भीमसंवेदनशीलता आणि नितीन वाघ ह्यांची बुद्धाइतकं स्वार्थी नाही होता येत ही कविता श्रीधर तिळवे नाईक बाबासाहेब आंबेडकर हा भारतातील प्रबोधनाचा सर्वोच्च बिंदू आहे आणि त्यांनी जी संवेदनशीलता निर्माण केली ती भीमसंवेदनशीलता होय जय भीम ही घोषणा ही ह्या भीमसंवेदनशीलतेचा जयजयकार आहे तिचा प्रारंभबिंदू शैव आहे आणि त्याचे नाव महात्मा फुले आहे फुले दाम्पत्याच्या शैवपणावर मी दीर्घ लिखाण इतरत्र केले आहे खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेंना गुरु मानल्याचे सर्वश्रुत आहे बाबासाहेबांनी हा प्रारंभबिंदूतून एक प्रचंड मोठा कॅनव्हास निर्माण केला आणि त्याची अंतिम परिणीती नवबौद्धपणात झाली आंबेडकर हे ह्या भीमसंवेदनशीलतेचे मुख्य प्रवर्तक आहेत त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म हा आत्तापर्यंत चालत आलेला बौद्ध धर्म नाही तो पूर्णपणे वेगळा असा बौद्ध धर्म आहे ज्याची चर्चा मी इतरत्र केली आहे भीमसंवेदनशीलतेचा हा दुसरा टप्पा आहे आणि तोच मुख्य टप्पा आहे १९९० नंतर जगात सर्वत्र चौथी नवता अस्तित्वात आली आणि ह्या नव्या बदलाला सामोरे कसे जायचे हा एक क्रुशियल प्रश्न बनला आणि मग ह्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्नही ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
आशुतोष दिवाण ह्यांचा घटत्कोच श्रीधर तिळवे नाईक आशुतोष दिवाण ह्यांचे घटोत्कच हे नाटक कित्येक महिने पाहीन पाहीन म्हणून चालले होते मी अकादमी ऑफ थिएटर च्या वसंत महोत्सवाच्या निवडप्रक्रियेत कधी भाग घेत नाही अपवाद फक्त कोपेनहेगेन व आत्ताचे घटोत्कच त्यांची मात्र मी जोरदार शिफारस केली होती कारण मला तर उत्सुकता होतीच पण विध्यार्थ्यांनाही उत्सुकता होती ह्याशिवाय च प्र देशपांडे व संजय पवार ह्यांच्या नाटकांचा महोत्सव आपण करावा व समुद्र, सावित्री व आर्टिफिशियल इंटिलिजिन्स हीही नाटकं करावीत असं मी सुचवलं होतं पण यासंदर्भात अद्याप काही घडलेले नाही ह्यातील आशुतोष दिवाण ह्यांचे नाटक सिलेक्ट केल्याची खबर मंगेश बनसोड ह्याने मला दिली तेव्हाच वेळ काढून नाटक बघायचे हे ठरवलं होतं भारतात सर्वात प्राचीन दृष्टिकोनांपैकी एक अनुकृतिवाद हा लोकप्रिय वाद आहे ह्यात रामायण महाभारत व पुराणे ह्यांच्यातील आशयकृतींची अनुकृती करून नाटक लिहिले जाते उदा कालिदासाचे महाभारतातील कथानकावर आधारित अभिज्ञानशाकुन्तलम भवभूतीचे रामायणावर आधारित महावीरचरित व उत्तर ...
- Get link
- X
- Other Apps
सांगण्यास आनंद होतो आहे कि एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार संपूर्णपणे टाईप व फेसबुकवर डीजीपब्लिश करून झाला आहे हा संग्रह अनालॉगसमध्ये पॉप्युलर प्रकाशनाने काढला होता व काहीसा मर्यादित होता कारण सर्वच कविता प्रकाशित करणं शक्य न्हवतं अस्मिता मोहितेंनी त्यावर घेतलेली मेहनत काहीशी एकतर्फी होती कारण कवी महाराजांनी म्हणजे अस्मादिकांनी ह्यावर काहीच मेहनत घेतली न्हवती १९८५ -८६ ला स्वीकारलेला हा संग्रह १९९१ -९२ साली प्रकाशित झाला आणि त्याला अवॉर्ड्स फिवार्ड्स मिळाली ह्यातल्या कविता आऊटडेटेड झालेत असं माझं त्यावेळी मत होतं आणि त्याकाळात दिलीप लाठी ह्या माझ्या परममित्राला दैनिक मराठवाड्याच्या रविवार पुरवणीसाठी दिलेल्या मुलाखतीत ते छापून आलं होतं आल्हाद भावसार मंगेश बनसोड दिलीप लाठी भालचंद्र कुबल महेश म्हात्रे आदी माझ्या मित्रांना मात्र माझे हे मत अजिबात आवडलं न्हवतं आणि त्यांच्या मते ह्या कविता भवतालाला अजूनही लागू होत होत्या १९९५ नंतरही ह्या कविता आवडणारे लोक भेटत राहिले आणि इथे फेसबुकवरही काहींना त्या आवडत राहिल्या ह्या कविता टाईप करण्याबाबत ज्यांनी लकडा लाव...
- Get link
- X
- Other Apps
आपण स्तुतीने भुलून वा हुरळून का जातो किंवा निंदेने व्यथित का होतो ? वास्तविक भाषा म्हणजे काही आईस्क्रीम न्हवे कि शस्त्र न्हवे पण तरीही आपण भाषेने मधाळतो वा जखमी होतो आपण भाषेला फक्त भाषा म्हणून पाहिले तर भाषा फक्त भाषाच राहते पण आपण तसे पाहत नाही मग भाषा शस्त्र बनते आईस्क्रीम बनते भाषेला ताकद आपण देतो एरव्ही भाषा फक्त भाषांग असते
- Get link
- X
- Other Apps
काही टिपणे श्रीधर तिळवे बहुयथातथ्यवाद आणि एकजालवाद सत्य हे शब्दाबाहेर असते चिन्हाबाहेर असते त्यामुळे ते चिन्हांना प्राप्त होण्याची शक्यता नाही पण वास्तव मात्र चिन्हात आणता येते पण वास्तव आपणास संपूर्ण दिसत नाही त्यामुळे जे वास्तव दिसते ते तथ्य असते आणि आपण सर्व आपल्या आपल्या तथ्यांच्या आधारे बोलत असतो . मात्र ही सर्व तथ्ये एका वास्तवासंदर्भात आहेत ह्याची आपणाला कल्पना असते हे जे दिसणारे तथ्य असते तेही संपूर्णपणे चिन्हात व्यक्त होत नाही किंवा करता येत नाहीत त्यामुळे आपण सर्व आंशिक तथ्यांच्या आधारे एकमेकांशी बोलायला लागतो ह्यांना आपण यथातथ्ये म्हणतो फेसबुक हे यथातथ्यांचे भांडार म्हणून आपल्यापुढे सादर होत असते आणि ह्या यथातथ्यांच्या वरून आपण हमरीतुमरीवर येऊन भांडत असतो जे अनेकदा विनोदी वाटायला लागते . डिजिटल युगांचा इतिहास हा यथातथ्यांचा इतिहास असतो आणि तो अनेक आवाजात बोलत असतो आंबेडकरवादी आवाज हिंदुत्ववादी आवाज शैव आवाज आगमवादी आवाज असे अनेक आवाज सतत निनादत असतात आणि त्यातून प्रचंड मोठा कोलाहल निर्माण होत असतो हा कोलाहल अनेकदा कर्कश म्हणावा इतका वाढत जातो आणि कानात तेलासा...
- Get link
- X
- Other Apps
साहित्यिक टिपण्या नितीन चांदोरकर ह्यांस शुभेच्छा आहेतच भविष्य डिजिटलला आहे छापीलला नाही तेव्हा तुम्ही इ अंक काढताय त्याला माझा फुल्ल सपोर्ट ! नव्वदोत्तर पिढीने एकदा आमच्यासाठी मार्गदर्शनपर लिही म्हणून लेख मागितला होता त्यावेळी मी तसा लेख लिहिला होता आता पुन्हा तेच कसं लिहिणार मला रिपीट करायला आवडत नाही मी दिवाळी अंकात लिहीत नाही अनेक धुरंधरांना नकार देऊन मी नकार दिलाय अपवाद फक्त चळवळीचे अंक तरीही काही नवीन सुचले तर नक्की देईन आम्ही महापंच चालू केलंय त्याला आठवड्याला किमान एक लेख देणे आवश्यक आहे त्यालाही विषय सद्या सापडलेला नाही नाराज नको होऊस तुझ्या अंकाला मनापासून शुभेच्छा ! मला नेहमीच तरुण पिढीचं अप्रूप असतं कारण ती बदलाची वाहक असते तुमचा अंक हा नवीन बदलांना आविष्कृत करेल अशी आशा वाटते . धन्यवाद ! तू मी विश्रामच्या लेखकाची गोष्ट ह्या कादंबरीवर दिलेले व्याख्यान शब्दांकन करून तेच का छापत नाहीस सुरवात तू केलीच आहेस ते पूर्ण कर -------------------------------------------------------------------------------------------------------------------- जातीपाती सोडतील ...