देशीयतेचे कार्य काय श्रीधर तिळवे नाईक साठोत्तरीचा ज्वर अद्यापही ओसरलेला नाही आपण ज्या संस्कृतीत चाललोय त्यापेक्षा आपण ज्या संस्कृतीत होतो त्यातच प्रत्येकाला रस ! बरं स्वतः भूतकाळात रमणाऱ्या ह्या लोकांचा तेच काम करणाऱ्या हिंदुत्ववादाला विरोध असतो कारण काय तर ह्यांना परंपरेत काही आधुनिक लोक व विचार सापडत असतात समजा असे लोक तुमच्या परंपरेत नसते तर तुम्ही हिंदुत्ववाद्यांचं काय केलं असतं ? आमच्या परंपरेत हिंदुत्ववाद्यांना विरोध नाही म्हणून गप्प बसला असता कि परंपरा मोडीत काढली असती ? नवतेचा आधार परंपरा असत नाही नवतेचा आधार वर्तमान व भविष्य असते तुम्ही नवतेला पारंपरिक आधार शोधायला लागला कि आपोआपच जे परंपरावादी लोक असतात ज्यांना आधुनिकता किंवा चौथी नवता नको असते ते तुमच्या वळचणीला येऊन उभे राहतात आणि मग तुम्ही परंपरेला बळ देता देता कर्मठपणाला बळ द्यायला लागता रामाचं समर्थन अंतिमतः बजरंग दलाचं समर्थन बनतं आणि परंपरेचा देशीवादी पद्धतीने विचार करणारे लोक कितीही आधुनिक असले तरी ते अल्पसंख्याक असल्याने परंपरेचा अंतिम लढा हा कर्मठ लोकांच्या ताब्यात जातो अंतिमतः हिंदू कादंबरी हिंदुत्...
Posts
- Get link
- X
- Other Apps
आंतरराष्ट्रीय, जागतिक आणि वैश्विक श्रीधर तिळवे नाईक मला वाटतंय जागतिक आणि आंतरराष्ट्रीय ह्यात तुमची काहीतरी गल्लत होतीये देशी भाषेतील पुस्तक भाषांतरामार्गे जागतिक होऊ शकते पण सॅम्युएल बेकेटसारखा लेखक आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लंड आयर्लंड आणि फ्रांस अशा तीन राष्ट्रातल्या लोकांसाठी लिहीत होता व्ही एस नॉयपॉल व सलमान रश्दीसाठी अनेक राष्ट्रातील ऑडियन्स डोक्यात असावा असे वाटते बाकी वैज्ञानिक तंत्रवैज्ञानिक चिन्हवैज्ञानिक चिन्हतंत्रवैज्ञानिक लेखक तर उघड उघड आंतरराष्ट्रीय वाचकांसाठी लिहीत असतात केवळ साहित्यासाठी कोण समग्र संस्कृतीला देशीवादी वेठीस धरेल ? खुद्द नेमाडे बदलतायत हे अलीकडच्या त्यांच्या गोष्टींच्यावरून दिसते नितीन , असं होऊ नये कि नेमाडे नूतन झालेत आणि तुम्ही जुन्या नेमाडेंच्यात थांबलाय . पहिली गोष्ट तीन कॅटेगरीज १ वैश्विक २ जागतिक ३ आंतरराष्ट्रीय अंतर्राष्ट्रीयमध्ये सगळी राष्ट्रे अभिप्रेत नाहीत दोन राष्ट्रातील वाटाघाटींनाही आंतरराष्ट्रीय वाटाघाटी म्हंटल जातं कम्युनिस्ट पक्षाची अनेक अधिवेशनं आंतरराष्ट्रीय असतात त्यात प्रत्येक राष्ट्र साम...
- Get link
- X
- Other Apps
सॉरी सहमत नाही मनोहर ओक एक टिपण श्रीधर तिळवे नाईक मनोहर ओक ह्यांची एक ओळ आहे "लेखक कसे सापासारखे माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे " ह्या ओळी दिसायला साध्या दिसतात आणि लेखकही त्यामुळे खुश होतात पण त्यातले खरे अर्थसौंदर्य लेखक मध्ये नाहीये ते आहे माणुसकीला दिलेल्या सापाच्या उपमेत अशी उपमा मन्यालाच सुचू शकते वास्तविक माणुसकी म्हणजे कशी छानछान दुधासारखी पांढरी तुपासारखी मुलायम असायला हवी ह्या ओळीत असे होत नाही ती चक्क सापासारखी होते मानवतावादी लोकांनी काढलेल्या माणुसकीबद्दलच्या मुलायम गळ्यापेक्षा इथे चक्क माणुसकीचा फुत्कार ऐकायला मिळतो ह्यात लेखकाचा गौरव जास्त आहे कि सापाचा हे ठरवणे कठीण आहे मात्र माणुसकी म्हणजे शामळुपणा हे समीकरण मन्या मोडीत काढतो हे नक्की ! श्रीधर तिळवे नाईक
- Get link
- X
- Other Apps
आशुतोष दिवाण ह्यांच्या कमेंटवर भाष्य श्रीधर तिळवे नाईक आशुतोष दिवाण ह्यांनी एक कमेंट केलीये तिला मी इथे उत्तर देतो आहे प्रिय आशुतोष दिवाणजी सर्वात प्रथम धन्यवाद ! तुम्ही म्हणताय, "आपण आणि मकरंद साठे या दोघांबद्दल मला आज मराठीत बहुदा सर्वात जास्त आदर आहे हे मी अनेकदा लिहीले आहे". श्रीधर तिळवे :मकरंद साठे ह्यांच्याबद्दल मलाही आदर आहे स्वतःचा मध्यमवर्ग झाकण्यापेक्षा तो खोलून ठेवण्यात अधिक अर्थ आहे हे कळलेल्या दुर्मिळ लेखकांपैकी ते एक आहेत मुख्य म्हणजे श्याम मनोहरांची उगाचची अगतिकता त्यांच्या पात्रांच्या ठायी नाही नवमध्यमवर्गाच्या आंतरिक लालसा आणि त्यांच्यातील साधनशुचितेचा होत चाललेला ऱ्हास ते प्रभावीपणे मांडतात असो तुम्ही म्हणताय, "पण आपल्या अश्या कविता वाचल्या की मला काही समजेनासे होते". श्रीधर तिळवे नाईक : अश्या म्हणजे कश्या ? तश्या म्हणजे कश्या ?आणि तश्या का आवडतात आणि अश्या का आवडत नाहीत तुम्ही म्हणताय, "एक भयंकर मोठा समाज भयंकर इंटेन्सली पोट भरण्यासाठी,आपले जीवन सुधारण्यासाठी इरेला पडून धडपडत आहे.खूप मोठ्या प्रमाणावर तोंडाने ...
- Get link
- X
- Other Apps
अब्सर्ड कविता प्रबोधनात्मक युगाचा औद्योगिक क्रांतीने अंत करायला सुरवात केली आणि मानवी इतिहासातला आधुनिक टप्पा सुरु झाला ह्या आधुनिकतेचे व्यक्तिगत आविष्कृत रूप म्हणजे अस्तित्ववाद ! अस्तित्ववादाचे सात टप्पे आहेत १ आदि अस्तित्ववाद हा प्रामुख्याने सोरेन किर्केगार्द व फ्रेडरिक नित्शे ह्यांनी मांडला अस्तित्ववादाच्या सर्व मूळ थीम्स ह्या दोघांनी शोधल्या मराठी साहित्यावर ह्या दोघांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना आधुनिक युगाचे पाच तत्वज्ञ निवडले तर त्यात ह्या दोघांचा समावेश करावाच लागतो इतके ह्या दोघांचे कार्य महत्वाचे आहे ह्यातील किर्केगार्दच्या प्रभावामुळेच इब्सेन इब्सेन बनला २ मानसघटित अस्तित्ववाद हा एडमंड हुसेर्ल ने मांडला ह्याने हेतुगर्भतेचे इंटेन्शनलिटीचे तत्वज्ञान मांडले प्रत्येक मानवी कृती ही हेतू ठेऊन जन्मते आपले ज्ञानही हेतुग्रस्त असते अशी त्याची मांडणी पुढे अनसर्टन्टीच्या तत्वज्ञानाला जन्म देणारी ठरली हुसेर्लने भूमितीच्या तत्वज्ञानाची जी मांडणी केली तिचा थेट प्रभाव जॅकस देरिदावर आहे ३ मनोविश्लेषणात्मक अस्तित्ववाद हा जास्पर्स व सिगमंड फ्रॉइड ह्...
- Get link
- X
- Other Apps
अर्बन लिरिकॅलीटीच्या शोधात श्रीधर तिळवे नाईक गीतात्मकता (लिरिकॅलीटी)ही कवितेतली एक अपरिहार्य गोष्ट आहे आणि अक्षरवृत्त आणि मात्रावृत्तात लिहिणाऱ्या लोकांना ती माहित असतेच मात्र प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुमचा एथॉस अरबन असतो सुदैवाने ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुरवातीलाच सापडले -स्वच्छन्द आणि अर्बन स्लॅन्ग ! माझा कवितेचा झटका तेव्हाही एका फ्लो मध्ये वीस पंचवीस कविता लिहणारा होता आणि अर्बन लिरिकॅलीटीबाबत हेच घडले चालले आहे xx माझे कुमारीशी xx भोग करायला बहरून तुमची काही नैतिक हरकत बाप म्हणून बाप म्हणून अशी सुरवात होऊन ही अर्बन लिरिकॅलीटी सुरु झाली आणि कर डिस्को हो फियास्को कुठले न बंधन काचू दे देह अवघा नाचू दे अशी रचना करत ती संपली ह्यातील चालले आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार मध्ये आहे तर कर डिस्को डेकॅथलॉन मध्ये ! कोल्हापुरी स्लॅन्गचा वापर अटळ होता तो झाला काही गझलांच्यातही अर्बन लिरिकॅलीटी मेंटेन झाली आता ह्या कवितांच्याकडे बघताना जाणवते कि चालले आहे ही लॉन्ग ओळींची तर कर डिस्को शॉर्ट ...
- Get link
- X
- Other Apps
स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे १ श्रीधर तिळवे नाईक आपण कशासाठी जगतो का जगतो कुणासाठी जगतो काय जगतो केव्हा जगतो हे प्रश्न कायमच माणसाचा पाठलाग करत असतात त्यातूनच माणसाने स्वतःचे मूल्यमापन स्वतःच्या व्हॅल्यू व स्टॅन्डर्डनं करावं कि इतरांनी दिलेल्या फूटपट्ट्या वापराव्यात ? हे प्रश्न निर्माण होतात व स्वमूल्यमापनाचाही प्रश्न निर्माण होतो व माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रश्न बनतो जगण्याचे चारच प्रकार असतात मोक्षिक : ह्या प्रकारात तुम्ही फूटपट्ट्या फाट्यावर मारून फूटपट्ट्या नाकारून जगता आत्मिक : जिथे तुम्ही स्वतःच्या फुटपट्ट्यानी जगता आर्थिक : जिथे तुम्ही समाजाच्या फुटपट्ट्यानी जगता कामिक : जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या फुटपट्ट्यांप्रमाणे स्टॅण्डर्डप्रमाणे जगता फूटपट्ट्या म्हणजे तुमचे फूट कुठे उभे आहेत कुठल्या मूल्यात उभे आहेत त्याची पट्टी म्हणजे इलाका म्हणजे क्षेत्र ! ही पट्टी हे क्षेत्र आपल्या अंतःकरणात तयार होत असते वावरत असते ते स्थावर आणि जंगम असे दोन्ही असते आपण आपला मोबाईल कॅरी करावा तसे ...