कविता आणि छंद १ श्रीधर तिळवे नाईक
मराठीत कविता आणि छंद ह्यांचा सांगोपांग विचार अनेकांनी केला आहे ग्रेस आणि सुरेश भट ह्यांच्यामुळे मराठीत वृत्त आणि छंद ह्यांचा कमबॅक झाला विशेषतः ग्रेस ह्यांनी अनेक पारंपारीक वृते समर्थपणाने वापरून वृत्त आऊटडेटेड झालंय ही कल्पना मोडीत काढीत काढली निसर्गिय युगात माणसाने अक्षरवृत्ते आणि मात्रावृत्ते ह्यांचा शोध लावला पुढे विश्वीय युगाने त्यांचा आधीक विस्तार केला ह्यांना प्रथम छेद दिला तो सृष्टीय युगाने ! विज्ञानाने भारावलेल्या ह्या युगात स्व महत्वाचा झाला आणि स्वछंद ही नव्या युगाची भाषाशैली झाली (freeverse ) विशेषतः शेक्सपियर ने स्वछंदाचा जबरदस्त वापर केला त्याची नाटके स्वछंदांच्या वापराची मिसाल बनली स्वछंदात छंद सोडला जात नाही मात्र मात्रांची गणिती मात्रा भिरकावली जाते मात्रिक लय सोडली जात नाही पण मात्रांचे अंकगणित भिरकावले जाते आणि स्व प्रमाण मानून रचनेत सैलपणा आला तर त्याला दुरुस्त न करता तो तसाच ठेवला जातो . उदाहरणार्थ अनुष्टुभची मात्रिक लय सोडायची नाही पण मात्रा कमीजास्त झाल्या तरी त्याविषयी बॉदर करायचे नाही अशी ही प्रवृत्ती असते प्रतिसृष्टीय युगाने स्वछंद मोडीत काढून त्याजागी मुक्तछंद आणला . मुक्तछंदात मात्रा आणि अक्षरगणना ह्यांची पूर्ण काशी केली जाते आणि फक्त पद्याचा वापर केला जातो उत्तरप्रतिसृष्टीयतेने ह्याही पलीकडे जाऊन गद्यछंद आणला आणि कविता किमान पद्यात लिहिली जावी ही मागणीही धुडकावून लावली गद्यात कविता लिहिली जाऊ शकते हे उत्तरप्रतिसृष्टीयतेने सिद्ध केले आमची पिढी कविता लिहायला बसली तेव्हा तिच्यामागे छंदाचा हा इतिहास होता आणि समोर चिन्हसृष्टीय युग ठाकायला सुरवात झाली होती
Comments
Post a Comment