Posts

मंगेश बनसोड जरतरचे प्रश्न काल्पनिक असतात आणि मी कल्पनांच्यात रमत नाही लोक जाती घेऊन येतात का ? तर कधी येतात कधी नाही काहीलोक आयुष्यभर येतात काही आयुष्यभर नाही तुझ्याबाबतीत जे काही झालं त्यात जातीयतेचा वाटा प्रभावी आहे हे तर उघड उघड मी मान्य केले आहे प्रश्न आहे उपाय काय तर सतत वर्ण जातिव्यवस्थेविरुद्ध ठाकणे शेवटी हजार वर्षाचा संस्कार आहे सहजासहजी जाणार नाही कचरा टाकायला दोन क्षण पुरतात साफ करायला दहा मिनटं कधी दहा तास लागतात त्यामुळे सफाई ही ह्या देशात सतत कन्विन्स करावी लागते तू दमून जाऊ नकोस कारण तू मी आपण सर्व सफाई कामगार आहोत आणि आपण दमून चालणार नाही अन्यथा गावच्या गावं शहराच्या शहरं कचऱ्याने भरून जातील आणि माणसं कचऱ्याखाली दबून ठार मरतील थकू नको मित्रा लढत राहू सफाई अटळ आहे कितीकाळ कचऱ्याचा वास घेत राहणार आहे ही व्यवस्था ? मुद्दा वैयक्तिक नाही सार्वजनिकच आहे तुझी केसही वैयक्तिक नाहीच आहे उलट आपली सामाजिक नीतिमत्ता किती किडलीये तेच त्यात दिसतं असो भेटीत बोलूच नेहमीप्रमाणं 
काही प्रश्नांना शॉर्टकट मध्ये दिलेली उत्तरे आता अधिक दीर्घ लॉंगकटमध्ये श्रीधर तिळवे नाईक प्रथम नाव सांगतो श्रीधर शांताराम नलिनी तिळवे नाईक कवितेचे किंबहुना कुठल्याही कलेचे मुख्य काम अनुभव देणे वा सादर करणे हे आहे आणि अनुभव हा आपल्या आसपास होत असतो घडत असतो घडवला जात असतो आणि सादरही केला जात असतो कला अनुभव सादर करत असते मीडियाही अलीकडे अनुभव सादर करत असतो किंबहुना मीडियाची अनुभव सादर करण्याची लाईव्ह टेलिकास्ट पद्धत हे एक चौथ्या नवतेचे वैशिष्ट्य आहे अशावेळी कलेचे नेमके काम काय हा प्रश्न पडतो आपण आपल्या जीवनाचे मीडियाही असतो कारण आपले अनुभव इतरांच्यापुढे सादर करण्याची खाज आपल्यालाही असते आणि इतरांच्या अनुभवात डोकावून बघण्याची खुजलीही आपण अंतिमतः मोक्षिक किंवा सामाजिक असतो हे सामाजिक अलीकडे आपण लँग्वेज ऍनिमल आहोत असे सांगत असते नो डाउट आपण प्रोग्रामेबल एंटीटी आहोत नो डाउट आपल्यातच कल्चर नामक एक अलिएन आपले डीएनए घेऊन वावरत असतो आणि रहातही  असतो पण आपल्यात हे महत्वाचे आपण न्हवे त्यामुळे हया प्रोगॅमेबल बरोबर आपण मांसल आहोत हे लक्ष्यात घ्या...