नज्म आणि मराठी कविता श्रीधर तिळवे नाईक
उर्दूतून मराठीत आलेले दोन प्रकार म्हणजे गझल व नज्म ! ह्यातील गझलवर अनेक लेख मी लिहिले आता इथे आपणाला थोडा नज्मचा विचार करावयाचा आहे
उर्दूतून मराठीत आलेले दोन प्रकार म्हणजे गझल व नज्म ! ह्यातील गझलवर अनेक लेख मी लिहिले आता इथे आपणाला थोडा नज्मचा विचार करावयाचा आहे
माझ्या काव्यवाचनाची सुरवात गालिबपासून झाली पण मी आयुष्यात प्रथम नज्म वाचली ती साहिर लुधियानवीची तल्ख़िया मधली ! त्याआधी ऐकली होती ती अभिताभ बच्चनच्या आवाजातील कभी कभी चित्रपटात कभी कभी मेरे दिलमे खयाल आता हैं ही ! तल्ख़ियातील किसीको उदास देखकर ह्या नज्मने त्या वयात माझ्या डोळ्यात पाणी आणलं होतं ही नज्म मुद्दामच इथं देतोय
तुम्हे उदास सी पाता हूं मैं कई दिन से,
न जाने कौन से सदमे उठा रही हो तुम?
वो शोखियां वो तबस्सुम वो कहकहे न रहे
हर एक चीज को हसरत से देखती हो तुम।
छुपा-छुपा के खमोशी मे अपनी बेचैनी,
खुद अपने राज़ की तशहीर बन गई हो तुम।
मेरी उम्मीद अगर मिट गई तो मिटने दो,
उम्मीद क्या है बस इक पेशो-पस है कुछ भी नहीं।
मेरी हयात की गमगीनियों क गम न करो,
गमे-हयात गमे-यक-नफ़स है कुछ भी नहीं।
तुम अपने हुस्न की रअनाईयों पे रहम करो,
वफ़ा फ़रेब है तूले-हवस है कुछ भी नहीं।
मुझे तुम्हारे तगाफ़ुल से क्यों शिकायत हो,
मेरी फ़ना मेरे एहसास क तकाज़ा है।
मै जानता हूं कि दुनिया क खौफ़ है तुमको,
मुझे खबर है, ये दुनिया अज़ीब दुनिया है।
यहां हयात के पर्दे मे मौत पलती है,
शिकस्ते-साज की आवाज रुहे-नग्मा है।
मुझे तुम्हारी जुदाई का कोई रंज़ नहीं,
मेरे खयाल की दुनिया मे मेरे पास हो तुम।
ये तुमने ठीक कहा है, तुम्हे मिला ना करूं
मगर मुझे ये बता दो कि क्यों उदास हो तुम?
खफ़ा न होन मेरी ज़ुर्रते-तखातुब पर
तुम्हे खबर है मेरी जिंदगी की आस हो तुम?
मेरा तो कुच भी नहीं है, मै रो के जी लूंगा,
मगर खुदा के लिये तुम असीरे-गम न रहो,
हुआ ही क्या जो तुम को जमने से छीन लिया
यहां पे कौन हुआ है किसी का, सोचो तो,
मुझे कसम है मेरी दुख भरी जवानी की
मै खुश हूं, मेरी मुहब्बत के फ़ूल ठुकरा दो।
मै अपनी रूह की हर एक खुशी मिटा लूंगा,
मगर तुम्हारी मसर्रत मिटा नहीं सकता।
मै खुद को मौत के हांथों मे सौंप सकता हूं,
मगर ये बारे-मसाइब उठा नहीं सकता।
तुम्हारे गम के सिवा और भी तो गम हैं मुझे
निजात जिनमे मै इक लहज़ा पा नहीं सकता।
ये ऊंचे ऊंचे मकानों के ड्योढियों के तले,
हर एक गाम पे भूखे भिखारियों की सदा।
हर एक घर मे ये इफ़लास और भूख का शोर
हर एक सिम्त ये इन्सानियत की आहो बका।
ये करखानों मे लोहे क शोरो-गुल जिसमे,
है दफ़्न लाखों गरीबो की रूह का नग्मा।
ये शाहराहों पे रंगीन साडियों की झलक,
ये झोपडों मे गरीबों की बेकफ़न लाशें।
ये माल-रोड पे कारों की रेल-पेल का शोर,
ये पटरियों पे गरीबों के ज़र्द-रू बच्चे।
गली-गली मे ये बिकते हुए जवां चेहरे,
हसीन आंखों मे अफ़सुर्दगी सी छाई हुई।
ये जंग और ये मेरे वतन के शोख जवां,
खरीदी जाती है उठती जवानियां जिनकी।
ये बात-बात पे कनूनों-जाब्ते की गिरफ़्त,
ये ज़िल्लतें, ये गुलामी, ये दौरे मज़बूरी।
ये गम बहुत है मेरी ज़िन्दगी मिटाने को,
उदास रह के मेरे दिल को और रंज न दो।
ही ती नज्म इमोशनल तीव्रता हे ह्या नज्मचे वैशिष्ट्य मला एकदम स्पर्श करून गेलं होतं पुढे फैज वाचल्यावर ह्यातला मुख्य भाव हा फैजच्या नज्ममधून आला होता हे कळालं पण इम्पॅक्ट करणारी पहिली नज्म म्हणून हिचे महत्व आयुष्यात कायमच राहिले
न जाने कौन से सदमे उठा रही हो तुम?
वो शोखियां वो तबस्सुम वो कहकहे न रहे
हर एक चीज को हसरत से देखती हो तुम।
छुपा-छुपा के खमोशी मे अपनी बेचैनी,
खुद अपने राज़ की तशहीर बन गई हो तुम।
मेरी उम्मीद अगर मिट गई तो मिटने दो,
उम्मीद क्या है बस इक पेशो-पस है कुछ भी नहीं।
मेरी हयात की गमगीनियों क गम न करो,
गमे-हयात गमे-यक-नफ़स है कुछ भी नहीं।
तुम अपने हुस्न की रअनाईयों पे रहम करो,
वफ़ा फ़रेब है तूले-हवस है कुछ भी नहीं।
मुझे तुम्हारे तगाफ़ुल से क्यों शिकायत हो,
मेरी फ़ना मेरे एहसास क तकाज़ा है।
मै जानता हूं कि दुनिया क खौफ़ है तुमको,
मुझे खबर है, ये दुनिया अज़ीब दुनिया है।
यहां हयात के पर्दे मे मौत पलती है,
शिकस्ते-साज की आवाज रुहे-नग्मा है।
मुझे तुम्हारी जुदाई का कोई रंज़ नहीं,
मेरे खयाल की दुनिया मे मेरे पास हो तुम।
ये तुमने ठीक कहा है, तुम्हे मिला ना करूं
मगर मुझे ये बता दो कि क्यों उदास हो तुम?
खफ़ा न होन मेरी ज़ुर्रते-तखातुब पर
तुम्हे खबर है मेरी जिंदगी की आस हो तुम?
मेरा तो कुच भी नहीं है, मै रो के जी लूंगा,
मगर खुदा के लिये तुम असीरे-गम न रहो,
हुआ ही क्या जो तुम को जमने से छीन लिया
यहां पे कौन हुआ है किसी का, सोचो तो,
मुझे कसम है मेरी दुख भरी जवानी की
मै खुश हूं, मेरी मुहब्बत के फ़ूल ठुकरा दो।
मै अपनी रूह की हर एक खुशी मिटा लूंगा,
मगर तुम्हारी मसर्रत मिटा नहीं सकता।
मै खुद को मौत के हांथों मे सौंप सकता हूं,
मगर ये बारे-मसाइब उठा नहीं सकता।
तुम्हारे गम के सिवा और भी तो गम हैं मुझे
निजात जिनमे मै इक लहज़ा पा नहीं सकता।
ये ऊंचे ऊंचे मकानों के ड्योढियों के तले,
हर एक गाम पे भूखे भिखारियों की सदा।
हर एक घर मे ये इफ़लास और भूख का शोर
हर एक सिम्त ये इन्सानियत की आहो बका।
ये करखानों मे लोहे क शोरो-गुल जिसमे,
है दफ़्न लाखों गरीबो की रूह का नग्मा।
ये शाहराहों पे रंगीन साडियों की झलक,
ये झोपडों मे गरीबों की बेकफ़न लाशें।
ये माल-रोड पे कारों की रेल-पेल का शोर,
ये पटरियों पे गरीबों के ज़र्द-रू बच्चे।
गली-गली मे ये बिकते हुए जवां चेहरे,
हसीन आंखों मे अफ़सुर्दगी सी छाई हुई।
ये जंग और ये मेरे वतन के शोख जवां,
खरीदी जाती है उठती जवानियां जिनकी।
ये बात-बात पे कनूनों-जाब्ते की गिरफ़्त,
ये ज़िल्लतें, ये गुलामी, ये दौरे मज़बूरी।
ये गम बहुत है मेरी ज़िन्दगी मिटाने को,
उदास रह के मेरे दिल को और रंज न दो।
ही ती नज्म इमोशनल तीव्रता हे ह्या नज्मचे वैशिष्ट्य मला एकदम स्पर्श करून गेलं होतं पुढे फैज वाचल्यावर ह्यातला मुख्य भाव हा फैजच्या नज्ममधून आला होता हे कळालं पण इम्पॅक्ट करणारी पहिली नज्म म्हणून हिचे महत्व आयुष्यात कायमच राहिले
भावनांचा प्रवाहीपणा आणि
यमकांच्या साहाय्याने साधलेला पूर्णविराम ही नज्मची खासियत ! चौपदी किंवा द्विपदी रचनेच्या साहाय्याने हा प्रभाव साधला जातो
मराठीत नज्म आणली ती अनिलांनी
मुक्तछंद आणि दशपदी ही अनिलांची मराठीला देणगी आहे ह्यातील दशपदी ही गीत नसून नज्म
आहे कारण गीतातील वृत्तबन्धन बिनधास्तपणे झुगारून एक दोन मात्रांचे स्वातंत्र्य
अनिल बिनधास्त घेतात त्यामुळे नज्मच्या सांगीतिक परिणामात उणीव येत नाही ह्याला स्वछंदही
म्हणता येईल उदाहरणार्थ आणिबाणी ही त्यांची नज्म बघू
अशा काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसे उरलो नसतो
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसे उरलो नसतो
वादळ असे भरून आले
तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या
काही सावरणार नव्हते
तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या
काही सावरणार नव्हते
हरपून जावे भलतीकडेच
इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो इतके
पेटून आले होते रान
इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो इतके
पेटून आले होते रान
असे पडत होते डाव सारा
खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते
जीव पुरा वीटून जावा
खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते
जीव पुरा वीटून जावा
कसे निभावून गेलो
कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते
नुसते हाती हात होते!
कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते
नुसते हाती हात होते!
इथे पादाकुलकाचा आठचा ठेका
असूनही कधीकधी सहा (कसे निभा )सात (कळत नाही ) किंवा नऊ(हरपून जावे ) मात्रा घेतल्या आहेत आणि त्याने काही फरक पडलेला
नाही
मराठीतल्या लोकांना साहिरची सर्वाधिक माहित असलेली नज्म म्हणजे ताजमहाल
ताज तेरे लिए इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही
तुझ को इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से
बज़्म-ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मअ'नी
सब्त जिस राह में हों सतवत-ए-शाही के निशाँ
उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मअ'नी
मेरी महबूब पस-ए-पर्दा-ए-तश्हीर-ए-वफ़ा
तू ने सतवत के निशानों को तो देखा होता
मुर्दा-शाहों के मक़ाबिर से बहलने वाली
अपने तारीक मकानों को तो देखा होता
अन-गिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है
कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उन के
लेकिन उन के लिए तश्हीर का सामान नहीं
क्यूँकि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़्लिस थे
ये इमारात ओ मक़ाबिर ये फ़सीलें ये हिसार
मुतलक़-उल-हुक्म शहंशाहों की अज़्मत के सुतूँ
सीना-ए-दहर के नासूर हैं कोहना नासूर
जज़्ब है उन में तिरे और मिरे अज्दाद का ख़ूँ
मेरी महबूब उन्हें भी तो मोहब्बत होगी
जिन की सन्नाई ने बख़्शी है उसे शक्ल-ए-जमील
उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नुमूद
आज तक उन पे जलाई न किसी ने क़िंदील
ये चमन-ज़ार ये जमुना का किनारा ये महल
ये मुनक़्क़श दर ओ दीवार ये मेहराब ये ताक़
इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर
हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से
इथे शेवटी तर “ मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से ”
असा मुक्तछंदात्मक मोकळेपणा आला आहे
आणि तो आवश्यक वाटतो कारण त्यात
मजाकचा प्रतिकार दिसतो ताजमहलचे कौतुक असतांना डाव्या विचारसरणीतून लिहिलेली नज्म ताजमहल हे एक सरंजामवादी बांधकाम आहे असे ठणकावून सांगते आणि इथे तू भेटू नकोस कारण हा ताजमहल म्हणजे गरिबांच्या प्रेमाची केलेली चेष्टा आहे असं ह्या नज्म मधला नायक म्हणतो
मराठीत व्यवस्थेची लक्तरे
टांगणारी नज्म डेव्हलप केली ती नारायण सुर्वे ह्यांनी
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.
ही त्यांची सर्वाधिक गाजलेली नज्म ह्यातील भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली ही ओळ आता आयकॉनिक झाली आहे
माझे विद्यापीठ मध्ये अनेक अव्वल दर्जाच्या नज्म आहेत नारायण
सुर्व्यांनी उर्दूचा बाज मराठीत कायम ठेवला पण वृत्ताची बंधने पूर्ण झुगारली ह्या
नज्मला आझाद नज्म म्हणू तर ह्या मुक्त नज्मला पुढे मस्तपैकी डेव्हलप केले ते
नामदेव ढसाळने त्याने काफियाची बंधने पूर्णपणे उधळून लावली पण लयकारी तशीच
ठेवली
आमची पिढी वाढली ती ह्यांच्या
कवितेवर साहजिकच माझ्या एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या कवितासंग्रहाची
सुरवातच मुळी
शब्द मुळातच असतात परके अर्थही
अनोळखी बनत जातात
तरीही माझ्या साऱ्या कविता
माझ्याच दिशेने प्रवास करीत असतात
अशी एका नज्मने झाली होती
ह्यामागची कारणे उघडच आहेत १९८० ते ९० ह्या कालखंडात एकंदरच गझल गायकी नज्म गायकी
ह्यांचे आलेले पीक ! चिठ्ठी आई हैं वा ये बाते झूठी बाते हैं ये लोगोने फैलाई हैं
ह्या नज्मनी त्याकाळात धुमाकूळ घातला होता ह्याचा अर्थ ही सुरवात होती असे न्हवे
त्यापूर्वीही उर्दूतली बहुचर्चित नज्म ("आवारा" ही असरार-उल-हक़ मजाज़ ह्यांची नज्म) ठोकर ह्या चित्रपटात १९५३ लाच आली होती आणि त्या पेशकश पासून प्रेरणा घेऊन पुढे गुरु दत्तने प्यासा ह्या चित्रपटात साहिर लुधियानवीच्या
ये महलो ये तखतो वैग्रे नज्म वापरल्या होत्या साहजिकच आमच्या पिढीने ह्या दिशेने वाटचाल करणे हे नैसर्गिक आहे आजही सुरेश भटांच्यापासून अनेक जण अशी नज्म लिहितात
प्रश्न आहे तो थांबण्याचा अनिल वा सुर्वे उर्दूमध्ये थांबत नाहीत ते नज्मला मराठी बाजाची बनवतात त्यामुळे साहित्यातील देशीवाद बळकट होतो हा देशीवाद अनिलांच्याबाबत रोमँटिकच राहतो सुर्वे हा बाज प्रगतिशील साहित्याच्या चळवळीकडे घेऊन जातात त्याला आधुनिक बनवतात तर ढसाळ त्याला देशी आंबेडकरवादी प्रोटेस्ट बनवतात ह्यातल्या रोमँटिक बाजाला कायम राखणारे कवीही झाले म्हणजे वसंत सावंतांच्या एक दोन कवितेत हा बाज दिसतो
आमच्या पिढीने नज्म सुरवातीला रोमँटिक पद्धतीने कवटाळली पण नंतर ती अनिल सुर्वे ढसाळ ह्यांना वाट पुसत गेली रोमँटिक नज्म येते ती पारंपरिक आकारसूत्रात नव्या आशयसूत्रांची रोमँटिक मांडणी करत ! ही मांडणी तुम्हाला लोकांच्याकडे न्हेण्यात फार यशस्वी ठरते आपल्या दैनंदिन जीवनातले तपशील भावनांच्या केंद्रात मुरवत ही मांडणी अवतरते समकालीन क्षणांचा भावनिक प्रत्यय देण्याची प्रभावी क्षमता हे तिचे बलस्थान असते
आधुनिक नज्म रोमँटिसिज्मचा भांडाफोड करते वर दिलेल्या साहिर लुधियानवीच्या दोन्ही नज्म ह्याचे उत्तम उदाहरण आहे पहिल्या नज्ममध्ये साहिर प्रेमाशिवायही जगात अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत असं ठणकावतो तर दुसऱ्या नज्ममध्ये रोमँटिसिज्मने ताजमहालला प्रेमाची निशाणी बनवलं होतं त्याचा भांडाफोड करतो आणि ताजमहल म्हणजे गरिबांच्या प्रेमाचा उडवलेला मजाक आहे असं सांगतो नारायण सुर्वे चंद्र हा रोमँटिक लोकांचा सिम्बॉल थेट भाकरीही जोडून त्यातील प्रेमाची हवा काढून घेतात
आधुनिक नज्म रोमँटिसिज्मचा भांडाफोड करते वर दिलेल्या साहिर लुधियानवीच्या दोन्ही नज्म ह्याचे उत्तम उदाहरण आहे पहिल्या नज्ममध्ये साहिर प्रेमाशिवायही जगात अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत असं ठणकावतो तर दुसऱ्या नज्ममध्ये रोमँटिसिज्मने ताजमहालला प्रेमाची निशाणी बनवलं होतं त्याचा भांडाफोड करतो आणि ताजमहल म्हणजे गरिबांच्या प्रेमाचा उडवलेला मजाक आहे असं सांगतो नारायण सुर्वे चंद्र हा रोमँटिक लोकांचा सिम्बॉल थेट भाकरीही जोडून त्यातील प्रेमाची हवा काढून घेतात
समकालीन कवितेत नज्मचे स्थान काय हा एक प्रश्न आहे कुठलाही काव्यप्रकार स्वतःच्या आयुष्याच्या संदर्भात मी वापरत होतो आणि असतो नज्म त्याला अपवाद नाही माझी एक नझ्म सादर करून लेख सम्पवतो
स्वामी विवेकानंदासाठी
मला नाही झेपत आहेत ही मोक्षाची
पिसं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
माझं स्मित खोळंबलंय अध्यात्मिक
अडचणीत
मध त्वचेचा खाणारा रोज खातोय
मीठ
स्निग्धतेचा दरवळ सुद्धा वाटतोय
अवघडलेला
गाणीसुद्धा येत नाहीत ऐकू मला
नीट
समुद्रसुद्धा दारी येऊन हसतोय
कसनुसं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
तुम्ही देताय दृष्टांत कि हा
आहे भास
संशयाचा वारा माझा दाबतोय
प्रत्येक श्वास
गवताच्या टेबलावरती ठेवताय
तुम्ही वड
बारीकबारीक केसाएव्हढेही दिसतात
स्पष्ट पाश
तुम्ही सांगताय राजयोग मला
दिसतायत कुसं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
लाईट सेट केलीये स्पर्धात्मक
परीक्षेची
पण करताना अभ्यास तुमची लागते
उचकी
पाण्याच्या आवाजानं दचकून उठते
बाटली
तुम्ही ठाकता समोर मारत मला टिचकी
दोस्तांना वाटतंय झालंय राजाचं
भूसं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
कुणाकुणाला सांगू तुम्ही मला
दिसता
राजयोगात पत्यांसारखा माझा देह
पिसता
शंका कुशंका विचारण्याआधीच
तुम्ही देताय उत्तरं
वर आणि विचारता वॅनिला कि
पिस्ता
अंधारातही तुमचं शरीर भिंतीमधून
घुसतं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
सूर्यसुद्धा काळजातले लागलेत
थरथरायला
मुक्तीच्या सुया लागलेत मेंदूत
बागडायला
आई म्हणते राजा तुला झालंय तरी
काय
का जातोयस पत्र्यावरती ढुंगण
टेकवायला
भाऊसुद्धा काढायला लागलेत रोज
माझी पिसं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
तुमच्यामुळे ज्वालामुखी भरतकाम
करतायत
बागांमधली सफरचंदं बियांमध्ये
परतायत
चारकोलने लिहिलेले काळेकुट्ट
इतिहास
आंघोळ करून अंगावर पांढरा रंग
शिंपडतायत
तलवारींचीही झाली माझ्या घरात
कासवं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
माश्यांनी माजवलीये
जरी रक्तात अंधाधुंदी
सूर्यप्रकाश जरी येऊन
पितोय माझी चांदी
शाकाहाराचा स्केल आहे रोज
आता वाढता
खाटीकसुद्धा घरी येऊन वळतोय
बुंदी
आईला हवं आहे खाण्यासाठी
नुसतं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
सिगरेटच्या धुरामध्ये गॅलऱ्या
जळत नाहीत
लायटरमध्ये पूर्वीसारखे पर्वत
विरघळत नाहीत
माऊथ ऑर्गन बसलाय बटाट्यासारखा
फुगून
द्राक्ष्यांच्या टापांमधून घोडे
उधळत नाहीत
गुलाबांच्या काळजातही दगड
ठुसठुसं
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
तुम्ही म्हणालात म्हणून काय
काय खोडलं
पाळलेल्या कबुतरांना हवेमध्ये
सोडलं
मेलेल्या लाकडांचे चाळे सहन
केले
स्वतःचंच रक्त मी स्वतःपासून
तोडलं
एकतर मोक्ष द्या नाहीतर कसं ?
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा
व्हा नाहीसं
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक
नज्म म्हणजे गीत असे म्हणता येईल का ? मला शंका आहे . गझल आणि नज्म हे उर्दूचे दोन मुख्य काव्यप्रकार
दशपदी
सुर्वे
वसंत सावंत
बिगुल
Comments
Post a Comment