DIVYAMARATHI SCIENCE AND LITERATURE

जेव्हा प्रस्थापित तुमच्या लेखनाला चटकन स्वीकारून मान्यता देतात तेव्हा त्याचा स्पष्ट आणि स्वच्छ् अर्थ तुम्ही त्यांना फारसे च्यालेन्जींग वाटत नाही असा असतो .

·        
alt="माझे शहर|Local" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1026">
माझे शहर

·         alt="महाराष्ट्र|Maharashtra" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1027">महाराष्ट्र

·         alt="क्रिकेट|Cricket" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1028">क्रिकेट

·         alt="देश|National" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1029">देश

·         alt="ओरिजनल|DvM Originals" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1030">ओरिजनल

·         alt="विदेश|International" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1031">विदेश

·         alt="मनोरंजन|Entertainment" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1032">मनोरंजन

·         बिझनेस|Businessबिझनेस

·         alt="जीवन मंत्र|Jeevan Mantra" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1034">जीवन मंत्र

·         alt="टेक-ऑटो|Tech-Auto" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1035">टेक-ऑटो

·         alt="स्पोर्ट्स|Sports" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1036">स्पोर्ट्स

·         alt="लाइफस्टाइल|Lifestyle" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1037">लाइफस्टाइल

·         alt="ओपिनिअन|Opinion" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1038">ओपिनिअन

Download App from

alt="Download android app - Divya Marathi" loading=lazy v:shapes="_x0000_i1039"> alt="Download ios app - Divya Marathi" loading=lazy v:shapes="_x0000_i1040">

Follow us on

·        

 

·        

 

·        

 

·        

 

·         Marathi News

·         Article On Astrology By Shridhar Tilve, Divya Marathi

ज्योतिषशास्त्राचे साम्राज्य

8 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

जगात अध्यात्माचा उदय होऊ लागल्यानंतरनियतीया संकल्पनेला आव्हान दिले गेले. माणसाचे आयुष्य हे नियतीकडून नियंत्रित होत नसून, ईश्वराकडून किंवा देवांकडून नियंत्रित होते, ही संकल्पना त्यापाठोपाठ उदयाला आली. त्यातूनचदैवही संकल्पना आकार घेऊ लागली. दैवाचा अर्थच मुळी जे देवाने दिले ते, असा होतो. नियती देवांनाही बदलता येत नाही, पण दैव मात्र देव बदलू शकतो. देवाला प्रार्थना केल्यास देव तुमची नियती बदलतो, या धार्मिक विश्वासाच्या आधारातूनच प्रार्थना ही क्रिया अधिकाधिक प्रभाव गाजवायला लागली. साहजिकच या दैव संकल्पनेचा (आपल्याकडीलरामायणआणिमहाभारतावर या दैव संकल्पनेचा प्रचंड प्रभाव आहे.) प्रभाव तत्कालीन साहित्यावर पडला. माणसाचे भविष्य देव ठरवत असल्याने साहजिकच भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणे, हा एक जीवनाचा उपचार बनला.
या आध्यात्मिक धारणेतूनच अनेक शास्त्रे जन्मली. पण शास्त्राला तर्काचा आधार द्यावा लागतो. केवळ आंधळ्या विश्वासापोटी शास्त्र एखादी गोष्ट स्वीकारत नाही. शास्त्र तर्काच्या आधारे पडताळणी करते. मात्र शास्त्राच्या आधारे सिद्ध झालेले सत्य हे विज्ञानाच्या कसोटीवर टिकेल, याची मात्र कधीच खात्री नसते. किंबहुना, शास्त्रातील अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचेही पुढे सिद्ध झाले आहे. प्रथम अध्यात्म, मग दर्शन, मग त्या दर्शनाच्या आधारे शास्त्र आणि मग शास्त्राच्या आधारे धर्म अशी मांडणी या काळात विकसित झाली. याच काळात शास्त्र म्हणून इतिहासाचा उदय झाला. भविष्यात जिज्ञासा असणा-या माणसाने भविष्य सांगण्याचे शास्त्र (भविष्यविज्ञानाच्या इतिहासात पायाभूत मांडणी करणारा काळ म्हणून हा काळ बघितला जातो.) निर्माण करता येईल का, याची चाचपणी करायला सुरुवात केली.
या धार्मिक कालखंडात भविष्यविज्ञानाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. ग्रीसमध्ये प्लेटोने भविष्याचा वेध घेणारा युटोपिया प्रथमच निर्माण करत भविष्याचा शास्त्रशुद्ध विचार करता येणे शक्य आहे, हा विचार दिला. भारतात याच दरम्यान भविष्यपुराण लिहिले गेले. हे भविष्यपुराण कोणी लिहिले, हे माहीत नसले तरी भारतीय भविष्यविज्ञानाच्या इतिहासातील हे पहिले पुस्तक म्हणून त्याची आवर्जून नोंद घ्यावी लागते. या भविष्यपुराणाने सर्वात प्रचलित केलेली कल्पना म्हणजे कलियुग.
या काळातील सर्वात प्रभाव टाकणारे भविष्यविज्ञानाच्या अंगाने उदयाला आलेले शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिष हे शास्त्र आहे की विज्ञान की थोतांड, हा वाद गेली कित्येक दशके महाराष्ट्रात चाललेलाच आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपश्चात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ज्योतिषशास्त्राकडे पाहायला वेळ नसला तरी, एकेकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषशास्त्राच्या विरोधात मोहीम सुरू केली होती, हे सर्व जाणतातच. माझ्या मते, ज्योतिष हे विज्ञान नाहीच. त्याला वैज्ञानिक दर्जा द्यायचा, जो काही प्रयत्न चाललेला आहे तो व्यर्थ आहे. मात्र ज्योतिष हे शास्त्र म्हणून कायमच राहील, असे मला वाटते. अर्थातच, ज्योतिषी या जमातीने या शास्त्राची रया पूर्णपणे घालविलेली आहे. तर्कशास्त्राचा आणि ज्योतिषांचा काही संबंध उरलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिका युरोपमध्ये या संदर्भात अधिक खोलवर अभ्यास सुरू आहे. मात्र ज्योतिष ही काहीतरी प्रयोगशाळेत सिद्ध होणारी गोष्ट आहे, असे मानणे जोपर्यंत ज्योतिषी सोडून देत नाहीत, तोवर त्या शास्त्रावर वादविवाद होणे अटळ आहे.
खरे तर ज्योतिष हे ओपन असावे. मात्र विज्ञानाचा दर्जा त्याला कधीही देऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे. भविष्याचा वेध घेऊन त्या संदर्भात काही कृती करता येणे, ही शक्यता माणसाने कधीच सोडू नये, या संदर्भात जितके संशोधन करता येईल तितके करावे आणि सर्व पर्याय खुले ठेवावेत. ज्योतिषाचा केवळ एक पर्याय म्हणून विचार करावा, हाच यातला खरा मध्यममार्ग आहे.
साहित्यात या संदर्भात सर्वाधिक गाजलेली कृती म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर यांचेकालाय तस्मै नम:’ हे नाटक. या नाटकाने इतके यश मिळविले की पुढे त्याच्यावर अमोल पालेकर यांनीअनकहीनावाचा सिनेमा काढला. अर्थातच, किरकोळ पातळीवर मराठी साहित्यात ज्योतिषशास्त्राचा उल्लेख येत असला, तरी प्रत्यक्ष साहित्यात मात्र ज्योतिषशास्त्राचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही.
सर्वाधिक गमतीचा भाग म्हणजे, साठोत्तरी साहित्यिकांच्या पिढीमध्ये भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, चंद्रकांत पाटील हे उत्तमज्योतिषीआहेत. यातील चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या समकालीन लेखकांच्या कुंडल्यांचा सांगोपांग अभ्यास करून त्यावरून एक लेखही लिहिला होता. अर्थातच, अशा प्रकारच्या मांडणीला दाद देणे हे मराठीत मागासलेपणाचे समजले जात असल्याने त्यावर फार चर्चा झाली नाही. गमतीचा भाग असा की, या लेखकांच्या प्रत्यक्ष साहित्यात मात्र ज्योतिषशास्त्राचा फारसा प्रभाव दिसत नाही. मात्र अनेक कवींच्या कवितांत हास्यरेखा, हातावरचे उंचवटे, हातातले खडे, बोटांचा ज्योतिषीय अर्थ, शनीची साडेसाती, मांगलिक असणे यांसारख्या अनेक संकल्पनांचा मार्मिक वापर झालेला दिसतो. मात्र नियती या संकल्पनेचा जेवढा प्रभाव साहित्यावर पडला आहे, तेवढा दैव ज्योतिषशास्त्र यांचा पडलेला नाही. यामागचे कारण उघड आहे. ज्योतिष हे तर्ककर्कश आहे, तर नियती ही संकल्पना कलात्मक आहे. साहजिकच तिचा कलात्मक वापर अधिक चांगल्या रीतीने करता येतो. त्यामुळे साहजिकच जी. . कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, काही अंशी दिलीप चित्रे यांच्या साहित्यात नियतीचा विचार प्रचंड झालेला दिसतो. दिलीप चित्र्यांना तर खड्यांचे प्रचंड वेड असल्याने त्यांच्या अनेक कथांतून या खड्यांचा प्रभावी वापर केलेला दिसतो. विशेषत: माणिक आणि नीलम.
अर्थातच, ज्योतिषशास्त्राला आव्हान देणारा एक विचार प्राचीन काळापासून भारतात आहे. विशेषत: चार्वाक आणि बौद्धदर्शनाने ज्योतिषशास्त्राला पूर्ण नकार देऊन, आपला कडवा विरोध नेहमीच जारी ठेवला. दुर्दैवाने ज्याला चार्वाकीय साहित्य म्हणावे, असे साहित्यात फारसे निर्माण झाल्याने ज्योतिषशास्त्राचा प्रभाव काही ओसरला नाही. कालांतराने बौद्धदर्शनात महायानाचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसा बौद्धदर्शनातील ज्योतिषशास्त्राचा शिरकाव चीन, जपान, तिबेट यांसारख्या देशात होत बौद्ध ज्योतिष्यांचा उदय झाला. या बौद्ध ज्योतिष्यांनी ज्योतिषशास्त्राचा स्वीकार केल्याने, साहजिकच अनेक बौद्ध राजांनी ज्योतिष्यांना आश्रय द्यायला सुरुवात केली. परिणामी, बुद्धाच्या जन्मापूर्वीसुद्धा बौद्ध जन्मणार, अशा प्रकारचे ज्योतिषीय उल्लेख बौद्ध
साहित्यात झळकू लागले. राजपुत्र सिद्धार्थाचे भविष्य सांगणारा ज्योतिषी आला. मूलभूत कथेतच ज्योतिषाचा शिरकाव झाल्यानंतर संपूर्ण बौद्ध धर्मात ज्योतिषशास्त्राचा शिरकाव होणे अटळच होते. याचा परिणाम चिनी आणि जपानी बौद्ध साहित्यात आपणाला जाणवतो. तिबेटमध्ये तर लामा कोण होणार, हेही आधीच ठरू लागले आणि साहजिकच आजतागायत संपूर्ण आशियावर ज्योतिषशास्त्राचे साम्राज्य पसरले. ते आजही अबाधित आहे.


shridhar.tilve1@gmail.com

भविष्य तांत्रिकीचा साम्राज्यविस्तार

8 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

१८५० नंतर विज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट होऊन त्याविषयी १८९० नंतर चर्चा सुरू झाली. या सर्वाचा सखोल परिणाम युरोपियन विचारवंतांवर होऊन अनेक प्रतिभावंत हे पुन्हा एकदा गणित आणि भूमिती यांच्याकडे वळले.


गेल्या काही लेखांत आप मानवी ज्ञानाच्या शास्त्र आणि विज्ञान या दोन महत्त्वाच्या अंगांचा आणि त्यांचा भविष्याशी असलेल्या संबंधांचा थोडक्यात विचार केला. आता आपणाला तिसऱ्या अंगाचा विचार करायचा आहे. हे तिसरे अंग म्हणजे तांत्रिकी होय. मानवी इतिहासात गणित आणि भूमिती या मानवी समाजाच्या आद्य तांित्रकी होत. त्या तर्कशास्त्राच्या आधारे चालतात अमूर्त शक्यतांच्या प्रदेशात सिद्ध होतात. साहजिकच गणित आणि भूमितीत अव्वल दर्जाची प्रतिभा आणि कल्पनाशक्ती लागते. गंमत म्हणजे, तरीही गणित आणि भूमिती व्यवहारात सिद्ध होत असतात. आपण बाजारात जातो तेव्हा गणित वापरत असतो. वस्तू, पैशाची गणती हे सर्व गणिताच्या आधारेच चालते. साहजिकच गणितातील शोधांचा शास्त्र आणि विज्ञान यांच्यावर सखोल परिणाम होत असतो. न्यूटन हा जसा वैज्ञानिक होता, तसाच तो गणितीही होता. १८५० नंतर विज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या आणि १८९० नंतर तर त्याविषयी स्पष्ट चर्चा सुरू झाली. या सर्वाचा सखोल परिणाम युरोपियन विचारवंतांवर होऊन अनेक प्रतिभावंत हे पुन्हा एकदा गणित आणि भूमिती यांच्याकडे वळले. त्यामुळे विसाव्या शतकातील संपूर्ण जगावर प्रभाव टाकणारे जे तत्त्वज्ञ होते, ते सर्वच गणित अथवा भूमितीशी संबंधित होते.
मानसघटितशास्त्राचा(फिनॉमिनॉलॉजी) प्रचंड प्रभाव मराठीतील गंगाधर पाटील या समीक्षकावर पडला आहे. त्यांनी पु. शि. रेगे यांच्या कवितांचा विचार या अंगाने केला आहे. मानसघटितशास्त्राचा प्रवर्तक एडमंड हुसर्ले, अॅनॅलॅटिकल फिलॉसॉफीचे प्रवर्तक नॉर्थ व्हाइटहेड बर्ट्रांड रसेल (याचा सर्वाधिक प्रभाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर पडला आहे.), पोस्टमॉर्डनिझमचा खरा बाप ल्युडविग विडगेस्टाइन, गेम थिअरीतील इक्वॅलिब्रियमचा प्रवर्तक जॉन नॅश, विरचनावादाचा (पोस्ट स्ट्रक्चरॅलिझम - भारतातील सर्व इंग्लिश डिपार्टमेंट याच्या नादी लागली आहेत आणि त्यांच्या नादी लागून मराठी डिपार्टमेंट सध्या विरचनावादाच्या नादी लागली आहेत.) बाप जॅकस देविदा, पोस्टमॉडर्ननिझमचे दुसरे बाप जिलिस डेल्युझ आणि गतारी (हे समजण्यास कठीण असल्याने मराठी विचारवंत यांच्या नादी लागत नाहीत.) हे सर्वच प्रथम तांत्रिकी म्हणजेच गणित आणि भूमितीत काम करत होते. उदाहरणार्थ, एडमंड हुसर्लेचेओरिजिन ऑफ जॉमेट्रीहे भूमितीवरील पुस्तक, नॉर्थ व्हाइटहेड बर्ट्रांड रसेल यांचेप्रिन्सिपिया मॅथॅमेटिकाहा गणितावरील ग्रंथ, जॉन नॅशची प्रसिद्ध गणितीसूत्रे (‘ब्यूटिफुल माइंडया चित्रपटाचा नायक जॉन नॅश आहे.), लुडविग विडगेस्टाइनची फिलॉसॉफी ऑफ मॅथॅमॅटिक्स, जॅकस देविदाची एडमंड हुसर्ले याच्याओरिजिन ऑफ जॉमेट्रीया ग्रंथाची इंट्रोडक्शन, जिलिस डेल्युझ आणि गतारीच्या सर्वच लेखनातील गणित आणि भूमितीतील अद्ययावत संकल्पनांचा मुबलक वापर हे सर्व लिखाण हा केवळ योगायोग नव्हता; तर विसावे शतक या तांत्रिकीच्या आधारे उभे राहणार होते, त्या तांत्रिकीशी गणित भूमितीमुळे या सर्वांचा जो परिचय होता, त्याचा हा निर्देशक होता. १८९० नंतर उदयाला आलेल्या या तांत्रिकीमुळेच एच. जी. वेल्स याने भविष्याचा विचार तांत्रिकीच्या संदर्भात करणे सुरू केले. याला कारण अर्थातचप्रो बॅबिलिटी थिअरीहोती. ब्लेझ पास्कल आणि पिअर फर्मट या दोघांनी सतराव्या शतकात सुरू केलेल्या या सिद्धांताला एकोणिसाव्या शतकात अचानक अनेक अनुयायी मिळाले आणि त्याचा परिणाम युरोपियन विचारवंतांवरही झाला. यातूनच एच. जी. वेल्सने भविष्याच्या शक्यता धुंडाळायला सुरुवात केली. १९०१मध्ये फोर्टनाइटली रिव्ह्यू या लिटिल मॅगझिनमध्ये त्यानेअँटिसिपेशन्स ऑफ रिअॅक्शन ऑफ मेकॅनिकल अँड सायंटिफिक प्रोग्रेस अपॉन ह्यूमन लाइफ अँड थॉटहा निबंध लिहून सायन्स ऑफ फ्यूचर ही संकल्पना मांडली. त्याने मांडलेल्याटाइम मशीनया संकल्पनेची चर्चा आजही होतेच. यानंतर भविष्यतांत्रिकीचा विचार हळूहळू प्रबळ होत गेला. भविष्याचा विचार करणाऱ्या साहित्यकृतींची चर्चा प्रचंड प्रमाणात होऊ लागली. या साहित्यप्रकाराचा पहिला नायक अर्थातच ज्यूल्स व्हर्ने हा होता. त्याचीट्वेंटी थाऊझंड्स फीट अंडर सीही पाणबुडीची संकल्पना मांडणारी कादंबरी आणिफ्रॉम अर्थ टू मूनही चंद्रप्रवासाची संकल्पना मांडणारी कादंबरी या आजही क्लासिक मानल्या जातात. या १८६० ते १८७० दरम्यान लिहिल्या गेल्या होत्या, हे कुणालाही अशक्यच वाटावे. कारण पुढील शंभर वर्षांत मनुष्य खरोखरच चंद्रावर पोहोचला आणि त्याने पाणबुडीही तयार केली. ज्यूल्स व्हर्ने आणि एच. जी. वेल्स यांच्या कादंबऱ्यांच्या संकल्पना भविष्यात जसजशा खऱ्या झाल्या, तसतसा हा साहित्यप्रकार सर्वात महत्त्वाचा वाङ्मयप्रकार म्हणून उदयाला येऊ लागला. १८७२ मध्ये अमेरिकेत अवतरलेले पॉप्युलर सायन्स हे मॅगझिन या वाङ्मय प्रकाराचे प्रमुख प्रमोटर ठरले. आजही या मॅगझिनच्या तब्बल ७० लाख प्रती खपतात. १८९३ मध्ये ७४ अमेरिकन विचारवंतांनी आणखी शंभर वर्षांनी म्हणजे १९९३ मध्ये काय काय होईल, हे वर्ल्ड कोलंबियन एक्स्पोझिशनमध्ये मांडले. गमतीचा भाग असा, या लोकांना विमानप्रवास दिसला, ट्रेन्स दिसल्या; पण ऑटोमोबाइल कार दिसल्या नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एच. जी. वेल्स याचे भविष्यविषयीचे विचार आधारित होते. विसाव्या शतकात त्याने मांडलेली ही भविष्यतांत्रिकी हळूहळू विस्तारत जाऊन संपूर्ण जगावर  संपूर्ण जगावर साम्राज्य गावू लागली.

======================================================

वर्तमान आणि साहित्याचे फेसबुक

8 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

मागील लेखात ऐंशोत्तरी पिढी आणि वर्तमानकाळातील वर्तमानपत्रे यांचा संबंध संपल्याने त्याचा परिणाम कसा उपेक्षेत झाला, हे आपण पाहिले. मात्र सुदैवाने ही उपेक्षा नव्वदोत्तरी कवितेच्या वाट्याला आली नाही. रोमँटिक नवतेचा सौमित्र हा अभिनेता असल्याने, देशी नवतेचा मंगेश काळे हा स्वत: पत्रकार प्रिटिंग प्रेसचा मालक असल्याने, तर चौथ्या नवतेचा हेमंत दिवटे हा स्वत: माध्यमात मॅनेजमेंट सांभाळत असल्याने या लोकांनी आपली कविता मीडियापर्यंत कशी पोहोचवता येईल, त्याची नीट काळजी घेतली. पण वर्तमान आणि कविता यांचा थेट संबंध जुळून आला, तो सोशल नेटवर्किंग साइट्समुळेफेसबुकने या संदर्भात केलेली कामगिरी लक्षणीय आहे. कवितेचे लेखन आणि प्रकाशन यांच्यातले सारे अंतराय फेसबुकने संपवले. या दोन क्रियांदरम्यानच्या काळाचा हा अंत ही एक क्रांती आहे. कवितेला ताबडतोब दाद देणारे रसिक असल्याने काही कवींनी फेसबुक हेच त्यांच्या कवितेचे माध्यम बनवले. काही कवींनी स्वत:च्या अनेक कविता फेसबुकवर आणायला सुरुवात केली. यातील फेसबुकमुळे ज्याचा प्रसार झाला, तो कवी म्हणजे ओंकार कुलकर्णी. ‘मॅड स्वप्नांचा प्रवाहहा त्याचा कवितासंग्रह दोनहजारोत्तरी संवेदनशीलतेचा चौथ्या नवतेतील तिसर्या पिढीचा कवितासंग्रह मानायला हवा.

याशिवाय योजना यादवसारख्यांच्या लक्षणीय कविता फेसबुकवर आल्या. तसेच ज्यांचा पुन्हा नव्याने शोध लागला, असे रवी लाखेसारखे रोमँटिक अस्तित्ववादी फेसबुकवर सळसळले (आणि माझ्यासाठी माझे सर्व मित्र!) . फेसबुकवरील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे चव्हाटा, उठाठेव, अस्सल कोल्हापुरी, द्या टाळी, भूमिया यासारखे ग्रुप! संजय सोनावणी, सुनील तांबे, चं. प्र. देशपांडे, सतीश तांबे, उदय रोटे, महेश पवार, हरिश्चंद्र थोरात यांसारख्या अनेकांनी चालवलेल्या चर्चा या मराठी संस्कृतीत काय चालले आहे, त्याच्या चालत्या- दिसत्या- बोलत्या वार्ता असतात. पण गमतीचा भाग असा की, ज्या लोकांना फेसबुकशी फारसे देणेघेणे नाही, अशा भालचंद्र नेमाडेंसारख्या आऊटडेटेड विचारवंतावर इथे जास्त चर्चा रंगलेल्या असतात. उदय रोटेसारख्या आकस बाळगून लिहिणार्या लोकांचीही इथे चलती! मात्र हिंदुत्ववादाची वाद्यांची टवाळी हाही इथल्या अनेक विचारवंतांचा टाइमपास. स्वत:च्या लेखनाच्या लिंक्स देणे, वा रोज काही ना काही कॉमेंट टाकणे, असाही रोग काहींना जडलेला. फेसबुक म्हणजे पारंपरिक विचार करणार्या विचारवंतांची जत्रा! मध्येच महेश पवारसारखे अवलिये! चं. प्र. देशपांडेंसारखे काही सीरियस, गजू तावडेसारखे सडेतोड तिरकस, अविनाश गायकवाडसारखे तब्येतीत चालणारे, अविनाश धर्माधिकारी, विश्वंभर चौधरीसारखे नेते, विजय तरवडेसारखे विनोदीवीर, श्रीराम पचिंद्रे, महेश म्हात्रेंसारखे संपादक, समीर परांजपेसारखे पत्रकार, सतीश वाघमारे, संजय जोशी यांसारखे लेखक! 2012पर्यंत फेसबुक हे मराठी साहित्यातले हॅपनिंग होते; पण 2012-13मध्ये या नवलाईचा भर ओसरायला लागला. हळूहळू सगळ्यांच्याच भूमिका प्रेडिक्टेबल होऊ लागल्या. काही लेखकांनी तर केवळ स्वत:च्या प्रमोशनसाठी फेसबुक वापरायला सुरुवात केली. काहींचा तर संतापही प्रेडिक्टेबल झाला. जे माध्यम दोनहजारोत्तरी संवेदनशीलतेची महाजत्रा होईल असे वाटले होते, ते चक्क मराठी साहित्य संमेलनाची -आवृत्ती झाले.

एकमेकाला प्रमोट करणार्या लोकांचे ग्रुप वाढू लागले आणि 100 पैकी 90 पोस्ट फालतू वाटायला लागल्या. फेसबुकवर आलेल्या कवितांपैकी 99 टक्के कविता या रोमँटिक संवेदनशीलतेच्या असू लागल्या. काही चांगल्या गजलाही फेसबुकवर आल्या, पण त्यांचे प्रमाण अल्प होते. हळूहळू फेसबुक ही फक्त गप्पा मारण्याची, टाइमपास करण्याची जागा झाली. फेसबुकचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे, बाथरूम पोएटचा झालेला प्रचंड विस्तार! प्रत्येक कलेत बाथरूम कलाकार असतात; पण त्यांना प्रतिभावंतांचा धाक असतो. उदाहरणार्थ, बाथरूम सिंगर्सना नेहमीच उत्तम सिंगर्सचा धाक असतो. पण मराठीच्या दुर्दैवाने कधीही बाथरूम पोएट्सना उत्तम पोएट्सचा धाक वाटला नव्हता. फेसबुकवर तर यांच्या बाथरूम कवितांना प्रचंडच आयता फुकटचा अवकाश मिळाला.

त्यामुळे पूर्वी फक्त डायर्यांत फुदफुदणारे कवी इथे मोकाटच सुटले आणि या बाथरूम पोएट्सना आवर घालण्याऐवजी त्यांना गोंजारणारे अनेक मध्यम दर्जाचे प्रतिभावंत दादा, ताई झाले. या दादा-तार्इंनी वीस-चाळीस वर्षांची बालके आपल्या खांद्यावर घ्यायला सुरुवात केल्याने बालसंगोपनाची साहित्यिक व्याख्या वेगळी असल्याचा संशय यायला लागला. फेक आयडेंटिटीने तर उरलीसुरली रया घालवून टाकली. प्रवीण बांदेकरांसारखा गंभीर साहित्यिक आरोपीच्या पिंजर्यात उभा केला गेला. सत्य काय हे कळले नाही आणि फेसबुक हा साहित्यिक घोटाळ्याचा अड्डा बनतो की काय, असे वाटू लागले.

आताच्या वर्तमानाचे अक्राळविक्राळ असे हे साहित्यिक रूप होते. याचा अर्थ सर्वच वाईट, असा नाही. काही लोकांचे अभूतपूर्व व्यक्तिगत अनुभव, सुनील तांबेसारख्याच्या चर्चा, आशुतोष आपटे, स्वीटी जोशीसारख्या चित्रकारांची हिस्सेदारी, काही कोपर्यातल्या वाचकांनी दाखवलेली साहित्याची अभूतपूर्व समज यामुळे फेसबुक वाचले; अन्यथा फेसबुकवरच्या फेसचे नाकच कापले गेले असते!

साहित्याचे भविष्विज्ञान !

9 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

आयुष्य म्हणजे माणसाला या ब्रह्मांडात (कॉसमॉस) असायला मिळालेला काळ. हा काळ जितका अधिक तितके आयुष्य अधिक. माणसाच्या आयुष्याचे काळाशी असे थेट नाते असल्यामुळेच की काय, काळ हा माणसाच्या चिंतनाचा आणि मीमांसेचा एक महत्त्वाचा भाग बनून काळविज्ञान (टायमालॉजी) उदयाला आले आहे. टोळीय समाजात टोळीचा थेट निसर्गाशी संबंध असल्याने माणसाचा मितीय काळ कायमच ऋतूच्या अंगाने वर्तुळाकारी आला. मितीत शिशिर, हेमंत, वसंत यांसारखे ऋतू फिरून फिरून येत असल्याने काळीयतेच ते पुन: पुन्हाहे पालुपद टोळीय समाजाचे आहे आणि ते आधुनिक नवतेचे करंदीकर देशीवादी नवतेचे नेमाडे यांनातेच ते तेच तेउद्या पुन्हा हाच खेळअशा शब्दांत सादर करावे लागले आहे. आवर्तनाच्या या कचाट्यातून सुटणे अंमळ कठीणच. या टोळीय समाजात माणसाला सर्वाधिक महत्त्वाची काळाची झालेली जाणीव म्हणजे काळाची व्यक्तिगत सरळ रेषीयता. व्यक्तिगत पातळीवर मानवी आयुष्य हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असे सरळ रेषेत जाते, याची लख्ख जाणीव माणसाला झाली आणि त्यातूनच माणसाचे आयुष्य पूर्ण बदलले.

माणसाचा मेंदू स्मृतिजडित असतो आणि या स्मृतिजडित असण्यानेच माणसाला भूतकाळ जाणवला. वर्तमान तर साक्षात होताच; पण पुढे माणसाचा भविष्यकाळ तपशीलवार पाहण्याचा आवाका असा काही वाढत गेला, की भूत वर्तमान भविष्य ही आडवी रेषा त्याच्या मेंदूत ठाम झाली. याबरोबरच माणसाची स्वत:च्या शरीराची होणारी वाढ सर्वांगीण असली तरी त्याच्या उंचीतील वाढीने आकाश (मुख्य म्हणजे प्रकाश देणारे सूर्य, चंद्र) दिसत असल्याने आकाश जमीन यांना जोडणारी उभी रेषा त्याच्या मेंदूत तयार होऊ लागली. वर्तुळ, आडवी रेषा आणि उभी रेषा या तिन्ही गोष्टी माणसाच्या मेंदूत इतक्या ठाम झाल्यामुळेच की काय, साहित्यात त्या आपोआपच प्रकट होऊ लागल्या. या रेषांनी त्रिकोण, चौकोन, षटकोन असे आकार जन्माला घातले आणि पिरॅमिडसारख्या वास्तूमध्ये ते प्रकटही झाले. माणसाच्या या वर्तुळी काळामुळेच कवितेत मुखडा अंतरा असे दोन भाग आले. त्यातील मुखडा हा वर्तुळ पूर्ण करतो, तर अंतरा नव्या आवर्तनाला सुरुवात करतो. संगीतात हेच घडते. अनेकदा कथा जिथून सुरू होते तिथेच पोहोचते. नेमाडे यांचीकोसलाही शेवटी नायकाला गावात पुन्हा खुंट्यावर आणून बसवते. एक प्राणी म्हणून आजही वर्तुळी काळ माणसासाठी अत्यंत नैसर्गिक आहे, हे इथे जाणवते. माणसाची काळाविषयीची भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ही सरळ रेषा मात्र आजही ॅप्लिकेबल आहे. माणसाच्या वर्तुळी मितीय काळाला नंतर विज्ञानाने आव्हान दिले; पण या सरळरेषीय मीय काळाचे मात्र विज्ञान आजही फारसे काही करू शकले नाही. थोडक्यात काय, माणसाचे कालिकमितीयसतत बदलले तरी त्याचे कालिकमीयमात्र अद्याप भक्कम आहे. या भक्कम मीयचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला आहे आणि या कॉलमच्या केंद्रस्थानी ते अवतरत राहणे अटळ आहे.

मी ज्या कोल्हापूर शहरात जन्मलो, तिथे या मीय काळातील भूतकाळाचा प्रचंड प्रभाव आहे; किंबहुना भूतकाळात जगणारे हे शहर अनेकदा वर्तमानाशी फटकूनही वागते. ययाती, स्वामी, मृत्युंजय, पानिपत, संभाजी, छावा यांसारख्या भूतकालीन गाजलेल्या कादंब-या या शहराच्या परिसरातून उगवलेल्या लेखकांनी जन्माला घातलेल्या आहेत. या शहराचा परिणाम म्हणून इतिहास हा माझा बालपणापासूनचा लाडका विषय झाला. पुढे माझ्या एफवाय बीए ते टीवाय बीए या प्रवासात इतिहास हाच मुख्य विषय होता. आर. सी. मुजुमदार, रियासतकार सरदेसाई, रोमिला थापर यांचे इतिहासलेखन वाचत मी इतिहासात प्रवेश केला आणि कलांचा इतिहास हा कायमच माझ्या कुतूहलाचा विषय ठरला. ज्याला देशीवादपरंपराम्हणतो, तीपरंपराआत्मसात करतच मी वाढलो. ही परंपरा आत्मसात करतानाच तिच्यातील कित्येक भगदाडे मला जाणवली पुढे मी परंपरेविरुद्ध उभा ठाकलो. कवी मनमोहन, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर या कोल्हापूरच्या कवींबाबत हेच घडले होते आणि माझ्याबाबतही हेच घडले. माझे आईवडील हे दोघेही गोव्यातील नागेशी बांदिवड्याचे. माझे दोन्ही आजोबा हे भविष्यात रस असणारे. विशेषत: माझे मातुल आजोबा वासुदेव नाईक हे गोव्यातील प्रख्यात भविष्यवेत्ते. एका विशिष्ट आध्यात्मिक साधनेने ते समोरच्याला भविष्य सांगायचे. त्याचा परिणाम म्हणून मला भूतकाळाइतकाच भविष्यकाळात रस निर्माण झाला. याच काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रभावाने ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास उडाला खरा; पण भविष्यकाळाबद्दलचे कुतूहल शमले नाही. पुढे आल्विन टॉफलरचे लेखन (तिळवे भांडारमध्ये रद्दीत म्हणून आलेले) मी वाचले आणि भविष्यविज्ञान (ऋवळवफडछडॠ) म्हणून भविष्याचा वैज्ञानिक अभ्यास करणारे विज्ञान युरोप अमेरिकेत जन्माला आले आहे, असे कळले. एच. जी. वेल्स याने 1902मध्ये डिस्कव्हरी ऑफ फ्यूचरहा निबंध लिहिला. या निबंधाने भविष्यविज्ञानाचा पाया घातला खरा; पण 1960पर्यंत भविष्यविज्ञानाविषयी खुद्द युरोपातच फारशी जाणीव नव्हती. पुढे पुढे जेम्स डॅटर, वेंडेल बेल यांसारख्यांच्या लिखाणाने 1980नंतर भविष्यविज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली आणि काळविज्ञान म्हणजे टायमालॉजीचाही गंभीरपणे विचार होऊ लागला. मला बीएनंतर भविष्यविज्ञान घेऊन मास्टर डिग्री घ्यायची होती; पण शिवाजी विद्यापीठात या विषयाचे डिपार्टमेंटच नव्हते. मी दोन वर्षे ड्रॉप घेतला. पुढे चौकशी केली असता भारतात या विषयाचे डिपार्टमेंटच नाही, हे कळले. पुढे 1989मध्ये तामिळनाडूत भारती विद्यापीठात त्यानंतर 1990 मध्ये केरळच्या केरळ विद्यापीठात ही विज्ञानशाखा सुरू झाली. पण तोपर्यंत मी एमएला साहित्य हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात दाखल झालो होतो. मात्र भविष्यविज्ञानाचा माझा अभ्यास थांबला नाही. भारतात ज्योतिष म्हणजे भविष्यविज्ञान असा गैरसमज आहे. सामाजिक आर्थिक भविष्यविज्ञानाने ज्योतिषशास्त्राला पूर्ण नकार दिला आहे. व्यक्तीय भविष्यविज्ञानात मात्र ज्योतिषशास्त्राला संख्याशास्त्रीय पातळीवर वापरावे की नाही, यावर वाद आहे. मात्र इथेही पारंपरिक ज्योतिषीय विद्येला मान्यता नाहीच आणि भविष्यनिदानात मानसशास्त्र, समाजशास्त्र, भौतिक विज्ञान, संख्याशास्त्र यांसारख्या विज्ञान शाखांचाच अधिक वापर होतो. या भविष्यविज्ञानाची शाखा म्हणूनच कलेचे भविष्यविज्ञान आणि कलेच्या भविष्यविज्ञानाची शाखा म्हणूनच साहित्याचे भविष्यविज्ञान अवतरते. साहित्यातील भविष्यविषयक संभाव्यता सादर करणे हे त्याचे मुख्य काम आहे. हे कामच तुम्हाला भूतकाळातील परंपरेपासून मुक्त करून नवतेकडे अधिक ताजेपणाने पाहायला शिकवते. जगभरातच हा विचार नवा असल्याने त्याला सध्या फारशी प्रतिष्ठा नाही; पण चौथ्या नवतेला मात्र त्यांचा विचार करणे अपरिहार्य आहे. मराठे काहीही घडवताना इतिहास घडवतात आणि म्हणूनच भविष्यविज्ञान हा मराठीच्या रोगावरचा उत्तम उपचार ठरू शकतो.

(ज्येष्ठ साहित्यिक -समीक्षक आणि भविष्यविज्ञानाचे जाणकार)

shridhar.tilve1@gmail.com

देवमाणूस! (बेस् ऑफ रसिक)

6 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

रजनीकांत हा माणूस म्हणून नेमका कसा आहे; त्याची जडणघडण, त्याच्यावर झालेले प्रभाव-संस्कार कोणते आहेत; त्याची जगण्याची फिलॉसॉफी काय आहे, या अनुषंगाने चित्रपट कारकिर्दीला ४० वर्षे पूर्ण केलेल्या रजनीकांत यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व याचा मर्मग्राही वेध प्रस्तुत लेखात लेखक-कवी श्रीधर तिळवे यांनी घेतला होता.

****

प्रकाशन दिनांक : ३१ ऑगस्ट २०१४

सरत्या ऑगस्ट महिन्याच्या १८ तारखेला कारकिर्दीची ४० वर्षे पूर्ण करणारा रजनीकांत हा आजच्या घडीचा भारतातला सर्वात लोकप्रिय कलावंत आहे, हे खरे तर अंडरस्टेटमेंट ठरावे. कारण, इंटरनेटवर वाढलेल्या पिढीने त्याला "सुपरह्युमन'चा दर्जा कधीच देऊन टाकला आहे. त्याच्याकडे असलेल्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडवणारे किस्से आणि विनोद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवत आहेत. प्रत्यक्षात,मात्र पडद्यावरचा सुपरस्टार आिण नेटवरच्या अितमानवापेक्षा समाजाच्या सुखदु:खांशी एकरुप झालेला, माणुसकीची काठोकाठ जाण असलेला, सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मुखवटा धारण करता वास्तवाला सामोरे जाण्याचे धैर्य अंगी बाणवलेला त्याच्यातला "देवमाणूस' चाहत्यांसाठी अधिक जिव्हाळ्याचा ठरला आहे.
--------
१९४०
च्या आसपास पुण्याकडून बेंगळुरुच्या दिशेने मायग्रेट झालेल्या गायकवाड कुटुंबीयांना स्वप्नातही वाटले नसेल, की आपल्या घरात जन्मलेला शिवाजी गायकवाड (जन्म - १२ डिसेंबर १९५०) हा मुलगा तामीळ भाषेचा सुपरस्टार होईल. स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठातील गुरुजनांना तेव्हा स्वप्नातही वाटले नसेल की, मठात वाढलेला आिण वैदिक गणित अध्यात्म शिकलेला एक मुलगा चक्क फिल्म इंडस्ट्रीत जाऊन भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार बनेल. आपल्याकडे दाखल झालेले दोन शिष्य पाहून खुद्द दिग्दर्शक


के. बालचंदर यांनाही वाटले नसेल, की त्यातला एक शिष्य हा भारताचा सर्वोत्तम अभिनेता बनणार आहे आणि दुसरा स्टायलिश अॅक्टिंगचा बादशहा बनून सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार होणार आहे...


चेन्नईच्या रस्त्यांवरून एकेकाळी एकाच बाईकवरून फिरणारे हे दोन शिष्य एकमेकांचे मित्र होऊन स्ट्रगल करत होते, तेव्हा या दोन मित्रांनाही वाटले नसेल की, भविष्यात त्यातील एककमल हासनआणि दुसरारजनीकांतहोणार आहेत. पण हा चमत्कार प्रत्यक्षात घडला. त्यात या दोघांचेही मराठी कनेक्शन कायम राहिले. एक स्वत: मराठी होता, तर दुसऱ्याची बायको मराठी होती. पण, हा शिवाजीराव गायकवाड नावाचा माणूस अशा सर्वोच्च स्थानी पोहोचलाच कसा? मॅनेजमेंट स्टडीजमध्ये रजनीकांतचे यश हे एक विशेष अभ्यासाचे क्षेत्र बनले आहे. रजनीकांत हा असा पहिला अॅक्टर आहे की, ज्याचे जीवनचरित्र चक्क पाठ्यपुस्तकात दाखल झाले आहे. त्याच्यावरील धड्याचे नाव अाहे, ‘बस कंडक्टर ते सुपरस्टार’.

रजनीकांतच्या घरामध्ये मराठी बोलली जाते, हे सर्वश्रुत आहे आणि मराठीच्या बरोबरीने कन्नडही. अनेकांना कदाचित आश्चर्य वाटेल, पण ज्या तामीळ फिल्म इंडस्ट्रीचा रजनीकांत बादशहा आहे, त्या फिल्म इंडस्ट्रीची तामीळ ही भाषा सुरुवातीला रजनीकांतला येत नव्हती. पण कन्नड नाटकातील त्याची अॅक्टिंग बघून बेंद्रे आणि के. बालचंदर या दोघांनी त्याला तामीळ भाषा शिकण्याचा आदेश दिला होता. पण एकूणच, रजनीकांतच्या यशाचा पाया हा अाध्यात्मिक आहे. हा पाया रामकृष्ण मठाने घातला आहे. रजनीकांत हा केवळ रामकृष्ण परमहंसांच्या विचारांचे मनन-चिंतन करून थांबला नाही तर त्याची बौद्धिक आध्यात्मिक वाटचाल ही रमण महर्षी आणि जे. कृष्णमूर्ती या दोन तत्त्वचिंतकांपर्यंत येऊन पोहोचली. याचा एक ठळक परिणाम म्हणून वास्तव आयुष्यात रजनीकांतने कधीच मुखवटा धारण केला नाही. त्याने आपले टक्कल कधी लपवले नाही किंवा स्वत:चा सावळा रंग झाकला नाही. तो जसा आहे, तसाच सार्वजनिक जीवनात वावरत राहिला. मुळातच, संपूर्ण दाक्षिणात्य फिल्म संस्कृतीतच स्टार लोकांचे स्टारडम हे भपकेबाजपणातून व्यक्त होत नाही. हे लोक सार्वजनिक जीवनात अत्यंत साधेपणाने वावरतात. रजनीकांतही कायम साधा राहिला. त्याच्या या साधेपणाने अाध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील लोकांची मने तो कायमच जिंकत राहिला.


रजनीकांतच्या आईचा मृत्यू त्याच्या लहानपणीच झाला, आणि तो जेव्हा सात वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील सेवानिवृत्त झाले. त्यामुळे साहजिकच लहानपणापासूनच कष्टाची कामे करायची रजनीकांतला सवय लागली. रामकृष्ण मठातील संस्कारांमुळे सर्व प्रकारच्या श्रमाची आणि श्रमिकांची इज्जत करण्याची परंपरा त्याच्यात खोलवर रुजली. त्यामुळेच सुरुवातीला हमाल आणि सुतार अशी कामेही रजनीकांत करत होता. नंतर त्याला बेंगळुरु ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली. यातूनच कुठल्याही कामाची तयारी आणि पुढे कुठलीही भूिमका जगण्याची तयारी रजनीकांत नेहमीच दाखवत राहिला. लहानपणी एकलव्याच्या मित्राची छोटी भूमिका करणारा रजनीकांत सुरुवातीला अत्यंत छोटे छोटे, निगेटिव्ह रोल करत होता. ‘गायत्रीसारख्या चित्रपटात तर त्याने चक्क पोर्नोग्राफरचा रोल केला होता, जो आपल्या बायकोलाच न्यूड शुट करून तिचे फोटो विकत असतो. परंतु पुढे अर्थातच असे रोल कमी होत गेले. पण या अनुभवातून गेल्यामुळेच रजनीकांतने त्याच्या अासपास छोटे छोटे रोल करणाऱ्या सर्वांनाच मानसन्मान दिला. सन्मानपूर्वक मानधनही दिले.


रामकृष्ण मठाच्या संस्कारांमुळे रजनीकांत हा कायमच सज्जन सभ्य गृहस्थ राहिला. त्याच्याबाबत वादविवाद घडविण्याचे प्रयत्न मीडियाने केले, पण मूळचा सज्जनपणा इतका मोठा होता की, अशा सगळ्या वादविवादांतून तो शुद्ध सोन्यासारखा बाहेर पडला. दक्षिणेत सर्वच कलाकार वेळेवर येतात. पण रजनीकांतचे वैशिष्ट्य म्हणजे, तो पंक्चुअल होताच, पण त्याचबरोबर त्याचे कितीही टेक असले तरी तो ते हसत हसतच देत असे. हल्ली तब्येतीमुळे त्याला हे करता येत नाही. पण याचाविषाद त्याच्या बोलण्यात नेहमीच असतो. रजनीकांत मूळचा थिएटर आर्टिस्ट असल्याने रंगमंचावर काम करताना लागणाऱ्या सर्व चांगल्या सवयी त्याच्या अंगात भिनल्या आहेत. त्यामुळेच लेखक दिग्दर्शकाचा सन्मान करणे, ते सांगतील ते नम्रपणे ऐकणे, हा रजनीकांतचा एक विशेषच आहे. चित्रपट हे टीमवर्क आहे, याची त्याला नीट कल्पना आहे. रजनीकांतच्या वरील स्वभावविशेषांमुळेच त्याची वाटचाल ही अनेक पातळ्यांवरून झाली. रंगमंचीय कलाकारापासून समांतर सिनेमा आणि नंतर स्टायलीश सिनेमा अशी ही वाटचाल अाहे.


कमल हासन हा जर अभिनयातला वास्तववाद असेल, तर रजनीकांतचा अभिनय हा अतिवास्तववादी मानला पाहिजे. गमतीचा भाग असा की, रजनीकांतचा सुरुवातीचा अभिनय हा वास्तववादीच होता. पण कमल हासनकडे असणारे अभिनयाचे कौशल्य आपल्याकडे नाही, हे लक्षात येताच रजनीकांतने अत्यंत जाणीवपूर्वक वास्तववादी अभिनय सोडून स्वत:चा स्टायलीश अभिनय सुरू केला. पुढेपुढे त्याच्या स्टाइल्स या आयकॉनिक बनत गेल्या. जेव्हा रजनीकांतने सुरुवात केली, तेव्हा कमल हसनने लागोपाठ तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके पटकावली होती. पण रजनीकांतला फक्त एकच फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले होते. रजनीकांतला याचे कधीच वैषम्य वाटले नाही. उलट माझ्यापेक्षा कमल हसन हा अधिक मोठा अभिनेता आहे, हे त्याने अनेकदा उघडपणे मान्य केले आहे. साहजिकच आपले सामर्थ्यक्लासमध्ये नसूनमासमध्ये आहे, हे उमगलेल्या रजनीकांतने सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडतील अशा भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. अनेकदा अनुकरणाचीही तयारी दाखविली. अनुकरण करताना अभिनय वगैरे भानगडी त्याच्या करिअरमध्ये त्याने आणल्या नाहीत. हिंदीतले अनेक उत्तम चित्रपट तामीळमध्ये त्याने रिमेक म्हणून सादर केले. त्यात अमिताभ बच्चन, चंद्रा बारोट यांचाडॉनअसो, किंवा फिरोज खानचाकुर्बानी’.


प्रेक्षकांना आवडतील अशाच गोष्टी दिल्याने आणि एंटरनेटमेंट एके एंटरटेनमेंट हा मोटो असल्याने साहजिकच सामान्य प्रेक्षकांच्या हृदयात त्याच्या चित्रपटांनी आणि व्यक्तिरेखांंनी प्रचंड मोठी जागा मिळविली. सामान्य प्रेक्षकाने त्याला सुपरस्टार बनविले. पण रजनीकांत हा सुपरस्टारचा सुपरह्युमन बनला, तो मात्र त्याच्या अत्यंत वेगळ्या गोष्टीने. पहिली गोष्ट म्हणजे, रजनीकांतने त्याला मिळालेल्या मानधनापैकी पन्नास टक्के उत्पन्न दानधर्मात वाटायला सुरुवात केली. तामिळनाडूतील अनेक घरांत त्याची ही मदत पोहोचल्याने साहजिकच या घरांत तो देव समजला जाऊ लागला. ब्लड डोनेशन, आय डोनेशनसाठी त्याने केलेले अथक प्रयत्न,आयुष्यभर दर महिन्याचा पगार समाजकार्यासाठी दिलेल्या पालम कल्याणसुंदरम नावाच्या ध्येयवादी गृहस्थास पिता म्हणून दत्तक घेण्याची त्याची कृती त्याला जनप्रियता देऊन गेली. २०११मध्ये त्याने अण्णा हजारे यांना पाठिंबा दिला, तो या सामाजिक बांधिलकीपोटीच. कमल हासनच्या एका चित्रपटाला अडचणीच्या वेळी त्याने भांडवलही पुरविले होते.


त्याच्या या चांगुलपणाचा विस्तार वाढतच गेला. यातचकुसेलानअसो वाबाबाहे चित्रपट जेव्हा फ्लॉप झाले, तेव्हा रजनीकांतने आपले सगळे मानधन निर्मात्याला परत केले. त्यामुळे निर्मात्यांतही त्याची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढली. वैयक्तिक आयुष्यात आदर्श पिता आणि आदर्श पती असल्याने महिला वर्गातही त्याला आदराचे स्थान प्राप्त झाले. यातच जपानमध्ये जपानी भाषेत डब केलेले त्याचे चित्रपट हे जॅकी चेन इतकेच धंदा करू लागले आणि हळूहळू चेक नाॅरिसच्या फॅन्सनी चेक नाॅरिसविषयी अतिरेकी विनोदाची शैली विकसित करून त्याचे किस्से घडविले, तसे रजनीकांतच्या फॅन्सनी रजनीकांत स्पेशल विनोद निर्माण केले. आणि रजनीकांत हा एक ग्लोबल फिनॉमीना बनवून टाकला. एका कष्टाळू माणसाने अपार मेहनतीच्या जिवावर मिळविलेले हे यश, हे कुठल्याही हिरोपेक्षा कमी नसल्याने साहजिकच रजनीकांत हा खराखुरा महानायक बनला.

shridhar.tilve1@gmail.com

भाषा आणि आय लव्ह यू

8 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

मागील लेखात इंटरनेटीय अवकाशाची चर्चा फेसबुकच्या अंगाने केली; कारण ऑर्कुटट्विटर वगैरेपेक्षा आजही फेसबुकवर साहित्य जास्त आहे.

फेसबुक वा इतर इंटरनेटीय साईट्सवर साहित्य एक कम्युनिकेशन म्हणून सादर होते. जैविक (यात मौखिकही येते), लिखित, छापील, मुद्रित (रेकॉर्डल) अशा भाषा सादर करण्याच्या चारही ºहा इंटरनेटवर अवलंबल्या जातात आणि साहित्याचे एक मेटॅमॉडेल बनत जाते. हे बांधकाम सतत चालू आहे आणि असणार. या बांधकामाला दोन मेजर रिअॅक्शन दिल्या होत्या.

भाषा संपलीए आणि धन्यवाद

- मन्या जोशी (ज्याम मज्या)

आणि

भाषा प्रचंड झालीये

आणि तिच्याजवळ सांगण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये

- श्रीधर तिळवे (आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण)

या काव्यात्मक दोन प्रतिक्रिया परस्परविरोधी वाटल्या तरी दोन्ही प्रतिक्रिया चौथ्या नवतेच्या आहेत. मन्या जोशीची प्रतिक्रिया ही पोस्टमॉर्डन आहे. तिची सुरुवात उबंरतो इको यानेआय लव्ह यूया तीन शब्दांच्या चर्चेच्या अंगाने केली होती. उबंरतो इको याचे म्हणणे असे होते की, ‘आय लव्ह यू हे यापूर्वी करोडो वेळा म्हटले गेले आहे. आता जर प्रेयसीला आय लव्ह यू म्हणायचे असेल तर मी काय करावे? भाषा वापरून वापरून संपली आहे.’

मी पोस्टमॉर्डन एथॉसच्या विरोधात बंड करून चौथ्या नवतेची संकल्पना मांडली, तेव्हा माझे म्हणणे उलटे होते. माझ्या मते, ‘आय लव्ह यूहे आता फक्त करोडोदा नव्हे तर अब्जावधी वेळा म्हटले जात आहे. भारतासारख्या जातीपाती पाळणार्या देशातआय लव्ह यूचा थरार वेगळा आहे आणिआय लव्ह यूम्हणणे क्रांतिकारक आहे.

पाश्चात्त्य देशातहीआय लव्ह यूहजारपट वाढले आहे. म्हणजेच भाषा संपलेली नाहीये; उलट ती प्रचंड झाली आहे. संवादाची सुबत्ता वाढली आहे. इतकेच कशाला, 'ILU' असे नवे फॉर्म सादर केले जातायत. शॉर्टफॉर्म हा नव्या पिढीने शोधलेला भाषेकडे जाण्याचा शॉर्टकर्ट आहे. तिला सांगण्याची इतकी घाई आहे, कीग्रे 8 4 असे ती कमीत कमी अक्षरात सगळी भाषा ओतत चालली आहे. कारण आत भाषा प्रचंड झालीये. बरे या प्रचंड भाषेचा हत्तीही झालेला नाही; ती डिजिटल फुलपाखरू बनून मस्त हल्लक उडतीये. 2000मध्ये 17 बिलीयन, 2001मध्ये 250 बिलीयन, 2005मध्ये 1 ट्रीलीयन आणि 2010मध्ये तीन ट्रीलीयन मेसेज कम्युनिकेशनमधून पाठवले गेलेत. म्हणजेच भाषा संपलीये, हा उत्तरआधुनिक अजेंडा पूर्ण कोसळून पडलाय. प्रत्येक व्यक्तीम्हणजे टेक्स्ट तयार करणारा एक कारखाना बनलीये. प्रश्न असा आहे, की यातील किती परसेंट भाषा काही सांगतीये? तिच्याजवळ सांगण्यासारखं काही उरलंय का? की हे फक्त इन्फर्मेशनचं रिसायकलींग सुरू आहे? माहिती, ज्ञान आणि शहाणपण या तीन भिन्न गोष्टी आहेत. माहिती चिन्हांच्याद्वारे होते. आणि ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून ॅप्लिकेशनमधून प्राप्त होते. आणि त्या ज्ञानाने सर्वांगाने सर्वांगाला न्याहाळले आणि त्याने प्रज्ञाशील करुणा जागृत झाली की शहाणपण प्राप्त होते. हे ज्ञान आणि शहाणपण भाषकाच्या जवळ असले तरी त्याच्या भाषेजवळ सांगण्यासारखे काही उरते. अन्यथा भाषा प्रचंड झालीये आणि तिच्याजवळ सांगायला काहीच उरलेलं नाहीये, अशी अस्वस्था होते.

यापुढील प्रश्न असा, की इतकी सारी माहिती स्तरबद्ध करून भाषा काय करणार आहे? अवाढव्य इंटरनेटपुढे बसून मी एक कविता लिहिलेली होती ती अशी :

भाषा

मर्डर करूनही भाषा संपत नाहीये

आत्महत्या करूनही भाषा संपत नाहीये

उलट भाषा अनेक तोंडांनी वाढतेच आहे

जे मेले होते त्यांचीही तोंडे भाषेत शाबूत आहेत

भाषा इतक्या तोंडांनी बोलतीये कि लिहितीये कि

मला फक्त तोंडेच दिसतायत

तिला ऐकायला माझ्याजवळ फक्त दोनच कान आहेत / दोनच डोळे आहेत

म्हणून मी सर्वत्र रेकॉर्डर लावून ठेवलेत

मला वाटतयं कि भाषा बोलत असलेले प्रत्येक वाक्य

मला ऐकता आलं पाहिजे

रेकॉर्डिंग वाढतंय, स्टोरेज वाढतंय, स्टोरेजीटी वाढतीये

मला वाटतंय कि भाषा फक्त एक स्टोरी बनून पडून राहणार आहे

प्रचंड स्टोरेज आणि मर्यादित वेळेचं आयुष्य

समजा मी अमर झालो, तर स्टोअर झालेले सर्व मी ऐकू शकेन काय?

कदाचित अमर होऊनही मला संपूर्ण भाषा ऐकतावाचताच येणार नाही

मग एवढ्या प्रचंड भाषेचे करायचे तरी काय?

मी या प्रश्नापुढे मूक आहे

आणि भाषा माझ्या या मूकपणाचीही वाच्यता कशी करता येईल

ह्यावर अनेक तोंडांनी चर्चा करतीये

(shridhar.tilve1@gmail.com

कविता वर्तमान आणि वर्तमानपत्रे

8 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1046">

मागील लेखात कवी, पत्रकार आणि अध्यात्मकार हे तिघेही कसे वर्तमानकालिक असतात ते आपण पाहिले. या लेखात ही चर्चा आणखी पुढे नेता येते का ते पाहायचे आहे.

जर कवी पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील तर 2014पर्यंत यांच्यात एवढे अंतर का पडले? आचार्य अत्रे, प्रभाकर पाध्ये यांच्यासारखे लोक जोवर मराठीत संपादक होते, तोवर मराठी वर्तमानपत्रात कवी लोकांचा दबदबा होता. पण पुढे काव्याचे मर्मज्ञ, विशेषत: समकालीन कवितेचे मर्मज्ञ संपादक गहाळ होत गेले आणि कवींचा दबदबा संपला.

बरेच मराठी संपादक आधुनिक कवितेच्या आगमनानंतर आधुनिक कवींशी जुळवून घेऊ शकले नाहीत. संपादक म्हणून त्यांचा पिंड प्रबोधनवादी किंवा रोमँटिकच राहिला. त्यामुळे आजही मराठीचे संपादक शेरोशायरीत रमतात; पण पुढील आधुनिक नवता, देशी नवता आणि चौथ्या नवतेशी अनेकांचे जमत नाही. . फुलेंनी आखून दिलेल्या प्रबोधन करणार्या प्रबोधनवादी कवितेची चौकट आजही अनेकांना ओलांडता येत नाही. त्यामुळेच प्रबोधनवादी नवता आणि रोमँटिक नवता यांचे 19व्या विसाव्या शतकातील पूर्वार्धाशी जुळलेले वर्तमानपत्रांचे नाते तुटता तुटत नाही. त्यामुळे समकालीन कवितेला काही सन्माननीय संपादक वगळता फारसे संपादक आकलनासाठी तयार झालेले नाहीत.

1980
पर्यंत मराठीत रविवार पुरवणीत हमखास कविता दिसत, पण पुढे कविता नाहीशा झाल्या. आधुनिक कविता कौतुकाऐवजी टिंगलटवाळीचा विषय बनवण्यातच अनेकांना रस होता. त्यामुळे 1980 नंतर जिथे कविता येत, तिथे आधुनिक समकालीन कवितांना जागाच नसे. अनेकदा तर रविवार पुरवणीचे संपादक स्वत:च्या ओळखीच्या कवींच्या कविता- मग त्या चांगल्या असोत वा नसोत- प्रकाशित करत. याचा एक दुष्परिणाम असा झाला, की अव्वल दर्जाच्या कवींनी स्वत:च्या कविता या पुरवण्यांना देणे कमी केले. पण त्यामुळे दर्जा सुधारण्याऐवजी अधिकच ढासळला. याच काळात मराठीच्या शिक्षक, प्राध्यापकांचा दर्जा अधिकच ढासळला आणि ज्यांना कविता शिकवणे डोक्याला ताप वाटतो, असे लोक प्राध्यापक झाले. त्यांनी कविता कशी वाचू नये, हे शिकवले विद्यार्थीवयात कविता आणि जीवन यांचा विद्यार्थ्यांच्या मनात जो जैविक संबंध तयार व्हायला हवा तो होऊ देता कविता म्हणजे मार्क्स देणारा किंवा ऑप्शनला टाकता येणारा विषय बनवला. त्यामुळे वर्तमानपत्रातील कवितांना प्रतिसाद देणारा वाचकवर्ग तयारच होईना आणि कविता ही रविवार पुरवणीतील फार कमी वाचली जाणारी गोष्ट बनली.

अशा वेळी नेमके काय घडते, ते समजून घेणारा प्रतिभावंतांचा वर्ग असावा लागतो. पण झाले असे की नेमके याच वेळी मराठी साहित्याचे नेतृत्व दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील आदींच्या हातात गेले. यांनी वर्तमानपत्रातील कवितेच्या अध:पतनाची नेमकी मीमांसा करण्याऐवजी सरळसोट वर्तमानपत्र या गोष्टीलाच विरोध केला. नेमाडेंनी तर वर्तमानपत्रावर बहिष्कार टाकला.

या प्रतिभावंत टीकोजीरावांमुळे कविता आणि वर्तमानपत्रे यांचा उरलासुरला संबंध संपला. हे लोक नंतर शहाणे झाले खरे; पण हा अशोकांचाशहाणेपणा होता आणि यांचे कॉलम येईतोवर कवितेचेकलिंगझाले होते. वर्तमानपत्रे आणि समकालीन साहित्य यांचा काही सन्माननीय वर्तमानपत्रे वगळता संबंध संपला होता आणि कवितेचे न्यूज म्हणून असलेले मूल्य आतील पानावरच्या कुठल्यातरी दुर्लक्षणीय कॉलम- चौकटीत गेले होते.

आमच्या पिढीने कविता लिहायला सुरुवात केली ती या बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर! आमच्या पिढीतील अनेकांची वर्तमानपत्रांना कविता पाठवण्याच्या संदर्भातील आस्था जवळजवळ संपुष्टात आली होती. वास्तविक वर्तमानपत्र हे कवितेसाठी सर्वात उत्कृष्ट माध्यम आहे. पण हे दोन्ही बाजूंना स्पष्ट दिसेनासे झाले, त्यामुळे बातम्यांतून येणार्या स्वत:च्या कवितेतील ओळी पाहून आनंदणार्या काव्यसंमेलनीय कवींची संख्या वाढतच गेली. हे सर्व कमी होते म्हणून की काय, रामदास फुटाण्यांसारख्या लोकांच्या वात्रटिका प्रसिद्ध होऊ लागल्या आणि मराठीतील जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांनी पुढे वात्रटिका प्रसिद्ध करायला सुरुवात केली. या वात्रटिकांनी कवी म्हणजे विदूषक, ही प्रतिमा घट्ट करायला सुरुवात केली आणि पुढे यातही दर्जा टिकवणारे अशोक नायगावकरांसारखे कवी पुढे हास्यसम्राट आणि कालांतराने टीव्हीवरील हास्यसम्राट या कार्यक्रमाचे परीक्षक झाले.

अशा वेळी आमच्या पिढीतील अनेकांना वर्तमानपत्रात वाव मिळाला नाही, यात आश्चर्यजनक काहीच नव्हते. आमची ऐंशोत्तरी कवींची संपूर्ण पिढी गारद झाली आणि विवेक मोहन राजापुरे, दिलीप धोंडो कुलकर्णी, अरुण काळे, भुजंग मेश्राम या माझ्या समकालीन पिढीतील प्रतिभावंत कवींना वर्तमानपत्रांत मानाचे मुजरे मिळाले, ते थेट मृत्यूनंतर! मराठी वाङ्मयाच्या इतिहासात कदाचित प्रतिभावंत कवी लोकांची हीच एक पिढी असावी, जिला मराठी वर्तमानाचे प्रतिनिधित्व करणार्या वर्तमानपत्रांनी भाव दिला नाही. आणि आता वेळ अशी आली आहे, की भाव देऊनही काही फायदा नाही. कारण बहुतेक प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड नाहीसे झाले आहेत आणि या पिढीतील जे प्रतिभावंत जिवंत आहेत, त्यांना आता कसलीच अपेक्षा उरलेली नाहीये. नारळही देता जिला मराठी संस्कृतीने सुखरूप रिटायरमेंट दिलीये, अशी ही प्रतिभावंत कवींची एकमेव पिढी! ही त्यांच्या वर्तमानाने घडवलेली शोकांतिका होती की वर्तमानपत्रांनी, हे मात्र येणारा काळच ठरवेल.


कालातीत ढसाळ

8 वर्षांपूर्वी

·          

·          

·          

मागील लेखात परंपरा, पुराण, इतिहास, रचित, रचना, जालित, जालना या अंगाने भूतकाळाचा भूतजालकीचा विचार केला. आता आपण थोडा वर्तमानकाळाचा विचार करू. साहित्याचे कथा, कविता, कादंबरी असे वाङ्मय प्रकार प्रत्यक्षात अस्तित्वात असतात की नाही, हा एक वादाचा विषय असला तरी प्रत्यक्ष साहित्य व्यवहार मात्र वाङ्मय प्रकारांना गृहीत धरूनच चाललेला असतो. साहित्याच्या काळमीमांसेत या वाङ्मय प्रकारांचा काळाच्या अंगाने विचार करणारी पहिली तत्त्वज्ञ म्हणून सुझान लँगर या अमेरिकन समीक्षाकर्तीचे नाव घेतले जाते. तिच्या मते, साहित्यातला काळ हा वाङ्मय प्रकार निश्चित करतो. ‘‘काव्यात’’ कालातीत आभासात्मक वर्तमानगर्भ भविष्यकाळ, ‘‘नाट्यात’’ वर्तमानगर्भ भविष्यकाळ आणि आभासात्मक भूतकाळ हा कथा, कादंबरी, चरित्र यांसारख्या कथात्मक साहित्यात आढळतो, अशी ती मांडणी करते. तिची ही मांडणी तिच्या समकालीन साहित्यावरून तिला सुचली आहे, हे उघड आहे. तिच्या वेळी आधुनिकतावादी प्रतिसृष्टीय विशीय दुस-या नवतेचे साहित्य आणि इझरा पाऊंड, टी. एस. इलियट, बॉदलेअर वगैरे आधुनिकतावादी कवी ऐन बहरात होते. त्यांनी परंपरेविरुद्ध बंड करून आताचे वर्तमानातले जीवन आपण कवितेत सादर केले पाहिजे, असा आग्रह धरला होता. त्यांच्या कवितेतील आभासात्मक वर्तमानकाळ हा समीक्षा साहित्यावर प्रभाव टाकून होता. आपल्याकडेही मर्ढेकर, दिलीप पु. चित्रे, अरुण कोलटकर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांतूनही हा आभासात्मक वर्तमानकाळ वारंवार साकारला गेला आहे. इथे आपणास नामदेव ढसाळ यांच्या एका कवितेतील आभासात्मक वर्तमानकाळ पाहायचा आहे. ही कविता पुढीलप्रमाणे-

माण्सं

हळूहळू माणसं शरीराच्या बाहेर पडू लागतात

पूर्ण घा-या डोळ्याचं सुतक पाठलाग करू लागतं

कालपर्यंत रात्र होती वैरी, आता दिवसही झाला आहे

किती बदलून घेऊ मेलेल्या त्वचेचा रंग

हे अनात्म सावलीचं झिंगूर : ते बांधून गेलेयत माझ्या कलेवरावर पिरॅमिड

या घनघोर भयकंपित भिंतीवर कोरून ठेवलीयत अपरिहार्यतेची प्रतीके

माझी निर्जिव कुडी अडकून पडलीये कोळ्याच्या जाळ्यात निवांत

उभेआडवे दाही दिशांचे विलोभनीय फास

हे कोण विणतो आहे, माझ्या भोवतालच्या निवांतपणाला

पिढ्या-दरपिढ्या रांगत आलेलं शुद्रत्व

हे असं हरवून गेलं स्वप्नातलं गाव

हिरवी मैना, हिरवं झाड

माझं अस्तित्व गेलं आहे दुभंगून

पाहता पाहता मीही होऊन गेलो आहे प्रवाहप्रतीत

वाटलं, नरकाची दलदल ओलांडून मी बाहेर येईन

जसं कमळ येतं चिखलातून

एक एक किडा, एक एक जीवजंतू

किती क्षुद्र वाहते आहे, हे सांडपाणी -यातून

फुललो, गळून पडलो

स्वत:साठी मातम करायलाही वेळ मिळाला नाही

आता नुसताच जांभळ्या रंगात निष्प्राण पडून आहे

शरीराबाहेर निघून गेलेली माण्सं पुन्हा शरीराकडे परतू लागली आहेत

आणि मी कासावीस झालो आहे.

ढसाळांच्या या कवितेचा अन्वयार्थ असा - शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माणसं बाहेर पडू लागली. त्याचं सुतकही माझा पाठलाग करू लागलं. वर्णव्यवस्थेची रात्र कालपर्यंत वैरी होती. आता आंबेडकरवादाचा सूर्य उगवून दिवस झालाय खरा; पण तो आता वैरी झालाय, कारण आपलीच माणसं सोडून चाललीत. त्वचेचा (जी मेलेली होती) रंग ती किती बदलणार? जिवंत असती तर रंग बदललाही असता; पण मेलेल्या त्वचेचा रंग कसा बदलणार? जे उरलंय ते अनात्म आहे, कारण (ढसाळ) बौद्ध आहेत, त्यामुळे सावलीचं झिंगुरही अनात्म आहे. अशा वेळी जे कलेवर उरलंय, त्यावर पिरॅमिड बांधून जाणारे निघून गेलेत. मग ज्या पिरॅमिडमध्ये, अनात्म झिंगुर कलेवर कैद झाले आहे, त्या पिरॅमिडच्या भिंतीवर (जी घनघोर आणि भयकंपित आहे) अपरिहार्यतेची प्रतीके आहेत. दाही दिशांच्या उभ्या-आडव्या विलोभनीय फासांनी एक कोळ्याचं जाळ विणलंय आणि त्यात मेल्यानंतरची माझी कुडी- माझे कलेवर निवांत अडकून पडलंय. पण मेल्यानंतरही सनातनी कर्मठ लोक पिढ्या दर पिढ्या रांगत आलेलं शुद्रत्व विणत आहेत. ते सनातनी कर्मठ कोण? हिरवी मैना, हिरवी झाडे यांनी बहरलेलं स्वप्नातलं गाव हरवलं. हे स्वप्नातलं गाव परिवर्तनाचं, क्रांतीचं, आंबेडकरवादाच्या विजयाचं, हरवलंय आणि मी इथे पिरॅमिडच्या आत कलेवर झालेलो! या स्थितीमुळे अस्तित्व दुभंगून गेलंय. या दुभंगपणामुळेच मी प्रवाहपतित झालोय. हे प्रवाहपतित होणं ही नरकाची दलदल होती, हे मला माहीत होतं. मला वाटलं होतं की, कमळ जसं चिखलातून बाहेर येतं तसा मीही ही दलदल ओलांडून बाहेर येईन; पण तसे झाले नाही. आता माझ्या भोवताली सांडपाणी जे -यातून वाहात आहे; या सांडपाण्यातून एक एक किडा, एक एक जंतू माझ्या अस्तित्वाच्या मूळ -याला क्षुद्र करतो आहे. कधीकाळी मी फुललो, आणि मग गळून पडलो. माझ्या या गळून पडण्याचा, मरण्याचा मातम करायलाही मला वेळ मिळाला नाही. बस्स मी माझ्यातच मेलो.

आता उरलंय ते जांभळ्या रंगातलं निष्प्राण शरीर आणि माणसे जी शरीराबाहेर निघून गेली होती, ती बहुधा खांदा द्यायला पुन्हा माझ्या शरीराकडे परतायला लागलीत...मी कासावीस आहे कदाचित ती परतलीत म्हणून किंवा कदाचित खूप काही सांगायचे-करायचे राहून गेले म्हणून...

 

ढसाळांची ही संपूर्ण कविता मरणप्राय अस्तित्वाने वाचकाला दिलेले स्वगत आहे. हे स्वगत वर्तमानकाळात चालू आहे. हा वर्तमानकाळ आभासात्मक आहे. कारण माणसांचे सोडून जाणे हा भूतकाळ होता; पण कवी तो मृतप्राय अवस्थेत, आता या क्षणी सांगतो आहे, म्हणून हा भूतकाळ आभासात्मक वर्तमानकाळ झाला आहे. तो हे सांगत असतानाच एक चमत्कार झालाय; तो म्हणजे, जी माणसे सोडून गेली होती ती आता तो निष्प्राण झाल्यावर मात्र त्याच्या शरीराकडे परत येत आहेत. हा त्या कलेवराचा वर्तमान क्षण आहे. आता आपण 2014 मध्ये या कवितेकडे पाहिले तर काय दिसते? ही कविता तितकीच ताजी आहे, आणि ढसाळांचा नुकताच झालेला मृत्यू, त्यांचे ते निष्प्राण शरीर आणि मेल्यानंतर मीडियाचे, त्यांच्या जुन्या मित्रांचे त्यांच्या या मृत शरीराकडे परतणे यामुळे जणू काय ढसाळ आपल्या या कवितेतून नव्हे प्रत्यक्ष बोलताहेत की काय, असे वाटते. त्या अर्थाने ही कविता कालातीत आहे. म्हणूनच सुझान लाँगर म्हणते, तशी ढसाळांच्यामाण्संया कवितेचा काळ वर्तमानही आहे, आभासात्मकही आहे, कालातीतही आहे. कवीने ही कविता लिहिली, तेव्हा हा मृत्यू प्रतीकात्मक होता; आता तो प्रत्यक्ष झाला आहे, आणि काही वर्षांनी तो पुन्हा सिम्बॉलिक- प्रतीकात्मक होईल. कारण नामदेव ढसाळ हा जितका स्वत:च्या वर्तमान काळाचा कवी होता, तितकाच तो कालातीतही आहे.

shridhartilvepublic@gmail.com

 

श्रीधर तिळवे 
साहित्य आणि विज्ञान / श्रीधर तिळवे -नाईक 

साहित्य आणि विज्ञान ह्या दोन भिन्न गोष्टी असल्यातरी त्या दोन्ही मागच्या सृजनतेची शक्ती ह्या एकच आहेत दरवेळी विज्ञान वेगळे म्हणत सृजनशीलतेच्या बाबतीतली  स्वत : ची नपुंसकता लपवून ठेवायची घाणे रेडी सवय मराठी साहित्यिकांना लागली आहे . विज्ञानात तुम्हाला कितीही नवे सुचले तरी जे सुचले आहे ते मागील वैज्ञानिकापेक्षा वेगळे आहे हे सिद्ध करावे लागते हे वेगळेपण सिद्ध झाले नाही तर तुमच्या तथाकथित नवेपणाला कुत्रेही विचारत नाही साहित्यातही असेच असते . साठोत्तरी अथवा पोस्टमॉडर्न जार्गन घेवून जुन्याच गोष्टी तुम्ही सांगत असाल आणि आपण काही नवे सांगतो आहोत ह्या भ्रमात तुम्ही असाल तर माझा सल्ला असा कि साठोत्तरी , नव्वदोत्तरी आणि पोस्टमॉडर्न ह्यांनी काय लिहून ठेवले आहे ते मिळवा वाचा आणि पचवा . अन्यथा भुक्कडगिऱ्या आपण पण फार पहिल्या भाऊ  खाऊ खाऊन खुश होणारे खूप पाहिले 

Comments

Popular posts from this blog