वैयक्तिक पातळीवर काव्यव्यवहार कसा हाताळावा हे मला कधीही कळलं नाही . अगदी कुणी कविता चांगली आहे म्हंटल तरी त्याला काय उत्तर द्यायचं ?
कविता लिहाव्यात पण काव्यव्यवहार टाळावा हा माझा बहुदा पिंड असावा नाहीतर प्रिंट माध्यमात कविता पाठवण्याबाबत मी एव्हढा उदासीन राहिलो नसतो मला वैयक्तिक संवाद आवडायचा पण कवितेवर सार्वजनिक बोलणं फार आवडत नव्हतं त्यामुळं माझे समकालीन जेव्हा अनुष्टुभला किंवा पुढारीला कविता पाठवायचे तेव्हा त्यांचं काय करायचं हे मला कधीही कळलं नाही कवितेचा व्यवहार आपल्याविनाच चाललेला बरा असे मला वाटत होते
फेसबुकने व ब्लॉगने ( ब्लॉगवर जवळ जवळ माझ्या सर्व टाईप केलेल्या कविता एकत्र उपलब्ध आहेत )हा प्रश्न सुटला इथे जे वैयक्तिक आहे तेच सार्वजनिक आहे त्यामुळे प्रिंट माध्यमात फारश्या कविता न पाठवणारा मी फेसबुकवर मात्र सुसाट सुटलो निदान लाईक किंवा धन्यवाद देणे इतका व्यवहार मला जमू लागला कविता व इतर लेखन टाकण्याचे वडिलांना दिलेले वचन कसे पूर्ण करायचे हा प्रश्न सुटला माझा इनबॉक्समधला व्यवहार फार लांबडा झाला नाही पण काही तरी झाला अनेकांना माझा प्रतिसाद फार थंड वाटला हा धन्यवादवर बोळवण करतो असाही आरोप झाला पण त्यात तथ्य न्हवते मी चटकन खुलत न्हवतो कारण तो माझा स्वभाव होता
ह्या दरम्यान कवितेला दाद देणारी काही मंडळी मिळाली सतीश तांबे सुनील तांबे प्रणव सुखदेव च प्र देशपांडे राजेंद्र बाणाईत आणि अरुंधती देवस्थळे पुढे त्यात गणेश कनाते नितीन चांदोरकर रामचंद्र कदम नितीन माळी अशा काही लोकांची भर पडली महेश म्हात्रे , मंदार फणसे , कीर्ती शिंदे , किशोर कदम , अभिजित देशपांडे , संतोष पवार , अजित अभंग , सतीश पाध्ये , महेश पवारासारखे काही सुरवातीपासूनच आहेत माझ्या कवितेला प्रथमपासून पाठिंबा दिला तो नितीन भरत वाघ ह्याने ! माझ्या कवितेचा इतिहास माहित असणारा हा पृथ्वीतलावरचा कदाचित एकमेव कवी असावा माझ्याशी कडाक्याने भांडणारा आणि तितकेच प्रेमही करणारा तो मुंबईत आल्यापासूनच त्याला मी ओळखतो त्याची उडवली गेलेली चेष्टा मी पाहिलीये आणि आज त्याचा काळ आलाय असं वाटतं त्याची तल्लख बुद्धी मी पहिल्या भेटीतच ओळखली होती मला काव्यव्यवहार समजवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला " तुम्ही स्वतःच तुमचे शत्रू आहात "हे त्याचं पेटन्ट वाक्य पण पालथ्या घड्यावर बहुधा पाणी पडलं .
२०१४ ला दिशा बदलली पण कवितेबाबतचे कर्तव्य जारी राहिले .
ह्यात सर्वात सरप्रायझिंग पॅकेज अरुंधती मॅडम ठरल्या त्या जे काही करायला चालल्या आहेत त्याला माझ्या शुभेच्छा आहेतच आम्ही दोघे एकमेकांना फेसबुकवरच ओळखतो प्रत्यक्ष परिचय नाही माझ्या प्रवृत्तीला हे योग्य ठरावे
तुम्हा सर्वांचे आभार ! कृतज्ञता हा लोकशाहीचा पहिला पाया आहे त्यामुळे ती व्यक्त करणे आवश्यक आहे तर धन्यवाद ह्या सर्वांचे आणि इतरांचेही !
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment