भारतीय समाजरचना आणि नेमाडें ह्यांची ''हिंदू''   श्रीधर तिळवे /नाईक 

                                      १) भारतीय समाजव्यवस्था 
भारतीय समाज व्यवस्था ही एक गुंतागुंतीची समाजव्यवस्था असून भारतात तिला पाहताना
१वर्णाधिष्ठित
२जात अधिष्ठित
३वर्गाधिष्ठित
अश्या  तीन दृष्टीकोनातून पाहिले जाते . माझ्या मते हे सर्व दृष्टीकोन उथळ असून भारतीय समाजव्यवस्था समजायला त्यांचा काहीही उपयोग होत नाही वैदिक निगम आणि युरोपिअन ह्यांनी प्रचलित केलेले हे मॉडेल आता  फेकून देण्याची वेळ झाली आहे . मी माझ्या भारत भ्रमणातून मला सापडलेल्या मॉडेलची मांडणी इथे करत आहे .
                २)  भारतीय दशसमुदायी समाजरचना

माझ्या मते भारतीय समाजव्यवस्था ही दहा समुदायांच्या बृहत जालांनी विणलेले महाजाल असून 

 ते सातत्याने विकास पावत अपडेट होत असते . त्याच्या अपडेट होण्याची गती मंद असल्याने ते 

वरकरणी स्थिर वाटत असते पण लॉंग टर्म मध्ये ते इवोल्व झालेलं दिसते . त्यामुळेच 

 भारतीय समाजरचना ही एक गुंतागुंतीची समाजरचना भासते  आणि गेली दोन दशके ती विचारवंताना चकवा देते आहे . तिचा तोंडवळा वर्ण , जाती , वर्ग असा भासत असला तरी  प्रत्यक्षात ती  दशसमुदायी आहे  हे समुदाय खुले असून त्यांचा आकार चेंडूसारखा आहे त्यामुळे तोचतोचपणा आणि सावकाश सरकणारा नवेपणा ह्यांच्यात ती घुसमटत असते वसाहतवादाच्या प्रभावामुळे आणि मनुस्मृतीच्या अतिरिक्त माऱ्यामुळे आपण वर्ण आणि जात ह्यांच्या आहारी जाऊन बोलत असलो तरी त्यामुळे भारतीय समाजरचना कळण्याची सुतराम शक्यता नाही . मी सुचवलेले दशसमुदायी मॉडेलच ह्याबाबत जास्त कामाचे आहे हे दशसमुदाय म्हणजे दहा चेंडू आहेत  हे चेंडू जेव्हा एकावर एक चढतात तेव्हा ती उभ्या अक्षाची गुलाम वाटते जेव्हा ते एकमेकास लागून पसरतात तेव्हा ती आडव्या अक्षाची वाटते आणि ते स्पर्श न करता विखुरतात तेव्हा आख्खा भारत पोस्टमॉडर्न वाटायला लागतो . हे समुदाय  पुढीलप्रमाणे 

१ पुरोहित समुदाय  PUROHIT SAMUDAY 

धर्मशास्त्री SUPREME JUDITIAL DHARMSHASTRI
न्यायाधीश JUSTICE-NYAYADHISH
वैद्य VAIDYA
ब्राह्मण BRAHMINS
गुरव GURAV
भगत BHAGAT
महाभक्त BHAKT
भटके BHATKE SADHU
देवसेवक SEVAK ह्या समुहानी  बनलेला आहे.

२ शासक समुदाय   SHASAK SAMUDAY 

राजा वा राज्याधीपती RAJYADHIPATI
पंतप्रधान PRIME MINISTER
मंत्री MINISTERS
सेनापती SENAPATI
योद्धे WARRIORS
अधिकारी OFFICERS
सैनिक SOLDIERS
भटके BHATKE
सेवक SEVAK ह्या समुहानी  बनलेला आहे.

३ व्यापारी पणी समुदाय 3 VYAPARI PANI SAMUDAY 

श्रेष्ठी / भांडवलदार SRESHTHI
निर्माता PRODUCER
कारागीर ARTISANS
वंजारी WANJARI/CARRIERS
वितरक DISTRIBUTORS
दुकानदार SHOPPERS
कामगार WORKERS
भटके विक्रेते BHATKE ह्या समुहानी  बनलेला आहे.


४ कृषी समुदाय 4 AGRICULTURS

श्रेष्ठी / जमीनदार SHRESHTHI
क्षेत्रकरी FARM-OWNER
शेतकरी FARMER
कुणबी CULTIVATERS
माळी GARDENER
शेतमजूर FARM-WORKERS
भटके BHATKE
शेत सेवक SERVICERS ह्या समुहानी  बनलेला आहे.


५ पशुपालक समुदाय 5 ANIMALRS

श्रेष्ठी SHRESHTHI
धनगर SHEPHARDS
गोपालक  GOPALAKS
खाटिक BUTCHERS
कामगार WORKERS
सेवक SERVICERS
भटके BHATKE ह्या समुहानी  बनलेला आहे.

६ आदिवासी समुदाय 6  ADIVASI




७ सर्जक 7  SARJAK CREATORS
बुद्ध व मुक्त BUDDHAS
वैज्ञानिक  DISCOVERER
तंत्र वैज्ञानिक INVENTOR
कलावंत ARTIST
दार्शनिक DARSHNIK
नवविचारकार IDEOLOGIST
व्यवस्थापनगुरु GURU-MANEGER
चिन्हवैज्ञानिक SIGNOVENTOR
प्रोग्रामर PROGRAMMER ह्या समुहानी  बनलेला आहे.

8 DNYANKARI

ज्ञानश्रे ष्ठी SHRESHTHI
ज्ञानव्यवस्थापक KNOWLEDGE MANEGERS
विद्वान SCHOLAR 
संपादक EDITORS
आचार्य ACHARYAS
शिक्षक TEACHERS
 पत्रकार JOURNALIST
कामगार WORKERS
ज्ञानाधिकारी KNOWLEDGE OFFICERS
विद्यार्थी STUDENTS ह्या समुहानी  बनलेला आहे.

९ दास समुदाय 9 DAS
गावदास GAVDAS /SI I.E. UNTOUCHABLES
नगरदास NAGARDAS/SI
देवदास DEV DAS/ DEV DASI
राजदास RAJDAS/SI
गृहदास GRUHDAS/SI
व्यापारदास VYAPARDAS/SI
कृषिदास KRUSHIDAS/SI
पशुदास PASHUDAS/SI
गणिका GANIK/KA ह्या समुहानी  बनलेला आहे.

१० बाहेरील समुदाय वा उपरे समुदाय 10 EXTERNAL

नेमाडे ह्या दहाही समुदायांना कवेत घेण्याचा प्रयत्न करतात 





                                                       ३ फॉर्म  आणि हिंदू 
हिंदू या कादंबरीच्या फॉर्मबद्दल मी बोलणार नाही कारण ह्या फॉर्ममधील काही गोष्टी मी माझ्या
 अडॉहॉकाबानासुना  ह्या कादंबरीबाबत वापरल्या आहेत.  अडॉहॉकाबानासुना आधी आली नसती तर नेमाडेंच्या हिंदूचे अनुकरण काही ठिकाणी झाले आहे असा शिक्का नक्कीच माझ्यावर मारला गेला असता उदाहरणार्थ अडॉहॉकाबानासुनातील 
हा भाग व हिंदुतील यक्षप्रश्नाचा भाग (पान २६१ ते २६९)

                                              ४ ) तीन नेमाडे आणि हिंदूतील नेमाडे 
साम टिव्हीवर चर्चेत भाग घेताना संजय आपटे ह्यांच्या प्रश्नाला 'लेखक नेमाडे जातीयवादी आहेत का ?' ह्या सुराला उत्तर देताना मी म्हंटले होते कि  नेमाडेंचे तीन टप्पे आहेत.
१) लेखक नेमाडे जे  अत्यंत प्रामाणिक आहेत अस्सल आहेत आणि जे मुळीच जातीयवादी  नाहीत. 
२) लेखकराव नेमाडे जे टीकास्वयंवरमध्ये प्रथम बालरुपात अवतरतात आणि ज्ञानपीठ मिळेपर्यंत वाढतच जातात. 
३) लेखकराज नेमाडे जे साहित्यात ज्ञानपीठानंतर राजकारण्यासारखे बोलतायत आणि कोल्यांट्य़ा उडया मारतायत आणि जातीवादाचे समर्थन करतात. सुदैवाने हिंदू ही कादंबरी प्रामाणिक व अस्सल लेखक नेमाड्यांनी लिहिली आहे. नामदेव ढसाळ  जसे कवितेबाहेर  वाट्टेल तसे कोलांट्या उड्या मारायचे मात्र कविता लिहिताना मांजरासारखे योग्यच पद्धतीने पायावर  पडायचे  तसे काहीच नेमाडेंचे आता  होणार कि काय अशी शंका येते आहे. 
लेखक नेमाडेंना राम राम आणि देशीवादी नेमाडेंना दुरूनच सलाम हे धोरण नाहीतरी मी पूर्वीपासून अवलंबले आहेच . 

                                               ५) मी हिंदूची समीक्षा का करतोय ?
हिंदू जेव्हा मी आल्या आल्या वाचली तेव्हा ती मला मुळीच आवडली नव्हती नंतर सहा महिन्यांनी वाचली तेव्हा मात्र ती बरी वाटली आणि तिसऱ्या वाचनात मात्र  ती आवडायला लागली ह्याचे कारण उघड आहे. हिंदू कोसलाप्रमाणे चटकदार नाही ती एखाद्या दारू प्रमाणे आहे. प्रथम कडवट चव पण नंतर ती चढत जाते. कोसला नंतरच्या वाचनात बालिश वाटत जाते. हिंदुत नेमके उलट होते. एखादा अनवट शास्त्रीय राग सतत ऐकल्याने आवडत जावा तसे होते. 
प्रश्न असा कि मग आत्ताच हिंदुवर का लिहावे? कारणे उघड आणि  स्पष्ट आहेत. 

अ) सर्वात महत्वाचे कारण नेमाडेंचा प्रवास हा गावातून बाहेर पडलेल्या साठोत्तरी पिढीचा प्रवास आहे. त्यामुळे नेमाडेंच्या प्रवासात मला अनेकदा माझ्या बापाचा प्रवास दिसतो. नेमाडेंच्या वडीलात अनेकदा शेतात आणि व्यापारात खपलेले माझे आजोबा दिसतात. नेमाडे हे ह्या अर्थाने आमचे साहित्यीक बाप आहेत.  स्वत:च्या  बापाला समजून घेणे आणि नेमाडेंना (आणि इथे खंडेरावाला) समजून घेणे हे काहीसे एकच आहे. मला नेहमीच असे वाटते कि आपले पूर्वज समजून घेण्याचा साहित्य हा एक विश्वासपात्र मार्ग आहे.  (चित्रपट आणि नाटकाला हि विश्वासपात्रता प्राप्त नाही कदाचित पुढे प्राप्त होईलही सीरीअल ही त्यात नव्वदोत्त्तरी भर) साहजिकच हिंदुवर लिहिताना मला माझे आजोबा आणि बाप आठवतायत. 

आ)  हा मजकूर मी आत्ताच का लिहितोय असाही प्रश्न मला आत्ता ह्या क्षणी पडतोय कदाचित मुंबईहून मी माझ्या गावी आलोय त्याचा तर हा परिणाम नाही ना  अशीही शंका दाटून येतेय. गाव आपला पाठलाग करत आपण  गावाचा हेही हिंदुवर लिहिण्याच एक कारण असेल. मुंबईत हिंदूचे होणारे वाचन आणि आपल्या गावात होणार वाचन ह्यामुळे हा फरक पडला असेल का असाही प्रश्न मला पडतो आहे. 

इ) हा प्रश्न पडण्याचे कारण असेही असेल कि अनेकदा खंडेराव गावात असतो. तेव्हा त्याला गावातले लोग साहित्य थोर वाटायला लागते. मग ते शाहिरी चौके असोत कि धनगरी गाणी असतो पण तो शहरात पोहोचला कि त्याची आर्कीऑलोजी सुरु !

ई) चौथे  कारण अर्थातच ह्या कादंबरीतील नेमाडे हे अस्सल लेखक आहेत हे आहेत . नेमाडे लेखन करताना विशेषतः कादंबरी लेखन करताना चिकित्सक   असतात पण  देशीवादी नसतात त्यामुळे समीक्षा करताना त्यांचा डोक्यात चालणारा साहित्य व्यवहार कादंबरी लिहिताना ते सहजरीत्या बाजूला सरतात आणि निके तेवढे निवडावे असे चालू होते. 

उ) ह्या  कादंबरीत नेमाडेंनी एक उत्कृष्ट तंत्र वापरले आहे. ह्या तंत्रानुसार खंडेराव ,चित्रपटाप्रमाणे घटनापट पहात जातो आणि हा घटनापट त्याच्याबरोबर आपण पहात जातो आणि अचानक चाप्लीनच्या चित्रपटात शाब्दिक पाट्या येतात तश्या खंडेरावचा स्टीलमध्ये घटनापट थबकतो आणि शब्दपाट्या येतात 'खंडेराव आता हे नीट साठव' 'खंडू आता तू प्रमुख' वगैरे. समीक्षा करताना ही अश्या अनेक स्टील पाट्या येतायत .  

ऊ) मी टीकाहरणमध्ये कोसला, जरीला, झुल, बिढार (ह्यातच हूल येते) मेलडी आणि टीकास्वंवर ह्या ग्रंथावर लिहिले होतेच आता  हिंदूवर लिहितोय कारण ह्या निमित्ताने  त्यांच्या सर्व साहित्यावर लिहिणे पूर्ण होईल हि आशा आहे. 

ए) नेमाडे समीक्षक म्हणून जो वाचाळपणा करतायत त्याचा त्यांच्या  कविता व कादंबरी लेखनाशी संबंध जोडण्यात काही अर्थ नाही. निखळ  कलाकृती म्हणून आपण त्यांच्याकडे समीक्षक नेमाडेंना बाजूला काढून पाहू शकतो. ह्याचा अर्थ मी सरंचनावादी भूमिका घेतोय असे नाही तर ह्या समीक्षक नेमाडेंना वगळून ह्या कादंबरीत जे  विचारवंत नेमाडे येतात त्यांचा ही विचार करतोय. 


                                                    ६) मार्गी देशी आणि मोहेन्ज्दडो 
मी एक म्हणणे नेहमी मांडले आहे ते म्हणजे नेमाडे लेखक म्हणून अजिबात देशीवादी नसतात. मार्गी आणि देशी ह्यांचा उत्कृष्ट संगम ह्यांचा कादंबऱ्यात आढळतो हिंदू ही कादंबरी ह्याला अपवाद नाही. 
ह्या कादंबरीची  सुरुवातच युरोपिअन लोकांनी सुरु केलेल्या अर्कीओलोजीने होते. मोहंजोदाडो अर्कीओलोजी, अर्थ्रोपोलोजी आणि सोशिओलोजी  हाच पहिल्या पन्नास पानांचा मचकूर आहे. मात्र ह्या माचकुराला नेमाडे खास  देशी तच देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. 
महोन्जोदाडो संस्कृतीचे काय करायचे हा एक यक्षप्रश्न आहे. ही संस्कृती व्यापारी समुदायाने जन्माला घातली होती. हे आत्ता स्पष्ट होत चालल्याने नेमाडेंचा गोंधळ उडाला आहे. हे स्पष्ट दीसते एकीकडे हिंदूची आद्य संस्कृती म्हणून त्यांना तीचावर क्लेम करायचा आहे तर दुसरीकडे ती व्यापारी समुदायाची असल्याने फेकूनही द्यायची आहे. हा  अखंडपने ह्या कादंबरीत वाहताना दिसतो. 
गावातून स्थलांतरित होऊन हे लोक करणार काय? तर आण खी एक मोहंजोदाडो निर्माण करणार असे नेमाडे  म्हणतात तेव्हा आपण आणखी विचारात पडतो कारण शहरांची संस्कृती हि फार काळ टिकत नाही अशी त्यांची ठाम धारणा आहे आणि हे देशीवादाला धरुन आहे. कारण खेड्यातील पिकाच्यामुळे जे भूमी सातत्य निर्माण होते ते शहरात कसे निर्माण होणार? त्यामुळे खेड्यातील संस्कृतीचे गुणगान प्रत्येक  पानावर !प्रश्न असा खंडेराव  मोहन्जोदडोत मग शोधतोय तरी काय ? हराप्पा संस्कृतीतील जाती, बांगड्या मोरगावमध्येही आढळतात त्यांचा अनुबंध तो शोधताना दिसतो. ५००० वर्षाचा एक विशाल फलक नेमाडेंना ह्या निमित्ताने  उभा करायचाय हे स्पष्ट आहे.
उत्क्रांति सामाजिक आणि जैविक हे नेमाडेचे ऑब्सेशन  आहे. खंडेरावने उत्क्रांतीवर सादर केलेला  निबंध चमकदार आहे. पण त्याचा प्रतिवाद सहज शक्य आहे मोहनजोदड़ो ही हिन्दू संस्कृतीच्या उत्क्रांतीची  सुरुवात आहे. साहजिकच नेमाडे तिथे अनेकदा स्टॉप  घेतात. ह्या बरोबरच आणखी एक समांतर शोध आहे तो तीरोनी आत्याचा ! खंडेराव जीवापाड प्रयत्न करतो पण  महानुभवी संन्यासिनी झालेली आत्या सापडत नाही
मोहन्जोदडो हि महानगरी संस्कृती होती असे खंडेरावाचे  मत आहे आणि महानगरी संस्कृती विरुध्द कृषी संस्कृती असे द्विध्रुविकरण तो मांडतो . महानगरी संस्कृती ही शोषण करणारी, ऐतखाऊ आहे असे त्याचे मत आहे. मोहन्जोदडो ही  अशी  नागर शोषण करणारी असल्याने नाहीशी झाली असे त्याला  वाटते. नागर संकृती ही आकाशात उंच जाते आणि युजलेस कुतुबमिनार बान्धते तर कृषी संस्कृती जमिनीत खोल जाऊन विहीर बांधते आणि पाणी आणते जे जीवनदायीनी असते असे तो सुचित करतो.
ही कादंबरी सुरु होते मोहन्जोदडोपासून ! इथेच वडील मरणांतिक  आजारी असल्याची न्यूज मिळते. त्यानंतर मोरगावला पोहोचेपर्यंत त्याला ज्या आठवणी येतात त्या आठवणी म्हणजे ही कादंबरी.
प्रश्न असा  कि नेमाडे मोहोन्जोदडो पासून कादंबरीची सुरुवात का करतात. दोन  कारणे आहेत.
१. नेमाडे हे संस्कृतिसातत्याने विशेषत: हिंदू संस्कृतिसातत्याने पछाडलेले आहेत त्यामुळे हे सातत्य कादंबरीत आणण्यासाठी मोहन्जोदडो  अपरिहार्य होते.
२. आणि दुसरे कारण ते भूमीसातत्याने पछाडलेले आहेत. भूमी सातत्य हे कृषी संस्कृतीचे वैशिष्ट  तर त्याचे विरोधी पक्ष म्हणजे शहरी संस्कृती आणि तिचा पहिला आविष्कार म्हणजे मोहन्जोदडो 
ही कादंबरी ह्या दोन्ही सातत्याचा आविष्कार करते एका अर्थाने नेमाडे मांडत असलेल्या देशिवादीचा ही कादंबरी सर्वोत्कृष्ट नमुना आविष्कार आहे आणि ह्या नमुन्याने बऱ्याच मार्गी   गोष्टी आयात केल्या आहेत.
ही दोन्ही सातत्ये  नेमाडेंना दोन समुदायात उभी करतात. १- ज्ञानकरी समुदाय २- शेतकरी समुदाय
प्रथम आपण ज्ञानकरी  समुदायाचा विचार करू कारण सरतेशेवटी लेखक प्राध्यापक ज्ञानकरी समुदायाचा सदस्य आहे.
    ७ ज्ञानकरी समुदाय आणि हिंदू
भारतात ज्ञानकरी समुदाय1ज्ञानश्रेष्ठी SHRESHTHI 2ज्ञानव्यवस्थापक  KNOWLEDGE MANEGERS 3 विद्वान SCHOLAR
संपादक EDITORS आचार्य ACHARYAS शिक्षक TEACHERS पत्रकार  JOURNALIST कामगार WORKERS ज्ञानाधिकारी KNOWLEDGE OFFICERS विद्यार्थी STUDENTS अश्या  समुहांनी बनतो  आणि बनलेला आहे
नेमाडे ह्यांच्या चतुष्टकात व कोसलात ह्या समुदायातील अनेक समूह आले असले तरी इथे प्रथमच सर्जक समुदायातला पवारासारखा नवविचारकार येतो त्याची होणारी गोची येते . भारत म्हणजे सर्जनशीलतेला मारणारा अडाणी शिक्षक आचार्य लोकांचा गोतावळा हे ह्या व्यक्तीरेखेवरून सिद्ध होते . पवार ही सर्जनविरोधी व्यवस्था बदलू पाहतात पण त्यांच्या आसपासचे दीड दमडीचे घाशीराम त्यांना टोळी करून हाकलून देतात आणि त्यातच त्यांची शोकांतिका होते
 हिंदुत कुलसचीवाच्या रूपाने ज्ञान व्यवस्थापक येतात . जुडगे म्हणून येणारे हे पात्र भ्रष्ट व्यवस्थापनाचा शैक्षणिक नमुना आपल्यासमोर ठेवते
ह्यातील सर्वात विचित्र पात्र आहे ते राज्यपालांचे ज्ञानव्यवस्थापकांचा प्रमुख असलेला हा माणूस आपली जबाबदारी झटकून फक्त राजकीयच उरतो राज्यपाल हा भारतीय शासक समुदाय आणि शासन यंत्रणेचा नमुना आहे नेमाडेंच्या आधीच्या कादंबर्यात अशा व्यक्तिरेखा न्हवत्या म्हणून त्यांचा उल्लेख केला
भ्रष्ट ज्ञानकरी समुदाय आणि  शेतकरी समुदाय ह्यांची तुलना केली तर  शेतकरी समुदाय हा नैतिक आणि उजवा वाटतो निदान तो धान्य पिकवतो भारतातील ज्ञानकरी समुदाय कुठले ज्ञान पिकवतो हा एक प्रश्नच आहे . केवळ माहिती पिकवणारा आणि सर्जक समुदायाला ठार मारायला टपलेला हा वर्ग खुनशीच वाटायला लागतो
ह्या ज्ञानकरीसमुदायातील लक्षात राहणारे पात्र म्हणजे मंडीचे ! हाडाची वैज्ञानिक असलेली ही गोरी मॅडम  संशोधक म्हणून वेळप्रसंगी नग्न होऊन अंदमान निकोबार बेटावरील लोकात जाते. तिची निष्ठा केवळ चकित करत नाही तर आपल्याला लाज आणते मोरगावातील तिचे  संशोधन  तिची बुद्धिमत्ता व चीकीत्सावृत्ती दर्शवतेच पण निष्ठाही दाखवते. हीच मंडी खंडेरावाला संशोधनाचा वेगळ्या दिशा दाखवते. ह्या शीवाय नेमाडे ह्यांच्या चतुष्टकात  येणारे प्राध्यापक आहेतच ह्यातील एक लक्षवेधी  पात्र देव ह्यांचे आहे त्यांनी दिलेल्या सूचना सर्वांनाच उपयोग आहेत. 
ह्या कादंबरीत आलेली पूर्ण नवी अशी नेमाडेंनी हाताळलेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे कोसला   पुर्वीचा शाळेत जाणारा विध्यार्थी ! पांडुरंग सांगवीकर ह्या शेतकरी समुदायातला होता पण त्याने विद्यार्थी म्हणून काय केले हे आपणास माहित नव्हते हिंदुत खंडेरावच्या रूपाने त्याचे काय झाले असेल ह्याचा एक अंदाज येतो. हिंदुत ह्या निमित्ताने एरव्ही प्राध्यापक वर्गात रमणारे नेमाडे चक्क प्राथमिक माध्यमिक शाळा व त्यातील शिक्षक व शिक्षण ह्यांच्याकडे येतात. खंडेराव हा शेतकरी समुदायातील असल्याने ज्ञानकारी समुदाय व शेतकरी समुदाय त्याच्या रूपाने टक्करतात. ह्यातूनच मग खंडेरावच्या बालक दृष्टितून शेतकरी समुदाय न्याहाळण्याची संधी मिळते.  इथे गिरीश  जाखोटीयांच्या 'एका मारवाड्याची गोष्ट' ह्या कादंबरीची आठवण येते. जखोटीयांनीही सुरवातीला  गोपाळ ह्या बालकाच्या बालक दृष्टीतून महेश्वरी मारवाडी ह्या व्यापारी   समुदायातील समूहाची गोष्ट नेमाडेंच्यापूर्वी अशीच सांगितली आहे. ह्या बालक दृष्टीचा फायदा  असा कि तुम्ही अत्यंत विश्वसनिय पद्धतीने एखादा समुदाय व समूह मांडू शकता अलीकडच्या 'फैन्ड्री ' ह्या चित्रपटातही हा फायदा कलाकारांना मिळालेला आहे. नेमाडे ह्यांनाही हा फायदा मिळतो आणि हिंदुतले निवेदन विश्वसनीय होत जातं आणि शेतकरी ज्ञानकरी समुदाय परस्परविरोधी द्विद्वन्दात्मकतेतुन उलगडत जातात. शिवाय त्यातून मराठी वाचकाला आवडणारा आणि शहरात बसून गावाला कुरवळणारा नॉस्टोलजीयाही आपोआप तैयार होत जातो . शेतकरी समुदाय  आणि हिंदू
भारतीय शेतकरी समुदाय हा हिंदुच्या केंद्रस्थानी आहे. भारतात हा  कृषी समुदाय 

श्रेष्ठी / जमीनदार SHRESHTHI
क्षेत्रकरी FARM-OWNER
शेतकरी FARMER
कुणबी CULTIVATERS
माळी GARDENER
शेतमजूर FARM-WORKERS
भटके BHATKE
शेत सेवक SERVICERS

ह्या समुहानी  बनलेला आहे. 
भारतातला हा सर्वात मोठा समुदाय आहे आणि ही कादंबरी त्या समुदायाला केंद्रस्थानी ठेवते. नेमाडेंचा या पूर्वीच्या  कादंबऱ्यात शैक्षणिक संस्था ह्या केंद्रवर्ती होत्या आणि शिक्षणाच्या  दुर्बिणीतून नेमाडे भारतीय संस्कृती हाताळायचे इथे शेती ही संस्था प्रचंड प्रमाणात येते. शेती आणि शिक्षण याचा कोम्बो ! शाळा आणि शाळा सोबती इथे येतात पण ४२ विध्यार्थ्यापैकी   फक्त तिघे चौघेच मॅट्रिक  पार करतात उरलेले गळून जातात त्याची कहाणी इथे येते मॅट्रिक  करणाऱ्यात एक नायक खंडेराव! इथेही एक जम्प आहे आणि प्रश्न असा- हे अवास्तव चिन्हाचे डोलारे, नुस्त्या ज्ञानाच युग, हे पुढे कोलमडून पडणार नाही ? 

चौथीपर्यंत एक शिक्षक असणारी शाळा आणि हा प्रश्न  ह्या दरम्यान नेमाडेंचा खंडेराव !
शेतातील कामे करत करत करावी लागणारी शाळा, अभ्यासासाठी चिमणी कधी मिळते ह्याची वाट पाहणारा विध्यार्थी!बालपणातले ग्रामीण खेळ आणि शेती ह्यांचे विसंगत वाटणारे संबंध कादंबरीभर अवतरतात मात्र केंद्रस्थानी राहते ती शेतीच ! आणि तिचे निवेदन करणारा खंडेराव मात्र ह्या घटनांना साक्षिदार आहे तो शाळेत शिकनारा खंडू म्हणून ! एका अर्थाने तो विध्यार्थी म्हणून ही जगण्याची समृद्ध अडगळ गोळा करत करत शिकतो आहे. शिकताना तो शेतकरी समुदायातील विध्यार्थी असल्याने त्याला काही अडचणी येतायत त्यातील एक म्हणजे शाळेला जाण्यास  होणारा  उशीर ! सुदैवाने खंडूला उत्तम दर्ज्याची मराठी माध्यमाची शाळा मिळते आणि उत्तम शिक्षक भेटतात ही दुसरी शाळा त्याला शिकवते पुढे मग यावरच  हायस्कूल. खंडू शाळेत जातो खंडू शेतशाळेत शिकायला घरी परततो अशी वाटचाल ! रघु नायकासारखा जीवलग मित्र ह्या वाटचालीत गळतो. छोट्या शेतकऱ्याच्या  घरची शोकांतिका ! 
खंडेराव मग गावातल्या कॉलेजात जातो. तिथे लैंगिकताप्रविणने बदनाम झालेले पण प्रत्यक्षात उत्कृष्ट शिकवणारे प्रा. भावे भेटतात. ते इतिहासाची गोडी लावतात . ग्रामीण भागात एक महाविद्यालय कसे तैयार होते त्याचीही चित्तरकथा नेमाडे इथे सांगतात. हाही एक इतिहास ! शेतीची अंगावर पडणारी कामे बऱ्यावाईट तऱ्हेने पुरी करत खंडेराव हळूहळू B.A. पुरे करतो आणि ऐन दुष्काळजंन्य परीस्थित निकालाची वाट पहात राहतो. त्याच्या क्षुब्धतेचा स्फोट  होतो तो अहिरांच्या शोधत आलेल्या चौधरी समोर. चौधरींची शेवटची ओळ- काहीतरी करा. आपल्या मागदुरावरच शेवटी आपण पोहत जातो, प्रवाह नावापुरताच असतो त्याला भिडते आणि तो स्वत : च्या मगदुरावर प्रवास करायचे निश्चित करतो .   
तो  कसाबसा पास होतो आणि जिगरदोस्त रघु नायकाच्या ट्रकवर स्वतःच्या मगदूरावर बसतो. इप्सित प्राप्तीसाठी ह्याला कारण ठरतो तो पर्यटनखात्याचा गाईड सर्टिफिकेट कोर्स. ह्यानंतरचा खंडूचा प्रवास म्हणजे बिढार, जरीला, हूल, झुलची रिपीट टेलिकास्ट अनंतरावच्या पत्रकारीतेपर्यंत. अनंतरावाचा आगमनानंतर मात्र सीन बदलतो  खास नेमाडे टचच्या जागा यायला सुरवात होते  म्हणजे प्र चा उर्दूतला अर्थ खरा प्रबोधन- परबोधन प्रताप- परताप वगैरे (४६२)
शेवटी खंडेराव डेक्कन कोलेजला जातो डॉ. साखळीयांचा विध्यार्थी होतो इथे पुन्हा एकदा नेमाडे शेती ह्या केंद्रातून शिक्षण ह्या केंद्रात दाखल होतात  मोहनजोदडाला जातात पण  बापाच्या मृत्यूमुळे पुन्हा खंडूला शेती ह्या केंद्रात यावे लागते आणि  ह्या केंद्रातच कादंबरीचा शेवट होतो. 

नेमाडे हे  श्रेष्ठी / जमीनदार SHRESHTHI , शेतकरी FARMER, कुणबी CULTIVATERS
माळी GARDENER, शेतमजूर FARM-WORKERS, भटके BHATKE , शेतसेवक   SERVICERS या सर्व समूहांचे चित्रण करतात.  नेमाडे हे शेतकरी समुदायात इनसाइडर (insider) म्हणून वावरत असल्याने ह्या चित्रणाला एक अस्सलपणा प्राप्त होतो. 
 नेमाडे हे जर एखाद्या छोट्या कुटुंबात न्युक्लीअर फॅमिलीत वाढले असते तर त्यांना ही कादंबरी लिहिता येणे शक्य झाले असते का? ह्या प्रश्नाचे उत्तर '' नाही ''असे आहे त्यामुळे आपल्याला खंडेरावच्या  घरातच कादंबरीतिल वीस पात्रे घरचीच म्हणून  दिसतात. 
ह्या शिवाय शेतकरयांचा पिके, धान्ये, फुले, फळे, काटे, झाडे, वृक्ष, वेली, विहीर,बैल, बैलगाडी,खळ वैगैरे स्थानक, पेरणी, क्रिया इत्यादि  ह्यांनी भारवला गेलेला अवकाश ,  खानदेशातील सगळा जंगली व खेडूत अवकाश तपशीलवारपणे इथे येतो. एक तपशील दुसऱ्या तपशिलाला घेऊन येतो म्हणजे कि विहीर- रहाट- पाणी- डुंबणे आणि बुडणेही आणि डुबून मरत असताना खंडूला वाचवणारी धनगर समूहातील रेनी आणि तिचा मेंढवाडा. 
व्यंकटेश माडगुडकरांनी विकसित केलेली तपशिलांची वास्तववादी मांडणीपद्धत नेमाडे अधिक विकसित करतात आणि तिला अत्त्यंत तीव्र आविष्कारवादी स्पर्श पुरवतात हा स्पर्श अस्तित्वजन्य असतो आणि देशिवादीही !
आम्हा  प. महाराष्ट्रात वाढलेल्या लेखकांना हे तपशील अपरिचित नाहीत पण ह्या तपशिलाला नेमाडे जो खानदेशी टच देतात तो मात्र पूर्वीचा लेखकांना नव्हता हे मान्यच करावे लगते. उदाहरणार्थ कुणबी संस्कृतीत रेड्यांचा उपयोग नाही म्हणून त्याला ताक पाजून पाजून हळुवार मारतात आणि म्हशीचे दूध जे त्यांच्या  हक्काचे ते माणसांना देतात ह्याचा संबंध नेमाडे थेट महिषासुराशी जोडतात आणि ह्या पुरकथेचा  अर्थच पालटून टाकतात. हा नेमाडे खानदेशी टच. 
शेती व ज्ञान ह्यांचे कोम्बीनेशन हा ह्या कादंबरीचा पाया आहे आणि नायक खंडेरावाची संवेदनशीलता व दृष्टी ह्या दोन्ही ह्या कोम्बिनेशनच्या अंगाने अवतरत राहते आणि भारतीय समाजातील अनेक समुदायांचे उत्खनन करत राहते. हे उत्खनन जितके ऐतिहासिक आहे तितकेच समकालीनही !
 हिंदू , लेवा पाटील आणि मराठी
                       
ह्या कादंबरीचा नायक खंडेराव हाच मूळचा  क्षेत्रकरी FARM-OWNER असल्याने क्षेत्रकरी घराचे बारीक तपशील नेमाडे अचूक नोंदवतात.
होळकरांच्या  विरुद्ध जाऊन इंग्रजांना मिळणारे आपले पूर्वज (सातवे) नागोराव, आजोबा, वडील,  भावडू आणि खंडेराव ही ह्या घरातील पुरुष पात्रे.
मोहन्जोदडोत आपली मुळे शोधत असतांना खंडेरावाला वडिलांच्या मृत्यूचा मृत्यूची खबर मिळते आणि मग जो फ्लैशब्याक खंडेरावपुढे सरकतो ती  ही कादंबरी. श्यामची आई मधला श्याम आणि बाल खंडेराव ह्यांच्यात एक सातत्य असले  तरी खंडेराव हा बाल्य नाही तर पक्व आहे त्यामुळे मुलाच्या औत्सुक्यातून नव्हे तर संशोधक खंडेरावाच्या  संशोधनात्मक समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून हे अनुभवविश्व सादर होते.
आतापर्यंत साहित्यात आपली जात लपवणारे नेमाडे इथे मात्र उघडपणे आपली जात घेऊन अवतरतात. हा नेमाडे ह्यांच्यातला सांस्कृतिक बदल  लक्ष्यात घेण्याजोगा आहे. आतापर्यंत साहित्यात आपली जात लपवणारे नेमाडे इथे मात्र उघडपणे आपली जात घेऊन अवतरतातहा नेमाडे ह्यांच्यातला सांस्कृतिक बदल  लक्ष्यात घेण्याजोगा आहेलेवा पाटलांचा  इतिहासही नेमाडे सांगतातमुळचे हे रेवा पाटील ! रेवा म्हणजे नर्मदा ! नर्मदा काठचे हे पाटीदार अल्लाउद्दिन खिलजीच्या गुजरातवरच्या हल्ल्याला तोंड देता  आल्याने घोड्यावरून पळून आले आणि महाराष्ट्रात लेवा पाटील झाले.
अर्थात हे नेमाडेंचे अर्थनिर्णयनदुसरी अर्थनिर्णयणे सांगितली गेलेली नाहीत पण ती नेमाडेंच्या डोक्यात असावीत उदाहरणार्थ हे मूळचे ईश्वाकु वंशाचे लोक ज्यातून राम आणि कृष्ण आले त्यामुळे हाडाचे वैष्णव बनलेले नेमाडेंचा विठ्ठल हा थेट कृष्ण आहे आणि गावातल्या विठ्ठल मंदिराचा त्यामुळेच वारंवार उल्लेख येतो आणि शैव औषधालाही आढळत नाहीत . वैदिकांचे , वैदिक ब्राह्मणांचे कौतुकही त्यामुळेच येते जणू राम कौतुकाने हा सोहळा पाहतोय . ह्या गटाचा एक उपगट लाहोर हे शहर ''लेवा''नी वसवले असे सांगतो नेमाडेंच्या लाहोर - पाकिस्तान ऑब्सेशनचे मूळ ह्या  विश्वासात आहे . सायरस आणि सिकंदरच्या आक्रमणानंतर ह्यांना पंजाब सोडून स्थलांतर करावे लागले।  हे स्वत : ला पामिरचे आर्य समजतात आणि कुर्मी क्षत्रिय मानतात . पिकाच्या पटावर नोंदी करणारे म्हणून हे पटलीक आणि त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून पटेल आणि महाराष्ट्रात पटेलचे पाटील असा प्रवास झाला असे हे मानतात  नेमाडे
रेवा म्हणजे नर्मदा सांगतात ते योग्य आहे पण दुसराही एक अर्थ आहे हा गट रावी नदीच्या काठी वस्ती करून होता त्यामुळे रेवा म्हणजे रावी नदीकाठचे असाही अर्थ होऊ शकतो  मूळ पाकिस्तान लावा पट्टीदार म्हणजे रवि नदीकाठचा तो रावा मग रावाचा लावा मग गुजरात लेवा पटेल  आणि अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्र लेवा पाटील असा   हा इतिहास आहे नेमाडे आपल्या कुलदेवतेबद्दल काहीही बोलत नाहीत फक्त एकदाच निम्बादेवीचा उल्लेख येतो कारण खरा प्रॉब्लेम  इथुनुच सुरु  होता जवळ जवळ  ९० % लेवा पाटलांची  कुलदैवते ही शाक्य पंथी शैव आहेत खंडोबा म्हाळसा रेणुका कळंकभवानी वगैरे ! एकीकडे राम , विठ्ठल आणि  कृष्ण  वैष्णव तर  शैव दुसरीकडे!नेमाडेंनी  वैष्णव वारसा निवडलाय . परिणाम  जातीव्यवस्थेचे समर्थन ! फक्त खंडेरावच नाही जवळ जवळ ९०हिंदूंची ही मानसिकता आहे ! आयुष्यभर ब्राह्मणांना शिव्या घालायच्या आणि लग्न मुंज तेराव्याला ब्राह्मणच बोलवायचा ! खंडेराव ह्यातून मुक्त नाही   . हा समूह शेती करत असल्याने वैदिकांच्या दृष्टिने वैश्य तर खुद्द ह्या गटाच्या मते क्षत्रिय खुद्द नेमाडे ही आपण वैश्य का अशी शंका व्यक्त करतात पण  थांबता बगल देतात कुटुंब नायक हि लेवा पाटलांच्यात फार महत्वाची संकल्पना आहे आणि ह्या कादंबरीतही एका कुटुंबनायकाचा अस्त आणि दुसऱ्याचा उदय होतो आणि ह्या उदयापाशी कादंबरी संपते .  त्यामुळेच हिंदू ही कादंबरीही पाकिस्तानात सुरु होते आणि मोरगावात संपते एका अर्थाने महाराष्ट्रातील लेवा पाटील गटाच्या नेणिवेचा हा प्रवास आहे.  

महाराष्ट्राला मराठी संस्कृती शिकवणारे चक्रधर हेही असेच मुळचे गुजराती त्यामुळे नेमाडे ह्यांच्या ह्या गुजराती मुळामुळे चक्क्रधर, नेमाडे व महानुभाव ह्यांचा एकवेळचा अनुबंध उलगडतो (तिसरा गुजराती मोदी ह्यांनी त्यामुळेच   तर नेमाडे ह्यांना ज्ञानपीठ दिले नाही न अशी शक्यताही उपस्थित करतो) महाराष्ट्राला मराठी संस्कृती शिकवणारे बाळासाहेब ठाकरे हेही मुळचे मध्य प्रदेशातले ! एकदन्दरच महाराष्ट्राला मराठी शिकवणारे महा हे महाराष्ट्रबाहेरचे असावेत हा विरोधाभास लक्षणीय !
           ९ खंडेरावाचे कुटुंब 
कुठल्याही वास्तववादी कादंबरीकाराच्या केंद्रस्थानी एक कुटुंब असते किंवा एखादी संस्था असते हिंदुत ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत . 
                   कुंडलीबुवा-रखमा 
हुणाकाका-आंधळी------------विठ्ठलराव----------निबोळा---------------चीन्धुआत्या  
  (शहीद)               (शेतकरी)         (अविवाहित)            ।
                          ।                                 ।
    ----------------------------------------------------------------            ।
    ।                     ।                      ।          ।
 भावडू सोना                ।                   खंडेराव         ।  
                          ।                                 ।
    ----------------------------------------------------------------            ।
    ।              ।              ।              ।           ।
 लाडकी सुभी   बिजा वकील     छबी/गार्डसोबत    शशी/पाटबंधारे   तायडी व बायडी 
 व आर्किटेक्चर   नवरा                            साहेब 

असा हा डोलारा आहे आणि नेमाड्यांनी तो उत्तम पेलला आहे

खंडेरावाने प्रत्यक्ष पाहिलेला पूर्वज म्हणजे आजोबा कुंडलीक तो पहिल्या आजीला कसे क्रौर्याने वागवतो ते नेमाडे तपशीलवार सांगतात आजी जाते आणि नेमाडेंची जेनेटिक आजी सीता घरात पाट लावून येते. तिला मुलगा होतो विठ्ठलराव ! विठ्ठलरावांना दोन मुले भावडू आणि खंडेराव ! पान २७० वर म्हंटल्या प्रमाणे कुंडलिकबुवा नैशनल वारकरी पण शेवटी नारायणबुवा पुढे झुकतात आणि काशीला मांजर अर्पण करायला निघतात निर्वंश होऊ नये म्हणून ! तिथे त्यांना विरक्ती आलेली असतांना एक शैव साधू भेटतो आणि खरा मार्ग दाखवतो. ते गावात येतात आणि येताना रिकामचंद सकलेचा  नावाच्या मारवाड्याला स्वैपाकी म्हणून घेऊन येतात. तो त्यांना टोलेजंग वस्तू बांधून देतो.
ह्या वस्तूच्या बांधकामामुळे खंडेरावला झालेला साक्षात्कार फार मोठा आहे. नेमाडे लिहितात, "तुम्ही कितीही नवं  व्हायचा प्रयत्न केला तरी आधीचं  सगळ  संपूर्ण नष्ट करता येत नाही ते नाहीसं होत नाही आमच्या आत्ताच्या वाड्याच्या भिंती  नव्या विटाच्या झाल्या पण जुन्या पद्धतीची चोर कपाटे , भंड्याऱ्या , त्याच्यात चोरकप्पे वगैरे हे सगळ आहेच  "
सगळ अवकाशाविषयीचे चिंतन ह्या २७२ ते २७४ पानावर सांडत  जाते . मॉडर्न म्हणजे कुरूप आणि  अल्ट्रामॉडर्न  म्हणजे अतिकुरूप  इथवर ते येते . जणू मॉडर्निटी म्हणजे डास निर्माण करणारे सैनिटरी संडास असे नेमाडेंना वाटते कि काय   अशी शंका येते
 १० विठ्ठलराव : मोरगावचे नायक
विठ्ठलराव हे मोरगावचे नायक श्रेष्ठी / जमीनदार  /सरंजामदार होणे शक्य असूनही त्याला नकार देऊन क्षेत्रकार झालेले क्षेत्रकरी FARM-OWNER ! तुकारामाचा आधुनिक अवतार मोक्षाशिवायचा ! त्यामुळे ओतप्रोत माणुसकीने भरलेल्या चांगुलपणामुळे कधी कधी अडचणीतही सापडणारा ! कोसलात पांडुरंग बापाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही  आणि  समजून घेतले नाही म्हणून पस्तावतोही ! इथे तसे होत नाही . 
चोर जपानी पंप चोरतो तेव्हा पोलिस स्टेशनात न जाणारा हा वारकरी! त्याने त्याचा शेअर न्हेला  ही वृत्ती  !
खंडेरावाने शेतीत यावे हा सुरवातीला आग्रह पण नंतर खंडू शिकणारा म्हणून त्याला शिकवतोही. नवीन येणारे तंत्रज्ञान काळानुरूप शिकतोही. त्यामुळे युरिया , जपानी पंप, ऑइल इंजिन यांचे स्वागतही करतो. जेव्हा खंडू मागे अधिकाधिक मागे जात असतो तेव्हा हा पुढे अधिक पुढे जात असतो . ग्रामीण संघटनाची अनेक पदे वा सदस्य त्याला भेटतात पण त्याने हा उतुमातु जात नाही.
थोरल्या मुलाचा अपघाती मृत्यू होतो आणि आपल्या मागे हा डोलारा चालवणार कोण हा प्रश्न त्याच्या पुढे उभा ठाकतो खंडूला शेती करायची नाहीये आणि ह्याला ती करणारा मुलगा हवाय त्यातून संघर्ष अटळ ! पिढीजात शेती हा नुस्ती सांभाळत नाही तर तिचा विकास करतो आपल्या चारी मुलींची प्रचंड हुंडे देऊन शहरातल्या मुलांबरोबर लग्ने लाऊन देतो. जावई भेटतात ते भ्रष्ट आणि सासुरवाडीला फार्महॉउस समजणारे! त्यांची नालायकगिरी मुलींसाठी काही न बोलता  सहन करतो.
गावाचे जेवढे भले करता येईल तेवढे करावे, परोपकार वेचावा, दया क्षमा शांति आचारावी, योग्य तितकेच योग्य वेळी बोलावे ही त्याची वृत्ती त्याला आब देते प्रतिष्ठा देते.
दुर्दैवाने खंडू त्यांना समजून घेत नाही. लाडकीचा लग्नात ते प्रश्न विचारत राहतात खंडू तिरपागडी उत्तरे देत राहतो. "खंडेराव मी तुला काय विचारतो आणि तू काय उत्तरे देतो " ह्या त्यांच्या  उद्गारात हा विसंवाद प्रखरपणे प्रकट होतो. शेवटी ह्या लव आणि हेट रिलेशनशिपचा   शेवट विठ्ठलरावांच्या  मृत्युने होतो. ह्या मृत्यूनंतर खंडेरावला आपल्या बापाचे मोल कळते पण तोवर उशीर झालेला असतो! फार उशीर झालेला असतो!
                             ११ भावडू
विठ्ठलरावचा पहिला मुलगा भावडू ! प्रेमळ पण शेतातच खपणारा ! लहानपणी सीता  आज्जीच्या माहेरी दोघे मिळून गेलेले! तिथल्या पाहुणचाराचे भरसक वर्णन नेमाडे करतात.
खंडेराव म्हणतो तसा शेतीला भावडूही लायक नव्हताच. त्यामुळेच भटक्या लोकांना हा शेतीतून नांगरटीवरून जाऊ देतो तेही नुकसान सोसून!खंडेरावच्या अनेक चुका हा मोठ्या भावाचे  प्रेम म्हणून  पोटात घालतो. खंडेराव शिकावा हि त्याची इच्छा त्यामुळे तो खंडूच्या शिक्षणाच्या  निर्णयाला मनापासून पाठींबा देतो. खरेतर त्याला शिकायचे असते पण वडिलांच्या हट्टापायी तो शेतीत येतो आणि शेतीतच खपायला लागतो.
खंडेरावने भावडूला लिहिलेले पत्र म्हणजे भावनाशील नात्याची सुंदर गुंफण ! एका भावाचे दुसऱ्या भावावरचे प्रेम  उत्कटता आणि वस्तुनिष्टता त्यात व्यक्त होतात .
कष्टाला मागेपुढे न पाहणारा भावडू लाडकीच्या  लग्नातही अतोनात कष्ट घेतो. दोघा भावांना भेटायला वेळ मिळत नाही जाताना भावडू ट्रक सुरु होता होता मागे ! . . . . . . तो मोठ्याने ओरडला, "आता तिकडेच भेटू " आणि मग मोटार पंप डोक्यावर पडून मृत्यू आणि खंडूकडे थेट त्याच्या  मृत्यूची बातमी ! ह्या मृत्यूचा  शोक   कोसला मधील मनीच्या  मृत्यू इतकाच तीव्र आणि काळजाला घर  पाडणारा आणि वाचकाला रडवणाराही ! खंडेरावचे हे अपरिहार्य मृत्यूविषयीचे  खोल दुःख नेमाडें ज्या  पारदर्शक तीव्रतेने व्यक्त करतात त्याला तोड नाही. वास्तववाद म्हणजे रुक्षपणा नव्हे तर संवेदनशीलतेचे वास्तवतीव्र आविष्कार असे हे वाचताना  वाटते . नेमाडेंच्याच भाषेत सांगायचे तर "स्मशान शेवटी मानवी भूगोलाचा अपरिहार्य  भाग असते"
भावडूच्या  खंडूला लहानपणाचा अनेक आठवणी येतात नेमाडे त्या पीळवटून सांगतात. दोन भावांच्यातलं  हे नाते  तंतू तंतू जोडत तयार झालेलं काळजातही कटी पतंगासारखं उडत राहते . 

                १२ खंडेराव
ह्या कादंबरीचा नायक खंडेराव ! त्याचे भाषेवर अफाट प्रभुत्व ! भाषाप्रभू  म्हणावे इतके ! आकाशातील तारेही टिपण्यात माहीर ! जीवनाविषयी प्रचंड उत्सुकता ! शेतीविषयी द्वेष ! कारण ती त्याच्या शिक्षणाच्या आड येते . आपला बाप आपल्याला शेतीत टाकेल ही  भितीही त्यामुळे शेतीपासून पलायन  आणि ज्ञानाचा पाठलाग ह्या दोन्ही गोष्टीत खंडू पळतोय चालतोय चालतोय पळतोय .  ५ फूट ११ इंचाचा, मोठ्या मिश्याचा , अत्त्यंत तल्लख, कष्टाळू आणि आत्ममग्न असा हा नायक ! ज्ञानाच्या चश्म्यामुळे  बापाच काय चाललाय हे ह्याला कळत नाही .  इतिहासाकडून ऑरकीऑलॉजीपर्यन्त त्याचा होणारा प्रवास विलक्षण आहे. दोस्त जमवण्यात, फड जमवण्यात, शेरीशायरी जमवण्यात वाकबगार आहे. बोलण्यात उत्कृष्ट, ग्रामीण संस्कृतीचा अभिमानी आणि तरीही तिच्यापासून पळून जाणारा, बायकांबाबत  पारंपारिक , कर्मठ , मध्येच त्यांच्या मुक्ततेची स्वप्ने पाहणारा, स्वप्ने नीट लक्ष्यात ठेवणारा,  धाडसी, मुटके मारण्यात तरबेज, सावळ्या रंगाचा, मध्यम छातीचा असा हा नायक दोस्ती यारी निभवायला त्यासाठी पैसे खर्चायला हरदम तैयार ! आपल्यापुढे प्रश्न एवढेच 
१ ह्याला आपला बाप कसा कळत नाही 
२ ह्याला आपली प्रेयसी कशी कळत नाही 
की हे दोघे  त्याच्यापेक्षा जास्त निधड्या छातीचे आहेत म्हणून हा घाबरतोय? शेवटी थेरॉटिकल धाडसी आणि व्यवहारिक धाडसी असणे ह्यात फरक असतो. हे दोघेही व्यवहारिक धाडसी म्हणून हा प्रॉब्लेम आहे कि बापाला ज्ञानाविषयी तळमळ नाही असा गैरसमज आहे? 
खंडू हे एक हिरॉइक  पात्र आहे ह्यात शंका नाही त्याला मर्यादाही आहे किम्बहुना तो विशाल खंड आहे पण शेवटी मर्यादाखंड आहे. 

                          १३  कुणबी 
शेतकरी समुदायातला तिसरा  महत्वाचा समूह आहे कुणबी! नेमाडे इथे कुणबी जीवनाचेही दर्शन घडवतात मुख्य म्हणजे मावशीच्या मुलीचे लग्न एका छोट्या शेतकऱ्याशी होते. त्याच्या वाट्याला नेमके शेत असे येते कि ज्यात दसऱ्या दिवशी सगळे गाव्  घुसते त्यामुळे  त्याने पिकवलेले अर्धे पीक हे असेच दडपले वा पळवले जाते व तो नशिबाला दोष देत राहतो कुणब्याला  काय कुणीही यावे दडपावे ह्याचे चित्रण इथे येते. मराठीत कुणबी समाज तपशीलवार आणला तो आनंद यादवांनी! त्यांच्यापेक्षा अधिक काही नेमाडे सांगतायत असे वाटत नाही. 
आणखी एक कुणब्यासारखा पण सेवक नसणारा समूह शेतसेवक सालदारांचा ! हे शेतसेवक सालदारच खरतर विठ्ठलांची शेती सांभाळतायत आणि विठ्ठलराव त्यांना ! हे नाते प्रेमाचे करण्यात विठ्ठलरावांना यश मिळालेलं दिसते. ह्यातील एक सालदार तर स्वतःचे तमाशा मंडळ काढतो आणि विठ्ठलराव त्यांना मदत करतात तोही तमाशाआधी त्यांचे नाव प्रत्येक शोआधी महापुरुष म्हणून घेतो. विठ्ठलरावांच्या  मृत्युनंतर येणारी ही  व्यक्तिरेखा मनात राहते 

                 हिंदू मानसिकता
हिंदू मानसिकतेची तीन  वैशिष्टे 
१) सर्व गोष्टी बद्दल उत्सुकता  
२) सर्व माणसांबद्दल आस्था 
पण ह्या  उत्सुकतेचे जिज्ञासेत व चिकित्सेत   रुपांतर होत नाही किंवा आस्थेचे रुपांतर करुणेत होत नाही. नेमाडेंच्या क्षेत्रदार नायकांतही हे वैशिष्ट आहे. ह्यातील खंडूत जिज्ञासेचे रुपांतर चिकित्सेत झाले आहे  पण आस्था  मात्र  शेवटपर्यंत हिंदू आस्थाच राहते करुणा होत नाही. तिसरे वैशिष्ट
३) समाजाविषयीचा क्षोभ 
पण या क्षोभाचे रुपांतर तीव्र संतापात होत नाही 
नेमाडेंचा क्षेत्रदार नायकांचे हेही वैशिष्ट आहे. आणि ते कुणब्यातही आढळते. 
ह्या मानसिकतेचा प्रचंड प्रभाव नेमाडेंच्यावर लेखक म्हणून पडला आहे आणि  क्षेत्रकार समूहाला त्याच संवेदनशीलतेने अभिव्यक्त केले गेले आहे. 
       १५ शेतमजूर, सेवक आणि कृषी दास

नेमाडे ह्यांच्या  ह्या कादंबरीत शेतमजूर मात्र येत नाहीत आणि येतात तेव्हा ते ज्यादा भाव मागणारे व वाढवणारे म्हणून. स्त्रिया तर मजूर म्हणून येतात त्या शेंगासाठी, दह्यासाठी, ताकासाठी!  गप्पा आणि श्रम एकत्रच चालतात आणि त्यातून गावातल्या अनेक भानगडी उलगडत जातात. एक ठिकाणी मात्र मजूर भाव वाढ करून मागतात ती भावडू देत नाही आणि मग चोरी होते. वडील विठ्ठलराव हि चोरी मजुरांनी केली असे सुचवतात पण ती करायला आपणच भाग पाडले असेही सांगून भावडूला दटावतात शेतकऱ्यांची कादंबरीभर शेतमजुरावर टीकाच चालू राहते. शेतमजुरांची बाजू मांडलीच जात नाही जुनी व्यवस्था नष्ट झाल्याने फुटके मजूर नाहीत आणि नवे मजूर परवडत नाहीत अशी काहीशी अवस्था दिसते आणि त्यात तथ्यहि आहे. खरेतर हा त्रांगडा आहे कारण शेतीत उत्पन्न नाही आणि ग्यारंटी नाही त्यामुळे भरपूर मजुरी देणे परवडत नाही आणि अल्प मजुरी मजुरांना परवडत नाही खरेतर शेती ह्या धंद्याचीच ही शोकांतिका  आहे.                  
शेतकरी समूहातील पूर्वी अस्तित्वात कृषी दास समूह मात्र नष्ट झाल्याचे हिंदुत स्पष्ट होते मात्र जिथे वेठबेगारी संपलेली नाही तिथे तो आजही आहे हे इथे सांगायला हवे किंबहुना आदिवासींना कृषीदास करणारा एक मोठा शोषक वर्ग भारतात आजही आहे. 



    १६ बायका: बायको ,सेविका आणि मजूर 

शेतकरी समुदायातील पाचवा समूह  बायकांचा होय. त्याचे सर्वाधिक चित्रण हिंदुत येते. हिंदू शेतकरी समुदायात बायको ही मोठी सेविका. त्यामुळे हिंदुत येणाऱ्या बायका ह्या प्रामुख्याने सेवक म्हणून येतात. सर्वात प्रथम सीता आज्जी येते तिचे हे दुसरे लग्न आणि विठ्ठलरावांचेही साहजिकच अड्जसटमेंटची पूर्ण तैयारी करूनच झालेले  पण ते अतिशय यशस्वी होते. ती ह्या घरात येताक्षणीच कुणब्याची सर्व कामे सुरु करते आणि सावत्र मुलीला छातीला लावते. स्वभाव मुळचाच मायाळू तो इथे प्रकट होतो. नवरा काहीसा तालेवार पण मध्यम मार्गी! त्याला ती स्वीकारते त्याच्यापासून तिला मुले मुली होतात. मात्र कुंडलिक बुवांचा पिंड धार्मिक असतो व  तसाच टिकतो.  तिचा मुलगा हुना देशभक्त ! तो देशासाठी फाशी जातो. त्याची बायको आंधळी होते. तिने सांभाळलेली चीन्दीही घरी येते. त्यामुळे सर्व आशा विठ्ठलरावाभोवती केंद्रित व्हायला लागते. ही सीता आज्जी सर्व गावाची आई ! तिचा स्वभाव कष्टाळू मायाळू आणि धाडसी ! त्यामुळे म्हातारपणात ही ती दीर्घप्रवास करते. परिस्थितीपुढे हार न मानता झुंजण्याची तिची वृत्ती अनेक प्रसंगात व्यक्त होते. कुठे वाकायचे आणि किती वाकायचे हेही तिला नेमके माहीत. वेळप्रसंगी नवऱ्याला न सांगता प्रसंग निभावण्याचीही तैयारी ! तिचे हे गुण  अनेकदा  पणाला लागतात. विठ्ठलराव तिचा एकुलता एक मुलगा आजारी पडल्यावर ती नाना  उपाय करते आणि शेवटी पुरोहित समूहातील वैद्य मार्कण्डेय देशपांडे ह्यांच्या घरी  जाते आणि तिथे पैसे नसल्याने मोबदला  म्हणून शेतमाल न्हेते, तूप न्हेते त्यांच्या  घरातील पडेल ती कामे करते  वैद्यराज विठ्ठलरावांना  करण्याचे सर्व उपाय करतात आणि बरे झाल्यावर हसत खेळत निरोप देतात. सीता आज्जीचा माणसांना जिंकण्याचा स्वभाव तिला इथे मदत करतो. हीच सीता जावळासाठी मुंजोबापर्यंत भिडते जावळ काढते .  एकंदरच जुन्या काळातील क्रियाशील शेतकरी स्त्रीचे ती एक चालते बोलते उदाहरण म्हणून समोर येत रहते. 
तिचे शेतीविषयी ज्ञानही अफाट ! शेतीत कुठे काय हे तिला नेमकं माहीत ! ती म्हणजे घरातल्या शेतीचा  विश्वकोष ! बी बियांनी कुठं कश्यात साठवायची ते माहित !
तीला सर्वांच्याबद्दल कळवळा ! लळा ! माया! ती सर्वांची हलकी फुंकर ! बोलणं सर्वांशी गोड ! सर्वाबद्दल आपुलकी ! तिचा शेवट मात्र खाटावर पडून ! तिचा हा खाटपसारा कुणालाच आवडत नाही. शेवटी कुलूप डोक्यावर पडून जखम. एकंदरच दुःखी शेवट! ह्या सीतेला दोन सुना थोरली थोरला मुलगा फाशी गेल्याने उरलेली आणि आंधळी झालेली काकू तर दुसरी खंडेरावची आई ह्या आंधळ्या काकूचे संसार नीट होण्याआधीच विधवापण आणि आंधळेपण वाट्याला आलेले नशीब हलवते. खंडेरावची आई ही दुसरी सून ती आपल्या मुलींना  स्वार्थपारायणतेचे धडे देते सासरपासून वेगळे काढते बिलंदर आणि व्यवहारी बनवते आज्जीने सांभाळलेली शेती ही खंडूची आई वाढवते पण त्यामुळे मजूर मिळत नसल्याने घरातील सर्व मजूर होतात. भावडूही ! ती प्रेमळही त्यामुळे सूर पारम्ब्याच्या   खेळात खंडूला लागते तेव्हा ती धावतपळत येते. तिची दुसरी एक बाजूही हिंदुत येते. जेव्हा तिच्या  पतीचा मृत्यू होतो तेव्हा शोकग्रस्त  परीस्थितीतही ती व्यवहार विसरत नाही आपल्या चारही लेकिंच्यात ती घरातले सारं  सोनं आणि नाणं वाटून टाकते हे करताना आपल्या विधवा सुनेचा आणि भावजयीचा हक्काचा वाटाही त्यांना देत नाही किंबहुना ह्या दोघी हक्क मागतील ह्या भयाने केलेले हे कृत्य असावे असे वाटते . नवऱ्याचा मृत्युनंतर हिशेबी डोके हिशेबच पाहते जे नक्कीच स्वार्थी वाटते . सर्वात वाईट म्हणजे हे करताना ती  साधी अनुमतीही घेत नाही. खंडेरावाबद्दल तिला अविश्वास असावा असे वाटते श्यामची आई लोप पावलेली इथे स्पष्ट जाणवते. लेकी आणि जावयांवरचा तिचा विश्वास काहीसा अनाकलनीय तिला दोन मुले एक भावडू  त्याच्याशी लग्न करून आलेली सोना आंधळ्या काकू प्रमाणे तिच्याही वाट्याला विधवापण येते. घराची सर्व कामे करणारी सोना सासुरवास सोसत दिवस काढते बायकांच्या  भांडणात पडायचे नाही म्हणून तिचा नवरा ह्या सासुसुनेच्या  भांडणात भाग घेत नाही एकदा घेतो आईचे बोल खातो पुढे हेच खंडेरावाचे होते. सोना  बिनचेहऱ्याची सून बनते. नंतर 'बिन चेहेऱ्याची विधवा सून' ! तिची सासू तिला राब राब राबवते आणि शेवटचा दिवसात रंकाची पार्वती करते तिच्या हक्काचे तिला मिळत नाही. 
चारचारपानात एकेका स्त्रीलाही उभे करतात नेमाडे ! खंडेरावाच्या  चारही बहिणी आणि मेव्हणे असे येतात. मित्राचा विश्व्सासघात करून त्याचे घर बळकावणारे वडील मेहुणा , कॉन्ट्रेक्टर  धंद्याखाली दारुडा पार्टीबाज झालेला दिल्लीकर मेहुणा, रेल्वेतले व सासरकडचे शक्य असेल ते समान गोळा करणारा गार्ड मेहुणा, पाटबंधारे खात्यातला भ्रष्ट सिविल इंजिनियर मेहुणा आणि त्यांना साथ देणाऱ्या खंडेरावाच्या  व्यक्तीस्वातंत्र्यवादी, भांडणकाढाप्रविण बहिणी ! स्वार्थपरायण आणि बिलंदर ! साठ्ठोत्तरी पिढीतील हि भ्रष्ट आचारी कीड ! तिची विविध रूपे ह्या मेहुण्यांच्या  रूपाने येतात नेमाडे ह्यांच्यातील नैतिकता ह्यांच्या  चित्रणात प्रखरपणे व्यक्त होत राहते. मात्र नेमाडेंच्या इतर नायकाप्रमाणे खंडेरावहि प्रत्यक्ष कृती करत नाही. एकदा बोलायला जातो तर वकील मेहुणा त्याला व्यवहार शुन्य म्हणतो. मग खंडेराव गप्प. 
ह्यातील निळूकाकाची बहिण सुमीचा वयाचा सोळाव्या वर्षी बाळन्तपणात झालेला मृत्यूही चुटपूट लावणारा!
सर्वात वाईट म्हणजे विठ्ठलरावांच्या मृत्युनंतर सासूने दिलेला सोना व पैसा घेऊन सर्वच जावई व मुली पसार होतात आणि उरते ते त्यांच्या भांडवली ओरबाडणाऱ्या प्रवृत्तीचे व्रण ! . 

विठ्ठलरावांच्या मृत्यूने ह्या डोलाऱ्याचा अंत होतो आणि थोरल्या बायेच्या  पुताच्या उंबरात लेकरं रंगू दे देवा _ _ _ _ हो देवा_ _ _ _ _
अश्या नव्या डोलाऱ्याचे संसूचन करून हा भाग संपतो. 

                 १७ दास समुदाय 
हिंदुतील सर्वात वादग्रस्त भाग आहे भारतीय खेड्यातील अत्यंज हा सर्वात शोषित दास समूह ! भारतीय व्यवस्थेतील  दास  DAS हा एक शोषित समुदाय आहे  . तो 
गावदास GAVDAS /SI I.E. UNTOUCHABLES
नगरदास NAGARDAS/SI
देवदास DEV DAS/ DEV DASI
राजदास RAJDAS/SI
गृहदास GRUHDAS/SI
व्यापारदास VYAPARDAS/SI
कृषिदास KRUSHIDAS/SI
पशुदास PASHUDAS/SI
गणिका GANIK/KA ह्या समुहानी  बनलेला आहे.
हा गावदास समुह साठोत्तरीशी संबधित असल्याने थोडा खोलात जाऊन तपासावा लागेल 
मराठी साहित्यात जो साठोत्तरी प्रवाह आला तो बौध्द आणि वैष्णव ह्यांच्या नेतृत्वाखाली आला होता . साहजिकच ह्या लोकांनी शैवांच्याकडे साफ दुर्लक्ष केले शब्दवेधच्या १९९९ च्या नव्वदोत्तरी विशेषांकात मी शैवांनी काय करायचे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तर सोडाच पण प्रश्नाची साधी दखलही कुणी घेतली नाही . नंतर अभिधाला १० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी  मुद्दाम साईबाबा डॉट कॉम ही दीर्घकविता वाचली तेव्हाही शैवांच्यावर कसलीही चर्चा झाली नाही जणू शैव अस्तित्वातच नाहीत अश्या तऱ्हेने माहौल बनवला गेला होता . अनेकांना तर असा काही प्रश्न अस्तित्वात आहे ह्याची कल्पना न्हवती त्यामुळे शैव मुदद्लातच मोडीत निघाले आणि नवबौद्ध आणि वैष्णव ह्यांच्यातच साहित्यिक वर्चस्वाची लढाई होणार हे स्पष्ट झाले ह्या लडाईत कोण कुणावर हल्ला करणार एवढाच प्रश्न होता आणि शेवटी वैष्णवांनी हल्ला केला तो भालचंद्र नेमाडेंच्या हिंदू ह्या कादंबरीमार्फत ! आत्तापर्यंत नेमाडे कसे थोर आहेत हे सांगणारे रावसाहेब कसबे ह्या हल्ल्याने ताळ्यावर आले . मी २३ वर्षे जे ओरडून सांगत होतो तेच मुद्दे घेवून  कसबे आता बोलायला लागले 
कसब्यांना विचलित करणारे असे हिंदुत काय आहे ?
हिंदुत गावदास  समूहाची  १) पारंपारिक व २) आंबेडकरवादी अशी दोन रूपे येतात  ह्या दोन्ही दरम्यानचा अत्यंत ज्याच्या आत क्षोभ आहे तो ही येतो महार गटाच्या रूपाने !  स्वतःच्या सामाजिक स्थितीमुळे वाट्याला अन्याय येतोय हे कळलेला  संतापलेला महार शेवटी आपला क्षोभ  आपल्याच जातभाईवर काढतो. काय करायचे हे न कळल्याने करण्यात आलेला हा आक्रस्ताळेपणा आहे. त्याउलट हनुमंत मात्र आंबेडकरवाडी होऊन पारंपारिक व्यवसाय टाकतो आणि  दारूचा व्यवसाय सुरु करतो. नेमाडे तो दारूचा व्यवसाय का पत्करतो हे खोलात जाऊन न तपासताच वास्तववादी चित्रण करतात ही नेमाडेंची मर्यादा!
ह्या कादंबरीतला सर्वात वादग्रस्त भाग आहे तो नवबौद्धांना बोचणारा बौद्ध धर्मविषर्याचा भाग! आतापर्यंत नेमाडेंची भलावण  करणाऱ्या नवबौद्धांना उगाच नाही नेमाडेंचा राग आलाय ? रावसाहेब कसबे  बहुदा हिंदू वाचूनच नेमाडेंच्या विरोधात गेलेत हा उल्लेख असा येतो 
"हिंदूशास्त्रज्ञ देवदत्त म्हणाले कि जैन आणि बौद्ध धर्मचौर्य करणारे पंथ आहेत. भांडवलशहा पंथ आहेत. अनेक मोठमोठे निरिच्छ श्रमणक  तत्वज्ञ मोहनजोदडो काळापासून आर्यावर्तात लोकजागृती करत होते. त्यांचे विचार महाविरने  आणि गौतम बुद्धाने  शिकून घेतले आणि त्यांना डच्चू दिला. त्यांच्याबद्दल साधी कृतज्ञताहि दाखवली नाही .  चार्वाक सोडले  तर बिचाऱ्यांची नावं सुद्धा कुणाला माहिती नाहीत मख्खली गोसाल, पुरण कस्सल, आलार कोलाम, पकुध कात्यायन, अजित केशकंबळी, संजय बेलाठीपुत्र- आणखी कोण कोण- उद्दक रामपुत्र, निकांठा नागपुत्र हे विलक्षण विचारवंत खालच्या दर्ज्याचे, खालच्या जातीचे, क्षुद्र वर्गातले, आदिवासी गरीब घराण्यांतले लोक दिसतात. महावीर- बुद्धांसारखे उच्चवर्गीय क्षत्रिय राजपुत्र नक्कीच नव्हते. श्रीमंत श्रेष्ठी व्यापारी राजेवाडे अश्यांचा आश्रम ह्या भणंगाना कुठून मिळणार? हे नुसतं विचारात सोफिस्टीकेशन  जोपासणारे श्रमण कुठेही नागडे हिंडायचे " (३९५)
                                                                    किंवा 
बौद्ध धर्म शहरी असल्याने तो टिकला नाही 
                                                                     किंवा 
बौद्ध धर्माने आपल्या चांगल्या पुराकथा  नष्ट केल्या 
                                                                    किंवा 
लहान मोठे काळे सावळे शेंड्या जानवी प्रशस्त पोट तावातावाने  मंत्रघोष  करत इतक्या सकाळी धडपडत येउन कुठल्याही यजमानाच्या पूर्वजाच्या सदगतिसाठी  दूरदूर डोंगरदऱ्यात खेडोपाडी हे ईश्वराचे पुरोहित असे तत्पर काळेभोर लठ्ठ प्रशस्थ वैदिक ब्राम्हण  सदैव हजर असल्यावर शहरी 
बौध्दधर्म नाहीसा झाला ह्यात काय नवल ? 
नेमाडेंचा हा आकस कि फार विचार करून काढलेला निष्कर्ष ?
ह्यातील मुद्द्यांचा  आता विचार करू त्यातील पहिला मुद्दा बरोबर आहे दुसरा चुकीचा आहे बुद्ध शहरांपेक्षा खेड्यातच अधिक हिंडला आणि त्याची धर्म तत्वे शहर व गावे दोघांनाही लागू होतात ती फक्त शहरी असती तर चीन, कोरिया, जपान वगैरे देशातील खेडेगावात कशी काय टाकली? बौद्धधर्म ह्या देशातल्या खेडेगावात कसा टिकला ? तेव्हा बौद्ध धर्म शहरी म्हणून टिकला नाही ह्या मुद्द्यात काही अर्थ नाही . तिसरा मुद्दा पहिली गोष्ट म्हणजे आधीच्या पुराकथा नष्ट झाल्या नाहीत त्याउलट लिखित स्वरुपात पौराणिक म्हणून अवतरलेल्या दिसतात दुर्दैवाने त्यांचे वैष्णवीकरण झाले हे मात्र खरे ! त्या भ्रष्ट झाल्या हे खरे ! बौध्द धर्माने उलट काही नव्या कथांची भर घातली आणि भारतीय संस्कृती समृध्द केली असो.
हिंदुत महाराखेरीज घरच्या चाम्भाराचे आणि ह्या समाजातील काकुचेही दर्शन होते ते मर्यादेत होते .  खंडेराव जेव्हा पुढचा शिक्षणासाठी मराठवाडा विद्ध्यापिठात येतो तेव्हा  त्याचा संपर्क नव्याने येतो मात्र खेड्यात असताना असलेला आकस ह्या शहरात निवळलेला  दिसतो. थोडी परिपक्वताही आलेली दिसते. 
          
     
             १८ व्यापारी समुदाय
शेतकरी समुदाय हा काही एकट्याने जगणारा समुदाय नव्हे त्याचा पुरोहित , शासक ,  व्यापारी
अश्या अनेक समुदायांशी, त्यातील समूहांशी, समूहातील गटांशी सबंध येत असतो. नेमाडे ह्या सर्व समुदायांशी येणाऱ्या संबंधांना साकार आणि सादर करतात ह्यातील
दुसरा मुख्य समुदाय आहे व्यापारी समुदाय!  हा समुदाय 
श्रेष्ठी / भांडवलदार SRESHTHI
निर्माता PRODUCER
कारागीर ARTISANS
वंजारी WANJARI/CARRIERS
वितरक DISTRIBUTORS
दुकानदार SHOPPERS
कामगार WORKERS
भटके विक्रेते BHATKE
व्यापारी अंत्यज चांभार व ढोर

ह्या समूहांनी बनतो अंत्यजातील चांभार व ढोर उत्पादक असल्याने त्यांचा थेट संबंध व्यापारी समुदायांशी येतो पादत्राणे बनवणे व विकणे हा त्यांचा व्यवसाय पादत्रानांचे factory उत्पादन सुरु झाले आणि चर्मकाराचा फक्त चप्पल दुरुस्ती पुरता उपयोग कि काय अशी शंका निर्माण झाली. हिंदुत गावदास चाम्भाराचे चित्रण येते आणि त्यानिम्मित्याने गावातली चाम्भाराची वाताहातही येते. 
हिंदुतील दुसरे व्यापारी चित्रण हे सकालेचा ह्या जैन मारवाड्याच्या निमित्त्याने येते. वडिलांनी स्वयंपाकासाठी म्हणून राजस्थानातून मोरगावात आणलेला साकलेचा हा मारवाडी पुढे वाणी बनतो आणि नंतर हे घराणे श्रेष्ठ बनते. साहजिकच धनमत्सर जागा होऊन वावड्या उठायला लागतात. 

हिंदुतील तिसरे चित्रण हे काहीसे सामुहिक आहे. मराठवाडा विद्ध्यापीठ तयार होत जाते तसे तसे कारागीर वर्गातील छोटे छोटे व्यवसाय करणारे अनेकजण विद्ध्यापिठाच्या परिसरात जोडधंदे किंवा धंदे टाकायला लागतात आणि हा परिसर छोट्या धंद्यांनी गजबजून जातो. शेतीच्या धंद्यात चोरल्या जाणाऱ्या विजेविषयी अवाक्षरही न काढणारे नेमाडे इथे मात्र त्याची चर्चा करतात त्याचे कारण शेतकऱ्यांची वीजचोरी त्यावेळी अस्तित्वात नसावी असे वाटते. न्हाव्यापासून टायपिंगपर्यंतचे अनेक कारागीर धंदे इथे फक्त उल्लेखाने येतात त्यानंतर तपशिलाने येते ते हॉटेल व हॉटेलमधली शेरोशायरी ह्याशिवाय अनंतरावाच्या निमित्ताने पत्रकारिता त्यातील उमेदवारी आणि पाट्या टाकणे. शिक्षणाचे कसे व्यवसायात रुपांतर होते आहे ते नेमाडेंनी चतुष्ठकात सांगितले होतेच ते इथे कुलसचिवाच्या संदर्भात काही नवे प्रसंग घेऊन येते. 
ह्या वर्गातील वंजारी वा तत्सम भटक्या व्यापारी समुहाचे चित्रण येते ते 'लभाण्याच्या रुपातलभाण्या हा समाज लढाईला लागणाऱ्या शास्त्रांचे उत्पादन  पुरवठा करत असतोहरिपुरा हे गावहोळकरांचे  पेंढारी त्यांच्यावर हल्ले करतातत्यांच्या माना मुरगाळतात टापाखाली तुडवतातमग बायकांना गाड्यात टाकतात ते त्यांना विकायला ! लेकुरवाड्या बायका बाजारात कमी भावाने जातात उरते ते जळलेले गावनेमाडे अत्यंत त्रयस्थ शैलीत हा विध्वंस मांडत जातात लभाण्याचे शेवटचे शब्दआम्ही कोणास काय वाईट केलेआम्ही ज्या लष्कराला पाहिजे त्याला   माल पुरवतो पेशवा असोशिंदे  असो वा टोपीवाला असो            हे तुमच्या होळकर सरकारला मानवल नसेलतर त्याचा सत्यानास होईललाभान्यांच्या व्यापाराची झालेली ही राखरांगोळी चटका लावतेशेवटी वाचलेल्या दोन स्त्रिया आश्रयाला येतात तेव्हा त्यांना मोरगावची  रंडी बनणे एवढा एकच पर्याय उरतो आणि तेव्हा त्यांना आमच्याकडे पाठवा असा आदेश येतो तेव्हा त्यांना पाठवलेही जाते व्यापारी समूहाची ही शोकांतिका मनात घर करते
कारागीर हा व्यापारी समूदायातला चौथा समूह शाळेबाहेर ह्या कारागिराची शाळा असतेकुंभार-मडके-चाकमांग -कणगीचांभार-कातड कातनसोनार-दागीनामुसदागिनालोहार-भट्टी-विळीसुतार-ओंडका-खुर्ची अश्या त्रयिंचा उत्पादन कसं करतो ह्याचा मागोवा खंडेराव घेत जातो पण हे कारागीर फार तपशीलवार येत नाहीत.    
भारतातील बहुतांशी भटके समूह हे व्यापारी समुदायाशी जोडले गेलेत आणि हिंदुत त्यांचेच उल्लेख येतात इतर भटके समूह फार कमी आढळतातह्या समूहातील सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. 

        १९  पुरोहीत समुदाय
व्यापारी समुदायाबरोबर येणारा दुसरा समुदाय हा  पुरोहीत  समुदाय आहे हा समुदाय हा 
धर्मप्रमुख 
धर्मशास्त्री SUPREME JUDITIAL DHARMSHASTRI
न्यायाधीश JUSTICE-NYAYADHISH
वैद्य VAIDYA
ब्राह्मण BRAHMINS
गुरव GURAV
भगत BHAGAT
महाभक्त संन्यासी साधक योगी  BHAKT
भटके BHATKE SADHU
देवसेवक SEVAK 

अशा समूहांनी बनलेला आहे
नेमाडे दशक्रिया विधीतील  ब्रम्हणांची ज्या तऱ्हेने तरफदारी करतात ती तऱ्हा धक्कादायक आहे खरी पण सामान्य हिंदूची मानसिकता त्यातून व्यक्त होते कादंबरीत निर्वंश होऊ नये म्हणून सोन्याची मांजर अर्पण करायला लागणारा भट आहे पण हा भट खलनायक म्हणून येत नाहीएक सल्लागार म्हणून येतोमात्र उत्तरेकडच्या पंड्याचे चित्रण मात्र निगेटीव रंगात येते
खंडेरावच्या घरातच एक धर्माधिकारी पुरुष जन्मतोतो म्हणजे निळोबा काका जो पुढे बुवा होतो आणि वारकऱ्यांचा धर्मपुरुष बनतो
गुरव मात्र फक्त वांजंत्री वाजवायपुरते येतात
मार्कण्डेय देशपांडे हे वैद्यांचे पात्र मात्र नेमाडेंनी अतिशय प्रभावीपणे उभे केले आहे कडक स्वभावाचे पण मऊ मनाचे है वैद्य ब्राम्हन्य सोडत नाहीत पण माणुसकीही सोडत नहितते शेवटी विठ्ठलरावांना वाचवतात
भगतांचा उल्लेख दोन तीन पैरात येतो
वारकरी भक्त मात्र नेमाडेंनी मुबलक उभे केले आहेखुद्द विठ्ठलराव हे साधक म्हणून येतात त्यांच्या वडिलांनाही एक शैव योगी भेटतो आणि चांगले मार्गदर्शन करतोत्यामुळेच कुंडलिकबुवा संसारात परततात
धर्मसेवक नाहीत मंदिरेही नाहित
आश्चर्यकारक रित्या दास मात्र तीरोनी आत्याच्या रूपाने येतोतिला एका अर्थाने देवदासी म्हणूनच महानुभव मठाला अर्पण केले तीचे लांब केस कापणे अंगावर येते
अंत्यजाना मंदिर प्रवेश मिळायलाच हवा अशी ठाम भूमिका नेमाडे घेतात पण प्रत्यक्षात  मंदिरप्रवेश झालेला दिसत नाहीमात्र सर्व हिंदू समान ही आस्था कादंबरीभर स्पष्टपणे वावरते 
        २०  पशुपालक समुदाय
व्यापारी समुदायाखालोखाल दुसरा महत्वाचा समुदाय हा पशुपालकांचा  समुदाय आहे  कारण खंडेरावाचे ह्या समुदायातील मेन्ढपाळ समूहातील रेनी बरोबरचे प्रेमप्रकरण. 
रेनीने जीव वाचवल्यामुळे तिच्या प्रेमात पडलेला खंडेराव पुढे तिच्याशी सलगी वाढवत न्हेतो आणि पुढे शारीरिक घसट ही वाढवतो किंबहुना तीच पुढाकार घेते. खंडेरावाचा बालपणाला दोस्त हा शेअरहोल्डर. तो रेनीच्या बापाला सांगतोही  पण तो लहान पोराची लिंगघुसळ म्हणून उडवून लावतो. 
भारतात पशुपालक समुदायाची म्हणून एक नेटसंस्कृती आहे आणि त्यात
 श्रेष्ठी 
 क्षेत्रकरी  
धनगर SHEPHARDS
गोपालक  GOPALAKS
खाटिक/ पारधी  BUTCHERS
कामगार WORKERS
सेवक SERVICERS
महार ढोर वगैरे दास 
भटके BHATKE
ह्या समुहाचा समावेश होतो .
 अनेक क्षेत्रकार हे शेती व पशुपालन एकत्रच करतात फक्त शेतकरी समूहातील क्षेत्रकरी हा शेतीला  प्राधान्य देतो तर पशु पालन समुहातील  क्षेत्रकार हा पशुपालनाला. गोपाळ आणि मेंढेपाळ हे अनेकदा छोटी शेतीही करतात. अंत्यजातील महार मेलेले पशु गोळा करतात तर ढोर चमडे सोलतात हा समुदाय समाजाला सर्व पशुजन्य गोष्टी पुरवतो ह्यात मांस, लोकर, अंडी, दुध, दही अश्या अनेक गोष्टी येतात ४०% अन्न हा समुदाय पुरवत असतो. जगातले अनेक महत्वाचे धर्म आणि राजे हे ह्या समुदायातून आलेले आहेत. 
हिंदुत प्रामुख्याने 'धनगर' समूह येतो. आखाजीला हे धनगर कायमच कुणब्यांना हरवतात. मेंढ्यांना घेऊन ते नव्या नव्या कुरणात हिंडतात व त्यांना नवे नवे सापडते म्हणून ते नवीन नवीन रचना करू शकतात असे कारण नेमाडे देतात. 
महाराष्ट्राचे आद्य  सम्राट सातवाहन हे ह्या धनगर समुहातून आल्याने साहजिकच हाल आणि गाथासप्तशति येते आणि त्या निमित्याने दोन इनामी गावे नाकारणारा मोरगावचा कवीही येतो. 
ह्यातील सर्वात शोकात्म प्रसंग युरियाचा आहे  एकदा  पाण्यात युरिया घालून खंडू विहिरीत उतरतो आणि युरियाचे पाणी तहानलेली  मेंढर पितात आणि हिज्जे होऊन मरतात प्रथमच बापाचा कडेलोटी संताप होतो पण धनगरांना पैसे देऊन हे प्रकरण मिटवतात आणि ह्या प्रकरणात खंडूचे नाव येऊ देत नाही. 

धनगरांच्यानंतर येतात ते गोपाळ चौधरी अहिर हे गवळी असल्याने त्यानिमित्ताने गवळी येतात मात्र नेमाडेंचा त्यांच्यावर फार फोकस आहे असे वाटत नाही

                  २१ शासक समुदाय
ज्ञानकरीपशुपालनव्यापारी समुदाया बरोबर येणारा आणखी एक समुदाय हा शासकांचा आहेशासक समुदाय हा
राजा वा राज्याधीपती RAJYADHIPATI
पंतप्रधान PRIME MINISTER
मंत्री MINISTERS
सेनापती SENAPATI
योद्धे WARRIORS
अधिकारी OFFICERS
सैनिक SOLDIERS
भटके BHATKE
सेवक SEVAK
 ह्या समूहांनी बनलेला असतो 
नेमाडे खंडूच्या नागोराव ह्या सातव्या पूर्वजाने इंग्रजांना कशी मदत केली ते शाहिरी शैलीत चौके सांडत इथे सांगतात. लभान्यावर पेंढारयांनी केलेले आक्रमण हे मोरगावात भय निर्माण करते आणि हे पेंढारी दाराशी येउन ठेपताच काय करायचे ह्याची तैयारी सुरु होते. होळकर-इंग्रज संघर्षातून निर्माण झालेले हे पेंढारी असंत रानवट! ते होळकरांच्या बाजूने असल्याचा संशय त्यामुळे होळकरांची मदत मिळणे  अशक्य म्हणून नागोराव इंग्रजाची मदत घेतात. खान्देश ताब्यात घेण्याची ही सुवर्ण संधी इंग्रज कशी सोडणार ? ते पेंढ्याऱ्यानचा  नाश करतात व मदतीबद्दल तीस परगणे  आणि चराऊ रान एवढी जमीन देतात.
नेमाडे ह्या निमित्त्याने शेतकरी समुदायातील तरुण शिपाई का होतात कसे होतात ह्याचा एक लेखाजोरवाच मांडतात आणि शिपाई समूहाबद्दल एक वेगळेच सादरीकरण आपणापुढे ह्या निमित्यांने पुढे येते नेमाडेची नजर कशी चौकस  फिरत असते ते इथे स्पष्ट होते.

हिंदुत होळकरांचे उल्लेख सोडता मुख्य शासक येत नाहीविठ्ठलरावांच्या सहवासात दुय्यम उपशासक येतात पण त्यांनाही फार जागा नाही प्रशासक येतात पण तेही कमी 
पेंढाऱ्याचा मात्र दीर्घ उल्लेख आहे पण ते शिपाई आहेत कि उपशासक हेच कळत नाही 
नेमाडेंनी ह्या निमित्त्याने जुन्या काळातील शिपाई का शिपाई होतात ह्याचे केलेले चित्रण मजेशीर पण विचार करायला लावणारे 
अंदमानातील आदिवासींना कपडे पुरवणारे पण साबण  पुरवणारे बिनडोक प्रशासन तिडीक आणते
ह्या हूनाकाकाला फाशी देणारे ब्रिटीश प्रशासन ब्रिटीशांची काळी बाजू दाखवते
एकंदरच नेमाडेचे ह्या समुदायाशी फारसे पटत नाही हेच खरे !

        २२ आदिवासी समुदाय
आदिवासी समुदाय हा हिंदुत ह्या मनाने खूप कमी आला आहेहा समुदाय हा मुख्य समुदायांपासून पूर्णपणे स्वतंत्र असल्यानेच हिंदुत भिल्लांना जेव्हा १५ ओगस्टला बोलावले जाते  तेव्हा त्यांच्यातील एक विचारतो, "आम्ही कधी पारतंत्र्यात होतो ? हा समुदाय प्रामुख्याने
गोंड 
नाग 
गौंडनागेतर क्षेत्रजाती 
गौंडनागेतर क्षेत्राजमाती 
गौंडनागेतर अल्पभूजाती 
गौंडनागेतर शिकारजातीजमाती 
गोंडनागेतर अल्पभुजमाति 
वेठबिगार 
अश्या समूहांनी बनलेला आहेहिंदुत भिल्लाचां उल्लेख जास्त आहे

           २३ सृजक समुदाय
हिंदुत येणारा आणखी एक समुदाय सृजकांचा आहेभारतात अजिबात विकास  पावलेला 
असा हा समुदाय आहेह्या समुदायात सृजनशील समूहांचा समावेश होतो
हा प्रामुख्याने 
मुक्त (ह्यात बुद्धकेवलज्ञानीशिवप्राप्ती झालेले योगी येतात)
वैज्ञानिक  DISCOVERER
तंत्र वैज्ञानिक INVENTOR
कलावंत ARTIST
दार्शनिक DARSHNIK
नवविचारकार IDEOLOGIST
व्यवस्थापनगुरु GURU-MANEGER
चिन्हवैज्ञानिक SIGNOVENTOR
प्रोग्रामर PROGRAMMER
सेवक 
 ह्या समुहानी  बनलेला आहे.

 खंडेराव ह्या नायकाला नवविचाररचनाकार बनायचे आहे आणि त्याने सादर केलेला उतक्रांतिवरचा निबंध ही नक्कीच नवविचाररचना आहे.  विचारवंत सारेच असतात पण नवविचाररचनाकार हा दुर्मिळ असतोखंडेरावाला हे स्पष्टपणे कळलेलं नाही पण जाणवलेले नक्कीच आहे त्यामुळेच आपणाला काही नवे संशोधन करता येईल का हे ते बघतो त्याने साखळीयांना Ph. D साठी सुचवलेले काही विषय नक्कीच नवविचाररचनाकार  होण्याच्या दृष्टीने टाकलेले पाउल आहे
प्रो  मंडी ही दुसरी नवविचाररचनाकार ! तिच्यावर लिहिलेले आहेच
प्रापवार हे तिसरे!
कलावंताचाही अनेक ठिकाणी वावर आहे विशेषतः मानकापे  वानरवडे मात्र ते फार मोठ्या कुवतीचे कवी आहेत असे वाटत नाहीह्याशिवाय लोक कला  लोककलावंतांची बहर नेमाडे 
उडवून देतातमात्र तेही फार काही अभूतपूर्व करतायत असे वाटत नाही
                                                             २४ हिंदू :ग्रुप फोटो 
विठ्ठलरावांच्या मृत्यूवेळी दशक्रिया विधी होतो तेव्हा ह्या सर्व समूदायांतील विविध पात्रे एकत्र येतात जणू ग्रुप फोटो असा ग्रुप फोटो ज्याच्या केंद्रस्थानी विठ्ठलरावांचे शव आहे
हिंदू ही ह्या अर्थाने विविध समुदायांचा ग्रुप फोटो आहे
   २५ अभिव्यक्ती, भाषा, शैली आणि संज्ञाप्रवाह
नेमाडे जो प्रचंड व्याप्तीचा अवकाश निवडतात तो व्यक्त करण्यासाठी अभिव्यक्तीच्या विविध शैली निवडतात कादंबरी वाचून संपते तेव्हा अनेक गोष्टीचा कल्लोळ उडतो
सर्वात प्रथम जाणवते ते नेमाडे ह्यांचे भाषाप्रभुत्व ! खानदेशीपुणेरीगोवनकोकणीधनगरीअश्या अनेक भाषा ते सहज हाताळतातभाषेवरची त्यांची सर्वश्रेष्ठ फिरत हिंदुत दिसतेमाझ्यातरी वाचनात एवढ्या प्रकारच्या भाषा आजवर एकाच कादंबरीत कुठेही मी वाचलेल्या नाहीतनेमाडे हे साठोत्तरीतले सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत ह्याबाबत शंकाच रहात नाहीकादंबरीत नेमाडे कवितेत ढसाळ आणि नाटकात विजय तेंडूलकर एकाच काळात हे अदभूत आहेह्या पिढीवर मी वारंवार टीका करूनही मी हे म्हणतो आहे
कृषी संस्कृतीची  अभिव्यक्ति ही प्रामुख्याने तीन प्रकारे होते
संपूर्ण खेड्यातील भाषा उदागोतावळा  
संपूर्ण प्रमाण भाषा निवेदन भाषण आणि संभाषणही 
आणि तिसरा निवेदन प्रमाणभाषेत भाषण प्रमाण भाषेत आणि संभाषण ग्रामीण भाषेत 
नेमाडेंनी तिसरा प्रकार अभिव्यक्ती साठी निवडला आहे क्वचित ठिकाणी अपवाद करून


विश्वियतेने   महाकाव्य  जन्माला घातले तर सृष्टीयतेने कादंबरी प्रतिसृष्टीयतेने नवकादंबरी  इतर काही ! नेमाडे महाकाव्याची काव्यात्मकता    कादमबरीची वस्तुनिष्ठ गद्यता 
आणि नवकादम्बरीचा  संज्ञाप्रवाह ह्या तीघांचा उत्कृष्ट समन्वय करतात आणि भाषणनिवेदन
संभाषण ह्यांचा तिपेडी तोल सांभाळत एक उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण करतातनेमाडेंचा कादंबरीभर दृष्टीकोन हा वस्तुनिष्ठ आहे. 'मीयेतो तोही वास्तुनिष्ठ्वादी बनुनत्यांची चमकदार प्रतिभा तर सर्वत्र नांदते अवकाशाची नेटकी स्थापत्यपूर्ण मांडणी ते करतात आणि हेही मोजक्या शब्दात त्यामुळे कुठलाच प्रसंग प्रमाणापेक्षा जास्त लांबत नाही
मर्ढेकरांनी जेम्स जोइसकडून आणलेला संज्ञाप्रवाह नेमाडे उत्कृष्टपणे वापरतात  त्याचे सहज देशीकरण घडवतात एखादी गोष्ट कशी देशी होते त्याचे हे उदाहरण ! जो संज्ञाप्रवाह मर्ढेकराच्या कादंबऱ्यात कृत्रिम वाटत होता तो इथे सहजस्वभावी  सहजप्रभावी होतो आधीच्या चतुष्टकात नको तितके वास्तववादी झालेले नेमाडे इथे विधायक सुधारलेले दिसतात अविष्कारवाद आणि वास्तववाद ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय  समतोल इथे साधला गेलाय ह्याला आपण expressionist realism किंवा realistic expressionism असे काहीही  म्हणू शकतो दिलीप चित्रेंनी कथेत साधलेली किमया इथे नेमाडेंनी कादंबरीत साधलेली दिसते आणि हे घवघवीत यश आहे
ही कादंबरी नेमाडेंच्या आधीच्या कादंबरी पेक्षा अधिक शारीर  आहे आणि हे शारीर हालाच्या गाथासप्तशतीशी नाते सांगत येते
क्रीयांशी कधी कधी सातत्यपूर्ण होणारी थीमटिक मांडणी हे ही ह्या कादंबरीचे एक वैशिष्ट उदाहरणार्थ पान ३०८ वर येणार 'वाट पाहणंही थीम ! नेमाडे तिच्या अनेक डायमेन्शन्स शोधत राहतातह्या कादंबरीतला काळ हा विलक्षण आहे लौकिकदृष्टा तो १९४० ते १९७० आहे असे दिसते पण अनेकदा काळाची सरमिसळ झालेली दिसतेह्या पुढील भाग बहुधा इंग्लडशी निगडीत असेल  असे वाटते



मानसशास्त्रातून निर्माण झालेला संज्ञाप्रवाह हा अभिव्यक्तीवर झालेला परिणाम एकीकडे तर आशयाची संरचना करताना अर्कीओलोजी आणि समाजशास्त्र ह्यांचा पडलेला प्रभाव दुसरीकडे ह्यातून नेमाडेंची दृष्टी (विजनवाटचाल करते
संपूर्ण हिंदू ही एका अर्थाचे हिंदू संस्कृतीची समाजशास्त्रीय मांडणी आहे आणि ती करताना ते जे सांस्कृतिक उत्खनन करतात त्यावर अर्कीऑलॉजीचा  प्रभाव आहेमिशेल फुको ह्याने 
अर्कीऑलॉजी ऑफ नॉलेज लिहून जगभरच्या साठोत्तरी पिढीची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली त्याचा इथे प्रभाव आहेमात्र ही एका अर्थाने  अर्कीऑलॉजी ऑफ हिंदू सोसायटी अण्ड सेन्सिबिलीटी आहेनेमाडे स्वतःला देशीवादी म्हणवून घेत स्वतःला चमकवत असले तरी प्रत्यक्षात त्यांची अनेक झाडे ही युरोप अमेरिकेतून आलेली असतात नेमाडे उत्कृष्ट कलमकार असल्याने ते ह्या झाडांचे उत्कृष्ट कलमी झाडात रुपांतर करत असतात एवढेच ! मी मागेच म्हणटल्याप्रमाणे "लोका संगे देशी ज्ञान स्वत:चा  मात्र विदेशी पाषाणही नेमाडेंची पॉलिसी  आहे मात्र त्यावर उभा करण्यात आलेला विठ्ठल मात्र अस्सल वारकरी  देशी असतो हे मात्र खरे ! हिंदू ह्याला अपवाद नाही मध्ययुगात नवसुधारणावादी रोमॅंटिक  कवींचा प्रेमावर प्रचंड विश्वास होतानेमाडे ह्यांचाही ''जुन्या गावगाड्यात असे प्रेम होते''  असा विश्वास आहे आणि शेतीचे भांडवलीकरण झाल्याने हे प्रेम नष्ट होत गेले असे ते मांडतात
                     २६ गांधी आणि नेमाडे 
नेमाडेंच्यावर गाधीवादाचा प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे खरा भारत हा खेड्यात आहे ह्या गांधीच्या मतावर त्यांचा ठाम विश्वास आहे गांधीवादाच्या तीन गोष्टींचा नेमाडेंच्यावर प्रचंड प्रभाव आहेदुःख आणि दुःखाचा स्वीकार ही गोष्ट गांधींच्याकड़े  बुद्धाकडून आली आहेत्यामुळेच संपूर्ण कादंबरीभर दुःखाचे साम्राज्य पसरलेले दिसतेत्यामुळे ही कादंबरी दुःखांची एक मालिकाच सादर करते दुःखाचे गाधीवादी सादरीकरण हे खांडेकरांच्यात प्रचंडच आकृतीवादी  अलंकारिक पद्धतीने यायचे साने गुरुजींनी 'श्यामची आई' त्याला छेद दिला आणि दुःख साधेपणाने सादर करण्याची एक साहित्यिक शैली शोधलीनेमाडे ही शैली अधिक विकसित करतात त्या शैलीतील निरागसपणा काढून टाकतात आणि ही शैली अधिक वास्तवसन्मुख करतात
गांधीवादी दुसरी गोष्ट सर्वच समूहांच्याबद्दल आस्था प्राण्यांबद्दल आस्था ही आस्था नेमाडे ह्यांच्यात इतकी खोलवर झिरपली आहे कि ती पानापानावर सांडतेकुठलाही समूह असो नेमाडे त्याचे चित्रण आस्थेने करतात हीच गोष्ट व्यक्तीबाबत  गांधीच्या अहिंसेचे ते समर्थक आहेत पण प्रत्यक्षात हिंसेचे काही ठिकाणी अपरिहार्यत्वं ते स्वीकारतात
गांधीची गावगाड्याबाबतची गौरववादि भूमिका ते सर्वार्थाने मिरवतात वास्तव घरात हुनाकाका हा क्रांतिकारक झाल्यावर खंडेराव हा क्रांतिकारक झाला असता तर ते अपरिहार्यच मानले गेले असते पण  हुनाकाकाच्या मृत्यूनंतर आंधळ्या काकीची जी परवड होते  लोक ज्या तर्हेने क्रांतीकाराकाच्या कुटुंबाशी वागतात ते खंडेराव पाहतो त्यामुळे बहुधा तो क्रांती वगैरेपासून लांबच जातोगांधींची औद्योगिकीकरण विरोधी भूमिका खंडेरावातही लपून बसलेली दिसते आणि नेमाडेही ती निवेदनात बागवताना दिसतात
ह्या तिन्ही गोष्टी कादंबरीत आशयाची संरचना  करताना महत्वाची भूमिका पार पडताना दिसतात
२७ आजकाल नेमाडेंचा तोल थोडा सुटला असला तरी ह्या कादंबरीत मात्र त्यांचा तोल कुठेही सुटलेला नाही ते कुणाचीच बाजू घेत नाहीत अपवाद शहरी संस्कृति विरुध्द कृषी संस्कृति अन्यथा सर्वच गोष्टींचा चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही बाजू ते दाखवतात फक्त बेलाबालाच्या चित्रणात हा तोल ढळलेला वाटतो आणि स्त्रीमुक्तीवादी स्त्रियांबाबत
२८ 
थोडक्यात काय हिंदू ही नेमाडेंची कोसलाइतकीच महत्वाची कादंबरी आहे ती नवी वाट काढत नाही पण आधीच्या कृषीसंस्कृतीवर लिहिणाऱ्या लेखकांनी ज्या पायवाटा निर्माण केल्या त्यांचा ती एक महामार्ग बनवतेपण त्यामुळेच ह्यापुढे कृषी संस्कृतीवर लिहिणाऱ्या लेखकांची ती पंचाईत करणार आहे कारण हिंदुपेक्षा व्यापक कादंबरी तीही कृषी संस्कृतीवर हे एक आता आव्हानच आहेआमच्या पिढीत हे आव्हान पेलणारा कोणी निपजला तर त्याहून आनंदाची गोष्ट नसेलसद्ध्यातरी हिंदुपुढे सर्व लेखक बारके बारके होऊन गेलेत
श्रीधर तिळवे - नाईक 

(सर्व पानांचे संदर्भ पॉप्युलर प्रकाशन मुंबई ह्यांनी प्रकाशित केलेल्या२०१० पहिल्या आवृत्तीचे आहेत )











































Comments

Popular posts from this blog