मुक्त गझलला "गझल " म्हणणे का आवश्यक आहे ?
गेली ३५ वर्षे तू तुझ्या मुक्त गझलांना गझल म्हणू नकोस बाकी काहीही म्हण असा आग्रह माझे काही मित्र करत असतात त्याच आग्रहाचे प्रतिबिंब फेसबुकवर चित्तरंजन भट ह्यांच्या कंमेंट्समध्ये पडलेले दिसते आमचे गझल क्षेत्रातील काही दिग्गज मित्रही ह्या आग्रहात सामील असतात त्यामुळे फेसबुकवर ह्या विषयावर थोडे दीर्घ लिहिणे आवश्यक झाले आहे
सर्वात प्रथम साहित्याच्या क्षेत्रात आकार , प्रकार ,अवतार ह्यांचे नेमके कार्य काय चालते हे नीट लक्ष्यात घेतले पाहिजे सर्वात प्रथम आकार !आकार पुढील असतात
१ महा
२ बृहद
३ विशाल
४ दीर्घ
५ लघु
६ अतिलघू
म्हणजे रामायण महाभारतसारखे महाकाव्य , ज्ञानेश्वरीसारखे बृहदकाव्य , ना धो महानोरांच्या अजिंठा सारखे खंडकाव्य हे विशालकाव्य , पु शि रेगे ह्यांच्या शहनाज सारखे दीर्घकाव्य , ५ शेरांची कुठलीही गझल हे लघुकाव्य . हायकू , चारोळीसारखे अतिलघुकाव्य माझा दशानन हा गझलप्रकार विशाल आकार आहे डेकॅथलॉन मध्ये माझी एक शम्भर वा त्याहून अधिक शेरांची एक गझल आहे तर गझलेत विशालगझल हा आकार शक्य आहे तीस ते पन्नास शेरांची गझल ही दीर्घ गझल म्हणता येईल तर पाच ते तीस शेरापर्यंतची गझल ही लघु गझल तर ३ -४ शेरांची गझल ही अतिलघु गझल होईल अतिलघु गझल ही गझलच न्हवे अशी भूमिका सुरेश भटांची भूमिका आहे जी मला पूर्ण अमान्य आहे माझ्या मते तीन चार शेरांची गझल ही गझलच होय प्रश्न असा उपस्थित करता येईल कि मग दोन शेरांची गझल तू का मान्य करत नाहीस तर माझे म्हणणे असे कि चारोळी वा ज्याला कतअ म्हणतात त्यात दोन शेरांची गझल बसू शकते तीन चार शेरांची गझल ही वाचतांना पूर्ण गझलेचा फील देते हा माझा अनुभव आहे म्हंणून मी तीनचार शेरांच्या गझलेला गझल मानतो
आता आपण प्रकाराकडे वळू वाङ्मयाचे अनेक प्रकार असतात
१ कविता ही प्रामुख्याने काव्यप्रधान असते
२ कथा ही गद्यप्रधान असते
३ महाकाव्य हे पद्यप्रधान असते मात्र त्यात गद्य आणि काव्य ह्यांचा वापर शक्य असतो
४ कादंबरी , प्रवासवर्णन , आत्मचरित्र , चरित्र , आत्मकथन गद्यप्रधान असते अपवादात्मक वेळी चरित्र हे खंडकाव्यामार्फत सांगितले जाऊ शकते पण अशावेळी त्यांना कुणी चरित्र म्हणत नाही तर चरित्रावर आधारित खंडकाव्य असेच म्हंटले जाते
ह्या प्रत्येक प्रकारचे उपप्रकार असतात
गझल ही प्रामुख्याने कवितेचा उपप्रकार असते काव्यप्रकार असते तिच्यातून कथा सांगितली जाऊ शकते नाही असे नाही पण हे कथ्य पद्यप्रधान असावे लागते आणि प्रत्येक शेरात एक नवे कथ्य उलगडावे लागते मी आयुष्यात महाकाव्ये लिहिली आहेत त्यातील आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण आणि श्रीवाहिनी ही दोन महाकाव्ये प्रकाशितही झालेली आहेत पण गझलद्वारे महाकाव्य लिहिण्याचा प्रयत्न मी केलेला नाही मात्र भविष्यात कुणी लिहिणारच नाही असे नाही
प्रश्न असा असतो कि अमुक एक गोष्ट कवितेचा उपप्रकार आहे हे कोण ठरवतं ? ह्या उपप्रकाराची वैशिष्टये कोण ठरवतं ? ही वैशिष्ट्ये स्थिर असतात कि बदलती असतात आणि जर ती बदलती असतात तर त्यांना स्थिर ठेवण्याचा प्रयत्न कोण करतं ? का करतं ?
कुठल्याही काळात कलेत चार वर्ग असतात
१ अभिजन वा महाजन वर्ग
२ बहुजन
३ मध्यमजन
४ कंगाल वा दासजन
गझल ही सुरवातीच्या काळात धार्मिकदृष्ट्या प्रबळ अश्या अभिजन वर्गातच घुटमळत होती आणि जिला युरोपियन इतिहासात स्कोलॅस्टिक परंपरा म्हंटले जाते ती गिरवत होतो ही स्कोलॅस्टिक परंपरा स्वतःची वाङ्मयीन सत्ता सतत प्रभावी राहावी म्हणून वृत्तात लिखाण करण्याचा आग्रह धरून असे तर ह्या अभिजनांच्या बाहेर जी लोकपरंपरा होती ती मात्र लोकसंगीताला प्रमाण मानून मात्राछंदात व कधीकधी मुक्त मात्राछंदात लिहीत असे त्यामुळेच आशयाची गरज असेल तर अनेकदा एकनाथ तुकाराम मात्रांची संख्या वा अक्षरांची संख्या धुडकावयाला लाजत नाहीत
वास्तविक लोकजन कला हीच मूळची कला तिच्यात फूट पडून अभिजन वर्गाने स्वतःला स्वायत्त करण्यासाठी स्वतःची तथाकथित क्लासिकल कला निर्माण केली आणि कलेत अभिजन कला व बहुजन कला असे दोन प्रकार निर्माण झाले मात्र लिखित संस्कृतीत अभिजनने आपला चष्मा कायम वर ठेवायचा प्रयत्न केला वृत्तछंदात्मकता हे अभिजन वर्गाने हत्यार म्हणून वापरले तुम्हाला आमच्यात यायचं असेल तर आमचे काव्यशास्त्र पाळूनच तुम्ही येऊ शकता अशी ही पंडिती दटावणी होती आणि कालीदासासारखे मूळचे बहुजन तिला बळीही पडले
वास्तविक मूळ प्रश्न गाण्याचा होता आणि लोकसंगीतात तो सुटतही होता पण ह्यांना शास्त्रीय संगीतच हवे होते मग गीत आणि पद कितीही बेढब आणि निरस झाले तरी चालेल लोकसंगीत लवचिक असल्याने ते मात्रांची चंचलता सहज सामावून घेई .
पुढे छापील संस्कृती आली आणि कविता ही संगीतमय असण्याची गरजच संपली मराठीत जवळ जवळ सर्वच कविता संगीतमय असल्याने वृत्तमात्राछंदात्मक होती गझल त्याला अपवाद न्हवती त्यामुळे जसे गझली विचारवंतांना वाटते तसे वृत्तमात्राछंद हे काही फक्त गझलेचे वैशिष्ट्य न्हवते तर समग्र कवितेचे होते जशी जशी छापील संस्कृती विकसित होत गेली तशी तशी कविता ही ऐकण्याची न्हवे तर वाचण्याची गोष्ट बनली ह्याचा थेट परिणाम कवितेच्या संरचनेवर झाला तिची संरचना हळूहळू मुक्त होऊ लागली आणि ती ब्लँक व्हर्स फ्री व्हर्स असा प्रवास करत शेवटी मुक्त छंदात्मक झाली तिच्या ह्या बदलत्या रुपाला नाक मुरडणारे त्याही काळात होते मुक्त छंदातली कविता ही कविताच न्हवे असं म्हणण्यापर्यंत ह्यांची मजल गेली ह्यात पु ल देशपांडे , बा सि मर्ढेकर असे दिग्गजही शामिल होते पण ह्यांना काळाकडून हार पत्करावी लागली एकेकाळी मुक्तछंदात्मक कवितेची खिल्ली उडवणारे पु ल स्वतःच मुक्तछंदातल्या कवितांना दाद देऊ लागले मुक्त छंदातल्या दलित व कामगार कवितेची (नारायण सुर्वे )भलावण करू लागले
ह्या छापील संस्कृतीचा सर्वच काव्यप्रकारावर परिणाम होणे अटळ होते आता कविता गायनातून मुक्त झाली होती
साहजिकच सर्वच काव्यप्रकार लवचिक होत गेले अभंग , ओवी , सुनीते वैग्रे ! अपवाद फक्त इस्लामिक काव्यप्रकार होते . मुस्लिम संस्कृती , कवी व काव्यपरंपरा छापीलता स्वीकारायला तयार न्हवती साहजिकच काव्यप्रकार लवचिक होण्याचे प्रमाण व वेग इथे अल्प व मंद झाले शिवाय मुस्लिम शायरांना मुशायऱ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा प्रश्नही इथे जोडला गेला होता मुशायऱ्याचे उत्पन्न त्यांना गमवायचे न्हवते मुस्लिम समाजात आजही शायरी वाचण्यापेक्षा ऐकण्याचे वेड अधिक आहे हे वेड परंपरेतून कट्टरतेतून चालत आले आहे छापीलतेला व छापील कवितेला महत्व न देण्यामागचं कारण उघड आहे छापीलता ही फक्त छापीलता असत नाही ती आधुनिक मूल्यांचे वहन करणारी जीवनवाहिनी असते ती अंतिमतः धार्मिक कट्टरतेला चॅलेंज करते हे चॅलेंज स्वीकारण्याची मानसिक तयारी मुस्लिमांची झालेलीच नाही त्यातूनच एडवर्ड सैदसारख्यांचे ओरिएंटॅलिझम सारखे भंपक ग्रंथ बाहेर पडतात आणि मुस्लिम अहंकाराच्या तुष्टीकरणाचे बुद्धिमान प्रयोग करतात
मुक्त कविता ही धार्मिक तुष्टीकरणाची कविता कधीच न्हवती तर आधुनिक माणसाची घुटन , व्यस्तता , धर्म कालबाह्य झाल्याने आलेली बौद्धिक परात्मता , विज्ञान स्वीकारणारी पण विज्ञानाची भोके उघडे पाडणारी अशी ही कविता होती जवळ जवळ ९० % मुस्लिम कविता ही धार्मिकतेतून बाहेर पडलीच नाही ती पुरेशी आधुनिक झालीच नाही आधुनिकतेला विरोधी अशी तिची मानसिकता होती त्यातच तिला नंतर उत्तराधुनिकतेने उथळ बळ पुरवले ह्याचा परिणाम असा झाला कि मुस्लिम काव्यप्रकार हे पारंपरिक आकारातच नांदत राहिले पारंपारिक काव्यप्रकारातच आधुनिक संवेदनशीलता व्यक्त करण्यात समाधान मानू लागले त्यामुळे जिथे मुक्त कवितेलाच खुला स्वीकार मिळत नव्हता तिथे पारंपारीक काव्यप्रकाराच्या खुल्या मुक्त आकारांना खुला स्वीकार मिळणार कसा ?
मला ह्या कट्टरतेशी काहीच देणेघेणे न्हवते ह्या कट्टरतेचे ओझे उर्दू फारशी अरबीने वहावे मराठीने का वहावे ?उलट मराठी माणसांनी इस्लामचे ओझे न बाळगता प्रयोग करावेत ह्या मताचा मी होतो साहजिकच मी प्रथम गझला लिहिल्या त्या ह्या कट्टरतेविरुद्ध ! त्यासाठी मला उपयोगी पडली ती अँटिपोएट्रीची चळवळ वृत्तछंदात्मक विरोधाचे टोक गाठले गेले ते अँटिपोएटरी चळवळीतअँटिपोएटरी चळवळीत निकॉनर पारा(ह्याचा पहिला संग्रह १९५४ साली आला होता ) आणि एलियास पेत्रोपाउलास ह्यांच्या कवितांच्यात ! वृत्तछंदात कसलीही गूढ ताकत नसते त्यामुळे कविता गद्यही असू शकते हे हिचे प्रतिपादन वृत्तछंदात जाणीवपूर्वक चुका करणे जाणीवपूर्वक यमक हुकवणे असले अनेक प्रकार ह्यांनी केले सेंटीमेंटल फीलिंग्सना कवितेतून हुसकावून लावून आधुनिक ताज्या भावनांची मोडतोड वृत्तछंदाची मोडतोड करत सादर करण्याचा हा उद्योग चांगलाच लोकप्रिय झाला मी गझलेबाबत हा प्रयोग केला आणि तिला प्रतिगझल नाव दिले ह्याला त्यावेळी बरा प्रतिसाद होता ही गझल पुढीलप्रमाणे होती
हजारो साल नर्गिस अपने बेनूरीपे रोता हैं हा इक्बालचा किंवा मेरे किस्मतमे गम गर इतना था दिलभी यारब कई
दिये होते हा गालिबचा वैगरे प्रसिद्ध शायरांच्या शेरांचे प्रतिशेर लिहीत ही गझल लिहिली होती आणि सेंटीमेंटल भावना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता ही प्रतिगझल मुक्त गझलेची सुरवात होती पुढे काही प्रसिद्ध मराठी रोमँटिक कविता घेऊन त्यापासून प्रतिगझला सादर केल्या होत्या उदाहरणार्थ बालकविंची औदुंबर
समुद्राची माशी बसली आसवाच्या हातावर
पाय टाकून त्यावर बसला असला औदुंबर
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटांतून
साखरबोट लावून जातो ऊसाचा जादूगर
चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
मँगेनिजच्या खाणीमध्ये उडवते कबूतर
पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे
वरून सूर्य घुसतो फेडून उन्हाचे धोतर
हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहांकडे
आत्महत्येची डळमळे कंबरेवर घागर
किंवा कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत (ह्या फेसबुकवर सादर केल्या आहेत )
गझलमधल्या रोमँटिसिझमला छेद देण्याचा हा प्रयत्न होता कधी कधी अपवादात्मक क्षणी एकाच शब्दाचे पाच अर्थ होत असतील तर तो एकच शब्द अंत्य यमक म्हणून वापरून का पाहू नये असा विचार रेंगाळून सेल हा एकच शब्द पाच अर्थांनी वापरून पाहण्याचा प्रकारही मी केलाय ही गझल पुढीलप्रमाणे सेल ह्या शब्दाचे लिलाव, विक्री , पेशी , कैदखोली , वीजसाठ असे अर्थ इथे आहेत
सेल
मुक्त गझल हा काही माझा शोध न्हवता प्रत्यक्षात तो उर्दूत फार पूर्वीपासून आजाद गझल म्हणून प्रचलित आहे व त्यावर मी लिहिलेही आहे कट्टरतेमुळे उर्दू शायरीत कधीही मुक्त गझलेला मुख्य प्रवाह म्हणून मान्यता मिळाली नाही पण एक गोष्ट होती ती म्हणजे बहुतांश उर्दू समीक्षकांनी वा शायरांनीं कधीही आझाद गझलेबाबत ही गझल न्हवेच अशी फॅनेटिक भूमिका घेतली नाही त्यांनी कायमच तिचा गझल म्हणून स्वीकार केला व तिच्यावर चर्चा केली मराठीत मात्र ते कुकर्म केले चित्तरंजन भटांनी आणि त्यांच्या भाटांनी हे लोक मुक्त छंदातल्या कवितेला ही कविताच न्हवे म्हणणाऱ्या कट्टर फॅनेटिक लोकांचे वंशंज आहेत ह्यांना बदल मानवत नाहीत हे शास्त्रीय संगीत शास्त्रीय ठेवू पाहणाऱ्या आणि हार्मोनियमसुद्धा आपण वापरता कामा नये असं म्हणणाऱ्या पंडिती लोकांचे वंशज आहेत बदल पटत नाही असे म्हणणे वेगळे आणि बदल केलात तर मान्यताच देणार नाही असे म्हणणे वेगळे ! दुसरा प्रकार दहशतवादात मोडतो आणि आम्ही जे गझलेचे शरियत तयार केले आहे ते मोडाल तर आमच्या मजहबमध्ये आम्ही तुम्हाला ठेवणार नाही असा हा दहशतवाद आहे मुक्त छंदातली कविता ही कविता म्हणून तुम्हाला मान्य असेल तर मुक्त छंदातली गझल तुम्हाला गझल म्हणून का मान्य करवत नाही इसके पीछे क्या पॉलिटिक्स हैं भाई ? मराठी कवितेचा इतिहास सांगतो कि १९३० पूर्वी मराठीत गझलच न्हवे तर सगळी कविताच वृत्तमात्राछंदातच लिहिली जात होती पण इतर काव्यप्रकारांनी मुक्तछंद स्वीकारल्यानंतर कुणी त्यांची मान्यता काढून घेतल्याचे ऐकिवात नाही मुक्तछंदातले खंडकाव्य हे खंडकाव्य म्हणूनच स्वीकारले जाते कुणी त्याला हे मुक्तछंदात लिहिले म्हणून ह्याला आम्ही खंडकाव्य म्हणणारच नाही असे काही म्हणत नाही हा उद्योग फक्त गझलकारांनाच का सुचतो ? हा मंबाजीपणा येतो कुठून ?बरं ह्या विधानामागे काही तर्क द्याल कि नाही ?
आजाद गजलविषयी मला माहित नाही पण माझी मुक्त गझल ही प्रामुख्याने तुमचा सुरेश भटीय रोमँटिसिझम हलवायलाच आली होती प्रेमाचे हळवे प्रकार थोडे वास्तव व आधुनिक बनवण्याचाच त्यात प्रयत्न होता पारंपारिक धर्माविरुद्ध व पंथाविरुद्ध त्यात बंड होते जगाला बाजार म्हणून नीट हाताळण्याचा प्रयत्न होता आणि हा बाजार हाताळताना हाताला होणाऱ्या वेदना व्यक्त करण्याचा सहजभावही होता तुम्हाला असला आशय खटकतो का ? तुम्हाला ह्या प्रयत्नांची समीक्षा करण्याचा पूर्ण हक्क आहे पण त्यांची गझल म्हणून मान्यता काढून घेण्याचा हक्कच नाही मुळात हा हक्क तुम्हाला आम्ही दिलेलाच नाही
गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे आणि ही वृत्ती मी मुक्त गझलेत सांभाळतो प्रत्येक शेराची स्वतंत्र स्वायत्तता हे ह्या वृत्तीचे व काव्यप्रकाराचे प्राणत्व आहे मी ते माझ्या प्रत्येक गझलेत कसोशीने सांभाळतो निदान तसा प्रयत्न करतो
आणि मुक्त गझलकाराने ते सांभाळले पाहिजे असा माझा आग्रह आहे कारण शरीर बदलता येते प्राण नाही हे मी जाणतो आणि म्हणूनच मुक्त गझलेला गझल म्हणून मान्यता मिळालीच पाहिजे हा माझा आग्रह आहे नव्याने आलेली चिन्हसृष्टी आणि चिन्हसंवेदनशीलताही गझलेने स्वीकारावी असा माझा आग्रह आहे ( माझ्या क. व्ही ह्या काव्यसंग्रहात अश्या गझला आहेत ) हे करताना पुढे मला चिन्हगझल हा मुक्त गझलेच्याही पुढचा प्रकार सापडला तो माझा शोध आहे तो स्वीकारणे फारच जड जाणार ह्याची मला कल्पना आहे त्यावर मी कधीतरी पुढे सवडीने दीर्घ लिहीन
श्रीधर तिळवे नाईक
गझल आणि एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार समग्र श्रीधर तिळवे नाईक
विनायक येवले ह्यांनी माझा एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार समग्र हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे त्यातील गझलांच्या अंगाने इथे लिहितो आहे माझ्या ह्या काळातल्या हिंदी गझल जागेअभावी ह्यात समाविष्ट केलेल्या नाहीत त्यामुळे फक्त मराठी गझला ह्यात आहेत काहींना जे माझे फेसबुकमित्र नाहीत त्यामुळे शॉक बसला आहे त्यांच्यादृष्टीने गझल हा थिल्लर प्रकार असल्याने मी त्या कुठल्या संग्रहात टाकताच कामा नाही पाहिजे होत्या त्यांच्या दृष्टीने गझल फक्त सेकंडरी कवी लिहितात अर्थात मला हे मान्य नाही त्यामुळे डेकॅथलॉन मध्ये गझला टाकल्यानंतर झालेली टीका झेलुनही मी त्या पुन्हा टाकल्या आहेत

कौनसा नर्गिस बेनूरीपे रोता अब इक़बालका हैं
बाजारोमे दीदावरोंको जाके सिड्यूस करता हैं
दिलभी गालिबके पास एक नहीं कई हैं
स्टाईलके हिसाबसे गम अपना अपना उठाता हैं
बादशाहोंको पता हैं कि हयात अब हैं चार दिन
इंतजारमें काटता नहीं आरजू पूरी करता हैं
मैं कोई मीर नहीं जो तुमतक सिमित रहूँ
जब तुम पास नहीं होते कोई दूसरा होता हैं
बढ़ गयी हैं इसकदर भीड़ उसके आसपास
याद रखनेकेलिए ही अब मोमिन करार करता हैं
हजारो साल नर्गिस अपने बेनूरीपे रोता हैं हा इक्बालचा किंवा मेरे किस्मतमे गम गर इतना था दिलभी यारब कई
दिये होते हा गालिबचा वैगरे प्रसिद्ध शायरांच्या शेरांचे प्रतिशेर लिहीत ही गझल लिहिली होती आणि सेंटीमेंटल भावना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता ही प्रतिगझल मुक्त गझलेची सुरवात होती पुढे काही प्रसिद्ध मराठी रोमँटिक कविता घेऊन त्यापासून प्रतिगझला सादर केल्या होत्या उदाहरणार्थ बालकविंची औदुंबर
समुद्राची माशी बसली आसवाच्या हातावर
पाय टाकून त्यावर बसला असला औदुंबर
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटांतून
साखरबोट लावून जातो ऊसाचा जादूगर
चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
मँगेनिजच्या खाणीमध्ये उडवते कबूतर
पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे
वरून सूर्य घुसतो फेडून उन्हाचे धोतर
हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहांकडे
आत्महत्येची डळमळे कंबरेवर घागर
किंवा कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत (ह्या फेसबुकवर सादर केल्या आहेत )
गझलमधल्या रोमँटिसिझमला छेद देण्याचा हा प्रयत्न होता कधी कधी अपवादात्मक क्षणी एकाच शब्दाचे पाच अर्थ होत असतील तर तो एकच शब्द अंत्य यमक म्हणून वापरून का पाहू नये असा विचार रेंगाळून सेल हा एकच शब्द पाच अर्थांनी वापरून पाहण्याचा प्रकारही मी केलाय ही गझल पुढीलप्रमाणे सेल ह्या शब्दाचे लिलाव, विक्री , पेशी , कैदखोली , वीजसाठ असे अर्थ इथे आहेत
सेल
जाणतो मी प्रत्येकजण लागला आहे सेलला
पण जगतात असे जणु न माहीत कुठल्याच सेलला
सारेच भ्रष्टाचार कसे शिक्षेतून फरार होतात
लॉक कसे लागत नाही पॉलिटिकल सेलला
मुमुक्षूंचा ध्यास न्हवे भक्तांचा कळप आहे
ईश्वरसुद्धा विकत घेतील डिस्काउंटमध्ये सेलला
चार्ज करूनही दुसरीला का लाईट देत नाही
पहिलीने काय केलंय छातीतील सेलला
तुझी मालमत्ता आहे जे करायचे ते तू कर
घरामध्ये ठेव वा लाव काळीज सेलला
पुढे ह्या सगळ्याला एक आकार प्राप्त झाला तो मुक्त गझलेत
मुक्त गझल हा काही माझा शोध न्हवता प्रत्यक्षात तो उर्दूत फार पूर्वीपासून आजाद गझल म्हणून प्रचलित आहे व त्यावर मी लिहिलेही आहे कट्टरतेमुळे उर्दू शायरीत कधीही मुक्त गझलेला मुख्य प्रवाह म्हणून मान्यता मिळाली नाही पण एक गोष्ट होती ती म्हणजे बहुतांश उर्दू समीक्षकांनी वा शायरांनीं कधीही आझाद गझलेबाबत ही गझल न्हवेच अशी फॅनेटिक भूमिका घेतली नाही त्यांनी कायमच तिचा गझल म्हणून स्वीकार केला व तिच्यावर चर्चा केली मराठीत मात्र ते कुकर्म केले चित्तरंजन भटांनी आणि त्यांच्या भाटांनी हे लोक मुक्त छंदातल्या कवितेला ही कविताच न्हवे म्हणणाऱ्या कट्टर फॅनेटिक लोकांचे वंशंज आहेत ह्यांना बदल मानवत नाहीत हे शास्त्रीय संगीत शास्त्रीय ठेवू पाहणाऱ्या आणि हार्मोनियमसुद्धा आपण वापरता कामा नये असं म्हणणाऱ्या पंडिती लोकांचे वंशज आहेत बदल पटत नाही असे म्हणणे वेगळे आणि बदल केलात तर मान्यताच देणार नाही असे म्हणणे वेगळे ! दुसरा प्रकार दहशतवादात मोडतो आणि आम्ही जे गझलेचे शरियत तयार केले आहे ते मोडाल तर आमच्या मजहबमध्ये आम्ही तुम्हाला ठेवणार नाही असा हा दहशतवाद आहे मुक्त छंदातली कविता ही कविता म्हणून तुम्हाला मान्य असेल तर मुक्त छंदातली गझल तुम्हाला गझल म्हणून का मान्य करवत नाही इसके पीछे क्या पॉलिटिक्स हैं भाई ? मराठी कवितेचा इतिहास सांगतो कि १९३० पूर्वी मराठीत गझलच न्हवे तर सगळी कविताच वृत्तमात्राछंदातच लिहिली जात होती पण इतर काव्यप्रकारांनी मुक्तछंद स्वीकारल्यानंतर कुणी त्यांची मान्यता काढून घेतल्याचे ऐकिवात नाही मुक्तछंदातले खंडकाव्य हे खंडकाव्य म्हणूनच स्वीकारले जाते कुणी त्याला हे मुक्तछंदात लिहिले म्हणून ह्याला आम्ही खंडकाव्य म्हणणारच नाही असे काही म्हणत नाही हा उद्योग फक्त गझलकारांनाच का सुचतो ? हा मंबाजीपणा येतो कुठून ?बरं ह्या विधानामागे काही तर्क द्याल कि नाही ?
आजाद गजलविषयी मला माहित नाही पण माझी मुक्त गझल ही प्रामुख्याने तुमचा सुरेश भटीय रोमँटिसिझम हलवायलाच आली होती प्रेमाचे हळवे प्रकार थोडे वास्तव व आधुनिक बनवण्याचाच त्यात प्रयत्न होता पारंपारिक धर्माविरुद्ध व पंथाविरुद्ध त्यात बंड होते जगाला बाजार म्हणून नीट हाताळण्याचा प्रयत्न होता आणि हा बाजार हाताळताना हाताला होणाऱ्या वेदना व्यक्त करण्याचा सहजभावही होता तुम्हाला असला आशय खटकतो का ? तुम्हाला ह्या प्रयत्नांची समीक्षा करण्याचा पूर्ण हक्क आहे पण त्यांची गझल म्हणून मान्यता काढून घेण्याचा हक्कच नाही मुळात हा हक्क तुम्हाला आम्ही दिलेलाच नाही
गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे आणि ही वृत्ती मी मुक्त गझलेत सांभाळतो प्रत्येक शेराची स्वतंत्र स्वायत्तता हे ह्या वृत्तीचे व काव्यप्रकाराचे प्राणत्व आहे मी ते माझ्या प्रत्येक गझलेत कसोशीने सांभाळतो निदान तसा प्रयत्न करतो
आणि मुक्त गझलकाराने ते सांभाळले पाहिजे असा माझा आग्रह आहे कारण शरीर बदलता येते प्राण नाही हे मी जाणतो आणि म्हणूनच मुक्त गझलेला गझल म्हणून मान्यता मिळालीच पाहिजे हा माझा आग्रह आहे नव्याने आलेली चिन्हसृष्टी आणि चिन्हसंवेदनशीलताही गझलेने स्वीकारावी असा माझा आग्रह आहे ( माझ्या क. व्ही ह्या काव्यसंग्रहात अश्या गझला आहेत ) हे करताना पुढे मला चिन्हगझल हा मुक्त गझलेच्याही पुढचा प्रकार सापडला तो माझा शोध आहे तो स्वीकारणे फारच जड जाणार ह्याची मला कल्पना आहे त्यावर मी कधीतरी पुढे सवडीने दीर्घ लिहीन
श्रीधर तिळवे नाईक
गझल आणि एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार समग्र श्रीधर तिळवे नाईक
विनायक येवले ह्यांनी माझा एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार समग्र हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे त्यातील गझलांच्या अंगाने इथे लिहितो आहे माझ्या ह्या काळातल्या हिंदी गझल जागेअभावी ह्यात समाविष्ट केलेल्या नाहीत त्यामुळे फक्त मराठी गझला ह्यात आहेत काहींना जे माझे फेसबुकमित्र नाहीत त्यामुळे शॉक बसला आहे त्यांच्यादृष्टीने गझल हा थिल्लर प्रकार असल्याने मी त्या कुठल्या संग्रहात टाकताच कामा नाही पाहिजे होत्या त्यांच्या दृष्टीने गझल फक्त सेकंडरी कवी लिहितात अर्थात मला हे मान्य नाही त्यामुळे डेकॅथलॉन मध्ये गझला टाकल्यानंतर झालेली टीका झेलुनही मी त्या पुन्हा टाकल्या आहेत
आमच्या पिढीतील गझल हा कदाचित सर्वात लोकप्रिय काव्यप्रकार असावा मात्र गझलेचा तात्विक विचार फार कमी लोक करतायत हे सत्य आहे पण मग त्याला उत्तर काय ?तर आपण गझलेचा अधिक विचार करणे
मराठीत गझलेची सुरवात एक स्वतंत्र फॉर्म म्हणून प्रथम माधव ज्युलियन ह्यांनी केली कारण ते रोमँटिसिझमकडे आकर्षिले गेले होते आणि शृंगार म्हणजे रोमान्स तीव्रतेने कसा व्यक्त करायचा हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता त्यांचे स्वतःचे आयुष्य हे रोमान्सने बऱ्यापैकी व्याप्त होते
मराठीत अभंग व ओवी हे दोन फॉर्म त्यावेळेस लोकांच्यात चांगलेच लोकप्रिय होते पण ओवी व अभंगाचा एथॉस हा इतका मोक्षिक आहे कि तो ते ज्या रोमँटिसिझमच्या युगात जन्मले त्याला सूट होईना शिवाय वारकरी काय म्हणतील ह्याचेही दडपण होते साहजिकच त्यांनी त्यासाठी मराठी परंपरेबाहेरचा फॉर्म शोधायला सुरवात केली त्यांच्यापूर्वी केशवसुतांनी असाच परंपरेबाहेरचा सॉनेट हा फॉर्म सुनीत म्हणून अपनवला होता माधव ज्यूलियननी गझल अपन वली त्यांच्या काळात भावगीत परंपरा सबळ होती तिचा एक दुष्परिणाम असा झाला कि प्रत्येक शेर स्वतंत्र असायला हवा ह्याचा त्यांना विसर पडला ते आशयाने इतके भारावलेले होते कि त्यांनी गझलेच्या तंत्राकडे दुर्लक्ष्य केलं ह्याचा मराठी गझलेवर एक विपरीत परिणाम असा झाला कि पुढील लोकांनी गझलेच्या प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे ह्या तंत्राकडे दुर्लक्ष्य केलं
ज्यूलियनांच्यानंतर विंदा करंदीकरांनी गझल रोमँटिसिझममधून बाहेर काढून तिला आधुनिक केलं मॉडर्न केलं मर्ढेकरांनी ओवी अभंग वापरून आधुनिकता व्यक्त केल्याने स्वतःची मर्ढेकरांच्यापेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना वेगळा फॉर्म आवश्यक वाटला मराठीत तोवर सुनीत एस्टॅब्लिश झालं होतं त्यांनी सुनीत मुक्त फॉर्म मध्ये आणलेच पण ते आधुनिकही केलं कारण पाश्च्यात्य देशात सुनीत मुक्त झालं होतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे गझल मात्र मुक्त करण्याचे धाडस त्यांना झाले नाही त्याबाबत त्यांनी ज्युलियन गझलच पुढे चालवली आणि प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे हे गणितही त्यांनी फार जमवले नाही
करंदीकरांच्यानंतर सुरेश भेट आले हा काळ देशी परंपरांच्या पुनरुथयनाचा काळ होता साहजिकच मूळ देशी मुळे शोधली गेली भट ह्याला अपवाद न्हवते त्यांनी गझलेचे देशीकरण व मराठीकरण केलेच पण त्याचबरोबर मूळ उर्दू फारसी परंपरेत आता प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे हा जो रुजलेला अट्टाहास आहे तोही त्यांनी मराठीत आणला व आणतांना माधव ज्यूलियनांना कमअस्सल ठरवले वास्तविक मराठी गझलेनं कसं विकसित व्हायचं हे उर्दू परंपरा कशी ठरवू शकते ? ते मराठी परंपरेनेच ठरवलं पाहिजे पण सुरेश भट इतके उर्दूळलेले होते कि आपण म्हणतो तेच खरं असा ठेका त्यांनी धरला पण त्यांच्या ह्या अट्टाहासाने एक गोष्ट रुजली ती म्हणजे गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे हे तत्व आणि आता हे मान्य केलं पाहिजे कि मराठी गझल परंपरेचे ते एक मुख्य तत्व झालं आहे
मराठीत माझ्या पिढीतील म भा चव्हाण नीता भिसे श्रीराम पचिंद्रे प्रदीप निफाडकर संगीता जोशी अशोक बागवे गोविंद नाईक ह्यासारख्या अनेकांनी सुरेश भटांची गझल दमदारपणे शाबूत ठेवलेली दिसते
अलीकडे सुरेश भटांच्या स्कूलमध्ये राहूनही त्यांच्या पुढे जाऊन व आत्ताच्या काळाला समोर जाऊन लिहिलेली उत्कृष्ट गझल लिहिली जातीये ह्यात चंद्रशेखर सानेकर सर्वात महत्वाचा व त्याच्या बरोबरीने किशोर कदम ! मी किशोरला कायमच सांगत असतो कि तू तुझ्या गझला पुस्तकरूपात आण मी चौथी नवता मांडत असूनही गझला पुस्तकात आणू शकतो तर तुला काय प्रॉब्लेम आहे ? पण ऐकेल तर शपथ ! असो
नव्या पिढीत मला कैलास गांधी , प्रणव सखदेव , वैवकू , रुपेश देशमुख हे मला फार दमदार वाटले अर्थात माझ्या मर्यादित वाचनाच्या आधारे मी हे बोलतोय
मी जेव्हा १९८२ पासून गझल लिहायला बसलो तेव्हा समोर ही सुंदोपसुंदी होती माधव ज्युलियन आणि विंदा करंदीकर हे दोघेही कोल्हापूर स्कूलचे कवी असल्याने ह्या फॉर्मचा माझ्यावर प्रभाव पडला पण सुरेश भटांची गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे हीही गोष्ट मला पटली मात्र विंदा करंदीकरांनी जे करायचं टाळलं ते आपण केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि मी मुक्त गझल लिहायला लागलो ह्यात
१ प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे
२ काफिया व रदीफ सांभाळले पाहिजेत
ही तत्वे मी स्वीकारली पण गझल वृतांत लिहिली पाहीजे हे तत्व मी धुडकावले व मुक्त गझलेचा पुरस्कार केला माझ्या आशयासाठी मला ते आवश्यक वाटले जर अभंग ओवी आणि सॉनेटस हे फॉर्म मुक्त होऊ शकतात तर गझलेनंच एव्हढा सोवळेपणा का पाळावा असा माझा सवाल होता आणि श्रीराम पचिंद्रेच्या घरी सुरेश भटांनाच मी तो थेट विचारला होता अजूनतरी ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही असो
१९८७ नंतर माझे गझललेखन जवळ जवळ थांबले एका फटक्यात २० -२५ गझला लिहिणारा मी नंतर फार कमी गझला लिहिल्या एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या माझ्या संग्रहात किमान ३०० मराठी गझला असाव्यात मी एव्हढ्या गझला लिहिलेत हे मलाच माहित न्हवतं मी स्वतःही ह्या संग्रहात त्या प्रथमच एकत्र वाचल्या असो
सांगण्याचे तात्पर्य इतकेच कि गझल लिहिणे हे काही आचरटपणाचे न्हवे तो एक फॉर्म आहे आणि प्रत्येक चांगला कवी फॉर्म आपल्या हिशेबाने घडवत असतो ह्या बाबत ज्यांना शंका आहेत त्यांनी पाश्च्यात्य देशात सॉनेट हा फॉर्म प्रत्येक काळात कसा कसा बदलत गेला त्याचा अभ्यास करावा
बाकी परंपरेच्या दगडावर जाऊन बसण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक काळात असतंच
श्रीधर तिळवे नाईक
it's time consuming . if i get time i will do it.
अशा कामांना वेळ लागतो तारुण्यात अशी कामे करण्यात उत्साह असतो आता म्हातारपणी ह्यापेक्षा अधिक महत्वाची कामे असल्याने जमेल असं वाटत नाही मागे एकदा उर्दूमध्ये मुक्त गझल आहे म्हंटल्यावर उदाहरणे दे म्हणून कॉल आला आणि उदाहरणे शोधावी लागली होती आणि ती पाकिस्तानातली दिल्यावर लोक शांत झाले होते असो मूळ मुद्दा असा आहे कि समजा उर्दूत मुक्त गझल नसती तर मी लिहिली नसती का ? तर लिहिलीच असती किंबहुना लिहिली होती आधीची उदाहरणे लागतात कशाला कि बंडही आधीच्यांना विचारून करायचे असते ?
तू वृत्तात अडकलायस ह्याचं मलाही खूप दुःख होतं मात्र त्याला मी वाईट अपघात म्हणणार नाही कारण वृत्तात लिहूनही मर्ढेकरांनी आधुनिक कविता आणली आहे मात्र वृत्तात अडकल्याने त्यांच्या किती आशयशक्यता हुकल्या हे सांगता येणे अशक्य आहे
तू वृत्तमुक्त गझल मी लिहितो हा गुन्हा मानतोस अपघात मानतोस मी वृत्तबद्ध गझल लिहिणे हा गुन्हा मानतच नाही गझल ही काही वृत्त नाही ती वृत्ती आहे असं बहुदा पु ल नीं म्हंटल होतं वृत्तांनी गझल चांगली झाली असती तर तुलाही सामान्य दर्जाच्या गझलाच जास्त लिहिल्या जातात अशी तक्रार करावी लागली नसती गझल हा माझ्यामते पिंडफॉर्म आहे आणि तो माझ्याकडे असल्यानेच मी गझला लिहितो वृत्त ही गझलेची आवश्यक गोष्ट नाही तर लय ही गझलेची आवश्यक गोष्ट आहे आणि ही लय लिहिताना वाचताना वा सादर करताना ऐकताना जाणवते मी लयात गझल लिहितो वृत्तात नाही वृत्ताची माहिती नसणाऱ्यांना ती वृत्तात नाही हे ऐकताना वा वाचताना जाणवतही नाही ह्याच कारण त्या त्या गझलेची लय मी सोडत नाही बरं संगीताच्या पातळीवर म्हणावं तर मी स्वतः त्या अनेकदा कम्पोझ केल्या आहेत अनेकदा त्या कम्पोझिशनसकट जन्मल्या आहेत तरीही तुमच्यासारख्या वृत्तजडीत लोकांना त्या गझला वाटत नाहीत कारण तुम्ही वृत्तात कैद आहात ही कैद तुम्ही स्वतः स्वीकारली आहे ही कैद तुमच्यातल्या रसिकाची कैद आहे गझलकारांची नाही जर मी गुन्हाच मानत नाही तर सोडण्याचा प्रश्न येतोच कुठं ?

मला प्रश्न पडतो तुम्हाला वृत्तमुक्त गझलेचं ती डॉमिनेट करेल किंवा तिच्या नादाला लागून अनेक मराठी कवी अशा गझल लिहितील आणि तुम्ही मुश्किलीने कमावलेल्या वृत्तप्रभुत्वाला धक्का पोहचेल असं भय तर वाटत नाही ना ? कसं आहे अनेकदा आपल्याला आपला पिंजरा कळत नाही प्रत्येक गझलकाराचा गझलेचा स्वतःचा म्हणून एक पिंडफॉर्म असतो माझा पिंडफॉर्म तुम्हा लोकांच्या पिंडफॉर्मपेक्षा कमालीचा वेगळा असल्याने तुम्हाला तो रसिक म्हणुनही धरवत नाही कारण प्रत्येकाचा गझलेचा पिंडफॉर्म असू शकतो हेच तुम्हाला मान्य नाही माझ्या अनुभवावरून सांगतो माझा पिंडफॉर्म सातत्याने प्रकटत ठेवणे कठीण आहे कारण तसा आशय असेल तरच तो जमतो त्यामुळेच मुक्त गझल लिहिणारे लोक फार कमी निपजतील किंवा मग माझ्यासारखेच पिंडफॉर्म असलेले अनेकजण पुढील पिढ्यात जन्मतील माझ्या पार्टीत सद्यातरी मी एकटाच आहे तुझ्या पार्टीत मात्र एकापेक्षा एक दमदार असे किमान ५ लोक आहेत आणि माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे कारण शेवटी गझल वृत्तबद्ध पद्धतीने वाढो किंवा वृत्तमुक्त पद्धतीने वाढो तिचे चौथ्या नवतेच्या दृष्टीने वाढणे माझ्यासाठी गरजेचे आहे
मर्ढेकरांच्या साऱ्याच कवितांचा आशय ग्रेट न्हवता हे मला मान्य आहे मात्र छछोर म्हणावा इतकाही तो टाकाऊ नाही पाच स्टारच्या भाषेत बोलायचं तर त्यांच्या आशयाला मी तीन स्टार देईन कुठलाही कवी किती कविता लिहितो त्यापेक्षा तो किती ग्रेट किती चांगल्या कविता लिहितो ह्याच्याआधारे त्यांचं मूल्यमापन करायला हवं त्यांच्या गाजलेल्या कविता ग्रेट नाहीत तीन स्टारच्या आहेत उलट पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो सारखी ग्रेट कविताही त्यांनी लिहिली आहे ते जर मुक्तछंदात लिहिते तर त्यांना जे वाटते ते आले असते त्यांची प्रेमप्रकरणे फार कॉम्प्लिकेटेड होती ती त्यांनी मुक्तछंदात जशीच्या तशी ट्रान्सफॉर्म केली असती तरी आशयशक्यतांच्याबाबत खूप काही घडले असते दुर्देवाने त्यांच्यावर केस झाल्याने ते फारच आकसत गेले असो
पुन्हा वृत्तंगझल व मुक्तगझल वाद श्रीधर तिळवे नाईक
प्रिय चंद्रशेखर सानेकर
आपल्यात मुक्त गझलेवरून वाद होतात पण आपल्यातले प्रेम अखंड वाहते राहते हे मला कायमच आनंदाचे वाटते तुझ्या माझ्या वादावरून मराठीत मुक्त गझल विरुद्ध वृत्त गझल असा वाद सुरु झाला आहे कि काय असं वाटलं , असो
पिंडफॉर्मला फितरत किंवा प्रकृती हा शब्द योग्य वाटेल का ह्याविषयी मला शंका आहे फितरतंमध्ये कदाचित पिंड बसेल फॉर्म बसणार नाही प्रकृती म्हणजे कायनात शैवांच्यात शक्ती त्यामुळे तो अतिव्याप्त वाटेल
गझल हा जितका पिंडफॉर्म आहे तितकाच तो लयफॉर्म ही आहे तुला हे मान्य असल्याचे ऐकून बरं वाटलं गझल ही मी कर्त्यांची गोष्ट मानतो हा तुझा आक्षेप बरोबर आहे गालिबही कर्त्यांची गोष्टच मानतो ती कर्त्या -भोक्त्याची मानणारे मात्र भरपूर आहेत तेही ठीक आहे पण गझल ही फक्त भोक्त्याची गोष्ट मानणारे मात्र मला मान्य नाहीत कारण मग लिखाण बाजारू बनते
वृत्तमुक्त गझलेची तुला भीती नाही तर गझलेचा एक नवा फॉर्म म्हणून निदान ऍडमिट करायला हरकत काय आहे ? हा फॉर्म मला मान्य नाही असं तू म्हणू शकतो जोवर तू हे मानत नाहीस तोवर मी तुला भीती वाटते असच मानणार कारण नव्याचा अस्वीकार तीन गोष्टीतून येतो १ नव्याविषयीचे भय २ नव्याविषयीची असुरक्षितता ३ नव्याविषयीचा मत्सर तू इतका चांगला गझलकार आहेस कि तुला असुरक्षितता वाटणे अशक्य आहे तू मत्सरी नाहीस हे तर स्पष्ट आहे मग भयच उरते भयाची अनेक कारणे असू शकतात उदा मुक्त गझल स्वीकारली तर गझल ही गझल म्हणून टिकणार नाही तिचे आत्मसत्व टिकणार नाही वैग्रे खुद्द सुरेश भटांनीच आमच्या वादात हे दोन मुद्दे विशेषतः गझल ही गझल म्हणून टिकणार नाही हे घेतले होते मुंबईच्या आमच्या भेटीत तर तुझा मतला वृत्तात येतो
उदाहरणार्थ
दीप जरासे जळतील मृत्यूनंतर माझ्या
लोक मला हे छळतील मृत्यूनंतर माझ्या
तर तू वृत्त का स्वीकारत नाहीस असा त्यांचा रागीट प्रश्न होता आणि त्यावर माझे उत्तर मी तुमच्याप्रमाणे क्लासिकल डान्सर नाही मॉडर्न डान्सर आहे असे होते
मुक्त गझलेचं तू केलेलं वर्णन ,"पिंजारलेली, अस्ताव्यस्त केशभूषा आणि आंबाडा, वेणी यासारखी छान केशभूषा अशा पद्धतीने केशरचना करता येते." असं करतो मी ते पारंपरिक अंबाड्याच्या आणि वेण्यांच्या वेगवेगळ्या
वेगवेगळ्या केशभूषा नाकारून बॉबकट साधनाकट अशा प्रत्येक शेरानुसार बदलत जाणाऱ्या केशरचनांच्या सामूहिक लयाची वेगवेगळ्या मॉडेल्सची एकसंध पेशकश असं करीन
बाकी एकमेकांचे पिंडफॉर्म मान्य असेल तर तुलना गैर हे मान्यच आहे पण तुझा पिंडफॉर्म आम्ही गझलफॉर्म म्हणून स्वीकारणारच नाही असं म्हणणं ही हुकूमशाही झाली ती कशी स्वीकारणार ? मी एक नवा काव्यप्रकार शोधला आहे असं तुला म्हणायचंय काय ? मग उर्दूतल्या आजाद गझलेचं काय करणार आहात ? तिचीही गझल म्हणून असलेली मान्यता काढून घेणार आहात काय ?
तू म्हणतोस ,"वृत्त आणि वृत्तमुक्त हे दोघेही शूटर. वृत्त म्हणजे टारगेटकडे पाठ करून, डोळ्यावर पट्टी बांधून बुल्स आय शूट करणे तर वृत्तमुक्त म्हणजे जिथून जमेल तिथून जे दिसेल ते शूट करून त्याला बुल्स आय (किंवा टारगेट) मानणे. असं मला वाटतं"
मला वृत्तगझल लिहिणे म्हणजे टारगेटकडे पाठ करणे वाटत नाही उलट एक डोळा टारगेटकडे व दुसरा डोळा वृत्तावर ठेवून केलेले बुल्स आय शूट करणे वाटते व काहीवेळा दोन डोळे दोन ठिकाणी रोखल्याने निशाणा चुकण्याचीच शक्यता आहे ह्याला सुरेश भट किंवा तूझ्यासारखे काही अपवाद असतील पण एरव्ही सगळी वृत्तावर डोळा ठेवण्याची कसरत केल्याने ढासळलेली गझलच जास्त निर्माण झालेली दिसते मुक्त गझलेत दोन्ही डोळे टार्गेटवर असल्याने बुल्स आय टिपण्याचे जास्त चान्सेस आहेत
आता कलानिर्मितीवेळी कुठल्याच कलेत टार्गेट सुस्पष्ट नसते किंबहुना पुढच्या क्षणी आपण काय करणार हा सस्पेन्स असतो टार्गेट स्पष्ट दिसणारे कला आणि कविता त्यात गझलही येते कला कविता व गझल पाडतात आणि मग स्वतःही पडतात
तू म्हणतोस," वृत्त हा पिंजरा आहे तर वृत्तमुक्तता हा पण याच न्यायाने पिंजरा ठरवता येऊ शकेल" हे म्हणजे पिंजऱ्यातून मुक्त झालेल्या पक्ष्याला तुझे मोकळे आकाशही पिंजराच आहे असं सांगणं आहे,
पुढं तू म्हणतोस ,"तूतू वृत्तबद्ध गझलाही लिहिल्या असत्यास तर तुझा वृत्तमुक्ततेचा मुद्दा तुझ्या बाजून अजून स्पष्ट झाला असता. पण तुझी वृत्तमुक्ती आणि तिचा आशय ही मला कवी म्हणून खूप भावलेली आहे इतकं मात्र नक्की. पण तो आशय गझल म्हणून वृत्तात मांडणं हेच मला कायम अधिक सौंदर्यवान वाटेल. ( अधिक काव्यशील आणि चॅलेजिंगही) मुक्तीत मुक्त होण्यात काही मतलब नाही, मतलब बंधनात मुक्त होण्यात आहे. वृत्तवाले ते करतात"
मी हे म्हणजे सती थांबवणाऱ्या माणसाला तू आधी सती जाणं थांबव असं सांगणं आहे असं मी म्हणालो असतो पण मी हे करणार नाही तुला कुणी सांगितलं मी वृत्तबद्ध गझला लिहिल्या नाहीत मी अभंग गझल सुरवातीला बंधन पाळूनच लिहिलेत पण मला त्यातच थांबवेना उर्दूतल्या तथाकथित आधुनिक गझला मी वाचल्या पण त्यात आधुनिकता फक्त औषधापुरतीच सापडायला लागली आणि माझ्या लक्षात आले कि हे लोक आधुनिक प्रतिमा वापरून रोमॅंटिक गझलाच लिहीतायत आणि रोमँटिक रसिकांना त्या त्यामुळेच आवडतायत आपला अनुभव व्यक्त करायला मुक्त होणे गरजेचे आहे मग मी केवळ गझलच नाही तर नज्म ही मुक्त लिहिली (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार मध्ये स्वामी विवेकानंदासाठी २ आणि बसवण्णांसाठी १ अशा अनेक मुक्त नज्म आहेत ) मी अशी सुरवात केल्यानेच चौथ्या नवतेतल्या हेमंत दिवटे किंवा सचिन केतकरसारखं "वृत्तात लिहिणारे मागासलेले असतात" असं म्हणत नाही किंबहुना अभिधा आणि अभिधानानंतर ग्रुपशी माझे जे काही मतभेद झालेत त्यात वृत्तबद्ध लिखाणाला होकार द्यायचा कि नकार ह्यावरून झालेला वाद हा एक मतभेद आहे मी चौथी नवता वृत्तबद्ध आणि वृत्तमुक्त फॉर्मबद्ध आणि फॉर्ममुक्त अशा दोन्ही पद्धतीने मांडता येते हे स्वीकारतो आणि गझल ओवी अभंग हे फॉर्म स्वीकारतो मात्र हे फॉर्म काव्यानुसार बदलले पाहिजे असं माझं मत आहे
तुझं 'तुझी वृत्तमुक्ती आणि तिचा आशय ही मला कवी म्हणून खूप भावलेली आहे इतकं मात्र नक्की.' हे आवडलं त्याबद्दल आभार !किंबहुना आशयाबाबत आपल्यात मतभेद नाहीत फॉर्म मुक्त करायचे कि नाहीत ह्यावरून मतभेद आहेत म्हणजे एका बाजूला मी अभिधानानंतरशी त्यांच्या एकांगी भूमिकेमुळे भांडतो आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याशी !
आता तुला तुझा अनुभव वृत्तात मांडणे सौन्दर्यवान वाटत असेल तर मला ते मान्यच आहे बागा सौन्दर्यवानच असतात पण मला जंगलासारखं जगायला व लिहायला आवडतं आणि आपले सगळे कलाफॉर्म जंगली झाले पाहिजेत असं मला वाटतं हा पिंडाचा तुझ्या भाषेत फितरतचा व प्रकृतीचा फरक आहे पण मित्रा फितरत व प्रकृती दोन्हीही जंगली असतात बागा माणसांचा शोध आहे वृत्ते दरबारी कवींचा शोध आहे एखाद्याचा पिंडच पु शी रेगेंचा शब्द घेऊन म्हणेन बागशाहीचा असेल तर मला तो मान्यच आहे फक्त बागेने जंगलाला नाकारू नये झाडांना वाढवण्याचा मूलभूत प्रकार म्हणून स्वीकारावे
तू म्हणतोस ,"मुक्तीत मुक्त होण्यात काही मतलब नाही, मतलब बंधनात मुक्त होण्यात आहे. वृत्तवाले ते करतात""एखाद्याला बंधनात राहून मुक्ती मिळू शकते त्याला ऑब्जेक्शन नाही गुरूच्या किंवा दर्शनाच्या बंधनात राहून मुक्ती मिळवणारे झालेच आहेत पण जे असे नाहीत त्यांची मुक्ती नव्या पायवाटा निर्माण करणारी ठरली आहे
तू म्हणतोस ,"आपल्या आधी रुमी, मीर, गालिब, डॉ.इकबाल, फिराक गोरखपुरी हे कवी होऊन गेले नसते तर वृत्तमुक्त गझलेचं अस्तित्त्व तगलं असतं. पण या कवींने ते पूर्ण संपवून टाकलंय असं मला वाटतं" ह्यातील रुमी मीर हे पारंपरिक आहेत गालिब , इकबाल व फिराक हे अर्वाचीन आहेत पण आधुनिक नाहीत आणि आपण आधुनिक , उत्तर आधुनिक आणि चौथ्या नवतेच्या कालखंडात जगतो आहोत ह्यातील इकबालनं पाकिस्तानला पाठिंबा दिला ह्याचं मला मुळीच आश्चर्य वाटत नाही कारण तो कधीच पुरेसा पुरोगामी न्हवता आधुनिक तर फार पुढची गोष्ट आहे
तुझ्या ह्या कवींनी आशयाबाबत प्रयोग केले नाहीत म्हणून आपण करू नयेत असं कुठं आहे ? माझा बाप मोबाईल हॅन्डल करायचा नाही म्हणून मीही तो हाताळायचा नाही असं थोडंच आहे ? वस्तुस्थिती अशी आहे कि ज्या इस्लामिक व अरेबिक व तत्सम समाजातून गझल आली तिथे ८ वे शतक ते १२ वे शतक तो ऍडव्हान्स होता पण आता तो समाजच आधुनिक व्हायला तयार नाही तिथं तो गझलेबाबत काय आधुनिक होणार ? शेवटी कुठल्याही कलाफॉर्मचा विकास हा त्या त्या समाजात घडत असतो आता जिथून गझल आली त्यां समाजांनी आधुनिकतेला (खरेतर अर्वाचीन पुरोगामीपणाही स्वीकारायला अजून बरेचसे तयार नाहीत )नकार दिला म्हणून मी का नकार देऊ ? शेवटी मी माझी गझल घेऊन माझ्या आसपासच्या समाजात जगतो आणि समज माझा समाज मागासलेला असेल तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे कि नाही ? ह्या लोकांच्यापुढे आझाद गझल टिकली नाही किंवा ह्यांनी ती लिहिली नाही तर तो विजय नसून त्या त्या समाजाचा त्याच्या कलासंस्कृतीचा पराजय आहे असो
तू पुढे म्हणतोस ,"असो. तुझ्यामुळे गझलेचा अभ्यास झाला रे.
तुला धन्यवाद आणि लव्ह यू श्रीधर".
माझाही गझलेबाबतचा दृष्टिकोन पूर्ण विस्तारपूर्वक मांडायला तुझ्याशी घातलेल्या वादांनी मदतच होते कुठल्याही कलासंस्कृतीत एकमेकांचा आदर राखत असे हेल्दी डिबेट होणं हे फार गरजेचे असते बाकी माझेही प्रेम आहेच
श्रीधर तिळवे नाईक
मुक्तगझल व वृत्तंगझल पुढे ३ श्रीधर तिळवे
वैवकू , धन्यवाद सर
तुम्ही म्हणालात, "वृत्तमुक्त लिहून आशयात काही तरी नवं , मुक्त इत्यादी साधता येईलच दरवेळी हा मुद्दा तर मला निराधार वाटला"
तुम्ही म्हणालात, "वृत्तमुक्त लिहून आशयात काही तरी नवं , मुक्त इत्यादी साधता येईलच दरवेळी हा मुद्दा तर मला निराधार वाटला"
वैवकू , पण प्रयत्न तर त्याच दिशेने केला पाहिजे ना ? शेवटी सृजनशीलता हाच तर सर्व कलांचा आधार आहे नाहीतर लाईव्ह टीव्ही आहेच आजकाल दर मिनिटाला ब्रेकिंग देणारं गझलेत प्रत्येक शेरात त्या त्या गझलकाराची एक इन्साईटहीअसते तशी नसेल तर तो शेर बाळगळतो ही इन्साईट बौद्धिक असेल असं नाही ती भावनिकही असू शकते खरेतर सर्वच कलांना हे लागू आहे मी कुठेही म्हंटलेलं नाही कि फक्त मुक्त गझलेत हे साधते वृत्तंगझलेतही हे साधू शकते पण तिथेही दरवेळी हे साधेलच असं नाही माझा मूळ मुद्दा असा आहे कि गझल हा फॉर्म आहे वृत्त नाही आणि हा फॉर्म वृत्तमुक्तही असू शकतो आणि माझ्याबाबत तो असतो अन आहे
पुढे तुम्ही म्हणताय ,"शेवटी ज्याला ज्या फॉर्म मध्ये परफेक्ट , नेमकं व्यक्त होता येईल तो त्याचा व्यक्तिगत मामला , तुम्ही वृत्तमुक्त जास्त सुंदर लिहू शकाल तर तसे लिहावेत असे वाटते. वाद निरुपयोगी वाटतो"
हा वाद कुठल्याही फॉर्मचा नाही इतर फॉर्ममध्ये तर मी व्यक्त होतोच पण वाद सुरु आहे तो गझल फॉर्मबाबत आणि मी लिहिलेल्या मुक्त गझलांच्यामुळं तो सुरु आहे आणि तो थेट श्रीराम पचिंद्रेच्या घरी माझी सुरेश भटांशी भेट झाली तेव्हापासून सुरु आहे साधारण ८५ -८७ ! परफेक्ट म्हणजे परफेक्ट वृत्तात असं तुम्हाला म्हणायचं आहे काय ? तसं असेल तर मतभेद पण परफेक्ट म्हणजे आशय असेल तर सहमती !
पुढे तुम्ही म्हणताय ,"बाकी मुद्दा असा एक की गझल इस्लामिक समाजासाठी जुनी वगैरे असू देत मराठी समाजासाठी ती आत्ता कुठे बहरात / भरात आलीये म्हणून फॉर्म च्या बाबतीत तुमच्या मनातले नवेपण अजून तिच्यावर सोपवण्यासाठी ती फार कोवळी आहे असे वाटते"
मराठी समाजासाठी मुक्तगझल हे नवेपण अजून तिच्यावर सोपवण्यासाठी ती कोवळी आहे ? जो समाज ऐंशी वर्षे
मुक्तछंद स्वीकारतोय त्याला मुक्त गझल झेपणार नाही ? मी माझ्या गझल वाचल्या आहेत आणि मराठी समाजाला प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम वृत्तात गझल लिहिणाऱ्या गझलकारांच्या गझल हा फॉर्म वृत्तबद्ध असलाच पाहिजे ह्या धारणेत आहे तुम्ही तशी वृत्तगझल लिहा माझे ऑब्जेक्शन नाहीच आहे पण मी मुक्तगझल लिहीत असेन तर ती गझलच न्हवे अशी अमान्यता देणाऱ्या असहिष्णू वृत्तीला माझे ऑब्जेक्शन आहे प्रश्न फॉर्म उत्क्रांत करण्याचा आहे आणि मी तो मराठीत केलेला आहे उर्दूत तो आझाद गझल म्हणून आधीच झालेला आहे आणि त्याला उर्दूत गझल म्हणून मान्यताही आहे मात्र उर्दूत तो मान्य झाला तरी प्रचलित झालेला नाही ह्याचे कारण म्हणून मी इस्लामिक समाजाचा मागासलेपणा अधोरेखित केलेला आहे मराठी समाजही इस्लामिक समाजाप्रमाणे आधुनिक झालेला नाही म्हणून मराठीने मुक्तगझल स्वीकारू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? मी एक अनुभव देतो
मी माझी मुक्तगझल पब्लिकसमोर प्रथम सादर केली होती ती शिवाजी विद्यापीठाच्या फेस्टिव्हलमध्ये न्यू कॉलेजचा स्टुडन्ट म्हणून आणि तिला किमान ५००० विद्यार्थी हजर असलेले डोक्यावर घेऊन नाचले होते दोन वन्समोर होते तेव्हा मराठी समाजाचा प्रतिसाद किती हे मी अनुभवलं आहे आणि त्याला गझल हा फॉर्म आवडतो वृत्तबीत्तशी त्याला फार काही देणंघेणं नसतं हा माझा अनुभव आहे
मराठीत सुनीत हा फॉर्म केशवसुतांनी प्रचंड वापरला उर्दूत तो आझमतुल्ला खानने प्रथम वापरला आणि तो वृत्तातच होता पण पुढे हाही फॉर्म फ्री झाला
फ्री सॉनेट किंवा मुक्त सुनीत ह्याची व्याख्याच " A Sonnet is a verse that is free from metre or metrical structure of poetic lines but having rhyme scheme "अशी केली जाते अशी फ्री सॉनेटस मॉडर्न कवींनी लिहिली आणि ती सहज स्वीकारली गेली उदा पाब्लो नेरुदा ह्या नोबल पारितोषिक विजेत्या कवीचे गाजलेले
Love sonnet XVII
I do not love you as if you were salt-rose, or topaz,
or the arrow of carnations the fire shoots off.
I love you as certain dark things are to be loved,
in secret, between the shadow and the soul.
I love you as the plant that never blooms
but carries in itself the light of hidden flowers;
thanks to your love a certain solid fragrance,
risen from the earth, lives darkly in my body.
I love you without knowing how, or when, or from where.
I love you straightforwardly, without complexities or pride;
so I love you because I know no other way
than this: where I does not exist, nor you,
so close that your hand on my chest is my hand,
so close that your eyes close as I fall asleep
ह्यात इटालियन सॉनेटप्रमाणे १४ ओळींची रचना आहे अंतगन्तव्य आहे पण मीटर नाही
मराठीत मी अशी मुक्त सुनीतंही लिहिलेत आणि मुक्त गझलाही !
वैवकू फॉर्म कवींनी बदलायचे असतात समाज हळूहळू बदल स्वीकारतो माधव ज्यूलियननी गझल ही बाहेरून आणली तेव्हाही हे बाहेरचे फॉर्म कशाला असं विचारणारे होतेच पण तो फॉर्म रुजलाच आता तो आधुनिक करायची वेळ झालीये आणि त्यासाठी मराठी समाज तयार आहे तुम्ही तयार आहात का कि गझलकार पाकिस्तानपेक्षा मागासलेले आहेत ? पाकिस्तानात मुक्त गझलेला निदान आजाद गज़ल म्हणून मान्यता आहे तुम्ही तीही द्यायला तयार नसाल तर तुम्ही पाकिस्तानपेक्षा कर्मठ व मागासलेले आहात असंच मी म्हणणार
तुम्ही म्हणता ,"टेक्निकल मुद्दा असा एक सुचला की इथे वृत्तमुक्त बद्दल चर्चा झाली यमकमुक्त बद्दल का नाही झाली 🤔 आपण पूर्वी मला फोनवर बोलताना म्हटलं होतं की वृत्त (लय नव्हे फक्त वृत्त) तुम्ही पाळत नाही पण यमक असतं त्यात... मग मुक्त म्हणजे पूर्णच मुक्त जर करता आली तर करावीत गझल असे एक सुचवू का 🙏🏻😍"
मी यमकमुक्त गझलही लिहिली आहे जेव्हा तशी आपोआप आली पण सर्वसाधारणपणे फ्लो मध्ये यमके येतात आणि मी फ्लो तोडत नाही मात्र यमकाबाबत अलामत वैग्रे सोडून आपण मराठीची यमकरचना स्वीकारायला हवी असं माझं मत आहे
पुढे तुम्ही लिहिता ,"असो
तुम्ही लिहिलं हे आवडलं! गझलबद्दल मराठीत कवींमध्ये अशा अधिकाधिक सकस चर्चा घडवून याव्यात हे स्वागतार्ह आहे
खूप खूप आभार तिळवे सर "
मीही आभारी आहे निदान कम्युनिकेशन सुरु आहे हेही चांगलं आहेच मला तुमच्या गझला आवडतात म्हणून इतकं तपशीलवार उत्तर दिलंय धन्यवाद
अनंत ढवळे कॉमेन्टबद्दल धन्यवाद
तुम्ही लिहिता ,"ही पर्सनल चर्चा असल्याना बोलावे की नाही या संभ्रमात होतो - पण ओपन फोरम असल्याने बोलतो आहे. पिंडफॅार्म / लयफॅार्म अशा ढोबळ व्याख्या आपण दोघे करताहात याचे मला आश्चर्य वाटते. गझल म्हणजे आग आहे / जाळ आहे / थ्रिलर आहे अशा भयंकर एंडॅार्समेंट्स देखील अधनमधन ऐकल्या आहेत."
गझलेच्या फॉर्मची व्याख्या आणि विशेषता काय ह्याची चर्चा सर्व गझलकारांनी नेहमीच केली आहे
किमान चार किंवा भट म्हणतात त्याप्रमाणे किमान पाच द्विपदिंची ही रचना आहे हे सर्वांना मान्य आहे रदीफ काफिया मान्य आहे
माझे मतभेद वृत्तापासून सुरु होतात आणि त्यामुळेच ह्या चर्चा होतायत वृत्त ही गझलेची अनिवार्यता नाही असं मी मानतो
माझ्या मते प्रत्येक फॉर्मची स्वतःची एक फॉर्मलय असते आणि गझलेलाही ही फॉर्मलय आहे आणि ह्या गझलेच्या फॉर्मलयीमुळेच गझल ही गझल वाटते आणि त्यामुळेच गझल हा लयफॉर्म बनतो ही लय जंगली असू शकते किंवा बागशाही असू शकते तिचा आधार उन्मादक तीव्रता ज्याला उर्दूत जुनून म्हणता येईल असतो
पिंड म्हणजे आपल्या जनेटिक मटेरियलची ऍक्टिव्ह संरचना ! ह्या संरचनेला आवडणारे फॉर्म असतात त्यांना मी पिंडफॉर्म म्हणतो काव्यात असे जे फॉर्म असतात त्यांना काव्यप्रकार म्हणजे काव्यफॉर्म म्हणतात प्रत्येक कवीचे असे पिंडफॉर्म असतात गझल हा त्यापैकी एक पिंडफॉर्म आहे
तेव्हा गझल म्हणजे जाळ वैग्रे अशा टाईप हे काही चाललेलं नाही
तुम्ही म्हणता ,"दुसरे म्हणजे हे की इक्बाल हा नज्मचा मोठा शायर होता, गझलचा नाही."
ह्याच तर्काच्या आधारे गेलं तर गालिबच्या उर्दू गझलाची व्याप्ती ही त्याच्या एकंदर लिखाणाच्या धड पाच टक्केही नाहीत आणि जर गुणवत्तेच्या आधारे बोलायचे असेल तर इकबालने नवी अर्वाचीन गझल सुरु केली किंवा नवी गझल सुरु करणाऱ्या तीनपैकी तो एक होता हे सर्वमान्य आहे त्याची
सितारोंसे आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं
तही ज़िन्दगी से नहीं ये फ़ज़ायें
यहाँ सैकड़ों कारवाँ और भी हैं..
ही माझी आवडती गझल आहे
त्याच्या नज्म अधिक ग्रेट आहेत हे मलाही मान्य आहे पण कधी कधी काय असतं कसोटीतील ग्रेट ५० -५० मध्ये सेंच्युरी मारून जातो इकबालने गझलमध्ये अशा सेंच्युरीज मारल्या आहेत
पुढे तुम्ही म्हणताय ,"मुक्त गझल लिहिली गेली पाहिजे यात काही शंका नाही. उर्दूतल्या अनेक आजाद गझल ह्या ‘वृत्तातले प्रयोग’ आहेत. पण संपूर्णतः मुक्त अशी गझल लिहिली जाणार असेल तरी ते ही ठीकच आहे."
मुक्त गझलेला चर्चा सुरु झाल्यापासून थेट आणि स्पष्ट पाठींबा देणारे बहुदा पहिले तुम्हीच आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो
आता मी प्रणव कडे वळतो
प्रणव , तू तर नव्या पिढीतला माझा आवडता कवी आहेस
तू लिहितोस ,"मुक्तछंदात्मक कविता किंवा वृत्तबद्ध गझल दोन्हीत आशयाकडे डोळा नसेल तर काय घडतं हे आपण बरेचदा पाहतो, त्यामुळे मुक्त गझलेच्या फॉर्ममध्ये प्रयोग केले पाहिजेत असं मला वाटतं. त्यासाठी वृत्ताचा ढाचा किती वाकवायचा की तो मोडून खायचा, हा कळीचा प्रश्न आहे. काही प्रमणात त्या त्या कवीवरही अवलंबून. मला वाटतं की त्यासाठी सुरुवात ही हा ढाचा वाकवून तर पाहू या, या शक्यतेपासून होते, ही शक्यता पेरण्यातून. ही पेरणी या अशा निखळ चर्चेतून होऊ शकते, त्यामुळे असे वाद आवश्यक आहेत.
व्यक्तिशः मला कवी म्हणून वृत्त लवचिक करून गझल लिहायची आहे, तसे प्रयत्नही केले पण काही एक आशय त्या 'लगागा'त मावेना होतो हा अनुभव आहे, मग अशा वेळी मोडूनच खायचे आहे तर वृत्तच कशाला अख्खा कविता हा फॉर्म मोडून खायचा प्रयत्न करू या असं होतं. अर्थात प्रत्येक कवीच्या भुकेचा हा प्रश्न आहे "
मुक्त गझलेची आवश्यकता तुला पटली हे वाचून बरं वाटलं प्रश्न गझल किंवा इतरही कुठला वृत्तफॉर्म किती वाकवायचा कि पूर्ण मोडून खायचा हा असतोच जेव्हा तो वृत्तफॉर्म पूर्णच मोडून खायची गरज निर्माण होते तेव्हा तो फॉर्म फॉर्म राहतंच नाही तो मुक्तछंद फॉर्म होऊन जातो त्यामुळे वृत्तफॉर्म किती वाकवायचा हाच प्रश्न उरतो माझे ह्या संदर्भातले उत्तर असे कि हे प्राचीन वृत्तफॉर्म जर वृत्तमुक्त केले तर हवे तसे वाकवता येतात आणि फॉर्मही शाबूत ठेवता येतो पुढे पुढे अख्खा कविता हा फॉर्मही मी मोडून खाल्लाच आहे पण जेव्हा आशयाची डिमांड होती तेव्हा !
बाकी भुकेचा मुद्दा आहेच पण भुकेतून मुक्त होण्यासाठीही फॉर्म मोडला जाऊ शकतो किंवा कविता संपूर्ण मोडून खाल्ली जाऊ शकते कविताच काय अख्खी कलाही !
मित्रांनो प्रतिसादाबद्दल धन्यवाद
श्रीधर तिळवे नाईक
साने गुरुजींची कविता आणि गझलत्व
गजलेचा विचार करताना ज्या काही गोष्टी गझल सदृश्य पुढे येतात त्यांचा विचार तुम्ही करायलाच लागतात या दृष्टीने काही रचना नेहमीच पुढे आलेले आहेत त्यातील एक रचना म्हणजे साने गुरुजी यांची ही कविता ती पुढील प्रमाणे आहे
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
तयाने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
- साने गुरुजी
हिला गझल म्हणता येईल का हा एक फार मोठा प्रश्न असतो
जगाला प्रेम करणे हा एकच विषय इथे आहे त्यामुळे पुढचा प्रश्न निर्माण होतो की ही एक विषयी गझल आहे का
जर संपूर्णपणे प्रत्यक्ष स्वतंत्र प्रत्येक शेर स्वतंत्र अशी अट मानली तर कदाचित हिला गजल म्हणता येणार नाही अशा प्रकारच्या रचना पूर्वी पंडित लोकांनी केलेल्या दिसतात माझ्या मते गजलेचे जे काही सौंदर्य आहे त्यामध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र असणे हे एक मुख्य सौंदर्य आहे किंबहुना माझ्या मते गजलेचे गजलेचे खरे सौंदर्य विधान हेच आहे बाकी सर्व गोष्टी तशा दुय्यम आहेत कदाचित आणखी एक अट ठेवता येईल ती म्हणजे यमक आणि अंत्य यमक जुळले पाहिजे याशिवाय च्या सर्व अटी या माझ्या मते दुय्यम आहेत आणि अंत्य यमक ही आट पाळली गेलेली आहे पण शेर संपूर्ण स्वतंत्र असणे हे घडलेले दिसत नाही म्हणूनच ही गझल नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment