परकीय वाङ्मय आकार व प्रकारासाठी परकीय भाषा येणे आवश्यक आहे काय ? श्रीधर तिळवे नाईक सदानंद डबीर ह्यांनी अलीकडे लोकसत्तात एक प्रतिक्रिया लिहुन नको ती खळबळ उडवलेली आहे मराठीतील मूर्खपणा किती खालच्या थराला जाऊ शकतो त्याचा हा नमुना आहे आणि चर्चेचा विषय काय तर सुरेश भटांना उर्दू येत होती कि नाही आणि त्यामुळे त्यांनी चुका केल्या कि नाहीत अनेकदा जेव्हा एखादा कवी एखादा काव्यप्रकार एखाद्या परकीय भाषेतून घेऊन येतो तेव्हा त्याला ती परकीय भाषा येत असते म्हणजे इंग्लिशमधून सॉनेटस येणे किंवा माधव ज्यूलियनांनी फारसीतुन गझल आणणे काही वेळा ज्या परकीय भाषेतून ती आलेली असते त्या भाषेनेही तो प्रकार कुठल्यातरी भलत्याच भाषेतून आणलेला असतो उदाहरणार्थ सॉनेट हा प्रकार सूर्याला वाहिली जाणारी सूक्ते ह्या रूपातून विकसित झाला आणि ज्या इटालियन भाषेच्या इतलो दालमिशियन ह्या सिसिलियन पोटभाषेत जियकोमो लेंटिणी ह्या कवीने तो जन्माला घातला ती भाषा आता जवळपास मृतप्राय झालेली आहे पण म्हणून कोणी यूरोपमध्ये सॉनेटस लिहिणाऱ्यांना तुला इतलो दालमिशियन ही मूळ भाषा येते का असं विचारलं नाही फ्रेंचांनी आपली सॉनेट...
Posts
- Get link
- X
- Other Apps
प्रबोधनात (Enlightenment ) अडकलेल्या नवता आणि आधुनिकतेचा प्रश्न मराठीत ज्यांनी नवता मांडायच्या त्यांनीच नवतेचे साहित्यही निर्माण करायचे अशी वहिवाट थेट ज्ञानेश्वरांपासून निर्माण झालेली दिसते त्यामुळे जेव्हा ब्रिटिश राजवटीत पुन्हा प्रबोधनाला चालना मिळाली आणि एतद्देशीयांना विज्ञानाचा मुख्य म्हणजे फ्रान्सिस बेकनने मांडलेल्या सायंटिफिक मॅथोडोलॉजिचा अप्रत्यक्ष परिचय झाला तेव्हा त्याचे पडसाद कलेत उमटणे अटळ होते मराठीतील प्रबोधनवादी नवता लोकहितवादी , फुले , जांभेकर प्रभुतींनी सुरु केली असली तरी साहित्यातील त्याचा पहिला पडसाद फुल्यांच्या कवितेत आणि तृतीय रत्न (१८५५)ह्या नाटकात उमटला फुल्यांचे समकालीन साहित्यिक क्लासिसिजममधेच अडकले रॅशनॅलिझमकडे वळलेच नाहीत फुल्यांना कादंबरी लिहिता आली न्हवती ती कसर बाबा पदमजी ह्यांनी यमुनापर्यटन (१८५७) लिहून भरून काढली पुढे विसाव्या शतकात बळवलेली पहिली रोमँटिक नवता केशवसुतांनी निर्माण केली त्यांनी कवितेवर कविता लिहूनच आपल्या नवतेची मांडणी केलेली दिसते वास्तविक ह्या काळात मराठीत कलेचा शास्त्रशुद्ध शोध सुरु व्हायला हवा होता पण तो झाला नाही फ्रान्सिस...
- Get link
- X
- Other Apps
संतोष पवार हे सर्व एकाच पातळीवर समजून घेणे खूप कठीण आहे, साहित्य,प्रेम,नाते, गुरू-शिष्य परंपरा, मान्यता, अधिक्षेप, मतभेद, काव्यपरंपरा, शत्रू-मित्रभाव, वाड्मयाच्या गावातील अनेकानेक आंतरविरोध हे सर्व एकात एक मिसळले जात आहे. या पद्धतीने मराठीचा वाड्मय इतिहास लिहिला जाऊ शकतो काय ? कारण 1990 ते 2009 हा मराठी कवितेचा कालखंड आपण इथे आणला आहे. आणि हा व्यवहार मोजक्या लोकांच्या मध्ये घडला आहे. याला वारकरी चळवळीसारखे परिमाण कदापिही येऊ शकत नाही. अनेक भूमिका एकात एक मिसळून टाकल्याने वाचकाच्या हाती गावणारे चौथ्या नवतेचे म्हणून काय शिल्लक राहते? एक श्रीधर तिळवे- व्यक्ती आणि वाड्मय हा प्रकल्प कुणी आकाराला आणून देईल तर फार मोठे उपकार होतील, चित्रे हे चरित्रवादी कवी होते, त्या अर्थाने आपण त्यांचे अनुयायी आहात. आपले सर्व आयुष्य कवितेत त्यांनी ओवले, तुम्हीही तेच करत आहात. पण तुम्ही समकालीन समीक्षेला देखील या क्षेत्रात आणल्याचे श्रेय तुम्हाला द्यावे लागेल... त्या अर्थाने चिकित्सा करणारे, कुणी पाध्ये, पुंडलिक, पाटणकर,धोंड, हे नाहीतच आता.गेला बाजार राजाध्यक्ष, थोरात तरी पुढे येतील की नाही ही ...
- Get link
- X
- Other Apps
दिलीप चित्रे गेले तेव्हा दिलीप चित्रे ह्यांचे १० डिसेंबर २००९ रोजी झालेले निधन हा मला वैयक्तिक धक्का होताच पण त्यांच्या निधनाने आमच्या पिढीशी ज्यांचा सुसंवाद आणि वाद दोन्ही चालू होते असा एक साहित्यिक निघून गेला ह्याचे दुःखद फीलिंगही होते . आमच्या दोघांचे संबंध अलीकडे काहीसे तणावग्रस्त झाले असले तरी एकमेकाविषयीचा आदर कायम होता संस्कृतीचा विचार मराठी संस्कृती म्हणून व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता इंग्रजी भाषेत लिखाण करणे हे मराठी संस्कृतीला कसे काय उन्नत करते हा माझा प्रश्न होता . मी ह्या अंगाने त्यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केल्याने ते व्यथित झाले होते पण माझ्या मते एकतर देशीवादाचा ...