भारतीय समाजरचना आणि नेमाडें ह्यांची '' हिंदू'' भाग २ श्रीधर तिळवे नाईक ८ शेतकरी समुदाय आणि हिंदू भारतीय शेतकरी समुदाय हा हिंदुच्या केंद्रस्थानी आहे. भारतात हा कृषी समुदाय श्रेष्ठी / जमीनदार SHRESHTHI क्षेत्रकरी FARM-OWNER शेतकरी FARMER कुणबी CULTIVATERS माळी GARDENER शेतमजूर FARM-WORKERS भटके BHATKE शेत सेवक SERVICERS ह्या समुहानी बनलेला आहे. भारतातला हा सर्वात मोठा समुदाय आहे आणि ही कादंबरी त्या समुदायाला केंद्रस्थानी ठेवते. नेमाडेंचा या पूर्वीच्या कादंबऱ्यात शैक्षणिक संस्था ह्या केंद्रवर्ती होत्या आणि शिक्षणाच्या दुर्बिणीतून नेमाडे भारतीय संस्कृती हाताळायचे इथे शेती ही संस्था प्रचंड प्रमाणात येते. शेती आणि शिक्षण याचा कोम्बो ! शाळा आणि शाळा सोबती इथे येतात पण ४२ विध्यार्थ्यापैकी फक्त तिघे चौघेच मॅट्रिक पार करतात उरलेले गळून जातात त्याची कहाणी इथे येते मॅट्रिक करणाऱ्यात एक नायक खंडेराव! इथेही एक जम्प आहे आणि ...