आमच्या पिढीच्या गोची श्रीधर तिळवे

आमच्या पिढीची सर्वात मोठी गोचि कुठली असेल तर ती म्हणजे एकाचवेळी आमची पिढी नव्या इंटरनेट क्रांतीला जन्म देत होती आणि त्याच वेळी आम्हीच निर्माण केलेल्या मीडियाला वापरून कर्मठ लोकांनी निर्माण केलेला धार्मिक हैदोशी अनुभवत होती 

आधीच्या पोस्टमॉडर्नने रिटर्न टू ट्रॅडीशन आणि रिलीजनचा जो अजेंडा राबवला त्याला पूरक हा धार्मिक हैदोस होता आणि ह्या हैदोसापुढे आम्ही ठाकल्यामुळे आम्हाला त्या हैदोसाचे काही करणे भाग होते त्यातून चार  पर्याय उभे ठाकले 
१ धर्माला व परंपरेला शरण जा व पोस्टमॉडर्न वा देशीवादाची मान्यता मिळवा आणि ह्या सिस्टीममध्ये सेटल व्हा 
२ ह्यातून अनिष्ट हे पुर्णं नष्ट करण्यासाठी हल्ले करून नवे धर्म निर्माण करा 
३ सर्व धर्मं नाकारा व नवे धम्म  व नवे अध्यात्म निर्माण करा 
४ धर्म व अध्यात्म संपूर्ण नाकारा 

आमच्या पिढीत ९९ टक्के लोक पहिल्या मार्गाने गेले आणि विविध जागी सेटल झाले एक टक्का संघर्ष करत राहिले मी तिसरा पर्याय निवडला व चौथी नवता आणि चिन्हआगमता (ह्यात चिन्हशैवता चिन्हासांख्यता चिन्हजैनता व चिन्हबौद्धता ह्या चारी येतात  )असा कम्बाईन कार्यक्रम हाती घेतला राबवला चिन्हागमतेत  चिन्हशैवतेत जे जे भूतकाळातील चांगले आहे ते सादर करणे आणि अद्ययावत करणे असे दोन उद्योग मी केले ते लोकांच्यापर्यंत कसे आणि कितपत पोहचले ह्याची मी कधी चौकशी केली नाही माझ्या कवितेतून सतत येणारे बौद्ध उल्लेख अनेकांना खटकले पण मी त्याची कधी पर्वा केली नाही

परंपरा ही अद्ययावततेची सर्वात मोठी शत्रू असल्याने मी कायमच  तिच्याशी पंगा घेतला

चौथ्या नवतेसंदर्भात मला  जालता विरुद्ध जूनता असा संघर्ष वाट्याला आला आणि अजूनही येतोय जालतेतील पहिली नवता म्हणजे विसाव्या शतकातील १ सौंदर्यवादी नवता २ आधुनिक नवता ३ उत्तराधुनिक देशीवादी नवता ह्या तीन नवंतानंतरची चौथी नवता असल्याने मी चौथी नवता हा शब्द प्रयोग वापरत राहिलो ह्यामागे एक उद्देश असाही होता कि येणाऱ्या पिढीला नवी नवता निर्माण करावीशी वाटली तर तिला निर्माण करता आली पाहिजे
जी पाचवी नवता येईल ती आमच्या चौथ्या नवतेचं नामकरण करेल जसं आमच्या पिढीनं तिसऱ्या नवतेचे देशीवादी नवता असे नामकरण केले

आमच्या पिढीच्या वाट्याला प्रत्येक युगातील जूनता विरुद्ध नवता असा संघर्ष अतिशय व्यापक
व न भुतो न भविष्यति अशा पद्धतीने आला

निसर्गयुगात हा संघर्ष श्रद्धा विरुद्ध धर्म कर्मठ दहशतवादी विरुद्ध सुधारक असा होता मोक्षयुगात धर्म विरुद्ध मोक्ष धर्मशासक  विरुद्ध क्रांतिकारक  धर्मराज्यसंस्थापकांत  मोझेस , मोहम्मद , श्रीकृष्ण , झरतहृष्ट येतात तर धर्मसंस्थापकात जिझस वैग्रे येतात वैयक्तिक धर्मराज्यसंस्थापकांनी  आपले धर्मराज्य निर्माण केले आहे आणि त्या राज्यात धर्माज्ञाही  दिल्या आहेत हे प्रथम धर्मसुधारक म्हणून आले आणि धर्मशासक म्हणून प्रस्थापित झाले

मोक्षयुगात धर्म विरुद्ध मोक्ष धर्मशासक  विरुद्ध क्रांतिकारक
प्रबोधनयुगात  उत्तर धर्म उत्तर ख्रिश्चन वैष्णव इस्लाम विरुद्ध विज्ञान पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी
तंत्रज्ञानयुगात  उत्तर पारंपारिक कान्ट किर्केगार्द नित्शे विरुद्ध आधुनिक नवनिर्माणवादी  टेक्नोसॅव्ही
चिन्हयुगात बद्धकोष्टक  विरुद्ध अद्ययावत उत्तराधुनिक विरुद्ध महाजालिक
आमच्या पिढीला हे सगळेच संघर्ष  लढावे लागले आणि लढायला लागतायत

Comments

Popular posts from this blog