बोधनशीलतेची नऊ अंगे आणि मराठी बौद्धिक कविता :श्रीधर तिळवे -नाईक

बोधनशीलता ही शारीरिक , बौद्धिक , भावनिक , आत्मिक , काल्पनिक , कृतीक , कालिक ,अवकाशीक ,अवस्थिक अशा नऊ अंगानी अभिव्यक्त होत असली तरी फेसबुकवर आणि मराठी साहित्यात  अद्यापही भावनिक आणि काल्पनिक अंगाचा गवगवा आहे . रोमँटीसिझमने भावनिक काव्याचा आणि सररिऍलिझमने काल्पनिक काव्याचा गवगवा प्रचंड वाढवला आणि साठोत्तरी मराठी कवी ह्यां  गवगव्याच्या कचाट्यात सापडले . नवीन पिढी ह्यातून सुटलेली दिसत नाही . अपवाद मार्क्सवादी आणि दलित कवितेचा . प्रतिमावादी सत्यकथीय  समीक्षेने कायमच  भावनिक आणि काल्पनिक कवितेला  पाठिंबा दिला . ह्यांनी  मार्क्सवादी आणि दलित कवितेतील भावनिक आणि काल्पनिक कवितेला प्रमोट केले . फेसबूकवरील अनेक लोक हाच उद्योग करतायत आणि त्यामुळे नवीन कविता बौद्धिक कवितेपासून पळून जाणार कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे . हे होणे योग्य न्हवे कारण त्यातून कविता एकाच अंगाने वाढण्याचा धोखा निर्माण होतो . कवितेवरचा बौद्धिक अंकुश नष्ट झाला कि प्रतिमावादी साहित्याचे पेव फुटते हा इतिहास आहे .

मला कवितांचे वर्गीकरण करतांना जाणवलेली गोष्ट म्हणजे कलावंताचा त्याच्या अवकाशाशी घट्ट संबंध असतो
अवकाश पूर्वी पाच  प्रकारचा होता
१ वैश्विक
२ जागतिक
३ स्थानिक
४ पोटिक
५ पोटस्थानिक

वैश्विकतेचे नाते हे अनंत शून्य पूर्ण अशा असण्याशी असते आणि त्यातून जन्मलेल्या कविता ह्या अध्यात्मिक अस्तिवाचक असतात
१९९० नंतर आपण सर्वच जागतिक अवकाशाशी जोडले गेलेले आहोत ह्यातील मुंबईसारखी महानगरे ही जागतिक अवकाशी बनलेली दिसतात
ह्याउलट कोल्हापूर सांगली सातारा सारखी शहरे मात्र आपली स्थानिक ओळख पुसू द्यायला तयार नाहीत त्याचबरोबर ती जागतिक अवकाशाने भारीत आहेत त्यामुळे त्यांचा  अवकाश जास्थानिक बनलेला दिसतो

गावातील संस्कृती मात्र मात्र जास्थानिक बनतांना दिसते पण इथे स्थानिक अवकाश अजूनही प्रबळ दिसतो

पोटिक अवकाश हा वैश्विक , जागतिक  आणि स्थानिक  अवकाशात त्याचा पोटावकाशी म्हणून वावरत असतो म्हणजे तुकारामाचा अवकाश हा पोटवैश्विक अंडरवर्ल्ड हा अवकाश पोटजागतिक  तर स्त्रियांचा व दलितांचा अवकाश हा पोटजागतिक किंवा पोटस्थानिक म्हणून वावरत असतो

आदिवासी जमातींचा किंवा भटक्यांचा अवकाश हा पोटस्थानिक अवकाश म्हणून वावरत असतो

कलावंताचा अवकाश बदलला कि अनेकदा त्याची कला बदलते











प्रवीण बौद्धिक कवितेतही प्रतिमा असते  . बौद्धिक कवितेतही चांगली आणि वाईट कविता असते .
तुळशी परब हा सर्वोत्कृष्ट बौद्धिक कवी होता




Comments

Popular posts from this blog