सांगण्यास आनंद होतो आहे कि एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार संपूर्णपणे टाईप व फेसबुकवर डीजीपब्लिश करून झाला आहे हा संग्रह अनालॉगसमध्ये पॉप्युलर प्रकाशनाने काढला होता व काहीसा मर्यादित होता कारण सर्वच कविता प्रकाशित करणं शक्य न्हवतं अस्मिता मोहितेंनी त्यावर घेतलेली मेहनत काहीशी एकतर्फी होती कारण कवी महाराजांनी म्हणजे अस्मादिकांनी ह्यावर काहीच मेहनत घेतली न्हवती १९८५ -८६ ला स्वीकारलेला हा संग्रह १९९१ -९२ साली प्रकाशित झाला आणि त्याला अवॉर्ड्स फिवार्ड्स मिळाली ह्यातल्या कविता आऊटडेटेड झालेत असं माझं त्यावेळी मत होतं आणि त्याकाळात दिलीप लाठी ह्या माझ्या परममित्राला दैनिक मराठवाड्याच्या रविवार पुरवणीसाठी दिलेल्या मुलाखतीत ते छापून आलं होतं आल्हाद भावसार मंगेश बनसोड दिलीप लाठी भालचंद्र कुबल महेश म्हात्रे आदी माझ्या मित्रांना मात्र माझे हे मत अजिबात आवडलं न्हवतं आणि त्यांच्या मते ह्या कविता भवतालाला अजूनही लागू होत होत्या १९९५ नंतरही ह्या कविता आवडणारे लोक भेटत राहिले आणि इथे फेसबुकवरही काहींना त्या आवडत राहिल्या ह्या कविता टाईप करण्याबाबत ज्यांनी लकडा लावला त्यात नितीन भरत वाघ ह्यांचा वाटा महत्वाचा कोल्हापूरच्या माझ्या मित्रांना माझ्या ह्याच कविता सर्वश्रेष्ठ वाटतात कारण त्यात कोल्हापूर दिसतं माझ्या कवितेचा कोल्हापूरात पाठलाग करणारा वेळप्रसंगी माझ्या कविता स्वतःच्या हस्ताक्षरात लिहणारा मित्र म्हणजे राजकुमार यादव लिहिल्यानंतर कविता रंकाळ्यात वा पंचगंगेत सोडण्याचा मूर्खपणा मी केलेला आहे आणि तो बघूनच राजकुमारने माझ्या प्रत्येक कवितेची एक प्रत स्वतःकडे ठेवायला सुरवात केली आपल्या कविता नीटनेटकेपणाने ठेवायला मी शिकलो ते राजकुमार यादवमुळे ! माझ्या काही गझलांना चाली लावणाऱ्या विश्वजीत जाधव व अवधूत भट ह्यांची आठवण येणे आता अटळ हे तिघेही आता हयात नाहीत माझ्या कवितांना ऐकणाऱ्या मित्रात मिलिंद गुर्जर जयसिंग पाटील निनाद काळे विलासकुमार काळे बाळकृष्ण शिर्के विलास पवार , सुहास व श्रीनिवास एकसंबेकर हे महत्वाचे ह्यांच्याशिवाय शरावती इंगवले , श्रीराम पचिंद्रे , मिलिंद पोतदार , नीता भिसे सतीश पोतदार असेही होते पुढे माझ्या घराला वाळवी लागली आणि वाळवीनं माझ्या काही कविता खाल्ल्या सुदैवाने राजकुमारकडे प्रति असल्याने कविता मिळाल्या मात्र आमच्या कार्पोव चेस क्लबची काही कागदपत्रे बोम्बलली मिलिंद गुर्जर आणि काशिनाथ ह्या माझ्या मित्रांनी मला उदार मनाने माफ केले पण ह्या प्रसंगाने माझा आणखी एक परममित्र महेश पुसाळकर सावध झाला व त्याने माझ्या कविता त्याच्या घरात ठेवायची सक्तीचं केली माझा तत्कालीन आळशी , निष्काळजी , बेफिकीर , धुनकी क्षणभैरवी स्वभाव लक्ष्यात घेता ही सक्ती झाली ते बरंच झालं असं म्हणायला हवं
हा संग्रह संपूर्णपणे एक खंड म्हणून प्रकाशित करण्याचा नितीन वाघ ह्यांचा मानस आहे तर एक पॉप्युलर प्रकाशनाची वेगळी सिलेक्टेड कवितांची दुसरी आवृत्ती तयार करावी अशीही इच्छा आहे
हा संग्रह तयार करण्यात शिरीष पै ह्यांचा काय वाटा होता ते मला त्यांच्या मृत्यूनंतर रामदास भटकळ ह्यांनी त्यांच्यावर जो लेख लिहिला त्या लेखामुळे कळाले त्यांचे मनापासून आभार त्या हयात असतांना ते व्यक्त करता आले असते तर बरे झाले असते अस्मिताने तो लेख दाखवला त्यामुळे त्यांचे त्याबद्दल आभार
सरोजिनी वैद्यांची आठवण अटळच ! बाईंनी ह्या संग्रहाची पहिली आवृत्ती तपासली होती . केशव मेश्रामांनी माझ्या ह्या कवितांना कायमच दाद दिली आणि नंतर सतीश काळसेकरांनी मी डावा राहिलो नसलो तरी डाव्यांबद्दलचे माझे प्रेम कधीच कमी झालेले नाही असो
फेसबुक व मार्क झुगेरबर्गचे आभार मानलेच पाहिजेत कारण त्याच्यामुळे हे फ्री असोशिएशन शक्य होते
सरतेशेवटी आभार मानले पाहिजे ते वाचकांचे ! मराठी समीक्षक माझं काही वाचत नाहीत आणि स्पष्टच सांगायचं तर मला त्यांची काही पडलेली पण नाही पण काही वाचक तुमचं तड लावून वाचतात आज त्यांचे मी इथं मनापासून आभार मानतो
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment