चौथी नवता चौथीच का श्रीधर तिळवे नाईक मराठीत पहिली दुसरी तिसरी चौथी अशा तऱ्हेची इतिहास मांडणी करण्याची परंपराच नाही साहजिकच पहिली नवता दुसरी नवता असं म्हंटल कि लोक दचकतात पाश्चात्य देशात मात्र १९६० नन्तर अशी मांडणी कॉमन होत गेली विशेषतः अल्विन टॉफ्लरच्या थर्ड वेव नंतर अशी मांडणी लोकप्रिय झाली आपल्याकडे द भि कुलकर्णी ह्यांनी पहिली परंपरा दुसरी परंपरा अशी मांडणी केली व ह्या नावाचे ग्रन्थही लिहिले विशेषण वापरण्याऐवजी संख्यात्मक मांडणी का केली गेली ह्याचे कारण एकाच काळात एकच मांडणी निर्माण होण्याचा काळ ओसरला होता मी अगदी सुरवातीला जालता हा शब्द वापरायचो पण तो डोक्यावरून जायला लागल्यावर परिचित काही शोधायला हवे म्हणून मी द भि कुलकर्णी ह्यांचा वारसा पुढे न्हेत १९९२ च्या नव्यांच्या अक्षर चळवळीत (संपादक अरुण म्हात्रे ) प्रथम चौथी परंपरा हा शब्द वापरला होता पण परंपरा हा शब्द कोणीच द भि च्या अर्थाने घेत नाही म्हंटल्यावर नवता हा शब्द वापरायला सुरवात केली त्याआधी विशेषण वापरतांना चौथी हा शब्द वापरला कारण करंट ट्रेंड तसाच होता उदाहरणार्थ ह्या काळात मानसशास्त्रात वर्तनवादी शाखेत वर्तनवादी थ...
ESSENCE OF TIKAHARAN : A CRITIQUE OF BHALCHANDRA NEMADE
Popular posts from this blog
इब्सेन आणि बेकेट श्रीधर तिळवे नाईक सर्वसाधारणपणे मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत मी दरवर्षी इजम शिकवतो पण ह्यावर्षी ऐनवेळी मंगेश बनसोड ह्याने दोन लेखक शिकवण्याची दोस्तीगळ घातली आणि मला हेन्रिक इब्सेन आणि सॅम्युएल बेकेट हे दोन लेखक शिकवण्याची वेळ आली आजारपणामुळे तयारीला वेळच मिळाला नाही आणि कमी होत चाललेल्या स्मरणशक्तीच्या जीवावर एक तासाची आठ व्याख्याने देण्याची वेळ आली पीएचडीला केलेले संशोधन ऐनवेळी स्मरत गेले आणि व्याख्याने रंगली एखादा लेखक प्राध्यापक लोक कसा शिकवतात हे मला माहित नाही पण दोन तास त्या लेखकाची क्रिएटिव्ह प्रोसेस उलगडायची आणि दोन तास प्रत्यक्ष कलाकृती असे काहीतरी झाले हेन्रिक इब्सेनची क्रिएटिव्ह प्रोसेस विलक्षण !अस्तित्ववादाचा प्रभाव किर्केगार्द वाचून त्याच्यावर पडला आणि पन्नासाव्या वर्षी त्याला त्याचे क्रांतिकारी नाटक सापडले आयुष्यभर आपल्या ईल्लेजिमेंट मुलाच्या परतण्याच्या शक्यतेचे भय त्याचा कायमच पाठलाग करत राहिले नित्शेच्या ट्रॅजेडीवरच्या विचारांनी ग्रीक ट्रॅजेडीविषयीचे त्याचे आकलन बदलले आणि शेक्सपियरन ट्रॅजेडीतून त्याची प्रतिभा मुक्त झाली लिखा...
बा सी मर्ढेकर मर्ढेकर हे व्यक्तिमत्व एक विलक्षण रसायन होते . एकीकडे जुन्या छंदात विशेषतः पादाकुलक अभंग ओवीत ते नवी कविता लिहीत होते आणि दुसरीकडे नवे सोंदर्यशास्त्र रचत होते मराठीची एक परंपरा अशी कि दोन पातळीवर कोणी काम करत असेल तर त्या कवीची कविता साईडलाईन करायची आणि आणि त्याला समीक्षक म्हणून जास्तीत जास्त गाजवायचे मर्ढेकरांच्या बाबत हेच घडले आणि मराठीत त्यांच्या कवितांची चर्चा कमी आणि सौन्दर्यशास्त्राची चर्चा जास्त झाली ह्याला छेद साठोत्तरी पिढीने दिला आणि मर्ढेकरांच्या कविता चर्चेत आणायला सुरवात केली त्यांनी मर्ढेकरांचे सौन्दर्यशास्त्र साईडलाईन केले आणि कवितेतला आधुनिकतावादी आशय केंद्रस्थानी आणला . मात्र एका मुद्दयांवर चर्चा झालीच नाही तो मुद्दा म्हणजे कवितेत पक्के आशयवादी असणारे मर्ढेकर समीक्षेत आकृतिवादी का झाले ? ह्या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन कवितेच्या स्थितीत आहे . रोमँटिसिझमने भारावलेल्या त्या कालखंडात रोमँटिक भावना असली म्हणजे काम भागते अशी गैरसमजूत पसरली आणि रविकिरण मंडळाच्या त्याच त्याच प्रतिमा जुन्या कढीला नवा ऊत आणावा तश्या नवा ऊत आणून साद...
Comments
Post a Comment