांनी जी शैव धम्मीक राजकीय व्यवस्था निर्माण केली होती तिला बुडवायलाच हे करंटे चालले आहेत शिवाजी महाराजांच्या हर हर महादेवचा नेमका अर्थसुद्धा अनेकांना कळत नाही शैवांनी कायमच मोक्षमुल्ये ही राजकीय राजवटीच्या आणि धनिक व्यवहाराच्या केंद्रस्थानी असली पाहिजेत असा आग्रह धरला होता आणि वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांना ठाम नकार दिला होता शिवाजी महाराजांनी फक्त कर्तृत्व पाहिले जात व वर्ण त्यांच्या गावीही न्हवती सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शैव पुरोहितव्यवस्था इतकी गाढ झोपलीये कि तिला आपल्या भवताली काय चाललंय त्यात आपलं कर्तव्य काय ह्याचाच विसर पडलाय गोविंद पानसरेंनी मांडलेला शिवाजी हा शैव मांडणीशी अधिक जवळचा आहे तो त्यांनी मांडला तर त्यांचा खून केला गेला लिंगायत शैव धर्माला स्पष्ट स्वरूपात मांडायला गेलेल्या गौरी लंकेश ह्यांचीही हत्या झाली
ब्राम्हण्यवाद हा इतरांच्या कामाचे श्रेय लाटून जिवन्त राहतो एखाद्या पॅरासाईटसारखी ही जीवनशैली आहे म्हणजे मोक्ष शोधायचा भगवान शंकरांनी आणि त्यांच्या मंदिरावर कब्जा करून ते रुद्र आहेत असा दावा ठोकून त्यांना बळकावयाचे ब्राम्हण्यवादाने ! ब्रम्हचर्य मांडायचे महावीरांनी आणि ब्राम्हणांनी ते आपणच शोधल्याच्या थाटात कथा रचायच्या व्याकरणाची महेश्वर सूत्रे रचायची शैव असलेल्या पाणिनीने आणि संस्कृत ग्रामरचे श्रेय लाटायचे ब्राम्हण्यवादांनी कालिदासाची कालीभक्ती त्याच्या नावापासूनच सुरु होते तर त्याला प्रसन्न झालेली ही काली माता काढून सरस्वतीने त्याला आशीर्वाद दिला अशा ढोंग कथा रचायच्या
आज ह्या ब्राम्हण्याचे कमबॅक झालंय माझ्यासाठी ब्राम्हण्याचे कमबॅक म्हणजे मोक्षिक वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक मूल्यांचा अंत ! ब्राम्हण्य ब्राम्हण्यालाच ब्राम्हणांचा ऑनर समजते ब्राम्हण्याची ही आत्मघातकी समजूत मूल्यहीनतेला पुन्हा दारात घेऊन आली आहे
मोदींनी दारात आलेली ही मूल्यहीनता अचानक परीक्षेला बसवली आणि कम्युनिस्ट , मुस्लिम ,समाजवादी , आंबेडकरवादी अशा सगळ्यांचे ऑनर पणाला लागले नाहीसे झालेले आत्मसन्मान आत्मभानासकट परतले गळून गेलेला चाफा अचानक देहभानावर आला मार्शल आर्ट्समध्ये विशेषतः सामुराई मध्ये हा आत्मसन्मान प्राण देण्याइतका महत्वाचा मानला जातो पण गेल्या काही वर्षात त्याने प्रतिष्ठा गमावली होती मोदींनी हिंदूंचा आत्मसन्मान परत मिळवला आणि त्याच्याबरोबर सनातन संस्थेचे पॅकेज डीलही आले ह्याला काउंटर म्हणून काउंटर ऑनर आले जणू गांधी आंबेडकर ह्यांच्या आत्मसन्मानाची ही काउंटरलढाई होती नवीन पिढीचे हे सगळे कुल मोर्चे होते खुद्द मी ज्या थिएटर अकादमीत काम करत होतो तिथेही ही लढाई जोरदार झाली आंबेडकरवादी आहे असं समजून जो नारळ मला देण्यात आला होता तो काढून पुन्हा श्रीफळ देण्यात आले
ह्या लढाईची चर्चा फार पूर्वीच सुरु झाली होती मुळात धर्म हा नेहमीच टोळीचा असतो ट्राईबचा असतो कौमचा असतो शक्तिमान ट्राइब्ज इतर ट्राइब्जना जिंकून त्यांना आपला धर्म स्वीकारायला भाग पाडतात ह्या ट्राइब्जपैकी देवसूर , ज्यू व अरबी ह्या तीन ट्राइब्ज अत्यंत आक्रमक असल्याने त्यांचे धर्म वेगाने पसरले धर्मराज्याची संकल्पना ही ह्या ट्राइब्जची संकल्पना आहे आणि त्यातील ज्यूंनी इस्राएल अरबांनी अरबस्थान ही दोन धर्मराज्ये निर्माण केली रोमन कॅथॉलिकांनी व्हॅटिकन हे धर्मराज्य निर्माण केले आर्यन देवसूरांना ह्या धर्तीवर आता हिंदूंचे हिंदुस्थान हे धर्मराज्य निर्माण करायचे आहे असुरांचे इराण हे धर्मराज्य मुळापासून उखडण्यात मुसलमानांना यश मिळाल्याने ह्याच धर्तीवर देवसुरांचे राज्यही मुस्लिम नष्ट करतील व सर्वांना बाटवतील अशी ही भीती आहे ही भीती जैनांच्यातही शिरलेली आहे त्यामुळे त्यांचा आता देवसूरांना त्यांच्या वैदिक , ब्राम्हणी , वैष्णव व हिंदू ह्या चारही धर्मांना पाठिंबा आहे सर्वच आता हिंदुत्ववादी नावाची मेगॅट्राइब बनवण्यात यशस्वी झालीये ह्या मेगॅट्राइबला शैव व बौद्ध ह्यांनी सामील व्हावं असा आग्रह आहे आणि काही शैव व बौद्ध ह्या आग्रहाला मान देऊन ह्या मेगॅट्राइबला सामीलही झाले आहेत ह्या मेगॅट्राइबचा शत्रू मुख्यत्वे मुस्लिम आहेत हळूहळू का होईना द्विध्रुवात्मकता निर्माण करण्यात मोदी यशस्वी झालेत
समाजवादी व साम्यवादी हे मोदींचे बकरे आहेत ते तेच करतायत जे त्यांनी करावे अशी मोदींची अपेक्षा असते नागरिकत्व कायदा हे अलीकडचे उदाहरण सेक्युलर लोकांची मजबुरी अशी आहे कि हिंदुत्ववादाला वाढता पाठिंबा आहे आणि त्याला तोडायला मुस्लिम जवळ करावेत तर बहुतांशी मुस्लिम सेक्युलर नाहीयेत म्हणजे हिंदू सेक्युलर उरलेले नाहीयेत मुस्लिम सेक्युलर कधीच न्हवते आणि जे होते त्यांची संख्या १० टक्केही नाही हे १० टक्के मोर्चात मोठे वाटतात पण इलेक्शनच्या पातळीवर त्यांचे व्होटिंग खूप कमी आहे त्यामुळेच हिंदूवादी गांधी अपरिहार्य होतात हिंदूवादी गांधींची ताकद माहित झाल्यानेच हिंदुत्ववादी महात्मा गांधींना उखडण्याचा प्रयत्न करतायत आपल्या मार्गातला मुख्य अडथळा गांधी आहे हे हिंदुत्ववाद्यांना गोडश्यांच्या काळापासून माहित आहे साहजिकच समाजवाद्यांना आणि कम्युनिस्टांनाही ह्यावेळी गांधी आंबेडकरांचे फोटो हातात घ्यावे लागले
प्रश्न इतकाच आहे हे सर्व तात्कालिक आहे कि भविष्याची चुणूक ? लाईफ झिंगालालाचा फ्रेश थम्सप आहे कि नव्या नितळतेची गंगोत्री ?
---------------------------------------------------------------------------------------------------------------
ही लढाई वर्गाची न्हवती भारतात वर्ग नाहीयेत आहे तो फक्त ओपन वर्ग पण तो तरी कितपत वर्ग आहे हा प्रश्न आहे आपली वाटचाल जमाती गण समुदाय वर्ण जाती अशी झाली ह्या जाती ब्रिटिशांनी स्वतःच्या स्वार्थासाठी घट्टच केल्या ह्याला शह म्हणून प्रथम शाहू महाराजांनी आरक्षण आणले पुढे बाबासाहेबांनी संविधानाद्वारे चार संवर्ग निर्माण केले ओपन ओबीसी बीसी आणि आदिवासी हे संवर्ग आज भारतात ऍक्टिव्ह आहेत मी नेहमीच आरक्षणाला पाठिंबा दिलाय पण माझी कारणे वेगळी आहेत माझ्या मते ब्रिटिश राजवटीत जी वैश्य शूद्रांची अतोनात हानी झाली त्यातून ओबीसीना आरक्षण आवश्यक झाले आहे तर अस्पृश्य आणि भटके ह्यांना इसवीसन ९०० नंतर किंवा १६९० नंतर जे सोसावे लागले त्यामुळे आरक्षण देणे गरजेचे आहे आदिवासींना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे बाबासाहेबांनी हे संवर्ग निर्माण करून जे शहाणपण दाखवलंय त्याला तोड नाही बाकी आरक्षण कुठे लागू करायला हवे ह्याबाबत माझे मत पूर्ण वेगळे आहे बाबासाहेबांनी धार्मिक कसोटी लावलेली नाही कारण सर्वच धर्मात ओपन क्लास आहे ह्या ओपन क्लासला आता अमेरिका यूरोपमध्ये सेटल व्हायचे वेध लागलेत त्याच्यासाठी भारत हिंदूत्ववादी राष्ट्र होणे आवश्यक आहे कारण यदाकदाचित उद्या गल्फ यूरोप अमेरिकेनं हाकललं तर परतायला त्यांना हक्काची भूमी हवी आहे म्हणजेच एकीकडे परदेश हवा आहे आणि दुसरीकडे स्वदेशही हवा आहे एका अर्थाने हा स्वदेश ही रिटर्न गॅरेंटी स्कीम आहे हिंदुत्ववादाचा सर्वात मोठा आधार हा ओपन क्लास आहे ह्याची भारतीय लोकसंख्या साधारण ३६ ते ४० टक्के आहे आणि तो सर्वधर्मीय आहे हिंदुत्व फक्त ज्युडायिक धर्मांना वगळत असले तरी अलीकडे त्यांनी ज्यू व ख्रिस्चन ह्यांना हिंदुत्व खुले केले आहे पारश्यांना ते पूर्वीपासूनच खुले होते म्हणजे टाटांना उद्या चायनाने धंदे गुंडाळायला सांगितले तर त्यांना भारतातच ते उद्योगधंदे आणावे लागतील म्हणजे उरतात फक्त मुस्लिम आणि कुठल्याही धर्मराज्याला एक काल्पनिक किंवा खरा शत्रू असावा लागतो आणि हिंदुत्ववादी धर्मराज्याचा असा शत्रू मुस्लिम आहे म्हणूनच भाजपचा नागरिकता कायदा मुसलमानांना वगळतो आणि तरीही इस्लामेतर सर्वांना तो सामावून घेतो आणि इस्लामेतर ओपन क्लासला तो आवश्यक वाटतो काश्मीरमध्ये ह्यां ओपन क्लासच्या लोकांना उद्योग टाकायचे आहेत म्हणून नवे काश्मीर कायदे त्यांना आवश्यक वाटतात असे हे राजकारण आहे
ह्या राजकारणात नवबौद्ध बीसींना आपलं समाजकारण कसं चालवायचंय ते नीट माहित आहे घोळ आहे तो शैव असलेल्या ओबीसींचा वैष्णव ओबीसीला हिंदुत्ववादाबरोबर जायचे होते आणि तो गेला आहे त्याला फक्त गांधींचा हिंदुवाद परत आणू शकतो तो परत आला कि काँग्रेस विजयी तो भाजपबरोबर राहिला तर भाजप विजयी ! विधानसभेवेळी पवारांनी हा ओबीसी काही प्रमाणात परत आणला पण शैव ओबीसी आला नाही हा शैव ओबीसी मोठ्या प्रमाणात शिवसेनेला शामिल आहे भाजपचा सारा प्रयत्न शैव ओबीसींना आणि बीसीना आपल्यात ओढायचे म्हणून चालला आहे त्यासाठी मोदी व हर हर महादेव ! जग्गी वासुदेव ही त्यासाठी खास योजना आहे ओपन वर्गातील शैव त्यांना उघडपणे सामील झालेत अगदी बॉलिवूड व साऊथ सेलिब्रिटीही ! त्यांना बघून ओबीसी शैवही आपोआप भाजपला येऊन मिळेल असा अंदाज आहे तो यशस्वी झाला तर भाजप पुढची निवडणूकही जिंकेल
भारतीय राजकारण आणखी किमान वीस वर्षे संवर्ग व धर्माधिष्ठित राहील अशी चिन्हे आहेत ह्यात मोक्षाला स्थान कुठं आहे ?
==============================================================
प्रश्न असा आहे कि हे सर्व घडवण्यात कलावंताचा वाटा आहे कि नाही ? तर ह्या प्रश्नाचे उत्तर ठामपणे हो असे आहे . देशीवाद हा अंतिमतः भाजपला आणि हिंदुत्ववादाला सपोर्ट करतो हे मी नेहमीच मांडत आलोय परंपरा हजारो वर्षाच्या सातत्याविषयी आग्रह धरते पण हे विसरते कि ह्या सातत्यावर वर्चस्व कुणाचे असणार आणि कोण तिला सादर करणार आणि तिला सादर करण्याची साधने कुणाकडे असणार ? हजार वर्षापर्यंत ही साधने बहुजनांच्या हातात होती व पुढे ती इसवीसन ७०० ते १००० नंतर ब्राम्हण , मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांच्या हातात गेली आणि त्यांनी ती त्यांना हव्या तशा पद्धतीने सादर केली नेमाडे ही गोष्ट विसरले परिणामी सगळी वैदिक परंपरा देशीवादी परंपरा म्हणून सादर केली गेली आणि लोक बघता बघता ब्राक्षवादी म्हणजे पुण्ययोनीवादी म्हणजेच ब्राम्हण क्षत्रिय व्हायला धडपडायला लागले पापयोनीवाले म्हणजे वैश्य शूद्र स्वतःला क्षत्रिय किंवा ब्राम्हण म्हणवून घेऊ लागले म्हणजे उदाहरणार्थ अगरवाल किंवा मौर्य (महाराष्ट्रात मोरे ) हे अस्सल वैश्य स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेऊ लागले पुढे अयोनीवालें म्हणजे अस्पृश्य भटके व आदिवासीही स्वतःची मुळे क्षत्रीयपणात शोधू लागले म्हणजे उदाहरणार्थ पूर्वाश्रमीच्या महार स्वतःला पूर्वीचे क्षत्रिय म्हणवून घ्यायला लागले किंवा चांभारांना आपण ब्राम्हण होतो अशी स्वप्ने पडायला लागली वास्तविक वर्ण जात योनी ह्या सर्व ब्राम्हण क्षत्रियांच्या वर्चस्व निर्माण करण्यासाठी जन्माला घातलेल्या संकल्पना आहेत भूतकाळ टाळता येत नाही हे मला मान्य आहे पण तो ब्राक्ष पद्धतीने परंपरेचा स्वीकार करत आपण स्वीकारणार असू तर आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाही कारण ह्या तिन्हीही संकल्पना बहुजनांच्यावर सत्ता गाजवण्यासाठी निर्माण झालेत भूतकाळात जूनतेत जुनाट गोष्टी असतात आणि अडगळी असतात ह्यांचं कौतुक करणं मूर्खपणा असतो त्याउलट अजूनता म्हणजे वर्तमानातही ऍक्टिव्ह असणारा आणि ऍक्टिवेट करणारा भूतकाळ असतो परंपरा जुनतेचा भाग असते आपण जूनता ठामपणे नाकारावी अजुनतेचा रिलेव्हन्स सतत तपासावा म्हणजे आईन्स्टाईनची सापेक्षता ही भूतकाळातली गोष्ट असली तरी ती वर्तमानातही ऍक्टिव्ह असलेली गोष्ट आहे आणि आजही आपणाला ती ऍक्टिव्हेट करणारी गोष्ट आहे अजूनतेला वैज्ञानिक कसोट्या लावता येतात परंपरा ही श्रद्धावान असल्याने तिथे वैज्ञानिकतेला वाव मिळत नाही जूनता सरळ सरळ आपण आऊटडेटेड आहोत किंवा अडगळ आहोत हे स्वीकारते
भाजपची सत्ता ही परंपरेची सत्ता आहे तिची रचना भूतरंजनेवर व भूतात रमणाऱ्या मनोरंजनावर उभी आहे देशीवाद ह्यांना बळकटी देतो
प्रश्न आहे साहित्य ह्या वर्तमानाचे काय करते मराठीत एक ढोबळ वास्तववाद आहे जो वर्तमानपत्री तपशिलावर उभा आहे एकेकाळी त्याची आवश्यकता होती पण आता मीडिया एव्हढा वाढलाय कि असा ढोबळ आणि इमीजिएट वर्तमान रोज आपल्यावर ओतला जातोय आणि आपण रोजच त्यात अंघोळ करतोय कळीचा प्रश्न असा आहे कि मला माझा प्रायव्हेट आणि पर्सनल असा वर्तमान आहे कि नाही कि मी फक्त मीडियाची पोपटपंची करणार आहे ?
कलावंताचे काम पर्सनल आणि प्रायव्हेट वर्तमान सर्वखोल सघनतेसकट गहनतेसकट सादर करणे हे आहे हा वर्तमान त्याचा प्रत्यक्ष वर्तमान असेल किंवा अनुमानात्मक असेल किंवा आप्तात्मक असेल किंवा कल्पनात्मक असेल आणि वेळप्रसंगी चिन्हात्मक असू शकेल पण त्याचा मुख्य टोकदारपणा वर्तमानाच्या व त्याहीपेक्षा अधिक नवतेच्या आणि अद्ययावतेच्या दिशेने असेल तरच ती कला सशक्त निपजू शकते
श्रीधर तिळवे नाईक

माझ्या पर्सनल वर्तमानाचा पहिला आयाम माझा संन्यास आहे माझ्या घरात शैव परंपरा आहे आणि तिचे दोन प्रवाह आहे पहिला नकुलीश दुसरा नाथसंप्रदाय आमचे रवळनाथाचे मंदिर हे नाथ संप्रदायाशी निगडित आहे आणि तिळवे नाईक घराण्यात सर्वाधिक प्रचिलित हा नाथ संप्रदाय आहे दुसरा प्रवाह नकुलीश दर्शन हा ज्ञानाशी निगडित असल्याने त्याकडे मात्र फारसे लक्ष्य नाही तत्वज्ञानावर माझ्या घराण्यातल्या लोकांचा विश्वास राहिलेला नाही माझे आजोबा नसते तर हा मेलाच असता इतकी उदासीनता खुद्द माझ्याच घराण्यात आहे त्यामुळे मी दोन्ही घराण्यात एका अर्थाने उपरा आहे
मात्र ह्या दोन प्रवाहात मी अडकून पडलो नाही माझ्यावर जैनांचा प्रभाव आहे कारण कोल्हापुरात मी जैन गल्लीत रहात होतो आणि माझ्यासमोर अक्कमहादेवी मंडप होता जिथून बसवेश्वर धडकले पुढे रामकृष्ण आणि विवेकांनद आले आणि नंतर बुद्ध बुद्धाचा खोलवर प्रभाव माझ्यावर पडला माझ्या आसपास विठ्ठलाचे मन्दिर नसल्याने माझ्यावर विठ्ठलाचा प्रभावच पडला नाही कोल्हापुरात अंबाबाई म्हणजे पार्वतीच जास्त प्रभावी होती
मात्र ह्या सगळ्यापेक्षा माझ्या संन्यासात मला १२वी ला असतांना अनंताचा जो स्पर्श झाला त्याचा प्रचंड वाटा आहे थेट सविकल्प समाधी प्राप्त होणे तीही न मागता हे केवळ प्रसादमय असते माझ्या शंका कुशंका निर्माण होण्याआधीच फिटल्या असे काही घडले कि जग किरकोळ होऊन जाते माझ्यासाठीही ते झाले पण मोक्ष न मिळाल्याने माझी तगमग सुरु झाली आणि त्यातूनच पाठलाग . आधी त्याने गाठले मग त्याला गाठण्याची माझी धडपड सुरु झाली ह्यातूनच माझा संन्यास जन्मला एका अर्थाने साक्षात अंतिम सत्याने दीक्षा दिलेला मी न्यू एज नंतरचा postnew age संन्यासी आहे
संन्याशाची निराशा ही सर्वाधिक गहन असते कारण ही निराशा जगाकडून आलेली नसते जगाने निराशेचा कोटा कम्प्लिट केल्यामुळेच किंवा कृपाप्रसादाने तो संन्यासी झालेला असतो माणसाच्या भुका तृष्णा आणि निकडी त्याला कुठलीही व्यवस्था निर्माण झाली तरी समाधानी करणार नाहीत हे त्याला खोलवर कळलेलं असतं त्यामुळे ही निराशा ही उदासीनता जगिक नसते ती त्याला साधनेतल्या दारुण अपयशाने आलेली असते त्याच्या भुका आणि तृष्णा ह्यांनी नाहीसे न होऊन त्याला दमवल्यामुळे आलेली असते अनेक संन्यासी नंतर गांजेकस होत जातात कारण ह्या निराशेला कसं हाताळायचं हे त्यांना कळत नाही हे गांजेकस लोक स्वतःचा ईश्वरही गांजेकस बनवतात म्हणजे भगवान शिव कधीही भांग पीत न्हवते पण आपल्याला भांग प्यायला मिळावी म्हणून ह्या गांजेकस लोकांनी भगवान शिवांच्या नावाने भांगेच्या पावत्या फाडायला सुरवात केली निराशेचे हे विपरितीकरण आहे मी ह्यातून वाचलो आणि आयुष्यभर निर्व्यसनी राहिलो पण मोक्ष न मिळाल्यामुळे येणारी निराशा माझ्यातही होती माझ्या कवितेत निराशेचेच्या अशा अनेक क्षणांच्या सावल्या पडल्या आहेत
आपल्याकडे जितके गैरसमज शैव धम्माबद्दल आहेत तितके कशाबद्दलही नाहीत शैव संन्यासाला भिक्षा मागायची अनुमती आहे पण ती पोटापाण्यासाठी नाही तर अहंकाराचा निचरा व्हावा म्हणून ! मुळात भिक्षेची सुरवात भगवान शिवांनी केली ती अंहकारनिर्मूलनाची साधनपद्धती म्हणून ! त्यामुळेच पुढे बसवेश्वरांनीही संन्यासाने श्रम केले पाहिजे (कायक )असा आग्रह धरला आर्य धर्मांना भिक्षेचे मूळच कळले नाही त्यांनी ती भिक्षा पोटापाण्याशी जोडली मी मूळ भिक्षेचा हेतू माहित असल्याने पोटापाण्यासाठी अनेक उद्योग केले त्यातील भविष्यविज्ञान(फ्यूचरॉलॉजी ) हा माझा मुख्य व्यवसाय होता व आहे पण त्यातून मी आवश्यक जगण्यासाठी आवश्यक असलेले पैसेच कमवतो भविष्य सांगतांना कठोर असणे फार आवश्यक असते कारण कधीकधी तुमच्या प्रेडिक्शनवर लोक करोडोंचे व्यवहार करतात ह्या व्यवसायामुळे भविष्याचा तर्कशुद्ध विचार करण्याची मला सवय लागलीये भविष्य कुठल्या दिशेने जाईल हे विचारणारे लोक माझ्या आसपास सतत असतात आणि त्यामुळेच कदाचित मला चौथ्या नवतेचा विचार सुचला असावा अर्थात हा विचार करणारा मी काही एकटाच न्हवतो जगभर अनेक लोक चौथ्या नवतेचा विचार करत होते अर्थात ह्या भविष्यविचाराबरोबर माझा वर्तमानही मला नवा विचार करायला भाग पाडत होता
साठोत्तरीविषयी वाटणाऱ्या प्रचंड असमाधानानं मी चौथ्या नवतेची घोषणा दिली तेव्हा आपण काय करतोय ह्याची एक स्पष्ट जाणीव मला होती साठोत्तरीचे अनुभव माझ्या आयुष्यातल्या अनुभवाशी जुळत न्हवते नेमाडेंचे गाव माझे गाव न्हवते अरुण कोलटकरांची मुंबई माझी मुंबई न्हवती ढसाळांचे अंडरवर्ल्ड माझे अंडरवर्ल्ड न्हवते माझ्या प्रेयस्या त्यांच्या साहित्यात कुठं भेटत न्हवत्या माझे पुरुष त्यांच्या पुरषांच्यात सापडत न्हवते चौथ्या नवतेचा अंतिम उद्देश नव्या अनुभवाशी आणि नव्याने अनुभवांशी स्वतःची झोपी गेलेली नाळ जागृत करून जुळवणे तिचा विकास म्हणून अस्तित्वात आलेला मेंदू जुळवणे शरीर जुळवणे हाच होता जेव्हा आधीच्या पिढीचे अर्काईव्हज तुमच्या वर्तमानाशी जुळत नाही तेव्हा त्या अर्काईव्हज विरोधात बंड करणे अपरिहार्य ठरते कारण स्वतःचा अनुभव जिवन्त ठेवण्याचा तोच एक कलात्मक मार्ग तुमच्यापाशी उरतो आणि तुमचे समकालीन जर ह्याबाबत भुक्कडगिरी करत असतील तर त्यांनाही ठोकावं लागत भले त्यांनी तुम्हाला वाळीत टाकले तरी ! कलावंत म्हणून ही किंमत तुम्ही दिलीच पाहिजे आणि जर तुम्हाला ती द्यायची नसेल तर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करत नाहीतच पण तुम्ही जिवन्त कलावन्त होण्याऐवजी मागील पिढ्यांच्या अर्काईव्हजचे एक्स्टेन्शन बनता
तुम्ही आता माझ्यासमोर वेटरला म्हणालात कि तुम्ही स्मोकर झोनही ह्या हॉटेलात ठेवायला हवा ही माझ्यापुढची स्त्री आहे आणि मला तिच्याशी डील करायचं आहे भिजक्या वहीतल्या कुठल्या दन्तकथेतल्या स्त्रीशी न्हवे ही माझ्यापुढची जी स्त्री आहे ती महत्वाची त्यामुळं भिजकी वही लिहूच शकलो नाही स्त्रीवाहिनीच लिहू शकलो तुम्ही परंपरेतून नव्या स्त्रीशी संबंध ठेऊ शकत नाही आणि सुदैवाने माझ्या नात्यात आधुनिक आणि उत्तराधुनिक स्त्रिया होत्या
शैव संन्यासात नाथ संप्रदायी संन्यास वगळता ब्रम्हचर्याची गरज नाही मात्र सुकाम पाळावा अशी अपेक्षा आहे माझे संन्यासकुळ हे नकुलीश दर्शनाशी संबंधित आहे आणि ते लवचिक आहे त्याला घट्ट करायचा प्रयत्न वैदिक परंपरेतून आलेल्या लकुलिशने केला आणि पाशुपत दर्शनात नसलेले ब्रम्हचर्य लादले खुद्द भगवान शिवांनी लग्न केलं होतं किंवा बसवेश्वरांनी दोन लग्नें केली होती ह्याचा विसर ह्यांना पडला मुळात ह्या अतिकडकपणाची सुरवात महावीराने केली बौद्धानी पसरवली आणि जैन व बौद्ध ह्यांना हरवण्यासाठी ब्राम्हणांनी ती महाअतिकडक केली परिणामी आजही संन्यासाचे लक्षण कोणते तर जो ब्रम्हचर्य पाळतो तो वा ती ! तो साधना करतो कि नाही ध्यानाला बसतो कि नाही हे महत्वाचे नाही त्यामुळे मीडियाचे कॅमेरेही बुवांच्या लफड्याकडे वळलेले ह्यातला मूर्खपणा उघडच आहे ब्रम्हचर्य हे जर मोक्षासाठी एखाद्याला आवश्यक वाटत असेल तर त्याने ते जरूर पाळावे पण ब्रम्हचर्य पाळले नाही तर मोक्षच मिळत नाही हा आर्यन दुराग्रह चुकीचा आहे आग्रह सुकामाचा असावा असलाच पाहिजे ब्रम्हचर्याचा न्हवे जर कामवासनेमुळे फोकस हलत असेल तर मात्र कामवासनेचा त्याग करणेच सर्वोत्तम !असो !संभोगातून समाधी आणि ब्रम्हचर्य ही दोन्ही टोके आहेत सत्य मध्यभागी आहे मात्र अंतिम पडावात मात्र ब्रम्हचर्य अत्यंत आवश्यक असतं हा माझा अनुभव आहे
प्रश्न हाच असतो ह्या अंगाने येणारे अनुभव व्यक्त कसे करायचे ?
पूर्वी जसा लग्न हा एकमेव पर्याय होता तसा सध्याच्या काळात राहिलेला नाही त्यामुळं मी लग्न केलं नाही माझी रिलेशनशिप ही लिव्ह इन रिलेशनशिप होती तर मी तिला त्यातल्या सगळ्या फॅक्च्युल हॅपनिंगसकट हाताळायचं कि नाही ?
त्यात मग माझ्या प्रेयसीची अफेअर्सही येणारच त्यातून माझ्या पुरुषत्वाचे लोचे येणारच शिवाय माझेही लव्हमल्टीटास्किंग ! ह्यातला लोच्या हाताळायचा कसा ?
माझे उत्तर आहे त्यांना थेट सामोरे जाऊन ! कविता कशी लिहावी तर कपडे काढून ! तुम्ही स्वतःच कपड्यात अडकला तर कपड्यांना सम्यक दृष्टीने व्यक्त करणे अवघड जाते . फॅशन डिझायनिंगमध्ये जोपर्यंत फॅशन डिझायनर स्वतः नग्न नजरेनं पहात नाही तोवर त्याला कुठला कपडा कुणावर कसा सूट होईल ते कळत नाही . कवींनाही नग्न नजर कमवावी लागते

आता मी कामवासनेच्या अस्तापर्यंत पोहचलो असलो तरी हे सहजासहजी घडलेले नाही राजनीशांनी खूपच चुकीचे गृहीतक सांगितले असं मला वाटतं जितका भोग घेऊ तितके आपण त्यातून मोकळे होतो हे ते गृहीतक रजनीशांवरचा फ्रॉईडचा इन्फ्ल्यूएंस ह्या फ्रॉडला जबाबदार होता
माझ्या संन्यासाला सर्वात मोठं चॅलेंज होतं ज्ञ
ज्ञ हे माझ्या आयुष्यातलं एक झंझावती प्रकरण आहे बांधकाम चालू आहे ज्ञ लव्ह इन लव्ह आऊट आणि लव्ह , सेक्स अँड एलसेंट्रा हे तीन काव्यसंग्रह ह्या प्रेमानं पूर्ण तर स्त्रीवाहिनी श्रीवाहिनी हे अर्धे ह्या प्रेमाने झाकोळले आहेत
ह्या प्रेमप्रकरणाचे पडसाद आजही संपलेले नाहीत माझ्या काही विद्यार्थ्यांनी कबीरसिंग बघून आल्यावर कबीरसिंग म्हणून माझ्यासोबत चर्चा केली होती श्रीधरचं आयुष्य उध्वस्त करणारं प्रकरण श्रीधरला देवदास बनवणारं प्रेमप्रकारण ह्या माझ्या मित्र मैत्रिणींच्या कंमेंट्स मी झेललेल्या आहेत आतासुद्धा मी बोलतोय म्हंटल्यावर आला पुन्हा ज्ञ वर अशीच कोणीतरी कॉमेंट करेलच
प्रेम म्हणजे काय हे कधी शब्दात सांगता येईल काय ? केमिकल लोच्या वैग्रे रासायनिक भाषा प्रेमाला न्याय देतात काय ? मी प्रेमाच्या फिलॉसॉफ्या वाचलेल्या आहेत अगदी अद्ययावत वाचलेल्या असतात वाचायला बऱ्या असतात
माझ्या आयुष्यात मी कधीही लव्ह अँट फस्ट साईट स्टायलीनं प्रेमात पडेन असं मला वाटलं न्हवतं पण रूईयाच्या कॅंटीनमध्ये तिनं एंट्री मारली आणि पाहताक्षणी ती बाला कलेजा खलास झाला स्टायलीनं सम्पलो ती इतर कुणाबरोबर एंगेज होती आणि मी बाजूला झालो केवळ ती दिसेल म्हणून मी रुईया कॉलेजवर चकरा टाकल्या आहेत अर्थात तिला मी हे कधीच सांगितलेलं नाही
आणि मग शाहरुख खान स्टाईल(खरंतर अल्केमिस्ट स्टाईल ) जब आप पुरे शिद्दतसे किसीको माँगते हो तो पूरी कायनात वो चीज आपको देनेके लिए जुट जाती हैं तसं काहीसं झालं ज्ञ भेटली आणि पुन्हा चालून आली
मग लाटांवर लाटा प्रतिस्पर्ध्यांना समजूतदारपणे हाताळणं ज्ञ ला घर सोडण्याचा आईने दिलेला आदेश मग फिल्मी स्टाईल निवारा शोधणे दहिसरचं घर मिळवणं आणि मग माझ्या व्यावहारिक निकम्मेपणावरून वाद संन्यास कि ज्ञ मोक्ष कि ज्ञ हे प्रश्न तरीही तिचे एम ए ला गोल्ड मेडल मिळवणे आणि मग कवितेवर केस महाकवींचा नालायकपणा बांधकाम चालू आहे बांधकाम कोसळत आहे मग दोघात तिसरा पेजरवरील मेसेज कम्म्युनिकेशन गॅप भायंदरला सुजित मिणचेकर बरोबर घरातल्या रात्री (त्यावेळी तोही प्रेमात पडला होता )
मीरा रोड स्टेशनवर एकट्याने बसणं ओरबाडणारे आकांत त्वचा फाडणारे भावनांचे ज्वालामुखी कडवट होत गेलेली भांडणं आणि ज्ञचं अफेयर तेही आपल्याच मित्राशी उध्वस्तपणाच्या वाटचाली मरून पडलेलं प्रेम त्याचं खांद्यावरचं शव तिला विसरण्यासाठी अफेयर्स मग एकीशी लग्नापर्यंत बोलणी तिथेही माघार संन्यासामुळं कि ज्ञ मुळं माहित नाही कम्प्लिट प्रेमल येडचॅप केऑस आयुष्य झाटुक करण्याच्या पन्नास तऱ्हा मी जगलो माझी इमेज रानटी त्यामुळं मला काही सांगायची कुणाची हिम्मत नाही सात वर्षे स्वतःशीच युद्ध आणि स्वतःचीच राख
आणि ह्यातला अंतिम निष्कर्ष काय तर संभोगातून समाधी प्राप्त होत नाही
ह्यात ज्ञचा काही दोष होता का ?तर नाही ! मी प्रेम केलं मी बरबाद झालो तिच्याजागी कुणीही असतं तर कदाचित हेच झालं असतं अध्यात्मिक मजनूंना लैला कोण हा प्रश्न सतावत नाही त्यांना लैलात बरबाद व्हायचं असतं निरोप घेतांना ज्ञ म्हणाली तिनं माझ्यावर कधीच प्रेम केलं न्हवतं मी ते स्वीकारलं कारण ती असं म्हणत होती
माझ्यासाठी ज्ञ स्त्रीसौंदर्याची अंतिम व्याख्या होती बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ह्यांचा अभूतपूर्व संगम होता आपण हिला शोभत नाही असाही एकदोनदा आलेला कॉम्प्लेक्स मला आठवतो आणि आता त्याचे आश्चर्य वाटते
ज्ञ ही माझी सत्वपरीक्षा आणि तत्त्वपरीक्षा दोन्ही होती मी त्यांच्यात सुरवातीला पूर्ण फेल झालो तरी शेवटी फर्स्टक्लास फर्स्ट पास झालो
२०१४ ला अनेक गोष्टींचा अंत झाला तसा ह्या प्रकरणाचाही झाला आता मी हसतो आणि म्हणतो लाइफमें कमसे कम एकबार मजनू देवदास किंवा कबीरसिंग होऊन जगावं ज्यांना मलमपट्ट्यावर भागवता येत नाही त्यांच्यासाठी हे खास ऑपेरेशन आहे इगोचा भुगा करण्याची ही खास सुवर्णसंधी आहे फक्त समोर तशी धारदार पार्टी हवी

काही प्रश्नांना शॉर्टकट मध्ये दिलेली उत्तरे आता अधिक दीर्घ लॉंगकटमध्ये ७ श्रीधर तिळवे नाईक
माझ्या पर्सनल वर्तमानाचा तिसरा आयाम माझे आप्त आहेत माझ्या प्रेमाचा एक कवी म्हणून जो मला फायदा झाला तसाच फायदा मला आप्तांचा झाला शैवांच्यात तीन प्रमाणे मुख्य आहेत
१ प्रत्यक्ष
२ अनुमान
आणि
३आप्त प्रमाण म्हणजे आप्ताने सांगितलेली एखादी गोष्ट प्रमाण मानणे
माझा स्वतःचा सिद्धांत असा कि मी म्हणजे माझी बॉडी ही प्रत्यक्ष असते तर पालक , जीवनसाथी आणि पाल्य ह्यांची बॉडी अनुमानात्मक असते तर आप्तांची म्हणजे नातेवाईक मोजके मित्र मोजके सुहृद ह्यांची बॉडी आप्तात्मक असते आणि उरलेल्या गोतावळ्यांची व समुदायांची राष्ट्राची पृथ्वीची ब्रह्मांडाची बॉडी ही चिन्हात्मक असते
शैवांच्यात आप्तांना कमालीचे महत्व आहे म्हणूनच आप्त प्रमाण हे पूर्णपणे स्वतंत्र असे प्रमाण मानले गेले आहे आप्त तेच जे तुमच्याशी खोटं बोलत नाहीत तुमची हिंसा करण्याचे विचार ज्यांच्या मनातसुद्धा येत नाही जे तुमच्या कुठल्याच वस्तूची क्रयवस्तूची चिन्हवस्तूची चोरी करत नाहीत जे तुमच्या बायकोशी नवऱ्याशी आणि आईशी वडिलांशी सेक्स करण्याचा विचार मनात आणत नाहीत व तुमच्या भावाच्या वा बहिणीच्या प्रेमात पडलेच तर तुमच्या संमतीने त्यांच्याशी विवाह करतात आणि तुमच्या न्हेलेल्या वा उसन्या घेतलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे परत करतात
शैव वर्ण वर्ग जात योनी लिंग पशु वनस्पती व्यवस्था मानत नाहीत त्यांच्या मते आपण सर्वच शिव शक्तीचे खेळ वा नृत्य आहोत एखादा कुत्रा वा गाय किंवा झाड हे तुमचं आप्त असू शकत भारतीयांच्या नसानसात ही आप्तव्यवस्था भिनलेली आहे
माझ्या संपूर्ण आयुष्यात मी निष्ठेने ही आप्तव्यवस्था पाळलेली आहे माझ्या संपूर्ण आयुष्यात संधी मिळूनही मी कधीही आप्तांशी व माझ्या मित्रांच्या बायकांशी आयांशी वा बहिणींशी कधीही व्यभिचार केलेला नाही मित्राची आई ती आपली आई मित्राची बहीण ती आपली बहीण व मित्राची बायको ती आपली बहीण हे माझे तत्व आहे आणि मी ते कधीही मोड्लेलं नाही फक्त एकदाच टिनेजमध्ये मी एका आप्तांच्या भाचीच्या प्रेमात पडलो होतो जे केवळ शारीरिक आकर्षण होते पण तिथेही माझा हेतू लग्नाचा होता त्या वयात लग्नाविषयी काही नीट विचार झाला न्हवता आणि माझ्या त्या आप्ताने माझ्या बाजूने मागणीही घातली सुदैवाने समोरची पार्टी एंगेज होती आणि हे तिथे थांबले मात्र ह्यावेळी जे काही तत्वमंथन झाले त्यातून माझे काही विचार फिक्स झाले
माझ्या कवितांच्यावर ह्याचा प्रचंड प्रभाव आहे माझे आई वडील बहीण भाऊ माझ्या अनेक कवितांत आले आहेत
माझ्या सर्वोत्तम मैत्रिणी ह्या माझ्या बहिणी असल्याने मला ह्याबाबतीत बाहेर काही शोधण्याची गरजच भासली नाही माझा धाकटा भाऊ भूषण भाचा जतीन व भाचेजावई सचिन हेही माझ्या सर्वोत्तम मित्रांपैकी एक दत्तादादा हा दुसरा भाऊ ! संन्यास म्हणजे कोरडेपणा न्हवे तर विरक्त करुणामय ओलेपणा !जगाला समजून घेण्याचा मार्ग आप्तांच्यातून जातो ज्यात मित्रही येतात आशुतोष गोवारीकर हेमंत दिवटे ह्यांच्यासारखे (ह्यातील हेमंतशी असलेले संबंध पुन्हा सुधारू लागलेत) सहा अपवाद वगळता माझी मित्रांची परडी कायमच फुलांनी भरलेली राहिली माझ्या मैत्रीवरच्या कविता ही माझ्या मित्रांची देन आहे आश्चर्यकारकरित्या ज्ञ व प्रा चा अपवाद वगळता माझ्या सगळ्या मैत्रिणी अतिशय चांगल्या निघाल्या (माझी भाची प्रिया ही ह्यात सर्वाधिक काळ जवळ राहिलेली हिने मला बापपण शिकवले )बायकांनी मला कायमच प्रेम दिलं आणि मी जसा आहे तसा स्वीकार केला
जग वाईट आहे असं नेमकं आपण कशाच्या आधारे म्हणतो आहोत ? जर ९० टक्के आप्त चांगले असतील तर १०
टक्क्यांच्या आधारे जग वाईट आहे असं आपण का म्हणावं ?
शीघ्रकोपीपणा स्पष्टवक्तेपणा समोरच्याला काय वाटेल ह्याची काडीचीही पर्वा न करता बोलणे आणि आवाजातील चीडचीड हे माझे आईकडून आलेले जनेटिक दोष वडिलांच्याकडून आलेली आत्मधुनकी (हिला अहंकार समजणारे खूप आहेत ) माझ्या आप्तांनी माझे हे दोष झेलले आहेत म्हणूनच नाते टिकले आहे कोल्हापूरच्या बाळकृष्ण शिर्केपासून मुंबईच्या सतीश भालेकरपर्यंत दिल्लीच्या सुधन्वापासून बनारसच्या अनुपम ओझापर्यंत उडपीच्या दिवा शेट्टीपासून मद्रासच्या श्यामसुंदरपर्यंत माझे असे अनेक मित्र आहेत ज्यांच्यावर मी आंधळा विश्वास बिनधास्त टाकू शकतो
हे पर्सनल आयाम सम्पले कि सामाजिक आयाम येतात ह्या सामाजिक आयामात सर्वाधिक महत्वाचा गोतावळा परस्परांचे हितसंबंध सांभाळणाऱ्या माणसांचा समूह मग क्षेत्र कविता असो कि व्यवसाय वा नोकरी वा एखादी संस्था आत्ताच्या काळात माणसाचे किमान तीन गोतावळे असतात जीविका (पॅशन) गोतावळा उपजीविका (व्यवसाय नोकरी )गोतावळा व संस्थात्मक (राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक )गोतावळा काहींची खाज ह्याहून आधिक असते मी जीविका गोतावळ्यापैकी धार्मिक वा मोक्षिक गोतावळ्याला कधी सामील झालो नाही निदान मला तरी गोतावळ्यात साधना शक्य झाली नाही ध्यानाचेही संस्थाकरण (इन्स्टिट्यूशनलायझेश )झाल्याने सध्या मोक्ष मिळवणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड घसरले आहे मी सौष्ठव काढले आप्त जमवले पण त्याचा गोतावळा होणार नाही ह्याची अतोनात काळजी घेतली
गोतावळ्यानंतर येतो समुदाय !
१ सृजन समुदाय २ ज्ञान समुदाय ३ औद्योगिक समुदाय ४ व्यापारी समुदाय ५ शेतकरी समुदाय ६ पशुपालन समुदाय ७ कारागीर समुदाय ८ दास समुदाय ९ श्रमिक समुदाय १० पुरोहित समुदाय ११ आदिवासी समुदाय १२ विदेशी समुदाय १३ मुमुक्षु समुदाय १४ शासक समुदाय आणि अलीकडे उगवलेला १५ चिन्हऔद्योगिक समुदाय
अश्या समुदायांशी आपला संबंध येतो
मी पुरोहित आणि व्यापारी समुदायात जन्मलो वाढलो त्याचे संस्कार माझ्या कवितेत उमटलेले आहेत तिळवे भांडारवर मी अनेक कविता लिहिल्या आहेत आणि पुढे मॉलवर चिन्हऔद्योगिक समुदायातील टीव्हीवरही माझ्या बऱ्याच कविता आहेत पेजर मोबाईल वैग्रे चिन्हवस्तूवरही
प्रत्येक समुदायात समाज असतात उदा पुरोहित समुदायात १ आचार्य २ गुरव ३ ब्राम्हण ४ भगत ५ मौलवी ६ पाद्री असे समाज आहेत किंवा कारागीर समुदायात कुंभार समाज लोहार समाज विणकर समाज वैग्रे समाज हे समाज आहेत समाज क्रियेवर व कौशल्यावर अवलंबून असतात जन्मावर न्हवे आचार्य कोणीही होऊ शकतो गुरव कोणीही होऊ शकतो भगत कोणीही होऊ शकतो प्राचीन काळी ब्राम्हणही कोणीही होऊ शकत असे ( आजही सगळे शैव वा मुस्लिम वा ख्रिस्ती आमच्या जातीत पेक्षा आमच्या समाजात हा वाकप्रचार अधिक वापरतात कारण ह्या जन्मप्रधान जाती नाहीत क्रियाकौशल्यप्रधान समाज आहेत ह्याची त्याला अनकॉन्शसली जाणीव आहे )
ब्राम्हणी धर्माने जन्म ही कसोटी देऊन जाणीवपूर्वक सगळ्या शैव समाज्यांच्या जाती बनवल्या वैदिक धर्माची कर्मप्रधानता ह्या ब्राम्हणी धर्माने पूर्ण धुळीस मिळवली आणि स्वतःच्याच पूर्वजांच्या वैदिक धर्माचा खून केला वेदात त्यासाठी घुसखोरी केली आजही ह्या ब्राम्हणी धर्माचे समर्थक नंगानाच घालतच आहेत साहजिकच मी वर्ण जात ह्यांच्यावर टीका करणाऱ्या अनेक कविता लिहिलेत कारण ह्या फेक आयडेंटिटिज आहेत
प्रत्येक समाजात वर्ग असतात म्हणजे चांभार समाजात सध्या अभ्यंकरांनी प्रवेश केलाय तर त्यांनी अफाट पैसे मिळवले म्हणजे चांभार समाजातील ते श्रीमंत झालेत एकेकाळी वडारी समाज प्रचंड श्रीमंत होता प्रत्येक समाजात १ गर्भश्रीमंत २ अतिश्रीमंत ३ श्रीमंत ४ उच्च मध्यमवर्गीय ५ मध्यमवर्गीय ६ निम्न मध्यमवर्गीय ७ गरीब ८ दरिद्री ९ कंगाल आणि १० अन्न वस्त्र निवाऱ्यालाही मोताज असे दहा वर्ग असतात ह्याशिवाय आंबेडकरांचे संवर्ग आहेतच त्यातही वरील दहा वर्ग असतात
माझ्या आयुष्यात मी तीन ते दहा असे सातही वर्ग जगलो आहे जन्मतः चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो होतो पुढे धंद्याची वाट लागल्यावर क्रमशः एकेक वर्ग वाट्याला येत गेला मुंबईत आलो तेव्हा माझ्या खिशात मोजकेच
रुपये होते पुढे आप्तांचे घर सोडावे लागल्याने सात ते दहा हा कोटाही कम्प्लिट झाला हे झाले ते बरेच झाले माझ्या वडिलांचेही मोताज ते श्रीमंत व पुन्हा गरीब हे वर्तुळ पूर्ण झाले एकवर्गीयता कवितेलाही एकवर्गीय बनवते माझी कविता बहुवर्गीय झाली
प्रत्येक वर्गात वा संवर्गात १ विश्वस्त २ संवेदनशील ३ शोषक ४ शोषित असे उपवर्ग असतात ह्यातील विश्वस्त उपवर्ग समाजात कमावलेले समाजाला कसे परत करायचे ते बघतो अगदी गरीब वर्गातही विश्वस्त म्हणून जगणारे लोक आहेत संवेदनशील स्वतःहून समाजात येत नाहीत पण संधी मिळेल तेव्हा मदत करत असतात आपल्याकडून शोषण होणार नाही ह्याविषयी जागृत असतात सर्वात खतरनाक शोषक असतात भारतात शोषक उपवर्गाचे सर्वाधिक प्रमाण शासक समुदायात आहे त्याखालोखाल पुरोहित , व्यापारी व औद्योगिक समुदायात ! मी आयुष्यात शोषक होणार नाही ह्याची काळजी मी नेहमीच घेतलीये किमान साठ टक्के पैसे वाटले जातील ह्याची काळजी घेतली अगदी जेव्हा २०० रुपये मिळाले तेव्हा किमान १२० वाटले जातील ह्याची काळजी मी घेतलीये
शोषित हा उपवर्ग हा सर्वाधिक त्रास देणारा आहे माझ्या अनेक कविता त्यांच्यावरही आहेत कारण मी स्वतःच अनेकदा नाडला आणि गाडला गेलोय
भारतीय सामाजिकता ही गुंतागुंतीची आहे म्हणूनच ती चॅलेंजिंग आहे लोक सत्याच्या आधारे जगू इच्छितात असा एक तत्त्वज्ञांचा गैरसमज आहे प्रत्यक्षात लोकांना फील गुड जगायचं आहे वैज्ञानिक सत्ये त्यांना फील गुड देत नाहीत विशेषतः डार्विनने जेव्हापासून आपण माकडसदृश्य होमो पासून आपण जन्मलोय असं सांगितलंय तेव्हापासून हे घडते आहे भारतीय लोक ह्याला अपवाद नाहीत वर्ण आणि जातीबाबत सद्या अचानक फील गुड वाढलंय परिणामी वर्णाभिमान आर्यभिमान वंशाभिमान जात्याभिमान असे अनेक मिथ्या अभिमान वाढलेले दिसतात भारतीय सामाजिकता ही कितीही निराशाजनक असली तरी ती आपल्या रोजच्या जगण्याला भिडणारी वस्तुस्थिती आहे प्रश्न आहे आपण ती खरोखरच किती पेलतो आपली पेलता ढोबळ आहे किंवा वर्तमानपत्री आहे मीडियाबाज आहे जोवर ही पेलता ऐलपैल कवेत घेणारी सूक्ष्म व सटीक होत नाही तोवर काही खरं नाही अनुकरणप्रियता हा लोकप्रियता मिळवण्याचा शॉर्टकट असल्याने बहुतेकजण त्याच मार्गाने जातात कुणी नेमाडीयन्सपैकी एक होतो तरं कुणी चित्रेयन्स वा कोलटकरीयन्स होतो ह्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या धडपडीचा साधा आवाजही आपणाला नकोसा झालाय मग मीडिया ही धडपड ऐकेल ही आशाच व्यर्थ आहे मराठी मीडियाला तर देशीवादी बनणं ही कमर्शियल सक्ती आहे त्यामुळेच देशीवादाचा गलबला मीडियात प्रचंड आहे स्वतःची कमर्शियल सक्ती मीडिया सांस्कृतिक गरज म्हणून सर्वांच्यावर लादतो आहे बहुमत देशीवादाच्या बाजूने आहे आणि चौथ्या नवतेला साधी विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता नाही चौथ्या नवतेची अवस्था ही एका अर्थाने काँग्रेससारखी झाली आहे

मागील पिढीत आणि आमच्या पिढीत फरक काय ?मला असं वाटतं एक मोठा फरक हा आहे कि पूर्वीचे कवी सिटीझन म्हणून कविता लिहायचे आणि आमची पिढी नेटीझन म्हणून कविता लिहतीये आम्ही समाजात नाही तर एका नेटवर्कचे भाग म्हणून अतिवैयक्तिक कविता लिहितोय
आयुष्याचा अर्थ सापडेस्तोवर बदललेला असतो म्हणून पर्मनंट फक्त अर्थातीत असते आणि अर्थातीत फक्त मोक्ष मिळालेल्यांना उपलब्ध असते त्यामुळे मोक्ष न मिळालेल्या जगात व साहित्यात मुख्य प्रश्न ह्या सतत बदलणाऱ्या अर्थाचं काय करायचं हाच असतो अर्थाच्या हुलकावण्या आणि पाठलाग निरंतर चालू असतो पूर्वी ह्यांचे सादरीकरण दूर होते पण मीडिया नेटवर्क्संनी आता अर्थाच्या हुलकावण्या आणि पाठलाग ह्यांचे सादरीकरण सुरु केल्याने आपण आता अपरिहार्यपणे केऑसेस आणि त्यांच्या स्वीकारात उभे आहोत केऑस पहायला कुठला गॉगल लावायचा हा ह्या युगाचा एक महत्वाचा प्रश्न आहे कविता असा गॉगल बनू शकते
नैतिकतेची न परवडणारी सापेक्षता आता सर्वांच्याच ध्यानी आलीये पण त्यावर उत्तर धर्मांची निरपेक्षता व ठाम पण चुकीची उत्तरे देणारी श्रद्धा असू शकत नाही त्याला उत्तरे मोक्षातून आलेली द्वादश शिले वा यमनियम आहेत
१ अकाळ
२ अकाम
३ अचौर्य
४ अपरिग्रह
५ अअवकाश
६ अहिंसा
७ अव्यसन
८ असंबंध
९ आस्तेय
१०अरंजन
११ सत्य
१२ निरहंकार
३६५ डेज विथ बॉडी ह्या ग्रंथात ह्या मूल्यांची सविस्तर चर्चा आहे ह्यांच्याशिवाय नेटवर्क चालवणे अशक्य आहे माझ्या व्यावसायिक कामातही मी अरंजन हे मूल्य सांभाळत असतो केवळ रंजनासाठी कला मला सर्वस्वी अमान्य आहे लोकांना अनुभवाशी बांधून ठेवून त्यांना संवेदनशील बनवणे म्हणजे व्यावसायिक कला होय मी कवितेत प्रायोगिक असलो तरी गीतलेखन संगीत चित्रपट दिग्दर्शन व लेखन ह्यांच्यात व्यवसायिक आहे
व्यावसायिक कलेत कलाकुसर असली तरी समाजाविषयीची कर्तव्यभावना बळी देऊन ती केली जात नाही अगदी चित्रपट व जाहिरातीतही मी हे सांभाळले आहे आपल्या कलाकृतीतून समाज पुढे गेला पाहिजे तो अधिकाधिक अध्यात्मिक झाला पाहिजे ह्याची काळजी मी घेतो समकालीन प्रश्नांच्यावर मी अनेक चित्रपटसंहिता लिहिल्या पण बॉलिवूड ही माझी कधीही प्रायोरिटी झाली नाही २०१४ पर्यंत माझी प्रायोरिटी ही नेहमीच मोक्ष होती
तीनवेळा माझ्या आयुष्यात असे झाले आहे कि मी लेखक दिग्दर्शक साइन झालो आणि सविकल्प समाधी घेऊन अनंत माझ्या देहात मी तल्लीन ! सुदैवाने लोक समजूतदार होते ते पुढं गेले ह्यातली एक फिल्म तर फारच बिग शॉट होती तिने मोक्ष कि बॉलिवूड असा प्रश्नच उभा केला मी मोक्ष निवडला येत्या २८ फेब्रुवारीला मी बॉलिवूडमध्ये ऑफिशियल दाखल होईन माझं एक गाणं संगीत दिग्दर्शक म्हणून येईल माझ्या संपूर्ण आयुष्यात बॉलिवूडमधली माझी एन्ट्री लेखक दिग्दर्शक म्हणून होण्याऐवजी संगीत दिग्दर्शक म्हणून होईल असं मला वाटलं न्हवतं फिल्म साधारण दर्जाची मेसेज फिल्म असल्यानं आणि स्क्रिप्ट निवडण्याचं स्वातंत्र्य म्युझिक डिरेक्टरला नसल्याने मी फिल्मचे नाव घेत नाहीये
ह्या गाण्याने माझी एंट्री झाली ती चमत्कारिक पद्धतीने
मुळात तो दिवस माझ्या आयुष्यातला एक गमगीन दिवस होता मी मोक्ष मिळत नाहीये व्यवहार फसलेला आहे आणि माझ्या तीन विद्यार्थ्यांनी दगलबाज केलेली आहे अशा कोंडीमूडमध्ये घरात परतलो नेमकी त्याचवेळी माझ्या इलेक्ट्रिसिटी मीटरचा लोच्या झाला अंधारात ह्या कोंडिमुडमध्ये असतांना मला काय करायचं ते सुचत न्हवते अशावेळी कविता माझ्या मदतीला धावते पण ह्यावेळी मदतीला धावले संगीत अचानक हे फ्रस्टेशन असे काही आले कि शब्द आणि चाल सोबतच आले आणि मी एकटाच तर्र गायला लागलो
अर्ध्या तासाने माझा असोशिएट आला त्याच्यापुढे मी पुन्हा गायिले पुढे काही वर्षांनी त्याला फिल्म मिळाली ह्या फिल्ममधे त्याचा नायक मृत्यूच्या दारात असतो आणि तो मृत्यूची आराधना करणारे गाणे गातो म्हणून त्याला माझ्या गाण्याची आठवण झाली जे गाणं मी विसरलो होतो ते त्याच्या लक्ष्यात होतं त्यानं ते मागितलं आणि मित्रासाठी काहीही म्हणून मी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली पुढे पन्ना गिल हा पंजाबी गायक त्यानेच आणला भट्टी जमली आणि माझ्या दुःखातून जन्मलेलं हे गाणं रेकॉर्ड झालं
बॉलिवूड कुणाला काय बनवेल सांगता येत नाही आणि माझ्या आयुष्यात नाट्यपूर्ण काही घडल्याशिवाय आयुष्याला गप्प बसवंत नाही मात्र ह्या गाण्याने अनेक कम्पोझिशन्स नव्याने सुचायला लागली आणि त्यांनी अतोनात आनंद दिला माझ्यासाठी हा आनंद सर्वात महत्वाचा कलेतला माझा प्रवास पेंटिंगपासून सुरु होऊन आता संगीतापाशी थांबलाय असो
माझ्यावर कलावंत म्हणून लोककल्याण कुणी थोपवलेलं नाही माझी सर्वलोककल्याणता ही आपोआप आली आणि तिनं तसं येण्यात खरी मजा आहे तिची सक्ती मला नामंजूर आहे एखादी व्यक्ती कलावादी असली तरी मला फरक पडत नाही तिचा कलावादी असण्याचा हक्क मी मान्य करतो
----------------------------------------------------------------------------------------------------------------------कला सहा पद्धतीने होत असते ऍक्ट इंटरऍक्ट ऍक्शन इंटरऍक्शन ऍक्टिव्हिटी इंटरऍक्टिव्हिटी ! तुम्ही ती कशी व्हावी ह्यावर बंधन घालू नाही शकत ! संघटनेने कला ताब्यात ठेवणे ह्यापेक्षा कलेने संघटना ताब्यात ठेऊन संघटनाच बदलावी हे उत्तम ! आणि मी फक्त राजकीय वा आर्थिक संघटनेविषयी बोलत नाही तर कवितेची म्हणून जी संघटना अर्काइव्जमधून मान्यताप्राप्त डिजाईन म्हणून माझ्यापर्यंत येते तिच्याविषयीही बोलतोय संघटन हे कम्पल्सरी
१ अकाळ
२ अकाम
३ अचौर्य
४ अपरिग्रह
५ अअवकाश
६ अहिंसा
७ अव्यसन
८ असंबंध
९ आस्तेय
१०अरंजन
११ सत्य
१२ निरहंकार
ह्या द्वादश शिलांच्या आधारे चाललेले असले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने शिलसाधना मानली पाहिजे असे मी मानतो आयडियॉलॉजीज आणि फॅंटसीज ह्यांच्यात फरक न राहिलेल्या काळात शिलसाधनेचा हा आग्रह काही प्रमाणात का होईना नैतिकता जोपासेल अन्यथा सापेक्ष नैतिकतेच्या बेबंदपणात हिंसा , बलात्कार , खोटेपणा , भ्रष्टाचार , चोरी , संपत्तीची साठेबाजी ह्यांचे थैमान अटळ आहे हे थैमान घातले गेले कि आपण प्रतिक्रिया देतो पण साधना संयमाविषयी फार कमी चर्चा करतो आपला भरोसा नियंत्रणावर असतो आणि नियंत्रण चंचल असते ते कधीही सिड्यूस होऊ शकते सत्ता नियंत्रणाला कधीही ऑर्डर्स देऊ शकते शिलसाधनेपेक्षा सेल्फ आणि सेल्फपेक्षा सेल्फी महत्वाची झाली कि प्रतिमांचा सिग्रेटटाइप गांजेकस धूर उडत राहतो आणि आत्म आणि बाह्य पर्यावरणाची दिल्ली होते कलावंताच्या हथियारांची विजयादशमी सनातन व्यवस्थेचे पूजन करून साजरी होणार असेल तर कला म्हणून एक ऍनिमेटेड बंच सादर होणे अटळ असते कला तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ऍप्लिकेशन असते आणि आपल्या अनुभवातील तंत्रज्ञान जेवढी कला अधोरेखित करते तेवढे कुणीच करत नाही एका अर्थाने कला विज्ञान तंत्रज्ञानाला सांस्कृतिक बनवते आणि काही वेळा उत्सवी !
सर्वांना शिलसाधना झेपेलच असं नाही अशावेळी द्वादश शिलाबाबत किमान संयम आणि संयमही साधत नसेल तर किमान नियंत्रण साधायला काय हरकत आहे उदाहरणार्थ अहिंसा साधत नसेल तर किमान हिंसेवर संयम तरी आपण ठेवू शकतो कि नाही ? दारू पिऊन दंगा करणारा कलावंत आणि दंगल करणारा दंगलखोर ह्यांच्यात काय फरक असतो एक खरी दारू पितो दुसरा हिंसेची दारू पितो पण परिणाम एकच असतो "न राहिलेले नियंत्रण व सुटलेला संयम !"
कला ही व्यक्तिगत आणि खाजगी बाब असतेच पण ती जेव्हा सामाजिकतेशी वा राजकीयेतेविषयी डील करते
तेव्हा तिच्या खाजगीपणालाही राजकीय व सामाजिक सिच्युएशन प्राप्त होते आणि ही जी प्राप्त झालेली सिच्युएशन असते तिला संघटनात्मक प्रस्थापितता गिळायला बघत असते अशावेळी ह्या संघटनात्मक शार्कच्या पोटात जाऊन पुन्हा खाजगीत परतणे ही खरी कुशलता ! त्यामुळेच कलेमध्ये इंटरऍक्टला इंटरऍक्शनला इंटरऍक्टिव्हिटीला सेल्फऍक्टचे सेल्फऍक्शनचे सेल्फऍक्टिव्हिटीचे स्वरूप प्राप्त होते
संघटनात काहीवेळा बेसिक असे काही इन्फ्रास्ट्रक्चर असते जे बदलले तर संघटना कोसळू शकते अशा अपरिहार्यतेत किमान रिशेपिंग तर मी करूच शकतो चालत आलेल्या भाषेला त्यातील शब्दांना टॉपल करू शकतो प्रत्येक झूम नवीन चुंबन असते आणि ते घ्यावे लागते अशावेळी इंडिविज्युअल काय सबइंडिविज्युअल काय आणि सोशोइंडिविजुअल काय ते बघावे लागते सोशोचा सोश्या होत असेल तर तो सोश्या टाळावा लागतो त्यांचं संघटनेशी काय नातं आहे ते तपासावं लागतं आणि त्यासाठी प्रॅक्टिस रियाज अपरिहार्य ! नुसतंच इमोशनल सातत्य फार काळ कलेला नवीन ठेऊ शकत नाही त्यासाठी थोडीफार फिलॉसॉफिकल प्रॅक्टिसही करावी लागते आणि ह्या प्रॅक्टिसचा भाग म्हणून माझी समीक्षा येते
माझ्या काही मित्रांना माझी कवितेतून येणारी फिलॉसॉफिकल प्रॅक्टिसच पुरेशी वाटते तू कशाला समीक्षेत वेळ वाया घालवतोस असा त्यांचा प्रश्न असतो माझं उत्तर एव्हढंच मी फिलॉसॉफिकल आर्टिस्ट आहे जसे बसवेश्वर ज्ञानेश्वर झेन कवी होते
----------------------------------------------------------------------------------------------------------------
द्वादश शिलसाधनेचा आग्रह कशासाठी हा प्रश्न काहींना किरकोळ वाटत असला तरी तो सद्याच्या सत्य , असत्य , ट्रोलिंग , थापा , फेकनेस आणि बनावटगिरी ह्यांच्या जमान्यात अतिशय महत्वाचा आहे जगतांना जी ठाम मूल्ये लागतात ती मूल्ये म्हणजे द्वादश शिले ! शिलव्यवस्था ही सर्व प्रकारच्या इन्वेस्टीगेशन्सना मान्यता देते आणि तीच संपूर्ण समाजाची आधारशीला असते किंबहुना शीला ह्या शब्दातूनच शील हा शब्द आला आहे आणि शीला म्हणजे फाउंडेशन स्टोन दुर्देवाने आर्यांनी त्याचा अर्थ बदलला (मूळ शब्द अर्थात शिळा आहे ) आणि पुढे आधारशीला असा शब्द निर्माण करावा लागला शिलान्यास हा शब्दही त्यातूनच आला आहे शिलसाधना हीच शिवसाधना ! शिलसाधना ही संपूर्ण मानवी व्यवहाराचा आधार आहे आपण एकमेकांशी सत्य बोलतो म्हणून हे जग चाललंय मी जेव्हा म्हणतो कि माझं नाव श्रीधर आहे तेव्हा ९९ टक्के लोक मी सत्य बोलतोय ह्यावर विश्वास ठेवतात म्हणून पुढचे व्यवहार होतात जेव्हा बायको म्हणते कि मी जेवण बनवलंय बाहेर जेऊ नका तेव्हा आपण बायकोवर (बायकांनी नवरा म्हणावं ) ती सत्य बोलते म्हणून विश्वास ठेवतो आणि बाहेर जेवत नाही आपला सगळा व्यवहार सत्याच्या आधारे चाललाय म्हणून आपली नातीही चाललेत पार्टनरशिप चाललीये आपल्याकडे आपण असत्य बोलतो ते सत्य बोलून आपले काम होणार नाही वा भागणार नाही किंवा सत्याने कुणी दुखावलं जाईल असं वाटलं तर ! आणि १ टक्का ज्यांना फसवायचंच असतं ते ! सगळे मिळून असत्य ५ टक्केही असत नाही पण जणू काय असत्य समाजाचा आधार असल्यासारखे आपण बोलत असतो हेच इतर शीलांबाबत आहे लोकांची नव्वद ते पंचाण्णव टक्के असलेली शीलस्थिरता हीच समाजाचा पाया आहे सत्याच्या वादाबाबत वाद घालणाऱ्यांनी तरी किमान सत्य बोललं पाहिजे असं आपण गृहीत धरतो म्हणजे सर्व वादविवादांचा पाया सत्य बोलणे हाच असतो सर्वच खोटं बोलायला लागले तर वाद शक्य आहे का ? हिंसेवर वाद घालणारेच एकमेकांची हिंसा करायला लागले तर त्यांना हिंसेच्या बाजूने बोलणे शक्य आहे का म्हणजे हिंसेचे समर्थन करण्यासाठीही अहिंसेची गरज भासते सर्वच चोरी करायला लागले तर कष्ट कोण करणार कुणीतरी चोरी न करता कष्टाने काम केलेले असते म्हणूनच कुणाला तरी चोरी करता येते म्हणजेच चोरीसाठीही अचोर्य आवश्यक असते
ठामपणा आणि ठामता ह्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत जेव्हा असली ठामता फिस्कटते तेव्हा नकली ठामता तिची जागा घेते किंवा कर्मठता ती जागा बळकावते कर्मठता इन्वेस्टीगेशन्सना नकार देते तर ठामता सर्व प्रकारच्या इन्वेस्टीगेशन्सना पुराव्यांच्या चौकश्यांना मान्यता देते भारतीय ठामतेबाबत ठाम नाहीत म्हणून सगळा गोंधळ आहे सनातनी ब्राम्हण्याने , ब्रिटिशांनी आणि इस्लामने आपला द्वादशशीलाबाबतचा ठामपणा फ़िसकटवला साहित्यात धार्मिक महाकाव्याच्या व श्रद्धांच्या आधारेच साहित्य व कला निर्माण केली पाहिजे असा आग्रह धरून ओरिजनॅलिटीचा गळा घोटला आणि वर पुन्हा त्याला अभिजातवादाचे नाव देऊन मोकळे ! परिणामी महाकाव्यात्मक पौराणिक हिंदू धर्म फोफावला आणि महाकाव्याच्या नायकांना लोक देव म्हणू लागले
हा शीलाबाबतचा नाहीसा झालेला ठामपणा पुन्हा आपल्या समाजजीवनात आपण परत आणला पाहिजे लोक धार्मिक राजवटींच्या नादाला लागतायत त्याचं सर्वात मोठं कारण त्या ह्या ठामपणाला समाजजीवनात आणतील असा त्यांचा गैरसमज आहे प्रत्यक्षात धार्मिक राजवटी
१ फेक ठामपणा आणतात जो श्रद्धांच्यावर अवलंबून असतो
२ धर्म हा त्यांच्या राष्ट्रवादाचा आधार असतो आणि त्या धार्मिक राष्ट्रवादाचा अखन्ड जप मांत्रिकपणे करत असतात
३ त्या मिलिटरी ,शहादत , युद्ध ह्यांच्याबाबत लोकांना इमोशनल करत असतात जणू राष्ट्रासाठी बळी जाणं आणि देवासाठी बळी जाणं ह्यात फरक नाही (मी बळी नावाची एक निर्वस्तुवादी कविताच ह्यावर लिहिली होती )
४ त्या स्वतःच्या धर्मराज्यात ह्युमन राईट्स पायदळी तुडवतात मात्र इतर सेक्युलर राष्ट्रात अल्पसंख्याक असल्याने तिथे मात्र ह्युमन राईट्सचा डिंडिम वाजवतात सेक्युलॅरिझम हा धार्मिक राजवट निर्माण करण्यासाठी ते अल्पसंख्याक असतात तिथे एकीकडे त्यांना आवश्यक वाटत असतो आणि जिथे त्यांचा धर्म बहुसंख्याक असतो तिथे मात्र सेक्युलॅरिझम हा त्यांचा शत्रू असतो ते स्वतःच्या धर्मराज्यात सेक्युलॅरिझमचा कचरा करत असतात
५ धार्मिक प्रपोगंडा आणि अपमाहिती ह्याच्या आधारे त्या आर्थिक प्रश्न दाबून टाकतात किंवा मिसमॅनेज करतात आणि त्यामुळं आलेलं अपयश दाबून टाकतात
६ त्यांच्या धर्माच्या आत एक धर्म असतो जो फक्त चोजन वन साठी खुला असतो त्याची कोअर संघटना असते आणि त्यात सामील असणे म्हणजे काहीतरी महान असणे असते ज्याचे अमिश दाखवून त्या वजनदारांना आपल्या कार्यक्रमांना ओढत असतात
७ त्या एक महाशत्रू निर्माण करतात त्याचा अँटीब्रँड बनवतात आणि स्वतःलाही ब्रँड बनवून प्रमोट करतात महाशत्रू अँटीब्रँड नामशेष करू पाहतात त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते
८ त्या स्वतःचे टेररिस्ट तयार करतात आणि त्यांच्यामार्फत त्यांना हवी ती कामेही करवून घेतात आणि गरज पडली तर सेक्युलर बनून त्यांना मारतात
९ त्या बायकांना धार्मिक कमोडिटी किंवा देवीचा अवतार बनवून आपल्या धार्मिक ग्रंथात कोंडतात
१० स्वधर्म लोकसंख्यावाढीला त्या उत्तेजन देतात मात्र इतर धर्मांची लोकसंख्यावाढ त्यांना भयभीत करते जितकी लोकसंख्या जास्त तितके धर्मवीर व धर्मनाऱ्या जास्त दारिदय जास्त आणि जितके दारिद्रय जास्त तितक्या समस्या अधिक धर्मावरचा विश्वास आधिक हे त्यांना ठाऊक असते त्यांच्यासाठी समस्यावाढ ही धर्मवाढीची संधी असते ज्यांना समस्यांचा मुकाबला करता येणार नाही ते हमखास धर्मात डोके खुपसून बसणार ह्याचा त्यांना अंदाज असतो
११ मास मीडिया आणि सोशल मीडिया ह्या दोघांवर अधिकाधिक कंट्रोल मिळवणे त्यांना गरजेचे वाटते दहशत हवी तशी स्पिन करण्यासाठी ते अत्यंत कुशलतेने त्यांचा व चिन्हतंत्रज्ञानाचा वापर करतात
११ धर्माच्या आणि स्वतःच्या धर्मराष्ट्राच्या सुरक्षिततेविषयी ते कमालीचे संवेदनशील असतात आपला धर्म खतऱ्यात आहे ह्याविषयी त्यांना खात्री पटलेली असते आणि त्याला ज्यापासून खतरा आहे असे त्यांना वाटते त्याला ते महाशत्रू बनवतात सेक्युलॅरिझम ह्या महाशत्रूची बाजू घेत आहे असे त्यांना वाटत असते त्यामुळेच त्यांना सेक्युलॅरिझमही शत्रू वाटत असतो त्यांची टिंगल आणि टवाळी करणे त्यांना आवश्यक वाटते
१२ स्टेट कॅपिटॅलिझम स्टेट कार्पोरेटीझम स्टेट सोशालीजम आणि स्टेट कम्युनिजम अशा सर्व अर्थव्यवस्था स्वतःच्या धर्मासाठी त्या वापरतात त्यांना आर्थिक इझमपेक्षा आपली धार्मिक सत्ता व नियंत्रण अधिक महत्वाचे वाटते भांडवलदारांना लोकशाहीपेक्षा ह्या धार्मिक सत्ता सोयीस्कर वाटू शकतात कारण त्यांना जर का धार्मिक सत्तेचा ऍक्सेस फास्ट मिळत असेल तर त्यांचा फायदा अधिक फास्ट होतो खायाला तर घालावेच लागते लोकशाही असो कि धर्मशाही उलट धार्मिक राजवटीत भ्रष्टाचाराचे रिटर्न्स अधिक फास्ट मिळतात पण त्याचबरोबर जीवाला धोका असतो पण हा धोका पत्करून फायदा कमवता येतो
१३ धर्मराज्यात धर्मसंहिता व धार्मिक कायदे ह्यांचेच राज्य असते गुन्ह्यांचे स्वरूपही धार्मिक असते आणि हे गुन्हे करणाऱ्यासाठी आपण नरक निर्माण केला पाहिजे अशी मानसिकता असते त्यामुळे नरकाचे छोटे छोटे तुकडे निर्माण होतात आणि नरकयातना देणाऱ्या यंत्रणाही !
१४ शासक समुदायाला धार्मिक राजवटीचा फायदा अधिक असतो कारण लोकशाहीपेक्षा धर्मराज्यात नोकरशाहीला अधिक सत्ता प्राप्त होते आणि उपभोगही प्राप्त होतो बायकांना गुलाम बनवण्याचे आणि नंतर विकण्याचे चान्सेस धर्मराज्यात अधिक असतात कारण धर्मकृत्य म्हणून हे करता येते शिवाय धार्मिक कायदेकानून कडक असल्याने व त्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय सत्ता आवश्यक असल्याने शासक समुदायाची दसो उंगलीया घीमें अशी अवस्था असते
१५ धर्मराज्यात १ सृजन समुदाय (ह्यात कलावंतही येतात ) २ ज्ञान समुदाय ३ मध्यम व लघुऔद्योगिक समुदाय ४ शेतकरी समुदाय ५ चिन्हऔद्योगिक समुदाय ६ पशुपालन समुदाय ७ कारागीर समुदाय ८ दास समुदाय ९ श्रमिक समुदाय १० मुमुक्षु समुदाय ११ आदिवासी समुदाय १२ विदेशी समुदाय १३ छोटे व्यापारी समुदाय हे समुदाय पूर्णपणे ठेचले वा पिचले जातात
१६ सृजन समुदायातील जे सृजनशील लोक धर्मराज्यांना पूरक असे काम करतात त्यांना ह्या धर्मराज्यात मोठाच आत्मसन्मान मिळतो पण जर एखादा ह्या राजवटीविरोधी आहे असं लक्ष्यात आलं कि त्याची यथेच्छ निंदा होते धर्मराज्यावर मनापासून विश्वास ठेवणारेही काही कलावंत असतात त्यांचे वर्चस्व सुरु होते त्यांना धर्मराज्यात मायलेज दिले जाते संस्थात्मक कारभार त्यांच्याकडे सोपवला जातो
१७ धर्मराज्यातील निवडी ह्या एकाधिकारशाहीप्रमाणे चालतात आणि ज्याचा एकाधिकार प्रस्थापित होतो त्याच्या मर्जीप्रमाणे निवडणूक व निवडी होतात मर्जीवाद प्रचंड वाढतो
१८ धर्मराज्यात अनेक पंथ सुरवातीला एक धर्म म्हणून वावरत असले तरी पुढे सत्तासंघर्षात एक पंथ विजयी होतो आणि तो आपल्याच धर्मातील इतर पंथीयांना शत्रू समजू लागतो आणि मग महाशत्रूकडून हा मोर्चा आतील शत्रूंच्याकडे वळतो आणि मग आतील सफाई चालू होते एक मुख्य पंथ विरुद्ध उरलेले पंथ अशी लढाई सुरु होते स्वधर्मीय धर्मस्थानात बॉम्ब फुटतात हत्या होतात
१९ लोकांना शेवटी कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येतो जोपर्यंत ह्या धार्मिक राजवटी नव्या नव्या दंतकथा रचून लोकांचे मनोरंजन करतात तोवर त्या यशस्वी होतात एकदा का लोकांना वस्तुस्थिती कळाली कि त्यांना उपरती होते अशावेळी मनोरंजन म्हणून युद्ध कार्यक्रम आखला जातो ह्या युद्धात जोवर ह्या राजवटी विजयी होतात तोवर त्या टिकतात पण एकदा का त्या पराभूत झाल्या कि मग मनोरंजन संपते मग डोळे उघडलेले लोकच त्यांना कोसळवतात कारण विजय मनोरंजक तर पराजय अंजक असतात
थोडक्यात पुरोहित समुदाय शासक समुदाय व दलाल समाज ह्यांचे धर्मराज्यात कल्याणच होत असते आणि हे लोक समाजाची नाडी असल्याने धर्मराज्ये वर्षानुवर्षे टिकतात आणि शेवटी स्वतःचे वजन सहन न होऊन कोसळतात
ह्या धर्मराज्यांना खरा पर्याय द्वादशशीलाधिष्टीत राजवटीच असतात ज्या सेक्युलर राजवटी द्वादशशीलता पाळत नाहीत त्या धर्मराज्यांना वाटा मोकळ्या करत असतात म्हणूनच द्वादशशीलतेचा आग्रह कलावंतांनी लावून धरावा लागतो
श्रीधर तिळवे नाईक
======================================================================================
S
आता ह्या पुढचा प्रश्न निर्माण मी करतोय हे धर्मराज्य धर्मराज्य आहे कि वंशराज्य आहे ? एक गोष्ट भल्याभल्या विचारवंतांच्या लक्ष्यात आलेली नाही ती म्हणजे ब्राम्हण्यवाद हा आर्यवंश नाकारत नाहीये तो आता फक्त असं म्हणतोय कि आर्यवंश भारतात होता आणि तो जगभर पसरला
गेली दोन दशके जो वाद निर्माण झालाय तो ह्या आर्य वंशाचा वाद आहे एकीकडे असा काही वंश अस्तित्वात नाही असं म्हणायचं आणि आर्य इथलेच म्हणायचे आणि दुसरीकडे सिंधू संस्कृतीपासूनच्या सर्व गोष्टी वैदिक आहेत असा धडाडून प्रचार करायचा सध्या जगात ज्याला रेस सायन्स म्हणतात त्याचे पुनरागमन झाले आहे काय ? आर्य स्वतःला श्रेष्ठ मानतात कि नाही तर ते मानतात नाहीतर अनार्य सिंधू संस्कृती हायजॅक करण्याचा आटापिटा कशासाठी ? आर्यांच्याशिवाय हिंदुस्तानात काहीही ग्रेट निर्माण होऊच शकत नाही हा माज येतो कुठून ? आणि एक अकॅडमिक झुंड त्यातून चालून कशी येते ? हा प्रकार नेमका काय आहे ? दरवेळेला लेबल बदलून तीच दारू विकण्याचे हे शौर्य नेमके कशासाठी राबवले जाते ? आर्य बाहेरून आल्याचा आणि ते अनार्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होते हा दावा कोसळल्यापासून आर्य वंशाला नकार देणे सुरु झाले जी एक फार चांगली मूव्ह होती पण हा चांगुलपणा धड वीस वर्षेही टिकला नाही अचानक १९८५ पासून हिंदुत्ववादाच्या नावाखाली वैदिक आयडेंटिटीचा अजेंडा राबवण्याचा खेळ सुरु झाला आर्यराष्ट्र ह्या शब्दाऐवजी हिंदू राष्ट्र हा शब्द वापरला जाऊ लागला काँग्रेसने सेक्युलॅरिझम अरबी समुद्रात बुडवल्यामुळं ह्या खेळाला अधिकच वाव मिळाला
मला नेहमीच प्रश्न पडतो कि आर्यांच्या डोक्यात हा श्रेष्ठत्वगण्ड येतो कोठून ? पिढ्यानपिढ्या हा श्रेष्ठत्वगंड एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचा उद्योग प्रत्येक पिढीला सुचतो कसा ?
आजच्या जगातला सर्वात मोठा प्रश्न आपलं आयुष्य आपणच प्रोग्राम करायचं कि आसपासच्या तयार प्रोग्राम्सकडून प्रोग्रामित व्हायचं हा आहे ब्राम्हण पिढ्यानपिढ्या जर आर्यगंड प्रोग्रामिंत करणार असतील तर ब्राम्हणेतरांचा द्वेष पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाणे अटळ अगदी भलेभले कम्युनिस्ट ब्राम्हणसुद्धा आर्यगंडातून मोकळे होत नाही त्यामुळे आर्यांची षडदर्शने दिसणाऱ्या आर्यांना शैवांची षडदर्शने मात्र दिसत नाही त्यातूनच महाशिवरात्रीला चर्चा कशावर तर भांगेवर ! हे लोक एकतरी शैव दर्शन ह्यादिवशी विचारात घेतात का ? ह्यांना एकतरी शैव दार्शनिक माहित आहेत का ? ह्याउलट शैव असलेला सर्वदर्शनकार मात्र स्वतःच्या शैव दर्शनांच्याबरोबर आर्यांच्या दर्शनांनाही किंमत देतो शैवांच्याबद्दल हा इतका पराकोटीचा द्वेष येतो कोठून ? अगदी आर्यांच्या बौद्ध दर्शनाला स्वीकारणारे नवबौद्धदेखील शिवाची आणि शैवांची टिंगलटवाळी करत असतात
अशी टिंगलटवाळी शैवांनी गौतम बुद्धाची केली तर चालेल का ? लेखण्या काय फक्त तुमच्याकडे नाहीत शैवांच्याकडेही आहेत पण त्या योग्य तर्हेनेच चालल्या पाहिजेत ह्याचे भान शैवांना शिव , बसवेश्वर नानक पासून शिवाजी महाराज महात्मा व सावित्रीबाई फुल्यांच्या पर्यंत सर्वांनीच शैवांना दिलंय आर्यगंडाविरुद्धची वंशवादाविरुद्धची लढाई शैव पिढ्यानपिढ्या लढतायत मात्र आपल्याला शैवगंड होणार नाही ह्याची ते काळजीही घेतात २१ व्या शतकातही काही ब्राम्हण जरी ब्राम्हण झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी तो श्रेष्ठ ह्यावर विश्वास ठेवतात तेव्हा काय प्रतिक्रिया द्यायची हा प्रश्न पडतो (माझ्या एका मित्रानेच ही प्रतिक्रिया दिली होती )ब्राम्हणांचा वंश हा जन्मतः अधिक बुद्धीमान असतो ह्यावर आजही अनेक ब्राम्हणांचा विश्वास आहे मी जोशी कि कांबळे ह्या चित्रपटकथेत ह्यावर भरपूर झोत टाकलाय (ही उपलब्ध आहे )
आजच्या घडीला सर्वात मोठा धोखा आहे तो जातीय व धार्मिक प्रोग्रॅमचा ! अलीकडे प्रत्येक जात एक प्रोग्राम बनून येतीये माणसाला भाषा आली तेव्हा प्रथम ती तो ऐकायला शिकला तरी नंतर ती बोलायलाही शिकला नंतर वाचायला शिकला तरी लिहायलाही शिकला तसेच आजच्या डिजिटॅलिटीचे आहे आता प्रोग्रॅम फक्त वापरून चालणार नाही तर प्रोग्रॅम बनवायलाही शिकायला हवे जे प्रोग्रॅम बनवत नाहीत ते स्वतःच कुणाच्यातरी हातचा प्रोग्राम बनतात
माझ्या पुरता मी चौथ्या नवतेचा प्रोग्राम बनवला आणि तो कधी ट्रान्सेन्ड करायचा तेही शिकलो
धर्म वर्ण जात हे असे तीन महाप्रोग्राम आहेत ज्यांच्या हातचे आपण साईडप्रोग्रॅम झालोय आपल्या सो कॉल्ड आयडेंटिटिज ह्या अनेकदा इतरांनी स्पॉन्सर केलेला प्रोग्राम असतो अशावेळी स्वतःलाच डीप्रोग्रामड करण्याची कला आपणाला अवगत असायला हवी मी ललित लेखनाला डीप्रोग्रॅम्ड करण्याची कला मानतो आपल्या कवितेत आपला धर्म आपला पंथ आपला वर्ण आपली जात आपला वर्ग उतरत असतो त्या उतरण्याला आपण नीट पहात गेलो कि आपोआपच डीप्रोग्रॅमिंगची शक्यता निर्माण होते ही शक्यताच साधना असते
=========================================================================================================================
डीप्रोग्रॅमिंगमधला सर्वात मोठा अडथळा अण्य आहे अण्य म्हणजे कर्मठ व सनातन जडत्व जे अस्तित्वाला चिटकून त्याचे नियंत्रण करते भारतात प्रत्येकात हे अण्य असते
हे अण्य सहा प्रकारचे असते
१ ब्राम्हण्य
२ क्षत्रियण्य
३ वैश्यण्य
४ शुद्रण्य
५ दलितण्य
६ आदिवासींण्य
ही सर्व अण्य कुणातही असू शकतात ती जन्मजात नसतात तर संस्काराने आलेली असतात
ह्या अण्यात सर्वात मोठे व प्रबळ अण्य हे ब्राम्हण्य असते आणि ब्राम्हण्य हे कुणातही असू शकते अगदी नवबौद्धांच्यातही आणि एखादा जन्माने ब्राम्हण असलेलाही ब्राम्हण्यापासून मोकळा असू शकतो चार्वाक बहुतांशी ब्राम्हण होते पण ब्राम्हण्यापासून संपूर्ण मुक्त होते आजही नेहरूंच्यापासून सुनील तांबेंच्यापर्यंत अनेक जण असे आहेत ज्योतिबा फुलेंनी स्पष्टपणे ब्राम्हण आणि ब्राम्हण्य ह्यात फरक केला होता हे आपण ध्यानात घ्यायला हवे
हे अण्य खरोखरच अनन्यसाधारण आहे इतके ते आपल्या डोक्यावर आणि डोक्यात बसलेले आहे आणि एक व्यक्ती म्हणून मला त्याचा सामना १०वी ला परीक्षा फॉर्म भरताना करावा लागला माझ्या आईवडिलांनी मला कधीही वर्ण वा जात सांगितली न्हवती साहजिकच फॉर्म भरतांना मला जेव्हा जात विचारली गेली तेव्हा माझ्याकडे कसलाही जातीय डाटा नसल्याने मी थंडच पडलो पुढे हे जातप्रकरण फारच बोकाळलेले दिसले अनेकदा मला प्रश्न पडतो सरकारने जात विचारणे बंद केले तर जात बंद पडेल कि नाही ? शेवटी आपण जात अनेकदा शाळेतच सर्टिफाय करून घेतो गंमतीची गोष्ट अशी कि मी ज्या गल्लीत जन्मलो व वाढलो त्या चक्क धनगर गल्ली माळी गल्ली सणगर गल्ली अशा जातिनिर्देश गल्ल्या होत्या व पुढे मी जैन गल्लीत आल्यावर धर्मनिर्देश गल्लीत दाखल झालो आणि तरीही मला कधी जात विचाराविशी वाटली नाही कि धर्म ! माझ्या दृष्टीने हे व्यवसाय होते माझ्या भाषेवर मात्र कोल्हापुरी आक्रमक धनगरी बाज व मराठा बाज कायमचा चढला तो इतका कि मी साधे पाणी मागितले तरी मी ऑर्डर देतो असं लोकांना वाटतं मराठा बाज चढण्याचे कारण माझा पाटलांच्या वाड्यावर झालेला जन्म ! वाड्यातच गोठा असल्याने गोठ्याची सगळी वळणं माझ्यावर लहानपणापासून चढली पाटलीणबाईंनी माझ्यावर जीव ओतून प्रेम केल्याने आणि पुढचे सगळे घरमालक बाबर फाळके पवार असे ९६ कुळी असल्याने माझ्यावर मराठा संस्कारही खूप झाले थोडा मोठा झाल्यावर धनगरी आणि माळी दुकानात जाऊ लागल्यावर वाणी आणि दुकान बारा इमामसमोर असल्याने मुसलमानी आणि गावात खुद्द आजोबाच मुख्य पुजारी असल्याने पुरोहिती असा सगळा मिश्र तामझाम माझ्या मेंदूवर चढलेला आहे मला कुणी माणूस परका वाटतच नाही अनेक बहुविध जीवनशैलींशी लहानपणापासून परिचय असल्याने मला सगळेच आपले वाटतात
आजही मी असा घडलो हे फार बरे झाले असे मला वाटते
माझ्यावर कवितेचा संस्कार आईकडून आला माझी आईच्या जीवाला धोका आहे अशी आजोबांची खात्री असल्याने तिला नागेशी बांदिवडेला न शिकवता दुसऱ्या गावात बहुदा तळोद्याला शिकायला धाडली गेली तिथे माझ्या आजीची सख्खी बहीण दिलेली माझी आजी प्रभू ! तिला नाईकांच्यात दिलेली तर मावशी सावंतांना दिलेली तर ही सावंत आजी जिला मी मावस आजी म्हणतो कवितेची विलक्षण आवड असलेली माझ्या आईला कवितेचे वळण लागले ते ह्या सावंत आजीमुळे दर सोमवारी बैलगाडीत बसवून तिला मावशीकडे न्यायची आणि तिला शनिवारी नागेशीच्या घरी सोडण्याची जबाबदारी वंजारी किंवा इतर तांड्यांकडे कधीकधी अफाट पाऊस लागला तर आई तांड्यातच वस्तीला साहजिकच आईने त्यांच्या गाण्यांचेही वळण घेतले माझ्या आईला ते स्वतःची लेकच मानत असल्याने त्यांचे अनेक संस्कार तिने उचलले विशेषतः निर्भयपणा आणि गाणी माझ्याकडे दोन्ही आले आणि सावंत आजीकडची कविताही
माझ्या ह्या गुंतागुंतीच्या कंडिशनिंगमुळे बहुदा माझी कविता आणि मी दोघेही अण्या पासून वाचलो पण त्याचबरोबर सगळ्या अण्यावर मी बिनधास्त टीका करायलाही शिकलो
=================================================
काही प्रश्नांना शॉर्टकट मध्ये दिलेली उत्तरे आता अधिक दीर्घ लॉंगकटमध्ये १३ श्रीधर तिळवे नाईक
ब्राम्हण्य क्षत्रियण्य आणि वैश्यण्य
ह्यातील प्रत्येक अण्य हे मानवतेच्या प्रगतीतील अडथळा आहे इथे प्रथम ब्राम्हण्य क्षत्रियण्य आणि वैश्यण्य ह्या तीन प्रोग्रामिंगची चर्चा करू प्रत्येकाने ह्यातले आपल्या आत काय चिटकून बसले आहे त्याचा विचार करावा
ब्राम्हण्याचा प्रोग्राम प्रामुख्याने खालील बेसिक गृहीतकांवर अवलंबून असतो
१ स्वतःच्या धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याला साफ नकार व त्याच्या दैवीपणावर अंधश्रद्धा
२ जन्मजात उतरंडीवर मग ती वर्णीय असो वर्गीय असो वा जातीय असो ठाम विश्वास
३ पुरोहित वर्ण सर्वोच्य वा प्रेषित वा संस्थापक सर्वोच्य वा दोघेही सर्वोच्य
४ कर्मकांडावर विश्वास व राजकीय सामाजिक कृतीसुद्धा धार्मिक कर्मकांडासारख्या करणे
५ धर्मग्रंथातील धार्मिक कायद्यानुसार राज्य चालवण्याचा हट्ट
६ मरणोत्तर जीवनावर विश्वास
७ स्त्रियांचा व दासांचा दुय्यम दर्जा मान्य दास प्रथा मान्य
८ शब्दप्रामाण्याला प्रमाण मानणे व प्रत्यक्ष प्रमाण जर धार्मिक शब्दप्रामाणाशी जुळत असेल तरच मानणे
९ संघटन धर्मकेंद्री सर्वच राजकीय सामाजिक आर्थिक संघटना धार्मिक ग्रंथानुसार चालवण्याचा अट्टाहास
१० धर्मप्रमुख वा धर्मप्रेषित वा धर्मसंस्थापक ह्यांना देवाचा दर्जा देणे व त्यांच्याविषयीच्या टीकेला नाकारणे वेळप्रसंगी टीका करणाऱ्याला दण्ड व देहदंड देणे
दुसरा मोठा अडथळा क्षत्रियण्याचा असतो क्षत्रियण्य प्रोग्राम खालील गोष्टीवर अवलंबून असतो
१ राजा वा शासक हा देव असतो राज्यकर्ता देव असतो वा देवाचा अवतार असतो वा त्याच्यात काहीतरी दैवी असते तो देवांच्याकडून वा देवाकडून वा नियतीकडून निवडला गेलेला कुणी स्पेशल असतो
२ जनता दास म्हणूनच जन्माला आलेली असते मात्र राजाने तिला ती दास आहे हे कळू देऊ नये
३ जो तळे राखील तो पाणी चाखील ह्या न्यायाने भ्रष्टाचार होणारच
४ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा राजसत्ता ठरवते
५ राज्यकर्त्याने स्वतःच्या रक्तातून वारस निवडणे हे सहज स्वाभाविक कृत्य आहे
६ राज्यकर्त्याने शक्यतो क्षत्रिय वा स्ववर्ण वा स्ववर्गीय वा स्वजातीय वा स्वजमातीय धर्मसंस्थापकच निवडावा व त्याचा प्रचार करावा त्यामुळेच राम व कृष्ण ह्यांचा मोह सुटत नाही मग ते कितीही वर्णवादी असोत
७ संघर्ष करून आलेल्या राजाने आपले मूळ प्राचीन क्षत्रियांच्यात असल्याचे सिद्ध करणे हे त्याला प्रतिष्ठा देते वा त्याची प्रतिष्ठा वाढवते
८ स्त्रियांचा दुय्यम दर्जा मान्य गुलामगिरीला मान्यता दासप्रथा मान्य
९ राज्यप्रमुखाला , राजकीय नेतृत्वाला वा राज्य संस्थापकाला देवाचा दर्जा व त्यांच्यावरच्या टीकेला नकार व टीका केल्यास दंड वा देहदंड
१० राज्यकारणात वंशवाद मान्य घराणेशाही मान्य जन्मानुसार राज्यपद मान्य राजकीय गादी जन्मानुसार हे तत्व मान्य
११ जनता फक्त सेवेसाठी सैनिक फक्त राज्याच्या सेवेसाठी त्यांच्या मरणाला सेलिब्रेशन करणे मान्य
१२ शासनसंस्था सर्वोच्य बाकी सर्व संस्था ह्या शासनसंस्थेच्या ताब्यात असल्या पाहिजेत ही प्रेरणा
तिसरा मोठा अडथळा वैश्यण्य असतो हे वैश्यण्य अनेक गृहीतकांनी बनते
१ वैश्यांनी शक्यतो राजकारणात पडू नये व संपत्ती निर्माण करण्याकडे लक्ष्य द्यावे
२ पैश्याने काहीही विकत घेता येते वस्तू , माणूस पुरोहित आणि राजाही
३ सामाजिक प्रतिष्ठा पैश्यांच्यावर अवलंबून असते
४ पैश्याने सर्व सुखे विकत घेता येतात
५ जग पैश्यावर चालते
६ शासनसंस्था वैश्यांना लुटायलाच निर्माण झालेली आहे
७ स्त्री हीही संपत्तीं आहे ती मिळवता आली पाहिजे
८ कायदे मोडण्यासाठी असतात गरज असेल तेव्हा खुशाल मोडावेत शक्य नसेल तेव्हा पाळावेत
९ थोडे कर भरावेत उरलेले चुकवावेत
१० समाजात वर्ग गरजेचे आहेत आणि अपरिहार्यही आहेत समाजात खरे वर्ग दोनच १ संपत्ती कशी निर्माण करायची ह्याचे कौशल्य प्राप्त झालेले २ आणि संपत्ती कशी निर्माण करायची ह्याचे कौशल्य प्राप्त न झालेले बाकी सर्व कल्पना आहेत
११ देव मोटिव्हेशनल फोर्स म्हणून वापरावा त्यासाठी पुरोहित ठेवावेत धर्म जोवर व्यापाराला फायदेशीर आहे तोवर पाळावा
चौथा मोठा अडथळा हा शुद्रण्याचा आहे हे शुद्रण्य अनेक गृहीतकांच्यावर उभे आहे
१ शूद्र हे मागासलेले होते
२ शूद्रांना लिहितावाचता येत न्हवते
३ शुद्रांनी शूद्रांच्यातून निर्माण झालेल्या राजांच्यावर क्लेम करू नये आपल्या शूद्र राजांना क्षत्रियाचा दर्जा द्यावा
४ क्षत्रिय आपले मायबाप आहेत
५ ब्राम्हण सांगतील तो धर्म आपण पाळावा
६ आपण पापयोनीज आहोत आणि आपल्या पापांच्यामुळे शूद्र म्हणून जन्मलो आहे
७ आपला धर्म शैव असला तरी तो आपण फक्त घरातच पाळावा बाहेर आपण आर्यांचे १ वैदिक २ ब्राम्हण ३ वैष्णव व ४ हिंदू हे धर्म पाळावे व त्यांच्याशी अधिकाधिक कनेक्ट व्हावे
८ राम आणि कृष्ण हे आर्यांच्या महाकाव्यातून निर्माण झालेले देव आपणही पूजावेत व आपल्या बायकोला सीता बनवून तिला चरणदासी पतिव्रता बनवावे
९ वेद स्मृती व ब्राम्हणग्रंथ वाचण्याचा अधिकार आपणाला नसला आपण ते पवित्र मानून त्यांनी सांगितलेले कायदे पाळावेत
१० महाकाव्ये व पुराणे वास्तव वा सत्य मानावीत व त्यांना इतिहास मानावे
११ आपले सर्व धर्मसंस्कार शूद्र मानल्या गेलेल्या शैव ब्राम्हण वा गुरव वा भगत वा जंगम ह्यांच्याकडून करवून न घेता वैदिक ब्राम्हणाकडून करवून घ्यावेत व त्यामुळे प्रतिष्ठा वाढते असा भ्रम बाळगावा
१२ शंकर पार्वती कार्तिकेयस्कन्द गणपती व नंदी ह्या आपल्या देवतांबाबत आपले आगमग्रंथ काय म्हणतात ते विसरून ब्राम्हणांनी ह्यांच्या नावाने रचलेली भाकड पुराणे व महाकाव्य प्रकरणे प्रमाण मानावीत
१३ आपला मूळचा धर्म वर्णजात मानत न्हवता स्त्रीलिंग पुल्लिंग समान मानत होता ह्याचा विसर पाडून घ्यावा
ह्या सगळ्या गोष्टी घडतात कशा ? तर ज्याला बिकमिंग एलिट म्हणतात तशी ही प्रक्रिया आहे आणि युरोपात ती प्रबोधनकाळात व्यवस्थित घडली कारण तिथली दासांची गुलामगिरी वर्गाधिष्टित होती भारतात ती वर्णाधिष्ठित होती ह्याचा परिणाम म्हणून भारतात ब्राम्हण वा क्षत्रिय बनणे म्हणजे एलिट बनणे हा पॅरॅडाईम बनला ब्रिटिशांच्या काळात ! यूरोपमध्ये प्रोटेस्टंट बनणे म्हणजे एलिट बनणे हा पॅराडाइम बनला आपल्याकडे तशी स्थिती बनावी म्हणून ब्राम्हो , आर्य ,सत्यशोधक समाजापासून नवंयांनी नवबौद्ध समाजापर्यंत अनेकांनी प्रोटेस्ट करणारे नॉर्म सेटल करण्याचा प्रयत्न केला पण लोक एलिट बनले नाहीत त्यांनी ब्राम्हण व क्षत्रिय ह्या पुण्ययोनीत प्रवेश करून एलिट बनण्याचा प्रयत्न केला म्हणजेच ब्राम्हण्याने लवचिकता धारण करावी म्हणून प्रयत्न केले पण एलिट ब्राम्हण कधीही आपला एलिट दर्जा शेयर करायला व इतरांना द्यायला तयार झाले नाहीत साधा शंकराचार्य हा पोपसम दर्जा ब्राम्हणेतरांना द्यायला तयार झाले नाहीत ब्राम्हणांच्या सुधारणा चळवळी आमचे ते आमचे आणि तुमचे तेही आमचे अशा टाईपच्या आहेत म्हणजे शूद्रांच्या अभिनय नृत्य ह्या कला आम्ही शिकणार वैश्यांच्या प्रमाणे व्यापार आम्ही करणार क्षत्रियांच्या प्रमाणे सगळ्या राजकीय पोस्ट्स आम्ही बळकवणार पण आमचा धार्मिक दर्जा आणि व्यवसाय मात्र आम्ही इतरांना करू देणार नाही मंदिर आम्ही आमच्याच ताब्यात ठेवणार पण तुमचा व्यापार आम्हाला हवा प्राईम मिनिस्टरची पोस्ट आम्हाला हवी पण शंकराचार्याची पोस्ट आम्ही कद्यापी ब्राम्हणेतरांना देणार नाही अभिनय नृत्य आमचे पण शूद्रांना आम्ही वेद वाचू देणार नाही आणि त्यांच्या लग्नाचे विधी आम्ही पौराणिक पद्धतीनेच करणार ह्यातलं डबल स्टॅंडर्ड उघड आहे
जे ब्राम्हण करतात तेच आपण करायचं हा क्षत्रियांचा खाक्या त्यामुळं त्यांनी कसलेही पारंपरिक हक्क सोडले नाहीत जमिनी सोडल्या नाहीत (विनोबा भावेंची भूदान चळवळ त्यामुळेच फेल गेली )ब्राम्हणांपुढं नमतं घ्यायचं पण ब्राक्षेतर म्हणजे ब्राम्हणक्षत्रियेतर समाजाला हायेस्ट ऑथॉरिटीज शक्यतो द्यायच्या नाहीत त्यांच्याशी आंतरजातीय विवाह करायचे नाहीत आता तर अशी अवस्था आहे कि प्रत्येक ठिकाणचा राजा आपल्या क्षेत्राचा खासदार आमदार बनण्याच्या तयारीत आहे म्हणजे लोकशाही मार्गाने राजेशाही आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि परंपरेनुसार ही राजेशाही ब्राम्हणशाहीसमोर झुकायला तयार आहे हिंदुत्ववादी क्षत्रियण्य हे असे बदलते चेहरे दाखवणारे आरसा आहे
हे अण्य का निर्माण झालंय ते फक्त भारतात आहे कि सर्वत्र आहे ?
ह्या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाने निर्माण केलेल्या श्रद्धेत व तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या विश्वासात आहे आजच्या युगात ह्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा अंत झालाय ह्याची सुरवात दोन महायुद्धांनी केली स्वतःला आर्य म्हणवणाऱ्या हिटलरने वंशवादाच्या नावाखाली लाखो ज्यूंचे जे शिरकाण केले तर जपानच्या ईशीशिरोने बौद्ध धर्माचा देश असूनही हिटलरच्या तिप्पट माणसांचे शिरकाण केले ह्यातील ख्रिश्च्णांनी आपल्या पापाची जबाबदारी घेतली पण जपानी धर्माने अशी जबाबदारी घेणे नाकारले हिटलरला व्हिलन बनवणाऱ्या अमेरिकेने ईशिशिरोला मात्र आपल्याकडे नोकरी दिली कारण तो वैज्ञानिक मदतगार होण्याच्या शक्यता होत्या पुढे पुढे विज्ञानावरची श्रद्धा उडतच गेली आणि तंत्रज्ञानावरचा विश्वासही
विज्ञानाची पद्धतच अशी आहे कि विज्ञान अंतिम सत्याबाबतचा खोटा दिलासा देऊ शकत नाही आणि धर्म अंतिम सत्याबाबतचा खोटा पण पक्का दिलासा देऊ शकतो साहजिकच लोकांना जेव्हा विज्ञानाकडून असा अंतिम सत्याबाबतचा खरा दिलासा मिळेनासा झाला तेव्हा लोकांनी अंतिम सत्याबाबतचा खोटा पण पक्का दिलासा स्वीकारायला सुरवात केली ह्यातला मूर्खपणा दिसत असूनही हे घडतय हे म्हणजे खोटी रिप्लेसमेंट चालवणं होतं लोकांच्या मानसिकतेला काल्पनिकसुद्धा चालतं हा खरतर पोस्टमॉडर्न टाईमचा सर्वात मोठा धक्का आहे धर्माचे कन्स्ट्रक्टेड ट्रुथ इतक्या प्रभावीपणाने चालताना पाहिल्यावर धूर्त राजकीय व आर्थिक नेत्यांची डोस्की त्यादिशेने चालावीत ह्यात आश्चर्य ते काय ? आताचे पोस्टट्रुथ युग ह्या पोस्टमॉडर्न खांद्यावर उभे आहे त्यातच युवाल हरारी सारख्यांनी ह्याला दिलेला फिलॉसॉफिकल चेहरा आता मेकपला आणि मुखवट्यांना फिलॉसॉफ़ीनेच आधार पुरवल्यावर कल्पनांचेच राज्य सुरु होणे अटळ ! आणि मग धर्माइतकी कल्पनाशील गोष्ट दुसरी कुठली ? साहजिकच कल्पनाजन्य राजवटींचे आकर्षण निर्माण झाले
नाहीश्या झालेल्या वैज्ञानिक श्रद्धेवर उपाय शोधण्याऐवजी पारंपरिक समाजांनी कल्पनाशीलता स्वीकारून धार्मिक श्रद्धेला आमंत्रण द्यायला सुरवात केली मोहम्मद अली जिनांनी पाकिस्तान निर्माण करून धर्माच्या आधारे राष्ट्र निर्माण करण्याचा घातक पायंडा पाडला धर्माच्या आधारे सेक्युलर राष्ट्र निर्माण करण्याचा जीनांचा प्रयत्न हा परस्परविरोधी वदतोव्याघात आघात होता तो कोसळणे अटळच होते आणि सहा महिन्यातच पाकिस्तानातील सेक्युलॅरिझमला घरघर लागली मुस्लिम ब्राम्हण्याने पाकिस्तान ताब्यात घेतला यूरोपात दुसऱ्या महायुद्धाने धर्माच्या आधारे ज्यू लोकांचे राष्ट्र निर्माण करून धर्माच्या आधारे राष्ट्र निर्माण करण्याचा घातक पायंडा यूरोपात गिरवला ह्या घातक पायंड्याने श्रद्धेला सत्ता स्थापन करता येते हा विश्वास दिला पुढे सर्वत्रच मुस्लिम राष्ट्रांनी जिनावाद गिरवून सर्वत्र इस्लामिक राजवटी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला श्रद्धेच्या आधारे राष्ट्र हा ट्रेंड भारताने सुरु करावा ह्याला नेमके काय म्हणावे ?
वास्तविक व्हायला काय हवे होते तर अण्यचे वाढते बळ पाहून त्याला शह देणारी विश्वासार्हता आपण निर्माण करायला हवी होती पण हे आवश्यक आहे हेच अनेकांना कळले नाही मग जे वाटोळं व्हायचं होतं ते झालं
श्रद्धा अण्यमुळे निर्माण होते तर विश्वासार्हता अन्य म्हणजे अदर other मुळे निर्माण होते मी आणि अन्य ह्यांच्यात विश्वासार्हता निर्माण करण्याची जबाबदारी माझी आहे असं जोवर प्रत्येकजण मानत नाही तोवर विश्वासार्हता निर्माण होत नाही आज ज्या बँका आणि कम्पन्या बुडताहेत त्याच्यामागे ह्या विश्वासार्हतेचा लोप हे कारण आहे बँक कर्मचाऱ्यांना आपण विश्वासार्हतेचे एजन्ट आहोत हेच मुळी कळत नाहीये राजकीय नेत्यांची आणि सरकारी अधिकाऱ्यांची विश्वासार्हतेची धूळधाण तर इंग्रजांच्या काळातच उडायला लागली होती आणि अत्रेंनी त्यावर मी उभा आहे ह्या नावाचे नाटकच लिहिले होते हे नाटक १९३९ चे आहे हे लक्ष्यात घ्या आता ही धूळधाण चरमसीमेला पोहचली आहे आणि खुद्द मतदारांची धूळदाण ते पैसे घेऊन आणि जात पाहून मतदान करायला लागले तेव्हाच उडाली शिक्षण क्षेत्र वाचेल असे वाटत होते पण १९७० नंतर तिथेही विश्वासार्हतेची धूळधाण उडाली आणि समाजाचा बोजवारा उडाला ही गेलेली विश्वासार्हता परत मिळवायची असेल तर आपण सर्वच एकमेकांच्या विश्वासार्हतेचे एजन्ट बनलो पाहिजे अन्यथा धर्मान्ध राजवटींचे पुनरागमन अटळ आहे
आजच्या काळात विश्वासार्हतेचे रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी ही मोक्षकांची मुमुक्षुंची आणि कलावंतांची आहे दुर्देवाने फार कमी कलावन्त ती पार पाडतायत
आपण एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी ती म्हणजे प्रत्यक्ष जीवनात लोकांनी काय ऐकावं वाचावं पहावं हे आपण ठरवू शकत नाही अपवाद काही निगोशिएटर पण निदान कलेत लोकांनी काय ऐकावं वाचावं पहावं हे आपण ठरवू शकतो त्यांचा अर्थ ते वेगवेगळा काढतील पण तो अर्थसुद्धा त्यांनी कशातून काढायचा हे कलावंत ठरवतो एकाअर्थाने तो चिन्हस्थिरता देतो आणि मग रसिक आपली चिन्हता आणि चिन्हस्थिरता घेऊन येतो आणि दोघातील मिसमॅचिंगमुळे चिन्हचंचलता निर्माण होते प्रत्येक रसिकाची चिन्हता आणि चिन्हस्थिरता वेगळी असल्याने रसिकागणिक अर्थ बदलला तरी कलावंताने दिलेल्या चिन्हस्थिरतेमुळे ह्या चिन्हचंचलतेला वेसण बसते आणि त्यामुळेच त्या कलासंहितेबाबतचा चिन्हव्यवहार शक्य होतो दोन माणसे तिच्यावर चर्चा करू शकतात भाषांतरात चिन्हस्थिरता काही प्रमाणात ढासळते पण जी भाषांतरित संहिता असते ती त्या भाषिकांच्यासाठी एक चिन्हस्थिरता देते विश्वासार्हतेसाठी चिन्हस्थिरता फार आवश्यक असते त्यामुळेच कलावंत अधिक स्थिर मेसेज देऊ शकतो विश्वासार्हता वाढवू शकतो कलावंतच चिन्हांना स्थिर करत असतात अन्यथा चक्रधर ज्ञानेश्वरांच्या भाषेखेरीज त्या काळातील मराठी चिन्हस्थिरतेचा काय पुरावा आपल्याला उपलब्ध आहे ज्ञानेश्वर मराठीची विश्वासार्हता वाढवतात आणि पर्यायाने मराठी मूल्यांची आणि पसायदानिक मागणीची !
कलावंत जेव्हा एकमेकांची विश्वासार्हता ढासळवू लागतात तेव्हा समजून चालावं कि आर्टिस्टिक पॉलिटिक्स चालू आहे सांप्रतकाळी हे राजकारण जोरावर आहे फेसबुक एकमेकाला व एकमेकांच्या विश्वासार्हतेला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांचा आरसा बनत चाललंय हे एकमेक दोन व्यक्ती असतील किंवा दोन समूह किंवा दोन धर्मसमूह
मी विश्वासार्हता नष्ट करणाऱ्या ऍक्टिव्हिटी शक्यतो टाळतो अनेकांना हे खटकते पण कुणीतरी हे पथ्य पाळायला हवे
अण्यअण्य
====================================================
प्रबोधनात भूगोल जिओग्राफी ही विज्ञान म्हणून उदयाला आली निसर्ग केंद्रस्थानी आला पण त्याचे स्वरूप निसर्गयुगासारखं न्हवते तर निसर्ग हा यंत्र आहे हा चायनीज दृष्टिकोन त्याच्या मुळाशी होता (हा दृष्टिकोन युरोपियन आहे असा अनेकांचा गैरसमज आहे ) साहजिकच हे यंत्र वाटेल तसे ताबडवता येते ही भावना दृढमूल होत गेली आमच्या पिढीने भूगोल नाकारला आणि पर्यावरणविज्ञान स्वीकारले ज्यात निसर्ग यंत्र नाहीये तर ते एक नेटवर्क आहे आणि ते जैविक आहे
-----------------------------------------------------------------------------------
प्रश्न असा आहे कि हे सगळं कसं व्यक्त करायचं आपल्या आसपास हे जे हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते आणि आपल्या आत जे हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते आणि ह्या आतबाहेर संपर्क संसर्ग व मधून जे हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते ते कसे व्यक्त करायचे ?
कलेचे मुख्य काम अनुभव निर्माण करणे आहे हे आपण पाहिलेच आहे आसपास घडणारा व बनणारा व्यक्तिगत सार्वजनिक आणि डायलेक्टिक अनुभव कलेत आणण्याच्या तीन प्रबोधनकालीन तऱ्हा आपणाला माहित आहेत
१ प्रत्यक्ष निरपेक्ष तऱ्हा ही प्रामुख्याने वास्तववाद म्हणून ओळखली जाते आणि बुद्धिप्रामाण्यवाद ,आंबेडकरवाद ,मार्क्सवाद , देशीवाद अशा सर्वांनीच ह्या तऱ्हेने लिखाण केले आहे कलावंताला जे बहिस्थ जे हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व अंतःस्थ जे हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते तो ते निरपेक्षपणे व्यक्त करू शकतो ह्यावर ह्या तऱ्हेचा विश्वास आहे
२ अनुमानात्मक निरपेक्ष तऱ्हा ह्या तऱ्हेत कलावंत अनुमानाने बहिस्थ जे हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व अंतःस्थ जे हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते ते अनुमानाने जाणून घेऊ शकतो व ते निरपेक्षपणे व्यक्त करू शकतो ह्यावर विश्वास ठेवला जातो
३ चिन्हात्मक निरपेक्ष तऱ्हा ह्या तऱ्हेत कलावंत चिन्हांच्या साहाय्याने जे बहिस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व जे अंतःस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते ते चिन्हांच्या साहाय्याने अनुमानाने जाणून घेऊ शकतो व ते निरपेक्षपणे व्यक्त करू शकतो ह्यावर विश्वास ठेवला जातो ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिताना ही तऱ्हा महत्वाची होती
पहिल्या तिन्ही तऱ्हांना बुद्धिप्रामाण्यवाद ,आंबेडकरवाद ,मार्क्सवाद , देशीवाद अशा सर्वांनीच मान्यता दिल्याने त्यांचा विशेष गवगवा आहे
४ कल्पनात्मक निरपेक्ष तऱ्हा ह्या तऱ्हेत कलावंत फक्त प्रत्यक्ष अनुमान व चिन्हात्मक ह्यांच्यापाशी न थांबता कल्पनेच्या साहाय्याने जे बहिस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व जे अंतःस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते ते चिन्हांच्या साहाय्याने निरपेक्षपणे वा कल्पकपणे व्यक्त करू शकतो ह्यावर विश्वास ठेवला जातो फॅन्टसीज लिहिताना ही तऱ्हा महत्वाची होती
ह्या सर्व तऱ्हा पारंपारिक विज्ञानाच्या तत्वज्ञानावर अवलंबून होत्या आणि एकेकाळी प्रस्थापित होत्या पुढे आईन्स्टाईन आला आणि त्याने हे पारंपारिक विज्ञानावर आधारित मॉडेल उधळले त्यातूनच चार नव्या तऱ्हा आल्या
१ प्रत्यक्ष सापेक्षवाद तऱ्हा
ह्यात जे बहिस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व जे अंतःस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते जसे ते प्रतीत होते तसे चिन्हात ओतण्याचा प्रयत्न असतो ओतताना एडिटिंग कमीत कमी करण्याकडे कल असतो अनुभवावर आशय आणि आकार न बिघडवता संस्कार केले जातात ह्यातल्या घटनला व बनणला सापेक्ष बनवून निरपेक्ष असा अनुभव कुणालाच येत नाही असे प्रतिपादन करून जितके सब्जेक्ट्स तितक्या रिऍलीटीज हे स्वीकारले जाते कुरोसावासारख्या अनेकांनी राशोमान सारख्या कलाकृतींमधून हा प्रत्यक्ष सापेक्षवाद पोचवला त्यातूनच आपण फक्त आपल्याला प्रतीत होणारे वास्तव प्रोजेक्ट करू शकतो ही मर्यादा स्वीकारली गेली ह्याला मी सापेक्ष प्रत्यक्षवाद म्हणतो प्रत्यक्ष सादर करायचे आहे पण त्यातील सापेक्षतेची जाणीव ठेऊन अशी ही तऱ्हा आहे
२ अनुमानात्मक सापेक्षवाद तऱ्हा
ह्यात माणसाला प्रत्यक्ष कधीच कळू शकत नाही हे स्वीकारून त्याच्या इंद्रियांच्या हातात येणारे जे बहिस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व जे अंतःस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते ते अनुमानात्मकच असणार हे स्वीकारले जाते ह्यात जसे अनुमानले तसे चिन्हात ओतण्याचा प्रयत्न असतो ओतताना एडिटिंग केले जाते आशय आणि आकार ह्यांच्यावर संस्कार केले जातात पोस्टमॉडर्नने ह्यातल्या घटनला व बनणला सापेक्ष बनवून निरपेक्ष असा अनुभव कुणालाच येत नाही असे प्रतिपादन करून जितके सब्जेक्ट्स तितक्या अनुमानात्मक रिऍलीटीज असा सिद्धांत मांडला आपण फक्त आपल्याला प्रतीत होणारे वास्तव कन्स्ट्रक्ट करू शकतो ही मर्यादा स्वीकारली गेली ह्याला मी अनुमानात्मक सापेक्षवाद म्हणतो प्रत्यक्ष सादर करायचे आहे पण सादर करता येणार नाही आणि त्यामुळे वास्तव कन्स्ट्रक्ट होणे अटळ आहे ही जाणीव ठेऊन ही तऱ्हा अवलंबली जाते
३ चिन्हात्मक सापेक्षवाद तऱ्हा
ह्यात माणसाला प्रत्यक्ष कधीच कळू शकत नाही हे स्वीकारून त्याच्या इंद्रियांच्या हातात येणारे जे बहिस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व जे अंतःस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते ते चिन्हात्मक असणार हे स्वीकारले जाते ह्यात जसे चिन्हले तसे चिन्हात ओतण्याचा प्रयत्न असतो संहितेतून संहिता निर्माण करणे हेच मानवी जगात चाललेले असते व आपण जी कलासंहिता निर्माण करतो आहे तीही ह्या चिन्हीकरणाची टेक्सच्युअलायझेशनची एक भाग आहे हे गृहीत धरून निर्मिती केली जाते निर्माण करताना चिन्हे ओतताना एडिटिंग केले जाते आशय आणि आकार ह्यांच्यावर संस्कार केले जातात ऑथर इज डेड अँड टेक्स्ट इज क्रिएटेड बाय टेक्स्ट हे दोन सिद्धांत मिरवणारी ही तऱ्हा आहे
४ कल्पनात्मक सापेक्षवाद तऱ्हा
ह्यात माणसाला प्रत्यक्ष कधीच कळू शकत नाही हे स्वीकारून त्याच्या इंद्रियांच्या हातात येणारे जे बहिस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते व जे अंतःस्थ हॅपनिंग व बिकमिंग चाललेले असते ते फक्त कल्पनेच्या साहाय्याने पकडता येणे शक्य आहे हे स्वीकारले जाते ह्यात जसे कल्पले तसे चिन्हात ओतण्याचा प्रयत्न असतो
कल्पनेला कसलाही तर्काचा लगाम लावण्याची गरज इथे नसते पॅरा युनिव्हर्स निर्माण केले जाते आणि कल्पनेचा उत्सव साजरा केला जातो
मॉडर्न आणि पोस्टमॉडर्न फिलॉसॉफी , सायन्स व टेक्नॉलॉजीमधून ह्या तऱ्हा जन्मल्या आहेत
प्रश्न असा आहे कि ह्या तऱ्हा काम करतात कशा
ह्याचे उत्तर सेट सिक्वेन्स कॉम्बिनेशन क्रिएशन ह्या चार शब्दात येते हिला मी SSCC थेरी म्हणतो सेट तुम्ही घेतलेल्या अनुभवात व समाजात आधीच उपलब्ध असतात त्यांचा काही नवा सिक्वेन्स तुम्हाला दिसतो कधीकधी ह्या सिक्वेन्समधली लिंक मिसिंग असते ती तुम्हाला क्रियेट करावी लागते आणि मग कॉम्बिनेशन बनवावे लागते
कुठल्याही कॉम्बिनेशनची एकात्म ताकद त्या कॉम्बिनेशनमधली सर्वात दुबळी लिंक किती सशक्त आहे त्यावर ठरते हे कॉम्बिनेशन एकात्म एका साच्याचे असेलच असे नाही ते विखुरलेलेही असू शकते हा विखराव ही विरचना वा संरचना वा बनाव कॉम्बिनेशन म्हणून कसा सादर केला जातो ते महत्वाचे कॉम्बिनेशनमागे एखादी आयडियालॉजी असू शकते किंवा एखादी मॅनेजमेंट एकदा हे कॉम्बिनेशन कळले व जुळले कि ते क्रिएटिव्हली चिन्हात ट्रान्सफॉर्म मारावे लागते कलाकृती म्हणजे अंतिम ट्रान्सफॉर्मेशनचे अंतिम नेटवर्क जे वाचकांसाठी रसिकांसाठी खुले असते
रसिकाने संपूर्ण नेटवर्क अनुभवले पाहिजे ही पारंपरिक अपेक्षा नव्या जगात आपण फेकून दिली पाहिजे मॉलमध्ये गेल्यावर आपण थोडेच सगळा मॉल विकत घेतो ? काही शॉप्सना भेटी दिल्या तरी चालते कलाकृती हीही अशी मॉलसारखी असली पाहिजे ज्याला ज्या भागाशी कनेक्ट व्हावेसे वाटेल तेवढे त्याने कनेक्ट व्हावे काही भाग दुरून पाहावेत काही अनुभवावेत आता काही इतके श्रीमंत असतात कि ते सगळा मॉल विकत घेऊ शकतात ह्या मॉलमध्ये प्रायोगिक अनुभव ठेवायचा कि समांतर अनुभवविश्व ठेवायचे कि व्यावसायिक अनुभव व्यावसायिक पद्धतीने सादर करायचा कि गल्ला गोळा करण्यासाठी अनुभवांचा धंदा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न मी प्रायोगिक व समांतर अनुभववाला आहे कलावंताने एकात्म संपूर्ण अनुभव मॉलसारखा रचावा पण रसिकाने तो तसाच अनुभवावा ही सक्ती कालबाह्य ! निदान मी तरी असे मॉल वा नेटवर्क उस्फुर्तपणे रचले आहेत आणि मग ज्याला जे अनुभवावे वाटेल त्याने ते अनुभवावे म्हणून सोडून दिले आहेत एकांगी अनुभवदर्शन आत्ताच्या बहुअंगी बहुरंगी बहुढंगी अनुभवविश्वाला मारक ठरणारे आहे स्वतःला उदारमतवादी आणि मोकळे समजणारे कलावंत प्रत्यक्ष कलाजीवनात इतके चिंचोळे असतात कि संकुचितवाद आणि हे ह्यांच्यात फरक काय हाच प्रश्न पडतो कलावंताचा कवटाळ मोठा असावा लागतो तरच मिठी ग्लोबल मिठी होते तो छोटा असला कि स्वतःचा हातही नीट दिसत नाही मिठी तर फार दूरची गोष्ट !
चौथ्या नवतेच्या तऱ्हा ह्यांच्या खांद्यावर उभ्या आहेत
कुठल्याही नवतेच्या चार महापीढ्या असतात
१ इनऍनिमेट महापिढी
२ व्हायरसल महापिढी
३ बॅक्टेरियल महापिढी
४ बायोलॉजिकल महापिढी
माझी पिढी ही व्हायरसल महापीढी आहे आमच्या पिढीत चौथी नवता अद्याप पूर्ण जीवन्त झालेली नाही मी नेहमीच स्वतःला चौथ्या नवतेचा पायाचा दगड असे म्हंटले आहे कारण चौथी नवता आता कुठे सुरु झाली आहे पण पाया नीट घालूनच मरेन अशी माझी प्रतिज्ञा होती मात्र तो पाया लवचिक हवा व राहील ह्याची मी सतत काळजी घेतली आहे एकीकडे देशीवादाचा बॅकलॉग भरून काढणे आणि दुसरीकडे चौथ्या नवतेची पायाभरणी करणे असे दोन रोल मी पार पाडले अनेकदा काळाच्या मर्यादा ह्या आपल्या मर्यादा होऊन जातात माझ्या समकालीनांनी मला साथ दिली असती तर जागतिक साहित्याच्या समदर्शी वाटचाल आपणाला सहज शक्य झाली असती जागतिक होण्यातच इंटरेस्ट असणाऱ्या लोकांच्याकडून काय अपेक्षा करणार जागतिक समदर्शी होणे आणि जागतिक होणे ह्या दोन गोष्टीतला फरकच ज्यांना कळत नाही त्यांना काय बोलणार ?
तुम्ही विचारताय कि कविता फेजमधून गेली का ? प्रत्येकाची जातेच माझीही गेलीच माझी कविता भूगोल आणि अंतःकरणात्मक वाढ ह्यांनी बदलत गेलीये असं दिसतं कोल्हापूर शहर मुंबई शहर नागेशी बांदिवडे बॉलिवूड ह्यांच्यातले शिफ्टिंग कायमच बदलाला कारणीभूत झालंय नागेशी बांदिवडेतील कविता तुम्ही कोल्हापुरात बसून कशी लिहणार किंवा कोल्हापूरची कविता तुम्ही मुंबईत बसून कशी लिहणार ? बॉलिवूडमध्ये बसून तुम्ही मुंबईविषयी कसं लिहणार कारण बॉलिवूड मुंबईत असूनही मुंबईत नसतं एक आर्टिफिशियल ग्लोबलायझेशन तिथं वावरत असतं आणि मोक्ष तर ह्या सगळ्यांच्या पलीकडे तर मोक्षात बसून जगाविषयी कसं लिहणार ? लाईफ हा कायमस्वरूपी सस्पेन्स आहे आणि म्हणूनच लाईफमध्ये मजा आहे फेजेस काही कुणी ठरवून निश्चित करत नाहीत ज्या वाट्याला येतात त्या जगाव्या लागतात
ह्या लाईफमध्ये लार्ज मॅटर्स मिडीयम मॅटर्स आणि स्मॉल मॅटर्स अशी तीन प्रकारची मॅटर्स येत असतात आणि कवितेत किंवा तत्वज्ञानात ती युनिव्हर्सल मॅटर्स बनण्याचा चान्स असतो कवी ह्या चान्सवर डाव खेळण्याची रिस्क घेत कविता लिहीत असतो आपली संस्कृती देशीवाद किंवा हिंदुत्ववाद ह्यांच्या नावाने एक न दिसणारा दबाव आपल्यावर टाकत असते culture returns झाल्यावर बॅक टू कल्चरचा आग्रह होणे अटळ असते अशावेळी कला हेच संस्कृती उल्लंघनाचे प्रभावी हत्यार असते आणि म्हणूनच हे हत्यार नियंत्रित करण्यासाठी जो तो सेन्सॉर बनून कलावंतांच्यापुढे अवतरायला लागतो अशावेळी टफ फाईट देणे आवश्यक असते अनेकदा ह्या सेन्सॉरशिपचे एजन्ट आपल्या घरातच वावरत असतात मित्रांच्यातच वावरत असतात नाती तुटतात हल्ले होतात पण लढावं लागतं ट्रोलिंग हे पुरोहितशाहीचं फार जुनं हत्यार आहे डिजिटॅलिटीनं ह्या पंडिती कलेला नवं जीवदान दिलंय असं दिसतं गमतीचा भाग असा कि अलीकडे ते दुतर्फा झालंय अशा दुतर्फा ट्रॅफिकमध्ये कविंनी पैदल चालावं नाहीतर काय करावं ?निदान सम्यक चालत सम्यक दिशेने जाण्याचे स्वातंत्र्य तरी अबाधित राहतंच की ! पैदल चालण्यात आपण ड्रायवरवर व गाडीवर अवलंबून नसतो आणि हा फार मोठा आडवानंटेज असतो जो चालतो त्याला तो कळतो आणि कलेत तो फळतोही
हो ! सेन्सॉरशिपचे प्रॉब्लेम पर्सनल लाईफमध्ये आहेतच म्हणजे बघा मी पडलो शैव संन्यासी त्यामुळं बॅचलर तर मुंबईच्या हौसिंग सोसायटींनी मला कधीही घर दिलं नाही अगदी माझा एक मित्र महेंद्र भवरे त्याची बायको पोलीस ऑफिसर वहिनीनां घर मला भाड्यानं द्यायचं होतं तर सोसायटीशी १ तास वाद घालूनसुद्धा शेवटी मला घर दिलं नाहीच पोलीस ऑफिसर असूनसुद्धा हे घडलं परिणामी मुंबईत माझी घरासाठी कायम भटकंती अपवाद पवार किंवा नलवडे हे माझे घरमालक त्यामुळे एकीकडे बॉलिवूडचा फाइव्हस्टारी झगमगाट आणि दुसरीकडे मी राहतोय त्या श्रमिकांच्या , कामगारांच्या , दलितांच्या वस्त्या ! माझ्या कलेत हा विरोधाभास कायमच वावरत आलाय आणि अनेकांना तो कोड्यातही टाकत आलाय

मराठी परंपरेचं वैशिष्टय ? एक गोष्ट स्पष्ट बोलतो म्हणून माफ करा पण भारतीय पातळीवरच्या लेखकांना व समीक्षकांना मराठी लेखकही कामवाल्या बायकासारखा हवा असतो अडाणी आणि देशी किंवा ह्या कामवाल्या बाईविरुद्ध तक्रार करणाऱ्या शोभा डे टाईप
त्यामुळे मी तुम्हाला वारकऱ्यांचं महत्व सांगत बसणार नाही कारण इथल्या वैष्णव परंपरेनं इथली शैव परंपरा जेव्हढी उखडली तेवढी ती कुठंच उखडली गेली नसेल वैष्णवांनी शैवांच्यावर मिळवलेला सर्वात मोठा विजय केरळानंतर महाराष्ट्रात असावा शिवाजी महाराजांसारखा शैव राज्यकर्ता होऊन गेलेला असूनही हे घडलंय किंबहुना वैष्णवांच्या विजयानेच शिवाजी महाराजांची भोसले राजवट तीन पिढ्यानंतर कोसळली आणि वैदिक राजवट आली वैष्णव संतांच्या कामाची ही फलश्रुती आहे ह्यातूनच पुढे हिंदुत्ववाद निर्माण झाला जो पेशवाईचे एक्स्टेन्शन आहे महाराष्ट्रातील खंडोबा आणि ज्योतिबा हे शैव देव व भवानी ही देवता वैष्णवांनी प्रभावहीन केली विठोबा हे मूळचे शैव दैवत ज्या तऱ्हेने वैष्णव झाले ती तऱ्हा नक्कीच आश्चर्यकारक आहे ह्या वैष्णवीकरणाची सुरवात चक्रधरांनी केली कोल्हापूरच्या शक्तिपीठाच्या एरियात जाऊ नका असा वटहुकूम ह्या गुजराती वैष्णव संताने काढला आणि मराठी लोकांनी ऐकला गुजराती लोकांची चुकीची आज्ञा ऐकण्याची मराठी लोकांची सवय इतकी जुनी आहे ह्याची अंतिम परिणीती अंबाबाईचे देऊळ महालक्ष्मीचे देऊळ होण्यात झाले आहे ही एक अशैव आर्यांची प्रक्रिया आहे आणि ती सहजासहजी समजत नाही आणि ह्यासंदर्भात बोलणारे आमच्यासारखे लोक वाळीत टाकले जातात शिवाजी महाराज कि जय म्हंटल म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं अनेक शैवांना वाटतं हा लढा मुळात जाती वर्णव्यवस्थेच्या अंताचा आहे हेही अनेक लोक विसरून गेलेत त्यांना वाटतं कि शिव आणि विष्णू ह्या दोन दैवतांच्यातला हा झगडा आहे शिवाची समता कि विष्णूची विषमता असा हा झगडा आहे स्त्रीला पार्वतीप्रमाणे समान मानायचे कि लक्ष्मीप्रमाणे विष्णूचे पाय चेपणारी मानायची हा इथे मुद्दा आहे त्यामुळेच फुलेवादही महाराष्ट्रात जन्मला पुढे आंबेडकरवादही जिथे सर्वाधिक अत्याचार होतात तिथेच सर्वाधिक प्रतिकारही निर्माण होतो शिवाजी महाराजांना राज्याभिषेकास नकार फक्त महाराष्ट्रीय ब्राम्हणच देऊ शकतात
मराठी संस्कृतीत फक्त दोन प्रकारचे लेखक लोकप्रिय होतात पहिले सनातन लेखक आणि दुसरे पुरातन लेखक नवतेला आणि नवतावादी लेखकाला तो जोपर्यंत पुरातन होत नाहीत तोवर मान्यता नाही त्यामुळेच मराठीतील ज्ञानपीठे ही वि स खांडेकर , वि वा शिरवाडकर आणि भालचंद्र नेमाडे ह्या तीन सनातनवादी लेखकांना मिळालेत मर्ढेकरांना ज्ञानपीठ नाही पण मर्ढेकरांची संवेदनशीलता पुरातन झाल्यावर करंदीकरांना ते मिळाले ही पुरातन संवेदनशीलता आमच्याही पिढीत अनेकांच्या ठायी नांदते आहे मराठीत जर चुकून एखादा नोबल मिळवण्याच्या लायकीचा लेखक निर्माण झाला तर मराठी साहित्य संस्कृती त्याला सडवून सडवून मारेल इतकी ती थर्ड क्लास आहे
ह्याचे काही दुष्परिणामही झालेत आम्ही नको तितके वास्तववादी कलेत आणि आयडियालॉजीत गुरफटून गेलो आहोत मॅनेजमेंटची आवश्यकता आम्हाला अजूनही पुरेशी पटलेली नाही
ह्या सनातनतेला आणि पुरातनतेला टाळण्याचा एकमेव उपाय म्हणून मी मराठी परंपरेशी सॉलिड कनेक्टिव्हिटी निर्माण करत नाही त्याऐवजी मी माझी कनेक्टिविटी दाक्षिणात्य करतो ज्यामुळे सॉलिड मराठी फाउंडेशन ऐवजी मी लिक्विड कनेक्टिविटी आणि गॅसिअस कनेक्टिव्हिटी जोडत माझे फाऊंडेशन मराठी ठेवूनही ते लिक्विड आणि गॅसिअस करतो माझी विट सॉलिड विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाची नाहीये तर लिक्विड विटेवर उभ्या असणाऱ्या सीसर्फरची आहे मी परंपरेच्या विटेवर उभा नाही मी पार्टटाइम परंपरेत सर्फर करणारा लेखक आहे जो जागतिक गॅसिअस कोणत्याही क्षणी होतो
----------------------------------------------
व्हीटगेस्टाईननं मृत्यू हा जीवनाचा भाग नाही असं म्हंटल होतं पोस्टमॉडर्ननं अमुक इज डेड तमुक इज डेड अश्या घोषणांची इतकी आतषबाजी केली कि आपलं जीवन हा मृत्यूचा उपभाग आहे असं वाटायला लागलं आमच्या जनरेशननं हा भंपकपणा थांबवला आणि जीवन आणि मृत्यू दोन्ही एकाच E -इव्हेंटचे भाग आहेत हे स्वीकारलं त्यामुळे आम्हाला ना जीवनाविषयी ओवरपझेशन आहे ना मृत्यूविषयी हायपरऑब्सेशन ! आहे ते फक्त सेलिब्रेनेशन किंवा सिलिब्रेनेशन !
माझ्या युवराज पाटील नावाच्या एका पत्रकार संपादक असलेल्या मित्रानं मला विचारलं होतं १९९१ ते १९९७ दरम्यान तुझी मराठी साहित्यात हवा झाली होती तर तू तेव्हा आम्हां पत्रकारांच्यापासून पाठ का फिरवली ? माणूसघाणा अशी तुझी इमेज झालीये ह्याची तुला कल्पना आहे का ? तू फेमस झाला असतास जर कंटिन्यूटी ठेवली असतीस ! माझं उत्तर हेच होतं कि त्यामुळे मी मोठा झालो असतो आणि माझी कला खुजी झाली असती प्रसिद्धी फार वेळ मागते आणि तेवढा वेळ माझ्याजवळ नाही मला माझी न झालेली कामं दिसत असतात माझ्यासाठी माझी कामं महत्वाची आहेत माझ्या कामांची प्रसिद्धी न्हवे राहिली गोष्ट माझ्या माणूसघाणेपणाविषयी तर मला असं म्हणणाऱ्या अनेकांच्यापेक्षा माझ्या मित्रांची संख्या जास्त आहे आणि प्रॉब्लेम इतकाच आहे कि ते फार साधे आणि प्रसिद्धी नसलेले लोक आहेत आणि त्यामुळेच त्यांना मी अफोर्ड करू शकतो फेमस लोक मी अफोर्ड करू शकत नाही कारण ते तुमच्या दारात संघटन घेऊनच पोहचत असतात आणि ते प्रत्येकवेळी परवडेलच असं नाही बरं हे काही आत्ताचं आहे असं नाही मी तुम्हाला शाळेच्या फोटोत किंवा कॉलेजच्या फोटोत फारसा दिसणार नाही आजसुद्धा माझे विद्यार्थी मी फोटो किंवा सेल्फी काढू देत नाही म्हणून नाराज असतात प्रसिद्धी हीही प्रवृत्ती असावी आणि माझ्यात ती तितकीशी नसावी कदाचित मी लाजाळू वा भिडस्त असेन
पुढच्या पिढ्यांच्याविषयी बोलायला मी लायक माणूस नाही पिढीउल्लंघन करायला मला आवडतं आणि मी ते करत आलोय त्यामुळे ही पिढी ती पिढी प्रत्यक्ष व्यवहारात मी करत नाही समीक्षक म्हणून हे सोयीसाठी करावे लागते ईमेल पिढी स्मार्टफोन पिढी अँप्स पिढी अशा पिढ्या पाडता येतील का ? ऍप्स पिढीत व्हाटसप पिढी सेपरेट मानायची का ?
तरीही सांगतो माझ्यानंतरच्या पिढीत मला नितीन वाघ संतोष पवार प्रणव सखदेव शर्मिला रानडे स्वप्नील शेळके ओंकार कुलकर्णी सुजित फाटक ह्रिषीकेश गुप्ते महत्वाचे वाटतात हे काही वेगळं लिहायचा प्रयत्न करतायत असं वाटतं किंवा असं म्हणूया कि प्रयत्न न करता त्यांना हे सहज जमतंय ह्याशिवाय देशीवादी वा रोमँटिक वाटा विस्तारणारे महेश लिलापंडित महेश लोंढे नामदेव कोळी गणेश कनाते योजना यादव प्रिया जामकर वैग्रे आहेतच समीक्षेत रणधीर शिंदे , पी विठ्ठल , गणेश कनाते मेघना भुस्कुटे अभिजित रणदिवे वैग्रे आहेत चिन्ह ,काव्याग्रह, ऐसी अक्षरे , परिवर्तनाचा वाटसरू ,नवंअनुष्टुभ , खेळ , वाघूर आणि नव्याने आलेले सजग ह्यांचे काम आहेच आमची पिढी ब्लॉगर आणि फेसबुकर बनली खरी पण सुनील तांबेंच्यासारखे सातत्य फार अपवादात्मक लोकांनी दाखवलं सतीश तांबे , सतीश वाघमारे , मेघनाद कुलकर्णी ,रेणुका खोत ,महेश पवार वैग्रे रसाळ भाषेत काही दमदार सांगतायत

आत्ताच्या पिढीचा माझा अनुभव हा थिएटर अकादमीवर आणि माझ्याकडे येणाऱ्या इतर विध्यार्थांच्यावर आणि माझ्या तरुण नातेवाइकांच्यावर वा मित्रांच्या मुलांवर अवलंबून आहे मी माझ्या स्टुडन्ट्सना इंटरनेट व गुगल वापरण्याची अनुमती दिली आहे कारण ही स्मार्ट फोन जनरेशन आहे तीने बालपणापासून डिजिटॅलिटी हॅंडल केली आहे त्यांच्या वादाचे विषय ऍप्स आणि गेम्स चांगले कुठले हे आहेत आपल्या किलर कॉन्शसनेसचे गणपती तात्कालिक मटेरियलच्या समुद्रात विसर्जित करतांना तृष्णांच्या राजकारणाकडे ते नजर वळवून पहात नाहीत
त्यांनी मोदी आणि केजरीवाल आणि पवार ह्यांचे जजमेंट व्हिडिओज पाहून केले आहे राज ठाकरे त्यांना राजकारणी वाटत नाहीत कारण ते त्यांना एफिशयन्ट मॅनेजर वाटत नाहीत ह्याउलट उद्धव त्यांना कार्पोरेट राजकारणी वाटतात आणि थोरल्या कार्पोरेट भावाचं फिलिंग देतात राहुल गांधी स्वतःची भाषणं बोलतात असं त्यांना वाटत नाही ते त्यांना ढ पंतप्रधान उमेदवार वाटतात मोदींच्याबद्दल एकेकाळी त्यांना वाटणारा उत्साह मी पाहिला आहे पण त्याच मोदींच्याविषयी त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे आणि ते त्यांचे व सर्वांचे मूल्यमापन डिजिटल डाटाच्या आधारे करतात नुसत्या इन्फर्मर असलेल्या लेक्चरर्सबद्दल त्यांना आदर नाही तुम्ही इन्साईट्स काय देता त्याकडे त्यांचं लक्ष्य असतं तुम्ही दिलेली माहिती ते गुगलवर टॅली करून बघतात कधीकधी इन्फर्मेशन आणि विजडम ह्यांच्यातील फरक त्यांना कळत नाही असं वाटतं नैतिकतेची सापेक्षता कोळून प्यालेली ही पिढी आहे गुरूबद्दल जर गुरूचा करिअर बनवण्यासाठी फायदा असेल तरच ते आदर व्यक्त करतात एक प्रकारचा निर्लज्ज उपयुक्ततावाद त्यांच्याजवळ आहे फायदा हाच कायदा हे धोरण आहे पण त्याचबरोबर एक उत्साहही आहे जोशही आहे मुख्य म्हणजे चुका करायला ही पिढी घाबरत नाहीये आदरी आणि अनादरी दुर्लक्ष्य करण्याची विद्या त्यांना अवगत आहे कुठल्याही गोष्टीची लागण त्यांना इमीजिएटली होते मग कुणाविषयीचे मत असो वा नवे ऍप्स असो वा आंदोलन असो फ्लॅटनेसवर तरंगण्याची नशा त्यांना नादखुळी बनवते निगेटिव्ह टीकेचा परिणाम ताबडतोब आणि टीका करणारा थेट व्हिलन त्यामुळे अचूक मूल्यमापनाचा दुष्काळ पसरलेला काहींच्यासाठी तर एकेक लाईक जीवनमरणाचा प्रश्न बनलेला VIBRANT LIFESTYLE ऑर्गनाइज्ड बाय मूड्स डान्सिंग ऑन फ्लॅट स्क्रीनल अँप्स अँड ब्रेन्स असे त्यांच्या जीवनशैलीचे स्वरूप आहे अलीकडे आंदोलन उभं करून त्यांनी चांगली धडक दाखवली आहे मात्र फिया घेता तर उत्तम शिक्षणही द्या हा त्यांचा आग्रह मीडियाने काहीसा दुर्लक्षला लाईफच्या सिग्निफिकंटनेसची व्याख्या कशी करायची मटेरियल डिझायरचं डिझाईन हे पाप कि पुण्य असे प्रश्न त्यांना पडतायत एड्स आणि पोर्नोचा जो विळखा आमच्या पिढीला होता तो त्यांनाही आहे अपयशी होण्याची भीती त्यांच्याही ठायी आहे पोस्टमॉडर्निझमनंतरची एक अंधाधुंद झालेली उत्तरअराजकता त्यांच्याही वाट्याला आलेली आहे आमच्या वाट्याला आलेली स्पर्धा ज्यात पहिला आलेलाच फक्त पहिला असतो आणि उरलेले सर्व शेवटचे असतात त्यांच्याही वाट्याला आली आहे आमच्या पिढीतली अटेन्शनपिपासा ह्या पिढीत डबल झालेली आहे आमच्या पिढीतली इन्फरकॉम्प्लेक्स आणि सुपरकॉम्प्लेक्स ह्यांच्यात चसकेबाज हिंदोळे घेण्याची लयकारी ह्याही पिढीत आहे स्वतःच सौंदर्य कन्व्हिन्स करण्याची ओढवलेली फेअर अँड लव्हली सौंदर्यशोकांतिका ह्याही पिढीत आहे आमच्या पिढीतले मिस्टर चमको आणि मिस चमको ह्याही पिढीवर चालून गेलेले दिसतात
बघायचं ह्या सगळ्या गोष्टींसकट कवितेला कुठल्या पोस्टडिजिटल अरण्यात ही पिढी सोडते ? अन्यथा रोमँटिक वा देशीवादी गाढवावर बसण्याचं घोडस्वातंत्र्य ह्याही शतकाच्या घोडेबाजारात अस्तित्वात आहेच
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आत्ता काय चाललंय ?मोक्ष आणि मृत्यू ह्यांच्यात फरक नाही मी ह्या आरशांपुढे उभा आहे जिला लोक चुकून बोधीधर्माची भिंत म्हणतात
श्रीधर तिळवे नाईक
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिंदुत्ववादाचे दहा टप्पे श्रीधर तिळवे नाईक
हिंदुत्ववादाचे दहा टप्पे आहेत
१ ग्रंथकेंद्रीयता प्रथम एक ग्रंथ केंद्रीय म्हणून प्रस्थापित करणे प्रथम वेद केंद्रीय ग्रंथ म्हणून वैदिक धर्माने आणले व १८६० नंतर महाभारतातील गीता ह्यां ग्रंथास हिंदूंचा केंद्रीय ग्रंथ म्हणून स्थिर केले गेले आणि त्याचा एक भाग म्हणून टिळकांचे व वैद्यांचे विवेचन येते
२ दुसऱ्या टप्प्यात कायदे म्हणून स्मृती व एक मांसल व्यक्तीसमूह केंद्रीय असायला हवा म्हणून ब्राम्हण हा केंद्रीय व्यक्तिसमूह म्हणून ब्राम्हणधर्माने स्थिर केला ज्याला कपिल महावीर बुद्ध ह्या तिघांनी हलवले व हादरवलेही
३ पुढे मग कपिल महावीर बुद्ध ह्या त्रयीला हलवण्यासाठी तीन देवता केंद्रीय हव्यात म्हणून प्रथम राम कृष्ण विष्णू अशी वैष्णव त्रयी प्रस्थापित केली गेली आणि नंतर ब्रह्मा विष्णू महेश ही त्रयी हिंदू त्रयी आणली गेली
४ ह्या तिघांच्या संघव्यवस्थेला छेद म्हणून शक्तिपीठे रिप्लेस करून शंकराचार्यांचे मठ प्रस्थापित केले गेले आणि धार्मिक प्रमुख म्हणून शंकराचार्य केंद्रीय केले गेले व पुढे ह्या मठातून शैव धर्म व त्याचे आगम ग्रंथ हटवून तिथे वैदिक ग्रंथ आणले गेले पुढे समुद्रपर्यटनबंदी करून वैश्यांना कंगाल केले गेले तर परशुरामाने सर्व क्षत्रिय मारले असा कांगावा करून कलियुगी क्षत्रिय वैश्य उरलेत कुठे असा प्रश्न विचारत ब्राम्हण व ब्राम्हणेतर अशी द्विवर्णीय हिंदू व्यवस्था प्रस्थापित केली गेली व पुढे मुस्लिमांना क्षत्रिय म्हणून स्वीकारून त्यांच्या राज्यातील सेवाक्षेत्रें स्वीकारली
५ पुढे ब्रिटिश आल्यावर तिथेही सेवाक्षेत्रे बळकावली मग सत्तेची व्याप्ती वाढवत राजकीय पाय रोवले व पुढे केंद्रीय राजकीय हक्क मागावयास सर्वसमावेशक संघटना हवी म्हणून प्रथम काँग्रेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि टिळकांच्या मृत्यूनंतर ते अशक्य आहे हे लक्ष्यात आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यात आला
६ मग राजकीय पक्ष हवेत म्हणून प्रथम हिंदू महासभा मग जनसंघ मग भाजप आणला गेला
७ मग भारतात केंद्रीय राजकीय नेतृत्व प्रमोट केल्याशिवाय सत्ता मिळत नाही हे लक्ष्यात आल्यावर म्हणून प्रथम वाजपेयी मग अडवाणी मग मोदी पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून प्रमोट केले आणि सत्तेवर आणले गेले
ह्यापुढचा आठवा टप्पा स्वतःचा अर्थव्यवहार निर्माण करणे हा आहे आणि मुकेश अंबानी हे पहिले पाऊल म्हणून प्रमोट केले आहे नवव्या टप्प्यात सर्व अर्थव्यवहार स्वतःच्या हातात एकवटवणे हे असेल अंबानी अदानी वैगरे सर्वांना हटवले जाईल आणि शेवटी दहाव्या टप्प्यात हिंदू स्टेट कॅपिटॅलिझम आणण्याचा चायनाप्रमाणे प्रयत्न केला जाईल
SHRIDHAR TILVE NAIK
दुसऱ्या नवतेनं सत्यकथेच्या रूपात टोकाचा मार्गिवाद गाठला म्हणजे सत्यकथेतल्या लेखक समीक्षकांना अनेकदा यूरोपमध्ये काय चाललंय हे माहीत असायचं पण आपल्या आणि आपल्या आसपासच्या राज्यात काय चाललंय ते माहीत नसायचं हा साहित्यिक नेहरूवाद होता ज्याच्याबद्दल माओ म्हणाला होता कि नेहरूंना कुणीतरी सांगा भारत आशियाचा भाग आहे युरोपचा नाही आजही हा सत्यकथावाद ओसरलाय असं नाही युरो अमेरिकेत गेलो म्हणून फोटो टाकणारे आणि त्या फोटोला लाईक देणारे प्रचंड आहेत माझी यूरोअमेरिकेला जायला हरकत नाही पण आपण ज्या देशात राहतोय त्याच्यावर फोकस ठेऊन ! युरोअमेरिकन आर्टिस्ट आपल्या देशावरचा फोकस कधी हटवत नाहीत एव्हढी तरी अक्कल आपण त्यांच्याकडून शिकावी कि ! ह्याला उतारा म्हणून नेमाडेंनी देशीवाद मांडला ज्याचा इतका स्वदेशावर फोकस वाढला कि ह्यांना जगात काय चाललंय त्याच्याशी देणंघेणं उरलं नाही हे दुसरे टोक होते सर्वात वाईट म्हणजे नेमाडेंच्या देशीवादाला देशी संस्कृतीतल्या एलिट शासक कास्टचं आवरण चढत गेलं आणि पोटी संस्कृतीतून आलेल्या दलित व स्त्रीवादी साहित्याची जमीन एलिट असेल तरच त्याला मान्यता देण्याचा खेळ सुरु झाला जमातीतून आलेले भुजंग मेश्रामासारखे लेखक प्रमोट केले गेले ते देशी संस्कृतीचा भाग म्हणून मात्र ते देशी संस्कृतीचा कसा काय भाग आहेत हे काही कुणी समजावून सांगितलं नाही जी के ऐनापुरे म्हणतात तसं साहित्य अकादमी पारितोषिक कधी दलित लेखकांना देण्यात आलंच नाही आता हे खरं असेल तर (मी पारितोषिकांचे हिशेब ठेवत नाही कारण मला त्यांच्याशी देणंघेणंच नाही म्हणूनच हे खरं असेल तर असं म्हणतोय ) ब्राम्हणांची सत्ता जाऊन क्षत्रियांची आली एव्हढंच कुलकर्णी जाऊन पाटील आले एव्हढंच असं म्हणावं लागतं वैष्णव पाटील पूर्वीपासूनच ओबीसींना औकातीत रहा म्हणायचे म्हणजे तुम्ही औकातीत रहात असाल तर आम्ही तुम्हाला पारितोषिकं देऊ आणि ढसाळांसारखा एखादा हे राजकारण समजून नकार देत असेल तर आणि त्याचा ग्रेटनेस नाकारता येत नसेल तर त्याला आम्ही स्पेशल पारितोषिक देऊ
हे सगळं राजकारण सुरवातीपासूनच लक्ष्यात आल्याने चौथ्या नवतेनं ही दोन्ही टोकं नाकारली आणि मार्गी देशी पोटी जमाती ह्यांच्या सम्यक भानाची मागणी केली पण माझ्या काही समकालीनांना ती भावली नाही ह्यातील काहींनी आंतरराष्ट्रीय मान्यतेची सत्यकथा पुन्हा गिरवली आणि त्यांना ती पावलीही आणि चवलीही ! आता एकदा चव चवल्यावर कोण कशाला पुन्हा मागे वळून पाहतो ? शेवटी आंतरराष्ट्रीय मान्यता कुणाला नकोय ?
ह्यातला फोलपणा कळालेली एक नवदेशी लोकांची समकालीन पिढी आता उदयाला येते कि काय अशी आता शंका येते आहे माझं म्हणणं मांडणी करा नितीन वाघ ह्यांनी एक मांडणी आणली आणि थेट बाबासाहेब आंबेडकरांना देशीवादी बनवलं फुले तर ऑलरेडी देशीवादी आहेतच मग फुले आंबेडकर ह्या दोघांना देशीवादी विचारवंत म्हणून सिद्ध करत नवदेशीवाद सिद्ध करता येईल का ? मुख्य म्हणजे हे साहित्यातून नवं म्हणून कसं मांडणार कारण नेमाडे सर्व गिळायला बसलेले आहेतच नेमाडेंच्यातून निसटून काही खर्रर्रखुर्रर्र नवं आहे का कि नुसती बडबड आहे ?
श्रीधर तिळवे नाईक
तीन वर्षांपूर्वी इथे टाकलेली कविता
मी एकदा राजयोग हा शब्द स्वामी विवेकांनंदाचा नसून १३ व्या शतकापासून आम्ही शैव तो वापरतो असे म्हंटल्यावर हे शक्यच नाही अशी प्रतिक्रिया एका बंगाली भद्राने दिली होती कारण काय तर असा शब्द एका कायस्थ ब्राम्हणालाच सुचू शकतो वैग्रे

काही प्रश्नांना शॉर्टकट मध्ये दिलेली उत्तरे आता अधिक दीर्घ लॉंगकटमध्ये १२ श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment