हॅपनिंग प्रक्रिया श्रीधर तिळवे नाईक
प्रत्येक दशक स्वतःच्या काही हॅपनिंग प्रक्रिया घडवतच साकार होत असते चौथ्या नवतेची ऐन्शोत्तर पिढी पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली नव्वोत्तर पिढी इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विसहस्त्रोत्तर पिढी फेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह आदी अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली तर द्विदशकोत्तर पिढी स्मार्ट फोन व्हाटसप अँप अशा काही हॅपनिंग प्रक्रियांना सामोरी गेली
प्रश्न असा आहे कि साहित्यिक ह्यांना सामोरे कसे गेले ऐन्शोत्तर पिढीला चारही दशक नावीन्याची नवतेची होती नव्वोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग ह्या प्रक्रिया जूनता म्हणून लाभल्या
द्विसहस्त्रकोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडी अशा काही हॅपनिंग प्रक्रियां जूनता म्हणून लाभल्या तर द्विदशकोत्तर पिढीला पर्सनल कम्प्युटर रंगीत टीव्ही अप्रोनेट कॅसेनेटिंग इंटरनेट लॅपटॉप डीव्हीडीफेसबुक ट्विटर पेनड्राईव्ह ह्या प्रक्रिया जूनता म्हणून लाभल्या
ह्या हॅपनिंग प्रक्रियांचे त्या त्या पिढ्यांच्यावर नेमके काय काय परिणाम झाले ?
एक वेळ अशी होती कि समाजशास्त्रीय पिढ्यांचा अस्त चौथ्या नवतेत होईल असं वाटलं होत पण प्रत्यक्षात तसं झालं नाही सतीश तांबे सुनील तांबे रवींद्र लाखे चं प्र देशपांडे ह्यांची काहीशी आयडियॉलॉजीला टच करणारी पिढी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवत राहिली श्रमिकांच्याबद्दलचा कळवळा ह्या पिढीला फेसबुकवरही वाटतच राहिला आणि सामान्य जनाविषयीची आस्था अगदी उत्तराधुनिक टोक गाठतांनाही कमी झाली नाही नव्वोत्तर पिढीचा चंगळवाद आणि संधिसाधूपणा लपवता म्हंटला तरी लपला नाही द्विसहस्त्रकोत्तर पिढी ह्या दोन्ही पिढ्यांचा सुवर्णमध्य साधण्याचा भूमिकेत रेंगाळत राहिली संधिसाधूपणाऐवजी प्रोफेशनल मार्केटिंग आणि चंगळवादी ऐश विवेकाने करण्याची धडपड ही पिढी करतांना दिसते देशी चौथ्या नवतेच्या स्पष्ट पाऊलखुणा ह्या लोकांच्या लेखनात आढळतात पण आश्चर्यकारकरित्या सत्यकथेचा प्रतिमावाद इथे कमबॅक करतांना दिसतोय मात्र सत्यकथेची चूक हे लोक करत नाहीत सत्यकथेची सर्वात मोठी चूक कुठली असेल तर ती म्हणजे अभिरुचीने जो मर्ढेकरी प्रतिमावाद आणला तो आशयकेंद्री व अर्थकेंद्री होता ही मूलभूत गोष्टच ती विसरली पुढे सौष्ठव च्या बाबतीत हीच चूक अभिधानानंतरने केली ही पिढी सत्यकथा आणि अभिधानंतरने केलेली प्रतिमाबंबाळतेची चूक करत नाहीयेत ती ह्याबाबत अभिरुची सौष्ठव सारखी प्रतिमेला साधन म्हणून वापरण्याबाबत अधिक सजग आहे
प्रत्येक पिढीच्या वाट्याला पाच प्रकारच्या आशयधारा थीम्स येतात प्रश्न असतो त्या आशयधारा ती कशा प्रकाशते ?
१ सनातन आशयधारा ह्यात सूर्य चंद्र आकाशगंगा झाड जंगल ह्या सारख्या आशयधारा येतात ह्यातल्या अनेक वापरून गुळगुळीत झालेल्या असतात मात्र नवा प्रतिभावंत त्यांना पुन्हा नवा आशय देतो
२ पारंपारिक आशयधारा ह्यात परंपरेने चालत आलेल्या आशयधारा येतात मात्र नवा प्रतिभावंत त्यांना पुन्हा नवा आशय देतो उदा विठ्ठल रुक्मिणी भीमा पंढरपूर शिवाजी संभाजी पेशवे रामायण महाभारत बुद्ध शिव
३ प्रस्थापित आशयधारा ह्यात मागील दोन तीन पिढ्यांनी वापरलेल्या अन प्रस्थापित झालेल्या आशयधारा येतात शाहू आंबेडकर चवदार संविधान निवडणुका चौकोनी कुटुंब देशीवाद अस्तित्ववाद
४ समांतर आशयधारा ह्यात मागील पिढीने वापरलेल्या पण अद्याप प्रस्थापित न झालेल्या आशयधारा येतात लिव्ह इन रिलेशनशिप पर्सनल कम्प्युटर सेम जेंडर विवाह कवितावाचन व काव्यगायनाचे कमबॅक देशीवादाऐवजी मार्गी देशी पोटी जमाती घटकांचे इंटरेस्टिंग इंटरनेटींग ह्या आमच्या पिढीच्या काही आशयधारा ह्यांनी चौथी नवता सुरु केली आता ह्या समांतर आशयधारा झाल्यात कारण त्या अद्याप प्रस्थापित नाहीत मात्र समाजाचा विरोध आता मावळत चालला आहे
५ प्रायोगिक आशयधारा ह्यात आत्ताच्या ताज्या अवकाशात व काळात नव्याने प्रवेश केलेल्या आशयधारा येतात ह्यांच्यामुळेच नवतेची सुरवात होते प्रश्न असा आहे कि ह्या पिढीला स्वतःच्या काही आशयधारा सापडल्या आहेत का ? कि आमच्या पिढीच्या आशयधारा ह्याच ह्याही पिढीच्या आशयधारा आहेत आमची पिढी जे लिहायचंय ते लिहून चुकली आहे पुढे लिहीलही पण आमचा ब्रेनही हलवेल असं काही ह्या पिढीपुढे आहे का कि अजूनही आम्हीच ह्यांचा ब्रेन हलवतो आहे ?
Pranav Sakhadéo हा प्रश्न महत्त्वाचा आहे की लिहिती पिढी काय करेल? आणि त्यापुढची इन्स्टाग्राम वगैरेवरची पिढी काय व कशी असेल? त्याचं जे काही असेल ते उत्तर मिळेल. पण - ब्रेन हलवणारं काही येईल का - याबाबत मला प्रश्न आहेत. साहित्य/कलेने नक्की काय केलं पाहिजे? ब्रेन हलवणं हे तुम्ही कोणत्या अर्थी म्हणता आहात मला समजलं नाही, पण मला ते सुपरफिशल वाटतंय. एक खरं की आजपर्यंत तरी माझ्या पिढीने आमचं म्हणावं असं कोणतंही व्यासपीठ उभारलेलं नाही, ज्यातून काही तात्त्विक मांडणी झाली व होईल. एकाअर्थी ही माझी पिढी मला स्कॅटर्ड व आत्ममग्न वाटते. ती वरवर सामूहिक असल्याचं भासवते, पण आतून स्वतःत रमलेली वाटते. यात सगळे प्रवाह/कवी/लेखक आले. याची कारणं काय हे शोधायला हवं.
लिहित्या सर्वच पिढ्या आहेत प्रश्न आत्ताची पिढी काय करणार असा आहे इंस्टाग्राम तुमच्याच पिढीचा भाग आहे तुमच्या पुढील पिढ्यांच्यासाठी तुम्ही व्यासपीठ सोडलेलं नाही कारण त्याची खास अशी गरजच उरलेली नाही फेसबुक हाच मीटिंग मेटींग आणि मेल्टिंग स्पॉट आहे प्रश्न आहे तो तुमच्या पिढीचा एक चेहरा तयार झाला आहे काय तुम्ही आमच्या पिढीपेक्षा खरोखर कुठे वेगळे आहात का ? तुम्ही खरोखर नव्वदोत्तर पिढी मुळात समग्र वाचायचा साधा प्रयत्न तरी केलाय का ? आम्ही हेलपाटे टाकून साठोत्तरी लेखन कमावले तुम्ही तसं केलं का ? माझा अनुभव असा कि तुम्हीही साठोत्तरीच्याच मागे लागला हे म्हणजे आमच्या पिढीने मर्ढेकरांच्या नादाला लागण्यासारखं होतं त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि नव्वोदत्तरी पण साठोत्तरी च्या प्रभावाखाली आणि तुम्हीही ! तुम्ही केलेल्या अनेक गोष्टी तुमच्या पिढीच्या आधीच कुणी केल्या असल्या तर तुम्हाला त्याचं श्रेय मिळणे अवघड आहे लेखनाला मान्यता मिळवण्याचा जो आटापिटा नव्वोदत्तरी पिढीने केला त्याच्या झाश्यात तुम्ही पण आलात काय आणि त्या नादात आता स्वतःच्या क्रिएटिव्ह प्रोसेसकडे तुम्ही दुर्लक्ष्य करत आहात काय
पुढच्या पिढीचे कौतुक करून त्यांना सोकावून ठेवणारे साहित्यिक प्रत्येक पिढीत असतात त्याने काहीच फायदा होत नाही मुळात संपूर्ण जागतिक काव्यक्षेत्रातच एक प्रकारची मरगळ आहे मी माझे समकालीन युरोपियन अमेरिकन वाचतो तेव्हा फार ग्रेट कविता वाचतोय असं मला वाटत नाही आमच्या पिढीतले कवी सर्वत्रच झाकले गेले असं दिसतंय आणि सर्वत्रच साठोत्तरीने पुढच्या पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्यातून फक्त तेच वाचलेत ज्यांनी मान्यतेचा टिळा लावायला नकार दिला
Comments
Post a Comment