ग्रीक आणि शैव बुद्धिप्रामाण्यवाद रॅशनॅलिझमचा आदिम अवतार
सध्या फेसबुकवर बरेच बुद्धिप्रामाण्यवादी लोक स्वतःला पुरोगामी म्हणवून घेत असतात आणि युक्तिवादही करत असतात त्यातील अनेकांना त्याची बीजे मात्र ठाऊक नसतात . काही पुरोगामी अंधभक्तांचा तर बुद्धिप्रामाण्यवाद हा फुले किंवा आंबेडकर किंवा मार्क्स ह्यांच्यापासून सुरु झाला असा ठाम गैरसमज असतो हा गैरसमज दूर करण्यासाठी इथे त्याचे जे आदिम रूप आहे ते सांगतो अर्थात जे जाणकार बुद्धिप्रामाण्यवादी आहेत त्यांना हे सर्व माहित असणारच
रॅशनॅलिझम समजायचा असेल तर प्रथम आपणाला त्याच्या इतिहासात जावे लागेल आणि त्याची मुळे ग्रीक तत्वज्ञानात कशी होती ते थोडक्यात पहावे लागेल
कुठलाही धर्म मायथॉस च्या आधारेच उभा असतो मायथॉस अनेक कथा रचते त्यांना आपण दन्तकथा वा भाकडकथा म्हणतो ग्रीक धर्मही अश्याच अनेक भाकडकथांनी भरलेला होता आणि वैदिकांच्या प्रमाणे ह्या धर्मातही एक इंद्र होता त्याचे नाव झ्यूस ! त्याच्याभवती देवतामंडळ होते आणि ग्रीकांचा ह्या देवतांच्यावर विश्वास होता त्यातूनच पहिला ध्रुव तयार झाला मायथॉस हा धर्मकेंद्रित होता भारतातही हा मायथॉस आहे व होता आणि अलीकडे तो बोकाळला आहे कि काय अशीच शंका येते
रॅशनॅलिझम नेहमीच मायथॉसला चॅलेंज करतो ह्या चॅलेंजची सुरवात थेल्सने केली त्याच्यामुळेच ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात दोन ध्रुव तयार झाले ते म्हणजे
१ मिथॉस वा मायथॉस
२ लॉगस
मायथॉसला चॅलेंज करणारा थेलीस वा थेल्स हा ग्रीकांचा पहिला फिलॉसॉफर प्लेटोच्या प्रोटगर्स मध्ये सॉक्रेटिस त्याचा समावेश सप्तर्षी मध्ये करतो आणि तो स्पार्टन असल्याचे नमूद करतो .
KNOW THYSELF हे खरेतर त्याचे महावाक्य जे सॉक्रेटिसच्या नावाने सांगितले जाते भूमितीचा शास्त्रीय वापर त्याने केला आणि पिरॅमिडची उंचीही मोजली
थेलीसने प्रथम एकतत्वता आणली आणि सर्व जग पाण्याने बनले आहे असे सांगितले म्हणजेच जगामागे पाणी हे एकतत्व आहे हे त्याने सांगितले त्याने जी ही एकतत्वता पुढे आणली ती वास्तव होती आणि वास्तवातितही होती त्याच्याआधी सर्वच मिथॉस होते काल्पनिक होते
त्याचा शिष्य अनागझीमँडरला हे मान्य न्हवते त्याच्या मते "अमर्यादित वा असीमित '' हेच एक तत्व आहे तेच पाणी हवा भूमी अग्नी ह्यांच्या मागे आहे थेलीसचे पाणी दृश्यात्मक होते अनागझीमांडरचे "अमर्यादित " अदृश्यात्मक अमूर्त होते वास्तवातित होते
त्याच्यानंतर अनागझिमीन्सने हवा (वायु ) हे एक तत्व आहे असे सांगितले जे अमूर्त असले तरी स्पर्श करणारे होते
पुढे हेरॅक्लिटसने अग्नी हे तत्व सर्वांमागे आहे असे सांगितले हा अग्नी जेवढा दृश्यात्मक होता तितकाच अमूर्तही होता तो प्रत्येक ठिकाणी होता प्रत्येक गोष्टीत होता आणि जग चालवत होता जग बदलत होता एका अर्थाने हे अग्नी तत्व म्हणजे सर्वत्र असलेले पेटते ब्रह्म होते
change ही संकल्पना हेराकलेट्सने तात्विक संकल्पना म्हणून मांडली
“You can’t go home again your
childhood is lost. The friends of your
youth are gone. Your present is
slipping away from you.
Nothing is ever the same”
किंवा
“No man can step into
the same river twice”
ही त्याची महावाक्ये प्रसिद्ध आहेत
बदल हा फक्त बदलत नाही बाकी सर्व बदलते असं तो म्हणायचा पण मग हे बदल चालवणारे तत्व कोणते तर logos लोगस LOGOS म्हणजे एकच एक तत्व जे बदलत नाही ते स्वतःच तर्क आहे आणि हे तर्कतत्व बदलाला केऑटिक होऊ देत नाही तर रॅशनल बनवते रॅशनलने बदलाला नियंत्रित करते त्याच्यामुळेच थेरी आणि लॉजिकल अनालिसिस शक्य होते आणि तेच रॅशनलला भाषा देते त्यातूनच सर्व लॉजी तयार होतात ह्या LOGOS ला जाणणे व समजावून घेणे म्हणजे तत्वज्ञान अशी तो तत्वज्ञानाची भाषा करतो रॅशनलची ही पहिली दीर्घ तात्विक मांडणी आहे प्रश्न असा येतो कि मग हे LOGOS म्हणजे ख्रिश्च्णांचा वर्ड का जॉन म्हणतो तसा
“In the beginning was the Word (Logos),
and the Word (Logos) was with God,
and the Word (Logos) was God”
असे म्हणता येईल का किंवा ह्याही पुढे जाऊन हाच शैवांचा ओंकार म्हणता येईल का ? ओंकार हा logos का ? तो logos असल्यानेच ध्वनिरूप आहे का ? ओंकार हा रॅशनल आहे का ? हो ! ओंकार हे LOGOS रुपीही आहे पण ते फक्त LOGOS नाही तर ब्लिस ही आहे
ह्यानंतर आलेल्या परमिनीड्सने पाणी अग्नी कसे असेल हा प्रश्न विचारला आणि ह्या सर्वच तत्वांमागे एकच तत्व असेल असा निष्कर्ष काढला मात्र ते तत्व अग्नी आहे हे त्याने नाकारले आणि त्या तत्वाला नाव दिले
BEING त्याच्या मते
१ फक्त BEING आहे
२ ते सर्वत्र सारखे आहे आणि सारखेच वास्तव आहे
३ जिथे BEING नाही अशी जगात जागाच नाही रिक्त अवकाश कुठेच नाही
४ ते आदिम आहे त्यास कुणी निर्माण केलेले नाही आणि ते नष्ट होत नाही
५ ते अभेद्य आहे अमर आहे
६ ते रॅशनल आहे त्याचा विचार करता येतो कारण ते स्वतःचा विचार करू शकते
७ BEING ला गती नाही कारण सर्वत्र BEING आहे ते जाणार तरी कोठे आणि NOTHINGNESS अस्तित्वात नाहीच
शैवांचे शिव हे असे आहे तेही
१ फक्त आहे

३ ते जिथे नाही अशी जगात जागाच नाही
४ ते आदिम आहे त्यास कुणी निर्माण केलेले नाही आणि ते नष्ट होत नाही ते अनादी अनंत आहे

७ ते हालचाल करू शकते आणि त्याचा कुठलाही भाग कुठेही जाऊ शकतो त्यामुळेच ते गतिशीलही आहे
परमानीड्सचा शिष्य झेनोने तर गती का अशक्य आहे त्याचे अजब उत्तर दिले त्याचा युक्तिवाद अजब होता त्याचे म्हणणे असे कि तुम्ही कुठे जातच नाही कारण कुठे जाणे शक्यच नाही कारण कुठेही जायचे असेल तर तुम्हाला प्रथम किमान अर्धे अंतर पार करावे लागेलं मग ते पार करायला अर्ध्याचे अर्धे मग त्याच्या अर्ध्याचे अर्धे असे अर्धे अर्धे करत गेला कि शेवटी तुम्ही तिथेच राहता जिथे आहात . वरप्रसंगी खुळचट वाटणारा हा तर्क तर्कदृष्ट्या त्याकाळी योग्य वाटल्याने अनेकजण बिथरले कारण त्यामुळे गती नाहीच असे सिद्ध होत होते
ह्यातून प्रश्न असा निर्माण होतो कि गती नाही तर मग अनेक निर्माण कसे झाले ? बदल आणि फरक कसे संभवतात ? गती नाही तर बदल आभास आहे का ?
प्रत्यक्षात तर आपण पोहचतो आणि आपल्याला गती आहे हे स्पष्ट दिसत होते मग करायचे काय ? एकतत्वता नाकारायची म्हणजे काय ? तर वास्तव हे एकाच तत्वाने बनले आहे हे नाकारायचे म्हणजे काय तर वास्तव अनेक तत्वांनी बनले आहे हे स्वीकारायचे
ह्यातूनच एम्पीडॉकल्सच्या तत्वज्ञानाचा उदय झाला त्याच्या मते प्रत्येक गोष्ट चार तत्वांनी वा मुळांनी बनलेली असते अग्नी , वायू ,पाणी आणि पृथ्वी ही being प्रमाणे अपरिवर्तनीय आणि अभेद्य आहेत जगातल्या विविध गोष्टी ह्या ह्यांच्या मिश्रणांनी बनल्या आहेत ही मिश्रणे बनतात कशी ? जीवन कसे साकार होते ? गती कशी उत्पन्न होते ?
ह्यासाठी ह्या चाराव्यतिरिक्त आणखी काही तत्वे असली पाहिजेत ही तत्वे म्हणजे प्रेमबल व द्वेषबल प्रेमबल विरोधी असतील तर त्यांनाही एकत्रित आणते तर द्वेषबल वेगळे करते जोड नष्ट करते तुकडे करते त्यामुळे जुने नष्ट होते पण प्रेमबल पुन्हा जोड करून नवे निर्माण करते
जगातली विविधता बघता फक्त सहा तत्वांनी एव्हढी विविधता शक्य आहे ? हा प्रश्न पडला अनॅक्सोगोरसला ! त्याला वाटले कि जगाची विविधता साकार व्हायला ही इतकीच रूट्स पुरेशी नाहीत हलणे मिश्रण करणे आणि पुन्हा वेगळे करणे ह्यासाठी आणखी काही रूट्स हवीत अग्नी , वायू ,पाणी आणि पृथ्वी ही रूट्स आहेत पण ती बियाणे स्वरूपात आहेत आणि ह्या प्रत्येक बीजात अग्नी , वायू ,पाणी आणि पृथ्वी आहेत ह्याचाच अर्थ प्रत्येक रुट मधे इतर रूट्स आहेत म्हणजे अग्नीमध्ये वायू ,पाणी आणि पृथ्वी आहेत वायूमध्ये अग्नी ,पाणी आणि पृथ्वी आहेत पाण्यात अग्नी वायू , आणि पृथ्वी आहेत आणि पृथ्वीत अग्नी , वायू ,पाणी आहे त्यामुळेच केस नाहीत तिथूनही केस उगवतात गवत हे मांस नसूनही मांस असणाऱ्या हरणाला आहार म्हणून चालते म्हणजे जे मॅटर आहे ते अनंत बीजांचा समुच्चय आहे पण प्रश्न असा आहे कि ह्या मॅटरला गती कशी आहे फक्त मॅटरने गतीचा प्रश्न सुटत नाही म्हणून ऍनाग्जोगोरस एक नवे तत्व आणतो ते म्हणजे माईंड (नौस ) सगळ्या बॉडीज रूट्सच्या मिश्रणांनी बनतात पण माईंड मात्र मिश्रण नसते ते शुद्ध अनंत अपरिमित असते ते सर्वत्र असते आणि युनिव्हर्सल असते हे मन सर्वच मॅटरला नियंत्रित करते आणि गतीही देते त्याची सर्वांवर सत्ता असते अनागजोगोरसची भाषा ही शेतकऱ्याची आहे हे उघड आहे त्यामुळे तो रूट्स आणि सीड्स च्या भाषेत बोलतो आणि त्यांना जीवन देणाऱ्या चैतन्याला नौस म्हणतो शेती करताना मुळे , बीजे आणि चैतन्य जेवढे जाणवतात तेवढे फॅक्टरी चालवतांना थोडेच जाणवणार ? ही शेतकऱ्याची भाषा ग्रीक नागरला कशी आवडणार ?
शैवांनी हा प्रश्न शक्ती ह्या तत्त्वाद्वारे सोडवला होता शैव हा शून्यरूप निष्क्रिय असतो पण शक्ती त्याला डांस करायला भाग पाडते बीज आणि मुळांची अनेकता म्हणजे शिव ह्या एकचे नृत्य आहे ज्याप्रमाणे डान्स आणि डान्सर वेगळे असत नाहीत त्याचप्रमाणे एक आणि अनेक वेगळे असत नाहीत पण ज्याप्रमाणे नृत्याचे हावभाव दिसतात तसे ''अनेक'' दिसतात "अनेक "शिवाच्या मुद्रा आहेत त्या शिवाच्या विलास आहेत . गती आहे पण सर्व गत्या शिवाच्या आतीलच गत्या आहेत ज्याप्रमाणे तोंडातून पाणी पोटात जाते पण अंतिमतः पाणी शरीरातच असते तश्या सर्व गत्या शिवातच असतात वेगवेगळ्या अवयवांचे स्वरूप विविधता दाखवते पण ही विविधता एकाच शरीराची अवयव असते तशीच सर्व विविधता शिवाच्याच विविधता असतात ह्या गत्या शक्ती मुळे निर्माण होतात म्हणजे चैतन्य शक्तीमुळे ऍक्टिव्ह असते आणि शिव नाचतो
डेमॉक्रिटसने हे माईंड अमान्य केले आणि मॅटर बाबत वेगळे विचार मांडले त्याच्या मते मॅटर बीजांनी नाही तर अणूंनी बनलेले असते आणि हे अणू अभेद्य असतात म्हणूनच मॅटर सॉलिड असते घट्ट असते अगदी पाणीही घट्ट असते आणि अणूंनी बनलेले असते राहता राहिला प्रश्न गतीचा तर त्याच्या मते गती स्वयंभू असते ती असतेच थोडक्यात अणूंनी बनलेले मॅटर असते आणि गती असते माईंड नसते आणि असलेच तर अणू व गतींनी बनलेले असते
थोडक्यात काय तर सॉक्रेटिस आणि त्याचे समकालीन यायच्याआधीच
१ पृथ्वी जल अग्नी वायू ही तत्वे वा रूट्स
२ माईंड , मॅटर ,फ्लक्स व गती
३ बल
४ अणू व बीज
५ मिश्रणे , जोड व तोड , एकता व विविधता
६ एकतत्ववाद व बहुतत्त्ववाद
७ लोगस व तर्क
८ भूमिती , मोजणी , गणित व नंबर्स
९ बुद्धी व इंद्रियानुभव
१० MYTHOS ला स्पष्ट नकार पर्यायाने ग्रीक धर्माला नकार
११ being ची मांडणी
१२ रॅशनल आणि केऑस
ही तत्वे ग्रीक संस्कृतीत दाखल झाली होती आणि त्यांच्यावर उलट सुलट चर्चाही झाली होती
====================================================================
देरिदाने लोगोसेन्टेरीसिझमला आव्हान दिले खरे पण त्याच्यामुळे पुढे काय होईल ह्याची त्याला कल्पना न्हवती आणि मग तेच झाले मायथॉस परतले भ्रम परतले आणि धर्म आणि कट्टर धार्मिकता परतली

Comments
Post a Comment