शिवराळ ,अर्वाच्य  आणि अश्लील  श्रीधर तिळवे नाईक

चिन्हांच्या संदर्भात जी अभिव्यक्ती  होते त्यामुळे कधी कधी काही भलत्याच समस्या निर्माण होतात त्यातील एक म्हणजे शिवराळ , अश्लील आणि अर्वाच्य ह्यासंदर्भातील

शिवराळ भाषेचे दोन प्रकार होतात
१ अपशब्द  शिवराळ : ही भाषा लिंगाशी निगडित असत नाही उदाहरणार्थ मूर्ख , हलकट , नीच ह्यांना आपण अपशब्द म्हणतो व सार्वजनिक जीवनात त्यांना वापरण्याची अनुमती देतो म्हणजेच आपण त्यांना वाच्य ठरवतो मात्र असे अपशब्द जातीवाचक वा वर्णवाचक असतील आणि ते अपमान करण्यासाठी वापरले गेले असतील तर मात्र ते अर्वाच्य मानावे लागतात
२ लैंगिक शिवराळ : ह्यात कामेन्द्रियांशी जोडून शिवराळ भाषा निर्माण केली जाते पुरुष लिंग आणि स्त्रीलिंग ह्यांना जोडून ही भाषा निर्माण होते पूरुषकेंद्रित समाजात अशी भाषा ही प्रामुख्याने स्त्रीलिंगाशी निगडित असते त्यामुळे रांडेच्या फोद्रीच्या असे शब्द आपण शिवराळ मानतो लवडू सारखा एखाददुसरा शब्द हा पुरुषलिंगाशी निगडित असतो झवाडा झवाडी असे अपवादात्मक शब्द दोन्ही लिंगाना धरून येतात पण ह्यांची रूपे अनेकदा स्त्रीलिंगाशी निगडित असतात ह्या शब्दांना वा शब्दसमूहांना आपण अर्वाच्य ठरवतो म्हणजेच सार्वजनिक जीवनात वापरायला मनाई करतो

प्रश्न असा येतो कि ही अर्वाच्य काय आणि वाच्य काय हे कसे आणि कुणी ठरवायचे ? म्हणजेच शिवराळ आणि अशिवराळ आपणाला माहित असते आणि अनेकदा ते खाजगी असते पण वाच्य आणि अर्वाच्य हे मात्र सार्वजनिक असते आणि कायदा त्यात शिरू शकतो अशावेळी कायद्याला लैंगिक भाषा आणि लैंगिक शिवराळ भाषा ह्यात फरक करावा लागतो उदाहरणार्थ एखादा समीक्षक शास्त्राभ्यास म्हणून किंवा न्यायाधीश वा वकील न्यायनिवाडा करण्यासाठी वा आरोपीचा खटला लढवण्यासाठी उदाहरण म्हणून लैंगिक शिवराळ भाषेचा वापर उदाहरण म्हणून करतात  तेव्हा तो अर्वाच्य वा अश्लील होत नाही .

शिवराळ भाषा वापरण्याची परंपरा फार जुनी आहे अगदी संतांनीही  तिचा वापर केलेला आहे प्रश्न असा आहे कि माणूस  अशी भाषा का वापरतो
१ जेव्हा सामान्य भाषेत भावनेची  तीव्रता पोहचत नाही तेव्हा ही तीव्रता पोहचवण्यासाठी अशी भाषा आपसुख येते अनेकदा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी अशी भाषा वापरली जाते
२ अनेकदा समोरच्या माणसाला नामोहरम करून विजयी होण्यासाठी जाणीवपूर्वक अशी भाषा वापरली जाते ही बनेलगिरी असते आणि तिचा वापर अत्यंत हुशारीने केला जातो आणि स्त्री आणि पुरुष दोघेही अश्या भाषेचा वापर ह्या कारणासाठी करताना दिसतात

३ काहीवेळा समोरच्या व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठी किंवा तू अतिशय खालच्या स्तरातील आहेस हे दाखवण्यासाठी मुद्दाम अशा भाषेचा वापर केला जातो अनेकदा असा वापर करणारी व्यक्ती एरव्ही वाच्य भाषेत बोलत असते पण समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी अर्वाच्य भाषेचा वापर करते . पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष अनेकदा बायकांचा अपमान करण्यासाठी अशी भाषा वापरतात एखादा पुरुष  खाजगीत जाणीवपूर्वक स्त्रियांचा अपमान करत असेल तर त्याचा निषेधच करायला हवा आणि जर तो हे सार्वजनिक जीवनात वारंवार करत असेल तर त्याला वचक बसवण्यासाठी एखाद्या स्त्रीने त्याच्याविरुद्ध कम्प्लेंट केली तर ती अभिनंदनास पात्र आहे

४ काहीवेळा  एखादी व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक अशी भाषा वापरायला प्रोव्होक करते आणि समोरचा अशी अर्वाच्य भाषा वापरतो अनेकदा वकिली मानसिकता असलेल्या व्यक्ती हा गेम खेळतात आणि समोरच्या व्यक्ती रिऍक्शन म्हणून अर्वाच्य भाषा वापरतात अश्या वेळी अश्या वकिली मानसिकतेच्या व्यक्ती निंदेस पात्र आहेत

५  साहित्यात एखादी व्यक्तिरेखा जर शिवराळच असेल तर त्या व्यक्तिरेखेच्या अनुरूप तिला शिवराळच भाषा द्यावी लागते असा वापर कायद्यालाही मान्य आहे फक्त साहित्यिकाने भान राखावे अशी कायद्याची अपेक्षा आहे

६ काही व्यक्ती भाषिकदृष्ट्या इतक्या विकृत असतात कि त्यांना लैंगिक शिवराळ भाषा ही लैंगिकतेसमान उन्माद पुरवते आणि असा उन्माद मिळावा म्हणून  ती लैंगिक शिवराळ भाषा वापरते

७ लैंगिक विनोद आणि लैंगिक उपहास हे लैंगिक शिवराळ भाषेचे असे दोन प्रकार आहेत जे अनेकदा समाजमान्य आणि वाच्य मानले जातात आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरेंनी ह्या महान वक्त्यांनी अनेकदा राजकीय शत्रूंना नामोहरण करण्यासाठी अशी भाषा वापरली आहे

८ जातीवाचक शब्द वापरण्याबाबत जसे निर्बंध लागू करण्यात आले आहेत तसेच स्त्रीबाबतही असे निर्बंध लागू आहेत असेच निर्बंध पुरुषाबाबतही लागू होणे गरजेचे आहे आम्ही पुरुषांना काहीही म्हणू पण पुरुषांनी मात्र आम्हाला काही अर्वाच्य शिवराळ म्हणता कामा नये हे समानतेच्या तत्वाला धरून नाही पुरुषप्रधान संस्कृतीतील  स्त्रीप्रधान लैंगिक शिवराळ भाषेला उत्तर म्हणून स्त्रियांनी पुरुषप्रधान लैंगिक शिवराळ भाषा विकसित करावी का म्हणजे पुरुष जसा उठसुठ आयमाय काढतो तसे बायकांनी बापसाप काढावेत का ? माणसांच्या आसक्त्यांचा तृष्णांचा जोवर अंत होत नाही तोवर स्त्रीमुक्तीचा व्यावहारिक अर्थ शोषणाच्या समान संधी असाच होणे अटळ आहे त्यामुळे बायका एकतर पुरुषप्रधान लैंगिक शिवराळ भाषा विकसित करतील किंवा पुरुषप्रधान संस्कृतीतील  स्त्रीप्रधान लैंगिक शिवराळ भाषा वापरतील असे स्पष्ट दिसते


९ काहीवेळा प्रस्थापित व्यवस्था अत्यंत हुशारीने शत्रूचा उल्लेख शिवराळ भाषेत रूपांतरित करतो उदाहरणार्थ निगमवाद्यांनी आगमवाद्यांच्या संकल्पनांचा शिवी म्हणून केलेला वापर उदाहरणार्थ बुद्ध ह्या शब्दाचा बुद्धू म्हणून केलेला वापर खुद्द शिव ह्या संकल्पनेचा  शिवी आणि शिवराळ म्हणून केलेला वापर प्राचीन काळी स्त्रीप्रधान मातृमुखी संस्कृतीचा उपहास करण्यासाठी आईवरून रूढ झालेल्या शिव्या ज्या आपण आजही वापरतो किंबहुना शिव्यांचे उगमस्थान तिथेच आहे ( मी इथे मुद्दामच शिवी आणि शिवराळ हे शब्द वापरलेत जेणेकरून हा वापर आणि निगमवाद कसा आपल्या रक्तात भिनलाय हे उमजावे )

१० काहीवेळा एखादी व्यक्ती (एखादा पुरुष वा स्त्री ) ज्या  भाषिक कंडिशनिंगमध्ये वाढते  त्याचा परिणाम होऊन  त्या व्यक्तीची भाषाच शिवराळ होऊन जाते अश्या व्यक्ती समोर स्त्री असो वा पुरुष शिवराळ भाषेतच बोलतात अश्यावेळी त्या व्यक्तीची भाषा स्त्री अथवा पुरुष ह्यांच्यासंदर्भात वेगवेगळी आहे काय हे तपासावे लागते अशी शिवराळ व्यक्ती आपल्या आयुष्यात असू द्यावी कि नाही हा प्रश्न पूर्णपणे वैयक्तिक असतो  कोल्हापुरात रांडेच्या वैगरे इतकं कॉमन आहे कि तुम्ही जर अश्या भाषेला सरावलेले नसाल तर कोल्हापुरात जगणे काहीसे अवघड जाईल मात्र कोल्हापुरातही शिवराळ व्यक्तीला बॅन करण्याचा हक्क तुम्हाला आहेच . सर्वसाधारणपणे जी व्यक्ती शिवराळ असते तिची भाषा बदलणे फार अवघड जाते आणि अशी शिवराळ व्यक्ती जेव्हा सार्वजनिक वाच्य भाषेतही शिवराळ विशेषतः लैंगिक शिवराळ भाषा वापरायला लागते तेव्हा भाषिक वाद आणि तंटे निर्माण होतात आणि त्यातील काही न्यायालयातही प्रविष्ठ होतात जेव्हा अर्वाच्यतेचा वाद कायदा आणि न्यायालयात प्रविष्ट होतो तेव्हा आरोप झालेली भाषा ही अश्लीलतेच्या दायऱ्यात प्रवेश करते कायद्याच्या चौकटीत ही अर्वाच्य भाषा अश्लील आहे कि नाही ते ठरवले जाते जेव्हा न्यायालय  ह्या अर्वाच्य भाषेला अश्लील ठरवते तेव्हा आरोपी व्यक्ती गुन्हेगार ठरते तोवर संबंधित लोकांनी शांत राहणे गरजेचे असते न्यायालयाने निर्णय देण्याआधीच आरोपीला गुन्हेगार मानून मीडियात किंवा  फेसबुकसारख्या माध्यमात ट्रोलिंग करणे हे शहाणपणाचे लक्षण न्हवे

११ काहीवेळा एखादा शब्द  एखादी शिवी एकदम सभ्य होऊन जाते उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरपूर्वी आईला हा शब्द अर्वाच्य  होता पण सचिन तो मैदानात सहज वापरायला लागल्यापासून तो अचानक आश्चर्य दर्शवणारा उद्गार बनला आणि सगळीकडे सभ्य म्हणून मान्यता पावला अर्थात ज्यांना हा बदल माहीत  नाही त्यांचे काय करायचे हा प्रश्नच आहे .  ह्या उलट च्युत हा शैवांचा शब्द च्युत म्हणजे शिवपासून ढळणारा तर अच्युत म्हणजे शिवपासुन न ढळणारा त्यातूनच पदच्युत म्हणजे पदापासून ढळणारा वैगरे शब्द तयार झाले पण च्युत हा शब्द आज एकटा येतो तेव्हा योनीवाचक अर्वाच्य  झाला आहे ह्यात पुरुषाला अच्युत आणि स्त्रीला च्युत ठरवण्याचे पुरुषप्रधान संस्कृतीचे राजकारणही खेळले गेले आहे


खाजगी आणि सार्वजनिक

शिवराळ , अर्वाच्य आणि अश्लील  भाषेच्या वापरासंदर्भातील  खाजगी भाषा कुठली आणि सार्वजनिक भाषा कुठली असा पेच नेहमीच निर्माण होतो जेव्हा एखादी व्यक्ती खाजगी वितरणासाठी अशी गोष्ट देते आणि वितरणच मर्यादित करते तेव्हा तो वापर खाजगी असतो पण जेव्हा अशी भाषा सार्वजनिक  वितरण संस्थेत दाखल होते तेव्हा ती कायद्याच्या सीमेत प्रविष्ट करते फेसबुकसारख्या सोशल माध्यमात तर हा पर्याय स्पष्टपणे फॉर पब्लिक आणि फॉर फ्रेंड्स अश्या तऱ्हेने नोंदवलेला आहे जेव्हा पोस्ट्स फक्त मित्रांसाठी टाकलेल्या असतात तेव्हा त्या पूर्णपणे खाजगी असतात पण जेव्हा पोस्ट्स पब्लिकसाठी टाकलेल्या असतात तेव्हा त्याची सार्वजनिक जबाबदारी लेखकाला घ्यावीच लागते इनबॉक्समधला मजकूर हा पूर्णपणे खाजगी असतो आणि तिसऱ्या माणसाला त्यात अनुमतीशिवाय प्रवेश नसतो जर समोरच्या व्यक्तीचा इनबॉक्समधला संवाद तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तो संवाद थांबवू शकता आणि तरीही तो एकतर्फी चालू राहिला तर  अनफ्रेंड करून थांबवू शकता आणि अनफ्रेंड करूनही तो थांबत नसेल तर पोलिसांच्याकडे जाऊ शकता ह्याला जातीवाचक शब्द कदाचित अपवाद आहेत जे योग्यच आहे


ज्ञानी आणि अज्ञानी

अनेकदा कुठला शब्द अर्वाच्य आहे आणि कुठला नाही ह्याबाबत ज्ञान असणे आणि नसणे हेही महत्वाचे ठरते उदाहरणार्थ कोल्हापुरात रांडेच्या हा शब्द प्रेमानेही वापरला जातो हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही फार घोळ घालू शकता . माझ्या लहानपणी मी माझ्या तीन मित्रांना मला उद्देशून हा शब्द वापरला तेव्हा कुडपलं आहे पुढं माझ्या हा शब्द प्रेमानेही वापरतात हे लक्ष्यात आल्यावर मी तो स्वीकारायला सुरवात केली माझ्या घरात गोवन भाषा असल्याने माझे हे अज्ञान होते अलीकडे तुझ्या आईच्या गावात ह्याला अशीच वेगळी छटा प्राप्त झाली आहे आणि कृष्णाने तो सोनी टीव्हीवर वापरून वापरून भारतभर पसरवला आहे

शिवराळ ,अर्वाच्य  आणि अश्लील ह्या संदर्भातील वाद

ह्या संदर्भातील वाद  नेमके का सुरु होतात

१ अनेकदा असे वाद सनातनी लोकांच्या काय वाच्य आणि काय अर्वाच्य ह्या संदर्भातील कर्मठ धारणेमुळे सुरु होतात असे वाद समजून घेणे सोपे असते कारण फिर्यादी सनातनी कर्मठ विचाराचा असतो
२ जेव्हा एखादी आधुनिक व्यक्ती  असे वाद निर्माण करते तेव्हा तो वाद समजून घेणे फार अवघड जाते सनातनी व्यक्तींना तर '' जी व्यक्ती स्वतःच आम्हाला अर्वाच्य वाटते अशा भाषेत कधी कधी बोलते वा लिहिते तीच अचानक दुसऱ्याची भाषा अर्वाच्य आहे असे म्हणते तेव्हा तिचे काय करायचे '' असे प्रश्न पडतात म्हणजे '' ''आम्ही अर्वाच्य भाषेत लिहिणार पण आमच्यापेक्षा आधिक अर्वाच्य भाषेत कोणी लिहीत असेल तर आम्ही त्याच्या भाषेला अश्लील ठरवून त्याच्यावर खटला दाखल करणार '' असे काही घडते आहे का असा प्रश्न सनातनी व्यक्तींना पडतो तर आधुनिकांना '' दोघेही आधुनिक आहेत तर  भांडतायत तेही भाषेवरून कशाला ?''
असा प्रश्न पडतो .

३ ह्यातूनच प्रश्न निर्माण होतो कि केस नेमकी कशाची आहे ? भाषावापराची ? कि विचारप्रणालीची ?भाषावापराची असेल तर ती समंजसपणे आपापसात बसून सोडवायला हवी होती कारण अशी केस कुठल्याही साहित्यिकावर होऊ शकते अगदी तुमच्यावरही आणि जर ती विचारप्रणालीची असेल तर तिचे स्पष्ट स्वरूप समोर यायला हवे दुसरी एखादी व्यक्ती तिच्या कण्डिशनिंगमुळे शिवराळच असेल तर तिला किमान साहित्यिकांनी ती जशी आहे तशी स्वीकारायला हवी कि नाही किमान इतकी करुणा आपल्याठायी असायला हवी कि नको आणि भाषिक करुणाही आपल्या ठायी नसेल तर आपण साहित्यिक कसले ?सर्वांभूती करुणा आणि आसक्तीचा - तृष्णांचा अंत हाच जगाच्या समस्या सोडवण्याचा मुख्य उपाय आहे . पण हे खरोखर आपणाला पटले आहे काय ?
४ समजा करुणा वैगरे अव्यवहार्य उपाय आहे आणि पुरुषप्रधानतेने माजलेल्या आणि सोकावलेल्या व्यक्तीचा   हा प्रश्न आहे  तर तिला  ताळ्यावर कसे  आणायचे  ? केसने ती व्यक्ती  ताळ्यावर येणार काय ? एखाद्या व्यक्तीचे कंडिशनिंग बदलणे सोपे आहे का ?

५ प्रथम मैत्री मग संघटन मग संघटनेचे संबंध मग संघटनेचे हितसंबंध मग संघटनाचा उन्माद आणि मग संघटनाचा  माज   ह्यातून अनेक सत्ता वाटचाल करून गेलेत . अश्या वादामुळे मैत्री - संघटन होताना दिसत असेल तर त्याची पुढची वाटचाल कशी असेल ?पुरुषसत्ताक मोडीत काढायलाच हवे पण त्यामुळे हे जग सुंदर होईल असे कुणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे ह्यामुळे फक्त पुरुषांच्या आसक्त्या तृष्णा जाऊन त्याजागी स्त्रीपुरुष्यांच्या संयुक्त आसक्त्या आणि तृष्णा सत्तेवर येतील एव्हढाच काय तो बदल घडणार आहे . मग ह्या संघटनाला रोखावे काय तर नाही त्याला पाठिंबाच द्यावा पण हा पाठिंबा देताना माणसांच्या आसक्त्यांना आणि तृष्णांना डोळेआड करू नये . प्रश्न असा कि ही संघटना वाच्य काय आणि अर्वाच्य काय हे ठरवणार काय ? ह्या संघटनेचे सभासद ह्या वादाच्या मुळाशी असलेल्या शिवराळपणाचा स्वतः त्याग करणार काय कि फक्त शिवराळपणा कायम ठेऊन सार्वजनिक जीवनात अर्वाच्यपणाचा त्याग करणार ? आणि ह्या संघटनाची अर्वाच्यपणाची व्याख्या दुसऱ्या संघटनांना मान्य नसेल तर त्यांच्याशी ती कशी लढणार ?

मी एक साधारण मनुष्य आहे आणि माझ्या मर्यादित कुवतीनुसार हे लिहिले आहे . कुणाचे हृदय ह्याने यत्किंचितही दुखावले गेले असल्यास क्षमाप्रार्थी आहे .

श्रीधर तिळवे नाईक
















Comments

Popular posts from this blog